परिमिती (काल्पनिक भयकथा)
आज खरतर उशीरच झाला तिला Bus Stop वर यायला. गिटार वाजवता वाजवता तंद्री लागली होती तिची..कोणीतरी बाहेर फट फट् आवाज करत बुलेट वरून गेलं तस ती भानावर आली..आपल् सगळ सामान आवरून लगबगीने जायला निघाली...
Bus Stop वर येताच तिने तिच्या हातातील नाजुक घड्याळाकडे पाहिले ७.४५ झाले होते..तिची शेवटची बस निघुन गेली होती. काय करावं- काय करावं असा विचार करत ती मोबाईल खेळवत होती.
तेव्हाच तिच लक्ष बाजूला गेलं. तिकडे एक मुलगा थांबला होता. ब्लॅक जीन्स आणि फिक्कट गुलाबी रंगाचा शर्ट तो ही इन केलेला, केस मस्त मागे वळवलेले..चेहर्याला सूट होणारा नाजुक काडीचा चष्मा..हातात मोठ्या डायलच घड्याळ आणि ohh myy God!!! त्याच्या उजव्या गालाला पडणारी खळी...स्स्स्स कलेजाच खलास..
थोडा सिंसियर वाटत होता पण फूल ओन मैरेज मटेरियल होता तो..त्याला पहाताच तिच्या मनात एकाच वेळी असे विचारांचे तरंग उठले ...कुठ आपल्याला पाहायला आलेला परवाचा मुलगा आणि कुठ हा..! आणि तेव्हाच त्याने ही तिच्याकडे पाहिले..हिने चपापुन नजर मोठ्या मुश्किलिने त्यावरून हटवली आणि समोर बघू लागली..
वैदेही!! मनाशीच् हसली..कुछ तो बात है बॉस!! एवढा वेळ मी त्याला बघत होते..अस आधी कधीच नाही झाल..अस मनात म्हणून तिने पुन्हा एकवार त्याकडे पाहिले..पण त्याच तिच्या कडे लक्षच नव्हतं. ती थोडी खट्टू झाली. huh!! Who cares? मी पण काही कमी नाहिए . अगदीच सुंदर नसेल पण चार चौंघीत नक्कीच उठून दिसते. एकदा पहायला काय झाल होत याला? फुकट भाव खातोय..हुड!
तेवढ्यात तिला तिच्या घरा जवळून जाणारी बस दिसते आणि ती बस च्या दिशेने वळते.
वैदेही पण कॉलेज कन्यका होती. लांब सडक मोठे मुलायम केस, नीलाक्षी निळे डोळे, गुलाबी पातळ ओठ, सरळ नाक, गोरा रंग , मोरपंखी रंगाचा कुर्ता आणि जीन्स..पाठीला तिची प्राण प्रिय गिटार.. आधुनिक आणि पाशचात्य मेहफिलिचा सुरेख संगम जणू..
तिच्या अफलातून गिटार वादना मुळे पूर्ण कॉलेज मध्ये फेमस असणारी अशी ती. कॉलेज च्या
"जवाँ दिलों की धडकन ची जान असणारी" निलपरी तिच ह्रदय कुणाला तरी पाहता क्षणी कुठ तरी हरउन बसलेली...पण होता कोण तो???
ही त्याची नेहमीची वेळ होती फिरायची..मृत्यु आणि पुनर्जन्म याच्या सापळयात अडकला होता तो..
अजुन किती काळ तो असा यातच गुरफटलेला असणार होता हे त्याचे त्याला ही माहीत नव्हते...
सुयोग नाव होत त्याच..कोथरूड मधल्या डहानुकर कॉलोनी मधल्या कुठल्याश्या खासगी बँकेत कामाला होता तो. पनवेल वरून नुकतीच बदली होऊन आलेला.
अतिशय मनमिळाऊ आणि हेल्पिंग नेचर म्हणून तो बँकेत प्रसिद्द होता. बँकेत बहुतेक मूलींच्या फेऱ्या भरपूर वाढल्या होत्या. त्या फक्त सुयोगला पाहण्यासाठी अस त्याचे वरिष्ठ गंमतीने म्हणत.
त्या दिवशी असाच तो एक ऑडिट संपवूंन बँकेत परत येत होता. बस No 102. डहानुकर कॉलनी म्हणजे मस्त एरिया..दोन्ही बाजुनी गर्द झाडी..निमुळता रस्ता..हिरवागार भाग . त्यातल्या त्यात गुलाबी वर्दळ जरा जास्तच होती तिथे.. बस मधून येताना सुयोग हे सगळ पहात येत असे. त्या दिवशी तो बँकेच्या जवळ आला होता पण बस मधून उतरायच्या आधीच 2 बाईक स्वार तिथून घाईत पसार होताना त्याने पाहिले. त्याचा बॅंकेचा शेवटचा स्टॉप असल्याने बस मध्ये फक्त तो कंडक्टर आणि ड्रायवर असे तिघेच उरले होते. काहीतरी गडबड झाली असे वाटून तो जिन्यात उतरण्यासाठी आला तोच 3 जन धडपडत घाईत कुनाला तरी शिव्या देत बस मध्ये चढले.. त्यांच्या हातातील बंदुका बघुन ड्रायवर ने तिथून पळ काढला. कंडक्टर आणि सुयोग दोघेच उरले. ते बस चालवण्यासाठी दोघांना सांगू लागले पण दोघांनाही येत नसल्याने ते तसेच थांबले.. तेवढ्यात त्या 3 पैकी एकाचा तोंडवरील रुमाल निघाला. आणि सुयोग म्हणाला राजेश तुम्ही?? ठरवलेल्या प्लान प्रमाणे काहीच न झाल्याने आधीच ते चिडले होते त्यात त्यांचे साथीदार त्यांना असे सोडून पळून गेले होते.
राजेश रागारागात सुयोगच्या जवळ जाऊन म्हणतो,
"तेव्हाच माझ कर्ज मंजूर केल असतस, तर आज ही वेळ नसती आली. पाहिले तूच मर साल्या" अस म्हणून राजेश त्यावर अंधाधुंद गोळ्या चालवतो. डोक्यातच गोळी लागल्याने त्याच क्षणी सुयोग मृत्यु पावतो.. कंडक्टर देखील घाबरून तेथून निसटायचा निष्फळ प्रयत्न करतो पण ते त्याला देखील गोळ्या घालतात. बँकेतून कोणीतरी पोलिसांना फोन केला असल्याने पोलिसांची गाडी सायरन वाजवत येते.
त्यादिवशी त्याच्या आईचा वाढदिवस असतो. घरी जाऊन तो तिला फिरायला घेऊन जाणार असतो. आपलं भविष्य, प्रोमोशन, आईची स्वप्ने, त्याच्या वडिलांच्या आशा-आकांक्षा..हे सगळ सगळ उराशी घेऊन तो बस मध्ये कोसळला..कंडक्टर आणि तो दोघेही रक्ताच्या थारोळयात पडले होते..दोघांनाही तातडीने दवाखान्यात हलवन्यात येते. कंडक्टर चा जीव वाचतो पण सुयोग ला गंभीर दुखापत झाल्याने तो तात्काळ मेला असावा अस डॉक्टर जाहीर करतात..
तेव्हा पासून सुयोग ची आत्मा ठराविक वेळी त्याच ठिकाणी विश्वाच्या चालू परिमिती मध्ये प्रवेश करत असे. त्याला मोक्ष मिळाला नव्हता. आणि अशा च एका घडिला अवचित पणे वैदेहीला तो दिसला होता..
दोन तीन दिवस वैदेही तो गुलाबी शर्टवाला मुलगा दिसेल म्हणून लवकर जात होती पण तो काही दिसत नव्हता.
मनातल्या मनात खट्टू होत होती ती. तिच्या गिटारचे सुर ही त्याच्याच विचारांच्या नादात भन्नाट लागत होते.
आज क्लास सुटायची वेळ झाली आणि अचानक मेघ भरून आले. रिमझिम पाऊस धारा जमिनीवर पडू लागल्या..क्षणात सृष्टीचे रूपच पालटून गेले.
आणि नेहमी सारखाच ती त्या मुलाचा विचार करू लागली. हातात गिटार होतीच.
आणि तिने गिटारचे सुर छेड़ले..
धुन वाजू लागली..
Aisa koi saathi ho..
Aisa koi premi ho..
Pyaas Dil ki Buzha Jaaye...
Nile Nile Ambar par...
Chaand Jab Aaye...
Pyaar barsaye.. hamko tarsaye...
क्लास मधून ज्यांची ज्यांची पावले बाहेर पडली होती ते सगळे जागीच थांबून तीच वाजवन Enjoy करत होते.
मस्त Romantic Climate झाल होत.
वैदेही मनातल्या मनात देवाच्या धावा करत होती..
देवा प्लीज प्लीज आज तरी तो दिसू दे..फक्त एकदाच..
तेवढयात तिचा फोन वाजला तिचे बाबा बोलले." पावसात बाहेर निघु नको. टीवी वर दाखवत आहेत पावसामुळे बरेच अपघात झालेत. मी स्वतः तुला घ्यायला येतो . " पण तिला आज काहीही करून त्याला बघायचच होत. त्याचं बोलन मध्येच तोडत ती म्हणाली बाबा,नको नको . तुम्ही नका येऊ मी येतच आहे थोड्या वेळात पोहोचते. एवढ बोलून तिने फोन कट केला. तेवढ्यात जोरात वीज कडाडली, सगळ आसमंत काही क्षणासाठी लख्ख् उजळून गेलं. आणि तिला लांबुनच तो दिसला. आज पण त्याने तोच गुलाबीच शर्ट घातला होता. बसची वाट बघत थांबला होता तो.
ती अतिशय आनंदित झाली आणि आजुबाजुला न बघता धावतच सुटली. आणि समोरून येणाऱ्या एका गाडीला जाऊन धडकली. जोरात ब्रेक मारल्याचा आवाज आला. गाडी चालवनारा तिच्याकडे बघत बड़बड़ करायला लागला. Sorry sorry दादा म्हणत ती तिथून निसटली. आणि धापा टाकत बस स्टॉप वर येऊन थांबली. तो मुलगा समोर असणाऱ्या एका पडक्या बिल्डिंगकडे बघत होता. त्याकडे बघत ती बोलली, "बैंक होती आधी तिथ. बंद पडली आता." त्याने चमकुंन तिच्या कडे पाहिले. ही आपल्याशी बोलली म्हणजे ही पाहू शकते आपल्याला.??? सुयोग आनंदाने काहीतरी मोठी आनंदाची गोष्ट झाल्या प्रमाणे तिच्या कड़े एकटक बघत राहिला. पण वास्तवाची जाण आल्याने त्याचा आनंदित झालेला चेहरा लगेच पडला. मेल्या पासून जवळ जवळ आज कोणीतरी 1st Time त्याच्याशी बोलत होत.
वैदेही पण छान दिसत होती आज. आणि त्यात भिजल्यामुळे तिच्या सौंदर्यात अजुनच भर पडली होती.
सुयोगच्या एकटक पाहण्याने ती थोडी लाजलीच.
पण धीर करून बोलली , Hi मी वैदेही. आणि तुम्ही?
गड़बडून सुयोग बोलून गेला तुम्हाला मी दिसतोय??
यावर ती जोरजोरात हसायला लागली. अहो दिसताय म्हणजे काय? न दिसायला तुम्ही काय भुत आहात का?आणि अजुनच हसु लागली. सुयोगचा खुप गोंधळ उडाला होता. त्याने खुपवेळा प्रयत्न केला होता दुसर्याशी बोलण्याचा पण तो कोणालाच दिसत नव्हता ना त्याचा आवाज कोणाला जात होता.
सुयोग तिला म्हणाला. माझ नाव सुयोग. मी त्या समोरच्या बँकेत कामाला होतो. आणि अजुन तो काही पुढे सांगणार इतक्यात बस आली. दोघजन बस मध्ये जाऊंन बसले. कंडक्टरने तिच्या जवळ येऊन तिकीटाचे पैसे घेतले पण सुयोग कडे न बघताच गेला. तिने त्यांना हाक मारून पुन्हा बोलवले. अहो काका यांचं पण तिकीट दया ना? कंडक्टर म्हणू लागला कुणाच्? ती तिच्या बाजूच्या सीटकडे बोट करून म्हणू लागली, अहो हे काय इथ हे बसलेत तुम्हाला दिसत नाहिए का??
रिकाम्या सीट कडे पाहत..चमत्कारिक नजरेने कुठ कोण आहे मैडम?ही वेडीबीडी आहे का काय? अस पाहात तिथून निघुन गेला.
तिच्या मनाचा गोंधळ उडालेला पाहुन सुयोग तिला म्हणाला, मी तुला सोडून कोनालाच दिसणार नाही. कारण मी मेलोय. म्हणूनच कंडक्टरलाही मी दिसलो नाही.
वैदेही वेड्यासारखी त्या कडे बघू लागली. तिला 2 मिनिटे काही सूचेनाच. खुप अस्वस्थ झाली ती.
इतके दिवस ह्याची एक झलक पाहायला तरसलेली मी. आज हा भुत आहे हे कळताच कशी React होऊ हेच कळेना तीला. अक्षरश: Hang झाली होती ती..
जेव्हा त्याच्या म्हणन्याचा खरा अर्थ तिला उमजला तेव्हा भितीची एक लाट सरसरत तिच्या अंगावरून दौडत गेली.
आणि ती घाबरूंन सुयोग कड़े पाहू लागली.
सुयोग तिला म्हणाला, वैदेही घाबरू नकोस मी तुला काहीही करणार नाही. मला मोक्ष हवाय. त्यासाठीच माझा आत्मा भटकत आहे. या कालचक्राच्या परिघामध्ये आडकलो आहे मी. प्लीज माझ एक शेवटच काम करशील? फक्त माझ्या आई बाबांना जाऊंन निरोप दे की मला त्यांची खुप आठवन येते. आणि मी ठीक आहे इथे. तुम्ही काही काळजी करू नका. व्यवस्थित रहा. बस मला काही नको.
वैदेहीला अजूनही कळत नव्हते हे खरे आहे की खोटे?
आणि तेवढ्यात ते जात असलेल्या रस्तायावरील झाडाची एक मोट्ठी फांदी बस वर मोठा आवाज करत कोसळते. सगळ्या काचा फुटतात. बसचे छत चेम्बुन खाली येते. पत्रा फुटतो.. कंडकटर आणि ड्रायवर जखमी होऊन पडतात. आजुबाजूचे लोक, झाड पडलं, झाड पडलं करत धावत बस जवळ येऊ लागतात.
पण वैदेही तिला मात्र काहीच झाले नसते. आजुबाजुला एवढ्या काचा पत्रा फुटून ही साधा ओरखडा ही उठत नाही. कशी तरी वाट काढत तो तिला हलकेच बस मधून बाहेर काढतो.. घाबरल्यामुळे बेशुद्ध होत असते ती. तिच्या हातात सुयोगचा हात असतो. पण त्याची वेळ संपलेली असते. तो त्याच्या परिमिती मध्ये पुन्हा जायला तयार होत असतो..जाताना तिला तो हलकेच बाय म्हणतो. आणि तिच्या डोळ्या समोरून त्याची आकृती धूसर होत जाते..परत कधी ही न भेटण्यासाठी...
समाप्त