सावंत साहेब जंगी पार्टी झाली पाहिजे हां.... हो हो सावंत साहेब ह्या वेळी जंगी झालीच पाहिजे ...पाटीलांनी सगळ्यात आगोदर हा विषय काढला आणि पाठोपाठ त्यांच्या हो मध्ये हो घालत बँकेतील इतर जमलेले कर्मचारी हि सावंतसाहेबांना हेच बोलू लागले ....साहेब पार्टी पाहिजे.
होय होय नक्की करूया ...माझं एक एक्झिबिशन आहे ते पूर्ण करून आलो कि नक्की...पुढच्या महिन्याचा दुसरा आठवडा धरूया ..चालेल ना.
हो हो चालेल ना...कधीही anytime we are ready ..हाहाहाहाहा.

आज सावंत साहेबांच्या निवृत्तीचा दिवस. म्हणजे कामावरचा आज शेवटचा दिवस. खरं तर ते दोघेही नवरा बायको एकाच तारखेला निवृत्त होत होते. सावंत साहेब आणि प्रमिला सावंत . दोघांनीही गेली ३५ वर्ष बँकेत नोकरी केली. मुलगा सुजय शिकायला अमेरिकेत. एकुलता एक मुलगा आणि तसं बघायला गेलं तर आर्थिक परिस्थिती खूपच चांगली.
आज संध्याकाळी सावंत साहेब आणि वहिनींचा सत्कार होणार होता तो कामेरकर हॉल मध्ये. कार्यक्रम संध्याकाळी ७ वाजता नियोजित झाला . कार्यक्रम हि व्यवस्थित पार पडला सगळ्यांनी दोघांना भावी आयुष्यासाठी अनेक शुभेच्छा हि दिल्या फोन नंबर घेतले कि जेणे करून या पुढे संपर्कात राहता येईल. पण कोणाला माहिती होतं नियतीच्या मनात काय खेळ चालू होता. सावंतांचं आयुष्य इथवर तर आनंदात पार पडलं पण या पुढे काय घडणार होतं याची त्यांना स्वतःला हि बिलकुल चुणूक लागली नाही.
संध्याकाळी दोघेही नवरा बायको घरी परतले ज्या काही भेट वस्तू मिळाल्या त्या त्यांनी आपल्या गाडीमधून काढून आपल्या घरात ठेवल्या. त्या नंतर सावंतांनी रेडियो ऑन केला आणि खूप जुनी गाणी ऐकत खिडकीत बसले. खिडकीची काच बंद आणि घरातील AC चालू होता. सावंतांचा बंगला तसा प्रशस्त. खिडकीतून समोर पसरलेलं अथांग मोकळं मैदान आणि भाताने भरलेली हिरवीगार शेतं दिसत होती. गाणी ऐकता ऐकता त्यांनी प्रमिलाचा हात पकडला आणि म्हणाले ...
"Can you make 1 peg for me"
"ya sure why not "
एक स्मित हास्य देत प्रमिलाने त्यांच्या साठी एक पेग बनवला आणि त्यात बर्फाचे काही क्यूब टाकले.
सावंतांनी आपल्या बाजूची खुर्ची ओढली आणि प्रमिला ला म्हणाले इथे बस.
कॉफीचा कप घेऊन प्रमिलापण त्यांच्या बाजूला बसून समोरचं ते दृश्य न्याहाळत बसली ...दोघांनी खुर्चीला मान टेकली ...एक दीर्घ श्वास स्डोळा..
समोरच्या मैदानावर चांदण्याचा प्रकाश पसरला होता. उन्हाळ्याचे दिवस असल्याने आकाश हि तसं मोकळंच होतं.

"प्रमिला व्हॉट डू यु से ...बघ समोर मोकळं मैदान आहे कशाचाही अडथळा नाही ..इथून पुढे आपण काय करुया असं तुला वाटतं ?"
"इथून पुढे आपण तुमचा छंद जोपासुया त्यासाठी आत्ता मी हि तुमच्या सोबत येणार आहे "
"मीन्स ? " सावंतांनी प्रश्न केला .
"सोप्प आहे ...इथून पुढे तुम्ही तुमचा छंद म्हणजे तुमचं प्याशान वाइल्ड लाईफ फोटोग्राफी करायची आणि मी तुमची साथ देणार "

सावंतांनी उजव्या हातातला ग्लास डाव्या हातात घेतला उजवा हात पुढे केला आणि प्रमिलाला हातमिळवणी करून म्हणाले ...
"ओके डन "
त्या संध्याकाळी ते दोघेही भलतेच खुश होते. सावंतांनी १-२-३- करता ४ पेग प्यायले आणि नंतर ते दोघेही रात्री २:३० वाजता आपल्या बेडरूम मध्ये जाऊन झोपले. गिफ्ट मध्ये मिळालेलं सामान बाहेर हॉल मध्ये तसंच पडलेलं.
एखाद्या शांत पाण्याच्या डोहात कोणी दगड मारून पाणी अस्थिर करावं असं काहीसं घडायला सुरवात झाली.
प्रमिला सकाळी उठली ८ वाजता ...तिने कोफी बनवला आणि सावंतांना बेडवर नेऊन दिला...डोळे चोळत सावंत हि उठले आणि पाठ टेकून तिथेच बेडवर बसले. प्रमिलाने पडदे सरकवले आणि खिडकीतून सूर्यप्रकाश आत आला...
"किती वाजले गं ?"
प्रमिलाने बेडरूममध्यल्या घड्याळात पाहिलं तर त्यात २:३० वाजले होते. सकाळचे ८ वाजले होते ....घड्याळ बंद पडलं होतं.
"थांबा बघते हॉल मध्ये "
हॉल मधल्या घड्याळात पण २:३० आणि सेकंद काटा बंद पडला होता.
"काय झालं तरी काय सगळी घड्याळं एकदाच बंद पडायला "
तिने मोबाईल मध्ये पाहिलं त्यात वेळ द्खवतच नव्हतं ...सावंतांच्या मोबाईल मध्ये पाहिलं ते पण तसंच....हातातली घड्याळ पाहिली.."वेळ २:३०"

प्रमिला हसली तिने सावंतांना सांगितलं रात्री जास्त झाली का हो तुम्हाला ?
का ?
आहो मस्करीची पण एक हद्द असते ....काय हे ..
म्हणजे समजलो नाही मी .
काळ आपण २:३० वाजता बोलणं थांबवलं म्हणून का सगळी घड्याळं २:३० वेळ सेट करून बंद करून ठेवायची का ?

काय ? ...छे मी असं काही केलं नाही . कोणाला वेळ अ आहे तेवढा खूप झोप आली होती ..हा बघ असा येऊन इथे आडवा पडलो आत्ता उठलोय.
प्रमिलाने पण जास्त मनावर घेतलं नाही. तिने सगळ्या घड्याळांचे सेल बदलून पुन्हा चालू केले.

सावंत हि उठले अंघोळ चहा नाश्ता झाल्यावर सर्वप्रथम त्यांनी आपलं कपाट उघडून आपला झूम लेन्स डिजिटल कॅमेरा बाहेर काढला.
चालू केला आपल्या संगणकाला जोडून बघितला ...आणि ठरलं कि वाईल्ड लाईफ फोटोग्राफी साठी उर्वरित आयुष्य झोकून द्यायचं.
साधारण एक आठवडा अभ्यास करून त्यांनी स्थळ निवडलं कोयनेचं वन्य जीवन अभयारण्य. तसं हे जंगल दाट आणि कोयनेचा पाणवठा म्हणून इथे ह्या परिसरात अनेक प्राणी पक्षी अस्तित्वात आहेत.
झालं मग त्यांनी इथेच जाण्याचं ठरवलं. दुसऱ्याच दिवशी निघूया.
संध्याकाळी सामानाची बांधाबांध केली आणि कल्याणहून ते निघाले ते चिपळूणच्या दिशेने .
संध्याकाळी पोहोचायला उशीर झाल्यामुळे त्या रात्री ते चिपळूणातच हॉटेलात थांबले. दुसऱ्या दिवशी चहा नाश्ता करून त्यांनी जवळच्या किराणा दुकानातून सामान खरेदी केलं. कारण आत्ता या पुढे त्यांचा जो काही १०-१५ दिवसांचा मुक्काम होता तो त्या अभयारण्यातच. ट्रेकिंग आणि वाईल्ड लाईफ फोटोग्राफी हा छंद त्यांनी आयुष्यभर जोपासला होता म्हणून त्यांना अनुभव दांडगा होता. सर्व परिपूर्ण तयारी केली होती त्यांनी.
चिपळूणात वारंगे म्हणून एक ओळखीचे स्द्गृहास्त ते सावंतांच्या नात्यातले. सावंतांचं गाव रत्नागिरीतलं चोरवणे. काही नातेवाईक त्या परिसरात हि होतेच.
आपली गाडी त्यांनी वारंगे ह्यांच्या घरी ठेवून त्यांनी आपला संपूर्ण आराखडा त्यांना सांगितला आणि तिथून खासगी गाडी करून दोघेही निघाले ते कोयनेच्या दिशेने. अभयारण्याच्या गेटवर त्यांची जी काही तिकीट होती ती त्यांनी काढली. आपण इथे का आलो अ आहोत कशासाठी आलो आहोत किती दिवस राहणार आहोत काय करणार आहोत याची कोणीतीही माहिती त्यांनी वन्य अधिकाऱ्यांना दिली नाही. त्यांनी जर असं केलं असतं तर कदाचित त्यांना उचित मार्गदर्शन आणि परिसराची सखोल माहिती मिळाली असती. सावंतांनी ते टाळलं .त्यांना भीती होती कदाचित वन विभागाचे लोकं त्यांची अडवणूक करतील. त्यांना तिथे वस्ती करण्यास मज्जाव करतील. आणि सावंतांना ते नको होतं.
आपल्या सोबत असलेल्या मोठ्या मोठ्या bag बघून काही लोकांनी त्यांना प्रश्न हि केले पण उडवाउडवी ची उत्तरं देऊन ते तिथून निघाले .
जंगलाची पायवाट पकडून हातात आपला GPS घेऊन त्यांनी चालायला सुरवात केली. त्या कित्येक किलोमीटर लांब पसरलेल्या अभयारण्यात एखादी व्यक्ती हरवली तर तिला वाट सापडणं कठीण अशी परिश्तिती. आणि सावंत तर कोणत्याही वन विभागाच्या लोकांसोबत न जाता एकटेच तिथे शिरले होते.
खाण्यापिण्याचा सर्व साथ आपल्या bag मध्ये होता.सोबतच कॅमेरा साठी आणलेल्या फुल चार्ज ३ battery आणि एक सोलर चार्जर. चालता चालता दुपार झाली. त्यांनी एका ठिकाणी झाडाखाली थाबायचं ठरवलं.शांत परिसर फक्त पक्ष्यांचे किलबिल आवाज कानावर पडत होते. अधून मधून त्या पडलेल्या पालापाचोळ्यातून एखादा सरडा चोपई सरपटल्याचे आवाज येत होते.प्रमिलाने आपल्या bag मधून आणलेली जेवणाची पार्सल बाहेर काढली. दोघांनी ते खाऊन घेतलं. थोडा वेळ विश्रांती करून पुन्हा पुढे चालायला लागले. एव्हाना आत्ता सूर्य डोंगराच्या आड जाऊ लागला होता.त्याची किरणं जमिनीवरून झाडांच्या शेंड्यावर पडू लागली आणि हळू हळू त्या दाट अरण्यात अंधाराने आपलं अस्तित्त्व दाखवायला सुरवात केली.वातावरणात भलताच फरक पडायला लागला होता.

"प्रमिला आय थिंक वी हेव तो मेक अ स्टे समव्हेयर हियर "
"होय कारण आत्ता अंधार दाटायला सुरवात झाली आहे , पुढे अंधारात कठीण होऊन बसेल "
झालं तर ठरलं मग त्यांनी आजू बाजूला नजर वळवली . सावंतांनी अंदाज घेतला कि कोणत्या ठिकाणी थांबणं योग्य ठरेल. अशी जागा कि जिथे हिंस्र प्राणी येऊ शकणार नाहीत. बघता बघता त्यांनी एका झुडपाच्या बाजूलाच आपला तंबू ठोकला. सर्व सामान त्यात ठेवलं. आपला कॅमेरा त्यांनी आज रात्री साठी आपल्याच तंबूच्या बाहेर सेट केला. कॅम्प फायर पेटवली. दोघांनी त्यावर त्या रात्री जेवण बनवलं, जेवले...सावंतांनी सोबत आणेलेल्या दारूचे २ पेग हि मारले. आणि आज रात्री ते जागरण करणार होते. प्रमिला त्यांच्या सोबत जंगलात म्हणून पहिल्यांदाच आली होती. जेवण होई पर्यंत काही वाटलं नाही..पण जसं जसा अंधार गडद झाला तिला भीतीने घेराव घालायला सुरवात केली. अंधारातल्या झाडा झुडपांमध्ये तिला वेगवेगळे आकार दिसायला लागले. बोलणं दोघांमध्ये चालू होतं पण तिची नजर भेदरलेली होती ..इकडे तिकडे भिरभिरत होती. हातातलं घड्याळ पाहिलं तिने ..."२:३० "
ओह शिट...हे बघा पुन्हा "
"काय झालं " सावंतांनी प्रश्न केला ..
काळ सेल बदलला आज पुन्हा घड्याळात २:३० आणि घड्याळ बंद .
सावंतांनी आपल्या घड्याळात पाहिलं..त्यात पण तेच... हे असं कसं होऊ शकतं ...दोघांच्या हि घड्याळात सेल टाकले होते घड्याळ चालू होते आणि हे २:३० च का...
खरं तर हि एक चाहूल होती मिळालेला संकेत होता जो त्या दोघांना ओळखता आला नाही. नियतीने फेकलेल्या जाळ्यात ते गुरफटले जात होते दोघांना त्याबद्दल काहीच समजत नव्हतं.
दुर्लक्ष केलं आणि प्रमिलाने दोघांचीही घड्याळ bag मध्ये कोंबली आणि मोठ्याने बोलली....
"फक ऑफ"
खरं तर हि तिची चीड कमी आणि भीती जास्त असावी. सावंतांनी ओळखलं ..त्यांनी हसण्यावर जास्त जोर दिला.....
"प्रमिला यु आर स्केआर्ड नाऊ "
"नो वे " आत्मविश्वासाने तिने उत्तर दिलं....
यस यु आर ...
नो वे ...सावंत हस्त होते हस्त होते आणि अचानक ....धप्प करून त्यांच्या पुढ्यात काहीतरी कोसळलं ...पेटवलेली आग विझली आणि निखारे सर्वत्र उडाले....
प्रमिला किंचाळली आणि साव्नातांच्या मिठीत जुं घट्ट पकडून थरथर कापायला लागली.
क्षणाचा हि विलंब न करता सावंतांनी जवळची torch उचलली आणि त्या दिशेने लाईट मारला.....

" हे डोंट वरी ...नथिंग सिरीयस" ......बोलून त्यांनी प्रमिलाला आपल्या मिठीतून बाहेर घ्यायला सुरवात केली...
"अरे हे बघ काहीच नाही ...झाडाची फांदी पडली आहे "

थरथरत्या अंगाने प्रमिलाने हळूच नजर वळवली ..आणि पाहिलं एक झाडाची ढावळी वरून खाली पडली होती...
"अरे हाच तर थ्रील असतो इथे ..काही होत नसतं " ...असं बोलून सावंतांनी प्रमिलाची समजूत काढली.....