अवदसा >> भाग 6
पहाटे कुणीतरी मला गदागदा हलवत होते. त्रासिक चेहरा करून मी पाहिले. मुग्धा उभी होती. तिचा चेहरा घामाने डवरलेला होता. डोळ्यात भीती दाटली होती. केस विखुरलेले होते.
काका, उठा.. आपल्या कॉलनीतले ते दोन...ती तुटक तुटक बोलत होती.
मी उठून बसलो. हलक्या आवाजात म्हणालो,
माहीत आहे. मी रात्रीच त्यांचा अंत पाहिलाय !
म्हणजे त्यांनाही...तिच्या आवाजाला कंप सुटला होता.
हो, तुझी शंका खरी आहे. तिथे मला अवंतीच्या पायातले पैंजण सापडलंय.. मीच ते परत आणून टाकलं. मी थंड स्वरात म्हणालो.
ती मात्र पांढरीफटक पडली. त्याच सुरात म्हणाली,
आता काय करायचं ? हे भलतेच काही घडतेय !
ते तू बघ. तिला परत पाठवण्याशिवाय गत्यंतर नाही. तू जे या जगात आणलंस, ते मानवी नाही मुग्धा.. या दुनियेत ते रमणार नाही. त्याची भूक मोठी आहे आणि ते अत्यंत पाशवी पद्धतीने ती पूर्ण करतेय. मी ठामपणे सांगितले. आता या प्रकाराचा सोक्षमोक्ष लावणे अत्यावश्यक झाले होते.
काका, मला ते शक्य नाही. माझ्या आवाक्याबाहेरचे आहे ते ! मुग्धाच्या आवाजात हताशा आणि निराशा होती.
काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे. अन्यथा तुझी आणि माझी गतही त्या चार जीवांसारखीच होईल. मी सांगितलं.
काहीच न बोलता ती माघारी वळली.
सकाळी दहा झाले असावेत. चहा देतांना मुग्धाने माझ्या हातात एक पाकीट आणि कागद दिला. ती बरीच सावरलेली दिसली.
बाहेर जाऊन वाचा ! तिने पुटपुटत सांगितले.
काही वेळाने घरापासून सुरक्षित अंतरावर पोहचून मी त्या कागदाची घडी उलगडली. त्यातला मजकूर वाचू लागलो.
काका, गर्भधानाचा विधी मला ठाऊक आहे. पण अवंतीला तिच्या जगात पाठवणे मला शक्य नाही. त्यासाठी प्रचंड सामर्थ्याची गरज आहे. खाली दिलेल्या पत्त्यावर जा. हे पाकीट तिथल्या बाईच्या हातात द्या. नक्की मार्ग निघेल.
तो मजकूर वाचून मी काहीसा गोंधळलो. पण घाई करणे गरजेचे होते.
प्रवासासाठी आवश्यक पैसे घेऊन मी लागलीच निघालो.
कोकणातले ते खेडे. आधुनिकतेच्या स्पर्शापासून अद्याप बरेच दूर होते. तासाभराच्या पायपीटीनंतर ते सापडले. एका कौलारू घराच्या छोट्या अंगणातल्या कोंबड्या उचलून खुराड्यात टाकणाऱ्या म्हाताऱ्याला मी विचारले,
बाबा, सरलाबाई कुठे असतात ?
त्याने आश्चर्याने माझ्याकडे पाहिले. बहुतेक कित्येक वर्षात सरलाबाईंकडे काय, त्या गावात कोणी पाहुणा आला नसावा. काहीच न बोलता तो घरात जाऊन एका लहान मुलाला सोबत घेऊन आला. माझ्यासोबत त्याला पाठवले.
गावापासून अर्धा किमीचा तो निर्जन परिसर होता. तिथल्या भयाण शांततेची साथ करीत एक टुमदार घर उभे होते. दुरूनच त्या घराकडे बोट दाखवून ते पोरगं मागच्यामागे पळालं.
काटेरी कुंपण ओलांडून मी आत गेलो. साधंच दार होतं. मी कडी वाजवली. काही वेळाने एका महिलेची मान बाहेर डोकावली. मी माझं नाव सांगितलं. तिच्या हातात मुग्धाने दिलेले पाकीट दिलं. तिने आत येण्याची खूण केली.
कमालीचं गूढ भरलं होतं तिथे.. त्याची सहजच जाणीव होत होती. दोन खुर्च्यांवर आम्ही समोरासमोर बसलो.
या पत्रात काय लिहिलंय ते ठाऊक आहे तुम्हाला ? तिने विचारलं.
नाही, पण अंदाज आहे. मी म्हणालो.
ठीक आहे. तुम्ही रात्री बाराला या घरापासून काही अंतरावर उभे राहा. तिथेच आपण भेटू. तिचा स्वर कमालीचा रुक्ष होता.
तुम्ही ?? मी विचारलं.
हो.. तुमचा अंदाज योग्य आहे. मी मुग्धाच्या होस्टेलला रेक्टर होते. तिने मला काही विधी करताना पाहिले. मलाही शिकवा म्हणून मागे लागली. आईवेगळी पोर म्हणून जगतांना तिला अनेक व्यवधाने येतील, तेव्हा तिच्या उपयोगी पडावी म्हणून मी तिला काही विधी शिकवले. पोरगी मात्र चलाख.. झपाट्याने आणि मन लावून शिकली. पण त्याचा असा उपयोग करून संकट ओढवून घेतलंय तिने ! सरलाबाईंनी सांगितलं.
पण निराकरण होईल ना या व्यथेचं ? मी अधीरतेने विचारले.
प्रयत्न करणे आपल्या हाती..बाकी सर्व प्रारब्ध ! त्या हसून बोलल्या. माझा त्यांच्यावरील विश्वास दृढ झाला. मी मोकळ्या मनाने बाहेर पडलो.
पुन्हा तासभर चालून जाणे मला कंटाळवाणे वाटले. म्हणून मी गावाच्या भोवताली रमतगमत वेळ घालवला.

किर्र अंधारी रात्र होती. आभाळ काळकुट्ट होतं. त्या कोकणी मुलखात सापांची फार भीती. म्हणून मी जपून पावलं उचलत होतो. त्या प्रचंड नागड्या काळोखात माझ्या हातातल्या टॉर्चचा उजेड अगदीच बापुडवाणा भासत होता. सरलाबाईंचं घर नजरेत आलं. घरातले दिवे बंद असावेत. तिथून अंतराचा अंदाज घेत घेत मी पुढे निघालो. ती पायवाट होती. जमिनीवर टॉर्चचा झोत टाकून चालत असतांनाच मी थबकलो.
त्या अंधारात दोन पांढरेफेक पाय दिसत होते. माझ्या अंगावर शहारा आला. मी टॉर्च वर करून पाहिले.
काळी चंद्रकळा नेसलेल्या सरलाबाई उभ्या होत्या. मोकळे केस वाऱ्याने उडत होते. कपाळावर मळवट भरला होता. डोळ्यात भरपूर काजळ.. त्या सिद्ध होऊन आलेल्या दिसत होत्या. हातातली जडशीळ पिशवी त्यांनी माझ्याकडे दिली.
ही जमिनीवर टेकवायची नाही. ती टॉर्च बंद करा ! त्यांनी सांगितलं. त्यांच्यामागून मी चालू लागलो.
तो परिसर त्यांच्या पायाखालचा असावा. कुठेही न अडखळता त्या सराईतपणे चालत होत्या. मी त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करत चालत होतो.
एका ओढ्याकाठी पसरलेल्या मोठ्या कातळावर आम्ही पोहचलो. तिथे गवत नावालाही नव्हतं. सरलाबाईंनी खूण करताच मी बसलो. त्यांनी एका डबीतून काढलेलं काजळ माझ्या डोळ्यात भरलं. डोळे क्षणभर चुरचुरले.
हा विधी सुरू केल्यानंतर तुम्हाला भ्रमित करणारी अनेक दृश्ये दिसतील. संयम सोडायचा नाही. अन्यथा तुमच्या मुलीऐवजी तुम्हीच त्या जगात जाऊन पोहचाल.. त्यांनी तंबी दिली.
मी शक्य तितका स्थिर होऊन तो विधी न्याहाळू लागलो.
सरलाबाईंनी राखेचा चौकोन आखला. त्यावर सप्तधान्याची रास रचली. कणकेचे दोन दिवे पेटवले. त्यांच्या मधोमध कणकेपासून तयार केलेली मोठी आकृती ठेवली. मी निरखून पाहिलं.
तो गर्भाशयाचा आकार होता.
हळदी-कुंकवाने सरलाबाईंनी त्या गर्भाशयाची पूजा केली. सोबत आणलेलं चिकट द्रव्य त्यात ओतलं. त्याचा एक पातळ पडदा तयार झाला.
तिथलं वातावरण हळूहळू बदलू लागलं होतं. डोळ्यातल्या काजळामुळे असावं कदाचित, मी काळोखातही स्पष्ट बघू शकत होते. अनेक अमानवी आकार आमच्या भोवताली फिरत होते. मोकळे सोडलेले सरलाबाईंचे केस आता पिंजारले गेले होते. मुळचेच मोठे डोळे काजळ घातल्याने आणखी मोठे दिसत होते. काही क्षण डोळे बंद करून कसले तरी स्मरण केल्यावर त्या विकट हसल्या. बस्स...मंत्रोच्चार सुरू झाले. दोन्ही हात हवेत फिरवीत त्या आवाहन करीत होत्या. त्यासारखी अनेक धूसर वलये त्यांच्याभोवती घिरट्या घालू लागली होती. मध्येच थांबून त्या ओरडत...
तू कशाला आलास..निघ..तुझी गरज नाही.. तुला मी बोलावले नाही..
नैराश्याने ते आत्मे माझ्याकडे बघत आणि पाहता पाहता निघून जात.
काही वेळ लोटला.. एक ओळखीचा चेहरा साकारू लागला. तिच ठेवण, तेच ओठ..ही तर माझी बायको होती. पण हे काय...प्रचंड क्रोधाने ती माझ्याकडे बघत होती. मी काही बोलणार तोच सरलाबाईंचा अंगठा माझ्या कपाळावर टेकला गेला. आवेगाने किंचाळत बायको हवेत विरली. मग पुढे गणतीच उरली नाही. लिमये पतिपत्नी, ते नवविवाहित जोडपे यांचे चेहरेही प्रकट झाले आणि मला तळतळाट दिल्यासारखे करून निघून गेले.
काही वेळाने हवे ते घडले.. अवंतीचा चेहरा दिसू लागला. किती गोड पोरगी..पण तिच्या चेहऱ्यामागे एक अमानवी चेहराही होता. तो पुन्हा पुन्हा तिला झाकोळत होता. तो दिसताच सरलाबाईंच्या मंत्रोच्चाराला कमालीचा वेग आला. त्या आवाहन करून त्याला साद घालू लागल्या.
त्या कातळावर भलताच टोकाचा संघर्ष पेटला होता. अवंतीच्या आत्म्याला पुन्हा गर्भाशयात घालू पाहणाऱ्या सरलाबाई आणि तिथे जाण्याची अजिबात इच्छा नसलेल ते... कितीतरी वेळ ही झटापट चालली होती. शेवटी त्याने सरलाबाईंवर आघात केला. त्यांचा मंत्रोच्चाराचा स्वर गुदमरल्यासारखा होऊ लागला. डोळे विस्फारु लागले. त्या हाताने खूण करून मला तिथून निघून जाण्याचा इशारा करू लागल्या.
पण तसं करून चालणार नव्हतं. ही संधी पुन्हा येणार नव्हती.
मी श्वास स्थिर केला. ते अगम्य भाषेतले अमोघ मंत्र माझ्या मुखातून बाहेर पडू लागले. अस्खलित उच्चार आणि शब्दघात त्या आसमंतात भरून गेले. अवंती सोडली तर इतर सर्व आत्मे लागलीच नाहीसे झाले. क्षणभरापूर्वी झालेली स्वतःची केविलवाणी अवस्था विसरून सरलाबाई माझ्या तोंडाकडे बघत होत्या.
दोन्ही बाहू जमिनीशी समांतर करीत मी मुठी उघडल्या. त्या वातावरणातली हवा दोन्ही मुठीच्या पोकळीत सामावून त्या बंद केल्या. कमालीचा जोर लावत दोन्ही हातांचे पंजे त्या गर्भाशयाजवळ नेले. त्यासरशी अवंतीच्या चेहऱ्यामागे दडलेल्या त्या भयंकर चेहऱ्याने भीषण नाद केला.
.. पण आता वेळ संपली होती.
मी दोन्ही मुठी त्या गर्भाशयातल्या चिकट द्रव्यात रित्या केल्या. त्यासरशी तो अमानवी चेहरा त्या द्रवात शिरला. मी ते गर्भाशय आवळून बंद केलं. शेजारच्या दिव्यातले तेल शिंपडून त्या अभद्र जीवाचं ते आश्रयस्थान जाळून टाकलं.
सरलाबाई पिसाटासारखं माझ्याकडे बघत होत्या.
तू..तू... त्यांच्या तोंडातले शब्द बाहेर येण्यास तयार नव्हते.
मला वेळ घालवायचा नव्हता.
मी कौशल्याने कमरेला खोचलेली सूरी काढली. डाव्या हाताने सरलाबाईंचे केस घट्ट आवळत उजव्या हाताने त्यांचा गळा चिरला. तिथल्या उष्ण रक्ताची धार माझा हात भिजवत होती. मी समाधानाने हसलो.
(क्रमशः)