अवदसा >> भाग 5
किती वेळ गेला ते कळलेच नाही. थोडा भानावर आलो तेव्हा पाहिले. मुग्धा माझ्यामागे उभी होती. तिचे शरीर भीतीने थरथर कापत होते. कोणत्याही क्षणी ती खाली कोसळण्याची शक्यता होती. तिकडे छतावरून भिंतीवर उतरत हळूहळू अवंती खाली येत होती.
पुढचे अरिष्ट लक्षात घेऊन मी संपूर्ण बळ एकवटून उभा राहिलो. मुग्धाला खेचतच शेजारच्या खोलीत घेऊन गेलो. तिच्या अंगात भरलेली भीती अद्याप कमी झालेली नव्हती. तिला खुर्चीवर बसवून पाणी पाजल्यानंतर थोडी तरतरी वाटू लागली. काही वेळाने तिला जोराचा हुंदका फुटला.
काका, मला माफ करा. मीच हे संकट ओढवून घेतलंय. मावशीचा बळी गेला आणि हे सर्व......ती दाटलेल्या कंठाने म्हणाली.
मुग्धा, तू हे आईच्या प्रेमापोटी केलंस. पण बघितलंस ! निसर्गाच्या विरोधात जाऊन केलेल्या कृत्याचे परिणाम काय होताहेत ? हे अमानवी तत्व घरात ठेऊन आपण सुखाने जगू शकू का ? मी म्हणालो.
पुढे आणखी काही बोलणार तोच मुग्धाने डोळ्यांची उघडझाप करून मला गप्प राहण्याचा इशारा केला. आम्ही दोघांनी एकाच वेळी दाराकडे बघितलं.
दोन्ही हात कमरेवर ठेऊन अवंती दारात उभी होती. आमचं बोलणं तिला आवडलं नसावं. तिचा गोड चेहरा उग्र झाला होता. डोळ्यात आग पेटली होती. घशातून नाराजी दर्शवणारी खरखर श्वासागणिक बाहेर पडत होती.
आई..हे काय चाललंय ? मुग्धा तिच्यावर खेकसली. अवंती मात्र ढिम्मपणे उभी होती.
तुला परत आणण्यासाठी मी नको ते केलं. मावशीने जीव दिला. त्याची परतफेड तू अशी करतेस ? मुग्धा बडबडत होती.
मुग्धा, शेजारच्या लिमये पतीपत्नीची क्रूर हत्या झालीय. त्यांना मारणारी शक्ती अमानवी आहे. हाल हाल करून मारलंय त्यांना ! मी म्हणालो.
मुग्धाचे डोळे विस्फारले गेले. ती क्रोधाने अवंतीकडे पाहू लागली. अवंतीच्या डोळ्यात आता पाणी होतं. तिचा रडवेला चेहरा माझ्याने बघवेना. मी पुढे जाऊन तिला कडेवर घेतले. तिचे डोळे पुसत म्हणालो,
माझं शहाण बाळ ते ! परत नाही ना असं करणार ?
तिने मान डोलावली. चेहऱ्यावर हसू पसरले. आम्ही दोघेही मुग्धाजवळ गेलो. तिही जरा वेळाने नॉर्मल झाली.
तो दिवस हसतखेळत घालवून मी ताण कमी करण्याचा प्रयत्न केला. कितीतरी वेळ अवंती माझ्याजवळ खेळत होती. तिला झोप येऊ लागली तसं तिच्या खोलीत झोपण्यासाठी घेऊन गेलो. मुग्धा स्वयंपाकघर आवरत होती. भांड्यांचा आवाज येत होता.
अवंतीला बिछान्यावर टाकलं तसं तिनं माझा हात घट्ट धरला. मला ओढून घेत कानाजवळ पुटपुटली...
हे तू बरं केलं नाहीस !
तिच्या तोंडून निघालेला तो पहिलाच शब्द..आणि त्यातही उघड इशारा होता.
मी निमूटपणे तिच्या खोलीतून मी पाय ओढत बाहेर पडलो.
अंथरुणावर पडलो खरा, पण झोप मात्र उडाली होती. हे माझ्या घरात काय चाललंय, कुठवर चालणार, याचा अंत काय आणि कसा होणार ? आईच्या मोहापोटी मुग्धाने तो अघोरी प्रयोग केला, प्राणाचं मोल देऊन माझ्या बायकोने अवंतीला या जगात आणलं पण ती सर्वसामान्य आयुष्य जगू शकेल का ? सलामीलाच लिमये दाम्पत्याचा बळी गेलाय..पुढे आणखी किती जीवांना अवंतीच्या आयुष्यासाठी खतपाणी म्हणून स्वतःला तुडवून घ्यावं लागणार ? किती निर्दोष या अघोरी प्रयोगाच्या फलनिष्पत्तीचे बळी ठरणार..मी फक्त साक्षीदार म्हणून मूक भूमिका बजावणे योग्य आहे का ? हे सर्व थांबवण्यासाठी मी काय करू शकतो ?
एकामागे एक विचारांचे सर्प मनाच्या वारुळातून बाहेर येऊन फुत्कार टाकत होते. त्या मानसिक थकव्याने मला ग्लानी आली. उशीत डोकं खुपसून मी निद्राधीन झालो.
एकामागे एक विचारांचे सर्प मनाच्या वारुळातून बाहेर येऊन फुत्कार टाकत होते. त्या मानसिक थकव्याने मला ग्लानी आली. उशीत डोकं खुपसून मी निद्राधीन झालो.
मध्यरात्र झाली असावी. मला अस्वस्थ वाटू लागलं. छातीतल्या बरगड्या वाजल्याचा भास होत होता. एक तीव्र सणक बेंबीपासून गळ्यापर्यंत संथ गतीने जात होती. हातापायातील त्राण नाहीसे झाले होते. अर्धांगवायू झाल्यासारखा मी लुळा पडलो होतो. जोरात बोंब ठोकावीशी वाटली पण शब्द फुटेचना. मग मी काही मिनिटे मेल्यासारखा पडून राहिलो. अंमळ हुशारी आल्यावर उठलो. तांब्यातलं पाणी ढसाढसा प्यालो. अंग घामाने भरलं होतं. एक सिगारेट काढून शिलगावली. खिडकीजवळ उभा राहून बाहेर बघत झुरके ओढू लागलो.
समोरच्या रस्त्यावर स्ट्रीट लाईटखाली दोन सावल्या हलत होत्या. मी बुब्बुळे ताणत त्यांना ओळखण्याचा प्रयत्न केला.
होय ! तेच होते...मी त्यांना विसरू शकत नव्हतो. त्यादिवशीचे कपडे दोघांच्या अंगावर होते.
इतक्या रात्री लिमये पतिपत्नी स्ट्रीट लाईटखाली उभे राहून मला का खुणावताहेत ? या विचारात मी इतका गुंतलो की काही दिवसांपूर्वी दोघांचे मृतदेह पाहिल्याचेही माझ्या लक्षात राहिले नाही.
मी दार उघडून धावतच रस्त्यावर गेलो. लिमयेच बोट आता समोरच्या एका घराकडे वळले होते. मी काही बोलणार तोच दोघांची शरीरे काळोखात विरून गेली.
त्यांनी इशारा केलेल्या घराजवळ मी जाऊन पोहचलो. पहिल्या खोलीतून आदळआपट झाल्याचा आवाज येत होता. कोणीतरी प्रचंड संतापात काहीतरी उचलून आपटत होते. मध्येच धुसफूस चालल्याची चाहूल..एका स्त्रीच्या किंचाळण्याचा आवाज. तिच्या विनवण्यांचा कोणताच परिणाम होत नसल्याचे वाटत होते. ते दार मी धाडधाड ठोकले. पण आतल्या गोंधळात तो आवाज विरला असावा. मीही इरेला पेटलो. दारावरल्या धडका सुरूच ठेवल्या. काही वेळाने दाराची कडी उघडल्याचा आवाज झाला. मी पूर्ण ताकदीने दार उघडले आणि काळोख झाला.
माझ्या पायातून सरपटत काहीतरी दाराबाहेर पळाले. मागे प्रचंड दुर्गंध सोडून ! तो लिबलिबित स्पर्श माझ्या अंगावर शहारे उठवून गेला. त्याच्या जाण्यापुरतीच जणू गेलेली वीज लगेचच परतली. मी गेटपर्यंत धावलो. पण कोणाचाही मागमूस लागला नाही.
मी परत त्या खोलीत आलो. नवविवाहित जोडपं होतं ते! त्या तरुणाचे मस्तक अनेकदा भिंतीला ठोकले जाऊन छिन्नविच्छिन्न झाले होते. भिंतीची ती बाजू रक्ताने माखली होती. मघाशी दार उघडणारी त्याची पत्नी जमिनीवर कोसळलेली होती. मी तिच्या नाकाजवळ हात नेऊन श्वास तपासला.. खेळ संपला होता. तिचा चेहरा, त्या खोलीतल्या खुणा तिने केलेल्या प्रतिकाराची साक्ष देत होत्या. सुन्न होऊन मी दारातून बाहेर पडत असतांना पायाशी ठोकरल्याने ती वस्तू दूर जाऊन पडली. मंजुळ नाद झाला तिचा !
मी पुढे होऊन ती उचलली...
ते नाजूक पैंजण होतं. काही महिन्यांपूर्वी मी हौसेने अवंतीच्या पायात घातलेलं !
माझ्या डोळ्यात अश्रू दाटले. तसाच मी घरी परतलो. मुग्धाच्या खोलीचं दार सताड उघड होतं. डबलबेडवर निर्धास्त झोपलेल्या मुग्धाशेजारी अवंती पहुडली होती. तिच्या डाव्या पायातले पैंजण जागेवर नव्हतं. मी हताशपणे ते पैंजण तिच्या पायाजवळ टाकलं. खांदे पाडून हॉलकडे गेलो.
हे थांबायलाच हवं...पण कसं, कोण थांबवणार ?? अशा विचारांची वावटळ पहाटे कधीतरी थांबली.
(क्रमशः)