सर्पकुल -भाग 5- Marathi bhaykatha,marathi bhutkatha,marathi bhitidayak katha,horror marathi
त्याच्या शब्दाशब्दांत आर्तता होती. त्याचे अंतःकरण घायाळ झाले होते. त्याचे उच्चार सुस्पष्ट होते. त्याच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या ध्वनिलहरी त्या ओंगळवाण्या पण भीतीदायक प्राण्यांच्या मेंदूत पोहचून अचूक परिणाम साधत होत्या. एरवी भित्री मानली जाणारी ती जमात कमालीची आक्रमक झाली होती. केवळ शब्दांच्या आधारे विखार पेरण्यात तो यशस्वी झाला होता.. नेहमीसारखाच !
कित्येक तपांपासून त्या मनांवर त्याचे अधिराज्य होते. त्या काळोख्या विश्वातील सर्पसृष्टीचा तो अनभिषिक्त सम्राट होता. ती दुनियाच निराळी होती. स्वतःचा वंशविस्तार झपाट्याने वाढवण्यासाठी हपापलेली ! पण त्यांचे वारस नैसर्गिक नव्हते. त्यांच्या पूर्वजांना टोपलीत डांबणाऱ्या, वाद्यांच्या साह्याने त्यांचे खेळ मांडणाऱ्या मानवजातीला काही सिद्धींच्या मोबदल्यात जमिनीवर सरपटण्यास भाग पडण्याची दुर्दम्य महत्वाकांक्षा घेऊन कार्यरत झालेल्या सरीसृपांची ती फौज होती. एकाहून एक हाहाकारी भयंकर विषधर त्या सेनेत होते. त्याचे आज्ञापालन करण्याशिवाय दुसरे काहीच ठाऊक नसलेल्या निष्ठावंत प्राण्यांना सोबत घेऊन तो वाटचाल करीत होता.
आजचा दिवस मात्र त्या सभागारातल्या काळोखाहून काळा होता. पराभवाची काजळी त्याच्या मनाला फसली गेली होती. त्यांच्या नुसत्या फुत्काराने जीव गमावण्याची वेळ येणारी घाबरट मानवजात, त्यातही त्यांच्यासाठी प्रजनन करून नवे वारस देणाऱ्या स्त्रियानी बंड पुकारले होते. त्या वाड्यात आजवर असे कधीच घडले नव्हते. त्यांची सत्ता आणि त्यासाठी द्यावे लागणारे स्वतःचे बलिदान निमूटपणे मान्य करणाऱ्या त्या दुबळ्या स्त्रियांपैकी दोघीनी सरळ विद्रोह पुकारावा ही बाब पराभवाहून क्लेशकारक होती. विद्रोहाचा हा अंगार फुलत गेल्यास या सर्पकुलाचा विस्तार धोक्यात येण्यास वेळ लागणार नाही हे कळून चुकलेल्या त्या अनुभवी सर्पनायकाने विचारातले विष त्या वेटोळ्यांच्या मनामनात भिनवले...

वृंदाची सासू त्या रात्री सावधपणे झोपली होती. कुठेही खुट्ट झाले तरी तिचा जीव खालीवर होत होता. वृंदाच्या पोटातल्या जीवावर पडणारी अनिष्टाची छाया दूर सारण्यासाठी जे धाडस केलं त्याची किती मोठी किंमत द्यावी लागेल याचा विचार काही केल्या मनातून जात नव्हता. संभाव्य संकट किती भयंकर असेल त्याची हजारो चित्रे पापण्यांआड उभी केली तरी तिची भीती कायम होती. त्या विचित्र मानसिकतेत असतानाच दार करकरल्याचा आवाज झाला. तिच्या लक्षात येणार नाही अशा बेताने दार उघडून कोणीतरी आत येत होते.
तिने डोळे किलकिले करून बघितले. तिच्या पायाजवळ नवरा उभा होता.
डोळ्यात आग पेटली होती त्याच्या ! जन्मोजन्मीची वैरीण असल्याप्रमाणे तिच्याकडे तो खुनशी नजरेने बघत होता. त्याचे मूळचे हिरवे डोळे विष मिसळल्याप्रमाणे अधिक हिरवे झाले होते. गर्दगोरा चेहरा लाल झाला होता. मान वारंवार झटके खात होती. पाठीचा कणा कमालीचा ताठ होऊन मणक्यांची कमाल लवचिकता पणाला लावत होता. आकडी आल्यासारखं शरीर डोलत होतं.
काय आहे ? तिने हिंमत एकवटून विचारले.
असं का केलंस तू ? त्याने हिंस्त्र आवाजात विचारले.
मग तुमच्या अघोरी सिद्धीसाठी बळी देऊ या वंशाच्या दिव्याचा ? ती ही संतापली होती.
वंश... तो विकट हसला.. कोणता वंश.. कोणाचा वंश ? या वंशाचा उगम आणि असत फक्त त्याच्यापाशी होतो. त्याच्यासाठीच इथेच लग्नासारखे मानवी संस्कार होतात आणि शरीरसंबंधही ! ती त्याला द्यायची आहुती असते. तू तुझं कर्तव्य विसरलीस. आज आमच्या मार्गात आलीस.
हो.. आली आणि हजारदा येणार ! हे अघोरी पापकर्म कशासाठी करत आहेत तुम्ही ? माझी तिन्ही लेकरं तुम्ही अशीच तोडलीत. आईच्या छातीला लुचून दूध ओढण्याच्या वयात विष लावलंत त्यांच्या तोंडी ! हे थांबवा.. तुमच्या पाया पडते. किमान आपल्या रक्ताचा तर विचार करा ! ती रडू लागली.
लवकरच थांबेल.. काळजी करू नकोस. पण जेव्हा थांबेल तेव्हा ते बघण्यासाठी तू जिवंत असणार नाहीस. ... त्याचा स्वर पुरता बदलला होता. त्यातली धमकी स्पष्ट जाणवत होती.
आपली घटका भरलीच हे तिला कळून चुकले. पण इतक्या सहजासहजी मरण पत्करण्याची तिची तयारी नव्हती. त्या खोलीत आपल्या बचावासाठी काय हाती येईल याचा शोध घेत तिची नजर भिरभिरू लागली.
तो मात्र बेखबर होता. नव्हे, त्याला तेव्हढी फुरसत नव्हती. त्याचं शरीर बदलू लागलं होतं. गोरापान चेहरा जाडसर ठिपक्यांनी भरून गेला. अंगावर खवले पसरले. प्रमाणाबाहेर लांब झालेल्या जिभेला दोन टोके फुटली. सर्पात रूपांतरित होण्याची अघोरी सिद्धी लाभलेला तो हळूहळू उद्दिष्टपूर्तीकडे चालला होता. त्याला पाहून तिचा श्वास अडखळला. या अशा भयंकर सर्पमानवापासून आपण तीन वारस निर्माण केले या विचारानेच तिला शिसारी आली. याला ठेचलेच पाहिजे असा विचार करून ती उठू लागली. पण ते दृश्य पाहून ती जागीच थबकली.
त्याच्या अर्धवट उघड्या तोंडातून काहीतरी बाहेर पडत होते. दीड हात लांबीचे ते जनावर छातीवरून ओघळत जमिनीवर आले. जमिनीचा पहिला स्पर्श होताच त्याने फणा काढला.
त्याच्यापाठोपाठ एक, दोन, तीन..... कितीतरी सर्प बाहेर पडले आणि पडतच होते.
त्या खोलीची इंच न इंच जागा वळवळणाऱ्या वेटोळ्यांनी व्यापली गेली. काळ्याशार रंगाचे ते पूर्ण वाढ झालेले यमदूत तिला खिजवत होते. तिच्याकडे पाहून फुत्कार टाकत होते. दुहेरी टोकाच्या लवलवत्या जिव्हा बाहेर काढून तिला भय घालत होते. सर्पकुल म्हणजे काय असते, कसे असते याचा साक्षात्कार तिला घडवून देत होते.
त्या शिसवी पलंगाच्या पायांवरून ते वर सरकू लागले. काही वेळातच तिच्यापासून काही इंच अंतरावर ते फणा काढून डोलत उभे राहिले. तिने डोळे मिटले.
बस्स.. एकच दंश.. आणि सर्व संपेल. हा अंधार.. इथली भयानक माणसे.. त्यांचे हिरवेगार डोळे.. सर्व काही त्यागून मी अनंताच्या प्रवासासाठी मोकळी... नाहीतरी आजवरचे जगणे मरणाहून काय कमी होते ? तिने मनाची तयारी केली.
तिच्या अंगांगावर दंश करण्यासाठी आसुसलेले ते अद्याप पुढे सरकत नव्हते. त्यांना अद्याप हुकूम मिळाला नव्हता.
तिच्या गळ्यात कधीकाळी ज्याने मंगळसूत्र घातले होते, तो तिच्या कुंकवाचा धनी पलंगाजवळ गेला. अर्धसर्पमानवाच्या अवस्थेतील त्या भीषण रूपाच्या स्वामीने तिचा चेहरा ओंजळीत धरला. तो लिबलिबीत स्पर्श अनुभवताच तिने डोळे उघडून पाहिले.
तेच हिरवेगार डोळे समोर होते... संमोहित करणारे.. विळ्ख्याचीही भूल पाडणारे. ..
बाकी चित्र मात्र बदलले होते. त्याच्या लालचुटुक ओठातून विषाची उधळण करणारे दोन दात बाहेर आले. त्याने मानेला झटका दिला. ते दात तिच्या ओठात खुपसले गेले. वेदनेची एक तीव्र कळ तिच्या शरीरात उमटून गेली.
इशारा मिळाला होता.. प्रतीक्षेत असलेल्या फौजेने चोख काम बजावले. एकाच वेळी हजारो दंश तिच्या अंगांगावर झाले. त्यांनी तिच्या शरीराची चाळण केली. केवळ विष पसरून ते थांबले नाहीत. तिच्या शरीरातील प्रत्येक तत्व त्यांनी शोषून घेतलं. अमर्याद विषाचा पुरवठा झाल्याने तिचे शरीर आधी फुगले. मग हळूहळू आकुंचन पावत रोडावत गेलं. इतकं की... तिचं पोट पाठीला जाऊन भिडले...
तो हळूहळू मूळ रूपात परतला. त्याच काम संपलं होतं. पलंगावर पडलेलं तिचं निष्प्राण शरीर त्याने पाहिले. सर्वकाही शोषून घेतल्याने वाळका झालेला तो मृतदेह त्याने दोन्ही हातात घेतला. त्या अंधारात तो सराईतपणे पायऱ्या उतरू लागला. कामगिरी फत्ते केल्याचा आनंदात त्याच्यामागे सर्पकुल सरपटत निघालं होतं.
(क्रमशः)