अवदसा >> भाग 4
काळ मोठं औषध असतो. दुःख कितीही अस्मानी असलं तरी कॅलेंडरची पाने उलटतात तशी त्याची तीव्रता कमी होत जाते. बायकोच्या जाण्याने घरात तयार झालेला अवकाश अवंतीच्या बाललीलानी भरून गेला होता.
अवंती....मुग्धानेच ते नाव ठेवलं होतं. तिने जन्मतः गमावलेल्या आईचं ते नाव होतं. निसर्गाच्या विरोधात जाऊन मुक्तीवाचून तडफडणाऱ्या आईला पुन्हा मर्त्य दुनियेत खेचून आणण्याची अचाट कामगिरी पार पडणाऱ्या मुग्धाचा तेव्हढा हक्क निश्चितच होता...आणि मला तो नाकारण्याचे कारण नव्हते !
मुग्धा तर अवंतीची आईच झाली होती. कासवाची मादी नुसत्या नजरेने पिलांना मोठी करते असे म्हणतात. मुग्धाचं तर अवंतीशी दुहेरी नातं होतं. अवंती तिची पूर्वाश्रमीची आई होतीच शिवाय माझ्या बायकोला पणाला लावून तिचा जन्म झाला होता. त्यामुळे मुग्धाची तिच्यावरील माया अक्षरशः उतू चालली होती. उरलो होतो मी...अगदी एकटा ! माझ्यावरील दोघींची माया तसूभरही कमी नव्हती. पण दोघांमध्ये संपूर्ण मिसळण्याचा प्रयत्न करूनही मला एकट एकट वाटत होतं..
त्या भागातले लोक आताशी माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत असल्याचं जाणवत होतं. विशेषतः स्त्रिया ! मी ये-जा करतांना त्या एकमेकींच्या कानाशी लागत. नाकासमोर चालणाऱ्या माझ्यासारख्या सरळमार्गी माणसाला ते कोडंच होतं. पण शेजारच्या लिमयेनी एके दिवशी सर्व काही स्पष्ट केले.
मला हाक मारून घरात बोलावल्यावर ते म्हणाले...
वहिनी जाऊन दोन वर्षे झाली असावीत ना ?
हो ! मी.
मग तुम्ही मुलीसाठी दुसऱ्या लग्नाचा विचार करायला हवा.. त्यांनी सुचवले.
मला त्याची काही गरज वाटत नाही.. मी सरळ सांगितलं.
बरोबर, कशी वाटणार ?..हा आवाज सौ.लिमयेचा होता.
म्हणजे ? मी न कळून विचारले.
वेड पांघरु नका. घरात तरणीताठी पोर आणून ठेवलीय. मग लग्न कशाला हवं ? त्या फणकाऱ्याने म्हणाल्या.
तोंड सांभाळा वहिनी! मुग्धा माझ्या मुलीसारखी आहे ! मी चिडलो होतो.
ते आम्हाला नका सांगू ! मुलीसारखी असेल तर लग्न लावून द्या तिचं..कॉलनीत काय काय चर्चा होताहेत ते माहीत आहे का ? मिस्टर लिमयेही उखडले होते.
अहो लिमये, असं काय करता ? माझ्या मुलीला कोण सांभाळणार मग ? मी घायकुतीला आलो होतो.
म्हणून सांगतोय, तुम्हीही लग्न करा आणि तिचंही लावून द्या. शेजारी म्हणून आम्हाला भंडावतात लोक ..लिमयेनी तुकडा तोडला.
मी उठून घरी आलो.
तो संपूर्ण दिवस डोक्याचा भुगा झाला होता. लिमये म्हणतात त्यात काहीच गैर नव्हतं. कॉलनीतल्या सर्वांनी मसलत करूनच लिमयेना बोलण्यासाठी उद्युक्त केलं असणार ! माझ्या खाजगी आयुष्यात नाक खुपसण्याचा त्यांना काय अधिकार ? मला काहीशी चीड आली.
अवंती चालत येऊन सरळ माझ्या पोटावर चढली. माझ्या कानाच्या पाळ्या ओढू लागली. मी तिच्या चेहऱ्याकडे पाहिले. तिची जिवणी, डोळे, ओठ सर्वकाही मुग्धासारखे होते. तिच्याशी काही वेळ खेळल्यावर मी मुग्धाला हाक मारली. लगबगीने येऊन तिने अवंतीला घेतले. माझा चेहरा पाहून विचारलं..
काका, काही बिनसलंय का आज ? तब्येत बरी नाही का ?
नाही गं! हे साले कॉलनीवाले...उगाचच ! मी दुखऱ्या स्वरात म्हणालो.
का, काय झालं ? तिने आग्रहाने विचारलं. मीही आडपडदा न ठेवता सर्व काही सांगून मोकळा झालो. बोलणं आटोपून तिच्याकडे पाहिले.
मुग्धाचे टपोरे डोळे पाण्याने भरले होते. ओठ थरथरत होते.
मी काहीतरी बोलणार तोच माझी नजर तिच्या कडेवरील अवंतीकडे गेली.
तिने मुग्धाला घट्ट पकडले होते. तिची नजर...तिथे डोळे नव्हतेच जणू! दोन धगधगते निखारे कुणीतरी खोबणीत ठेवले होते. दात गच्च मिटले गेले होते.
अवंती.....मी बेंबीच्या देठापासून ओरडलो. तशी मुग्धा भानावर आली. तिने अवंतीकडे पाहिले. क्षणार्धात ती सामान्य झाली होती.
मी मात्र अजूनही त्या इवल्याश्या निष्पाप जिवाच्या प्रतिक्रियेवर हैराण होतो.
या घटनेला चार दिवस उलटले असावेत. सकाळी मला कल्लोळाने जाग आली. गल्लीत खूप माणसे जमली होती. मीही तोंड धुवून त्या गर्दीत पोहचलो. एकदोघांना विचारले काय घडले म्हणून !
अहो, चार दिवसापासून लिमये घराबाहेर पडलेले नाहीत. पेपरवाला, दूधवाला दार ठोकून परत जाताहेत. दाराला कुलुपही नाही. काय घडलं असावं देव जाणे !
काही वेळात पोलिसांची जीप येऊन पोहचली. गर्दीला पांगवत एक फौजदार, दोन हवालदार दाराजवळ पोहचले. कुठूनही मार्ग नसल्याने दार तोडण्याचा निर्णय घेण्यात आला. पंच म्हणून माझ्यासह दोघांना तयार केले. त्या हवालदारांनी दिलेल्या दमदार धक्क्यांनी आतली कडीकोयंडा तुटून दार उघडले गेले.
भप्प...कोंडलेल्या हवेच्या झोतासह तीव्र दुर्गंधीचा भपकारा नाकात शिरला. ती घाण असह्य होऊन माझ्यासोबतच्या दोघांनी जागीच उलटी केली. मी व हवालदारांनी नाकावर रुमाल ठेवून बेडरूममध्ये प्रवेश केला.
तिथलं चित्र कोणालाही हृदयविकाराचा झटका आणण्यासाठी पुरेसं होतं.
बिछान्यात लिमयेचं शरीर पालथं पडलं होतं. त्याचा चेहरा मात्र वर होता. कमालीच्या पाशवी ताकदीने त्याची मान कोणीतरी पिरगळली होती. शरीर सडण्यास सुरवात झाली होती.लिमये वहिनी बेडरूमच्या कोपऱ्यात बसल्या होत्या. डोळे सताड उघडे होते. चेहऱ्यावर काहीतरी भयंकर पाहिल्याचे भाव होते. नाक, कानातून पिवळाजर्द स्त्राव बाहेर आला होता. नेहमी वटवट करणारे, कुजकं बोलणार त्यांचं तोंड केविलवाण दिसत होतं.
मी शिसारीने मान फिरवली...

घाईगर्दीत पंचनाम्यावर सह्या करून मी घराकडे पळालो. मनात काहीतरी अशुभ शिरू पाहत होतं. अंघोळीसाठी गेलो तेव्हा बाथरूममधून पाण्याचा आवाज येत होता. बहुतेक मुग्धा आत असावी.
अवंतीला पाहण्यासाठी तिच्या खोलीत गेलो. तिची झोपमोड होऊ नये म्हणून हलक्या हाताने दार उघडलं. आत मान डोकावली..
पोटातली आतडी सप्पकन हलली. हृदय धाडधाड उडू लागलं. जीभ, घसा कोरडा पडला. भोवळ आल्याने मी भिंतीचा आधार घेऊन उभा राहिलो.
छतावर उलटी लटकून पालींचा पिच्छा करीत अवंती पळत होती. खदाखदा हसणाऱ्या अवंतीला पाहून ते ओंगळवाणे जीव भयाने पळत होते. जमीन, भिंती, छत अशा चौफेर पळणाऱ्या अवंतीला पाहून मी मट्कन खाली बसलो.
(क्रमशः)