सर्पकुल -भाग 4- Marathi bhaykatha,marathi bhutkatha,marathi bhitidayak katha,horror marathi
प्रदीर्घ काळ धीराचे प्रदर्शन करणाऱ्या वृंदाच्या सासूच्या काळजाने ठाव सोडला होता. त्या खोलीतून साक्षात मृत्यूच बाहेर पडला होता. थोडाही उशीर केला असता तर ? या कल्पनेनेच ती थरथरत होती. घडला प्रकार पाहून वृंदा पांढरीफटक पडली होती. या वाड्यातल्या काळोखाच्या पोटात आणखी किती रहस्ये दडली आहेत, सासूने पोटावर घाव करण्याच्या अघोरी कृतीमागचे कारण काय, दारातून आत येऊ पाहणारे ते नेमके कोणाच्या जीवावर उठलय, आपला आणि त्याचा संबंध काय असे अनेक प्रश्न तिच्या चेहऱ्यावर दाटले होते.
सगळीकडे सामसूम झालीये.. आता धोका उरलेला नाही याची खातरजमा करून घेतल्यावर तिची सासू पुन्हा वृंदाजवळ आली. नुकत्याच पिकू लागलेल्या केसांखालचे तिचे कपाळ आठ्यांनी भरून गेले होते. वृंदाविषयी वाटणारी काळजी तिच्या डोळ्यात पसरली होती. वृंदाचा चेहरा ओंजळीत धरून ती म्हणाली,
तुला फार लागलं नाही ना पोरी ?
नाही, पण असं का केलंत आत्याबाई ? वृंदाने विचारलं.
तुझ्या भल्यासाठीच केलंय सारं ! सासू मायेने म्हणाली.
हे कसलं भलं म्हणावं, पोटावर सरसर चाकू फिरवला.. रक्ताची धार बाहेर काढली.. थोडा आणखी जोर लागला असता तर कोथळाच बाहेर पडायचा.. वृंदाच्या चेहऱ्यावर प्रश्न चमकून गेले.
मला जितकं ठाऊकाय.. तितकं सांगते. सांगावेच लागेल ! त्याला डिवचल्यावर मी आणखी किती जगू शकेन याची शाश्वती नाही... उसासा सोडून पण निर्धाराने सासू बोलत होती.
या वाड्यातली स्त्री.. इथल्या पुरुषांच्या ताब्यात असते. शरीराने आणि मनानेही.. ते तिच्या शरीराशी केवळ उद्दिष्टपूर्तीसाठीच खेळतात. पण मनाशी.... मनाशी मात्र कायम खेळत असतात. रात्रंदिवस ! आपल्याला होणारे सारे विभ्रम, भास, आभास सर्व काही त्यांनी योजलेले असतात. मग मृत्यूचा विळखाही हवाहवासा वाटू लागतो. विषारी दंश व्यसनासारखे अंगवळणी पडतात. काळोख आवडू लागतो. प्रकाश नकोसा होतो.
दुपारी खालच्या खोलीत घडलेला तो प्रकार आठवला वृंदाला आठवला. तिच्या अंगावर भीतीने काटा उभा राहिला. सुभाष.... तू खेळत होतास..
वृंदाची सासू बोलतांना थांबली. तिचा ऊर धपापत होता.
वृंदा एकटक तिच्याकडे बघत होती. तिने विचारले,
पण असं का घडतंय या वाड्यात.. का करतात ही लोक अशी ?
पोरी.. हे देशमुखांचे कुळ नव्हे... हे सर्पकुल आहे.. तिच्या आवाजातही भीती दाटली होती. अशुभाची काळी सावली तिच्या मनाभोवती फेर धरू लागली होती. आजवर अज्ञात असलेलं हे रहस्य या कोवळ्या, गर्भार मुलीपुढे उघड करणे योग्य होईल का अशी चिंताही तिला वाटू लागली. पण त्याचा भेद होणे आवश्यक होते. कित्येक पिढ्यांपासून सुरु असलेली ती अघोरी परंपरा थांबेल न थांबेल, किमान तिची पुसटशी का असेना, या वाड्यातल्या कुलस्त्रीला कल्पना असणे गरजेचे होते.
सर्पकुल... त्या शब्दांमागे दडलेल्या हजारो जिव्हानी एकाच वेळी दंश केल्यासारखी वृंदाची गत झाली. मघाशी झालेले ते अशुभाचे भयावह दर्शन आणि आता सासूच्या तोंडून बाहेर पडलेले रहस्य... आपल्याच नशिबी का यावेत हे भोग.. गरिबाघरची लेक ! लग्नानंतर तरी दिवस पालटतील अशी आशा घेऊन या वाड्यात पाय टाकला. नवरा अबोल.. अंतर्मुख ! सदानकदा स्वतःतच हरवलेला.. अशी तेज हिरवीगार नजर.. जुगलबंदी करून भारणारी ! पण कायम कशाच्या तरी अमलाखाली असलेला... त्याचीही आशा सोडली. पोटी येणारं निखळ सत्व तरी पांग फेडेल याच अपेक्षेने आला दिवस ढकलतेय तर हे जीवघेणे संकट समोर उभे राहिले.. वृंदाचा मेंदू काम देईनासा झाला.
पण सासूला मात्र तिच्याकडे पहायलाही फुरसत नव्हती. अंतःकरणात खोलवर दडलेली भीती वर येऊ पाहत होती. तिने प्रभुत्व मिळवण्यापूर्वीच ते रहस्य सांगणं गरजेचे झाले होते.
वृंदा.. पोरी आपण या पुरुषांच्या अधीन आहोत. पण या वाड्यातला प्रत्येक पुरुष त्याच्या गुलामीत आहे. तो कोण आहे हे मला ठाऊक नाही.. त्याला मी कधी पाहिलेले नाही. पण त्याने पुरुषांना दिलेल्या सिध्दी पाहिल्या तर तो प्रचंड ताकदीचा आणि अमर्याद सिद्धीचा स्वामी असावा हे सहजच कळते. त्याची सत्ता इथल्या कणाकणावर चालते. इथली दगडी दिसणारी मने त्याच्या आदेशावर चालतात. हे पाषाणहृदयी लोक त्याच्या सूचनांवर डोलतात.
वृंदाच्या पोटातली भीती डोळ्यात गोळा झाली होती. आपण जिथे राहतोय, ती जागा एका अदृश्य हुकमतीखाली आहे, इथले सर्व व्यवहार ती शक्ती नियंत्रित करते म्हणजे काय ? हे कसे शक्य आहे ?
आत्याबाई, मग माझ्यावर झालेला तो प्रयोग ? तिने चाचरत विचारले.
हो.. केवळ वाड्यात अस्तित्व असणारी लोकच नव्हे तर गर्भातल्या जीवावरही सत्ता चालवण्याचा त्याचा प्रयत्न आहे. आणि अनेकदा तो यशस्वी ठरलाय.. हे सांगताना सासूचा कंठ दाटला होता.
म्हणजे. तुमच्यावरही... वृंदा म्हणाली आणि तिच्या सासूने आतापर्यंत महत्प्रयासाने अडवून ठेवलेला अश्रूंचा बांध फुटला.
होय पोरी.. तसाच विळखा मला पडला होता.. एकदा नव्हे तर तीनदा आणि त्याचे परिणाम मी भोगतेय.. माझ्याआधी माझी सासू आणि त्यापूर्वी तिची सासू.. अशा कित्येक पिढ्यातल्या स्त्रियांना तो विळखा घातला गेला आणि त्याची सत्ता अबाधित राहिली. त्याची पालखी उचलणारे नवे हात तयार होतच गेले. आता तुझी पाळी आहे..
आता काय होईल ? संभाव्य परिणामांच्या भीतीने वृंदा शहारली होती.
तुझ्या उदरातल्या जीवावर त्याची सत्ता चालणार नाही. कारण त्याभोवती तुझ्या ओजातून निर्माण झालेले परम पवित्र पाणी आहे. त्यामुळे त्याचे संदेश तिथवर पोहचू शकणार नाहीत. त्याला हवे ते संदेश पोचवण्यासाठी कित्येकदा तुला विळखा घालावा लागेल. दुपारी जे घडलं तो याच योजनेचा एक भाग होता. आता हे प्रयत्न वारंवार होतील. त्या विळख्याचा मोह कसा टाळायचा हे सर्वस्वी तुझ्यावर आहे.... सासू आता निरवानिरव करीत होती. भीतीची ती उबळ तिच्या छातीशी झटत होती.
मग ही जखम ?? वृंदाने ठसठसणारा तो भागच जणू उघडा केला.
त्या सायीसारख्या मऊ भागावरून अलगद हात फिरवीत सासू म्हणाली,
आता काही दिवस तरी तुला भीती नाही... या जखमेत जहाल प्रतिविष भरलय मी... या सर्पकुलाचा कोणताही वारस तुझ्याशी आता झटू शकत नाही. तुझ्या गर्भाला कह्यात करण्याचं स्वातंत्र्य फक्त त्याच्यात आहे. आणि तो अहंकारी जीव स्वतः ला या कामाला जुंपून घेणार नाही. तोपर्यंत तू निर्धास्त आहेस पोरी...
तो दिलासा वृंदावर अपेक्षित परिणाम करू शकला नाही. ती डोकं गच्च धरून बसून राहिली. त्या खोलीतून सासू खांदे पाडून चालत कधी बाहेर पडली ते तिला कळलेच नाही.

ठीक त्याच वेळी...
वृंदाच्या खोलीखाली तीन पुरुष खोल असलेल्या त्या सभागारात मात्र जल्लोष सुरु होता.. सर्पयुगुले क्रीडा करत होती. ज्यांच्यावर विशेष जबाबदारी होती, ते मात्र ती मौजमजा फक्त प्रेक्षक बनून बघत होते. त्यांच्या पुढ्यात लालभडक रक्त होते. ते रिचवून त्याचे अतिजहाल आणि तोड नसणारे विष कसे तयार होईल याची तजवीज करण्यात ती निष्ठावंतांची वेटोळी गुंतली होती. फुत्कार... मग ते असूयेचे असोत, क्रोधाचे असोत की स्वामीनिष्ठेचे... त्यात लय उरली नव्हती. कोणत्याही मानवी सभेइतकेच ते बेशिस्त झाले होते. ही आसक्तियुक्त फौज कोणती आणि कशी कामगिरी बजावणार ??
तो आवाज पुन्हा घुमला.... त्यात चीड होती, आदेश होता आणि प्रामुख्याने खेद होता.. !!
कृतघ्नानो.... तुमच्या शक्तिदात्यावर काय प्रसंग ओढवलाय आणि तुम्ही सण साजरा करत आहात ? हीच का ती सर्पकुलाची शिस्त... तुम्ही सर्वजण शिक्षेला पात्र आहात... आजपासून सर्व उत्सव बंद !

त्या गर्वोन्नत, आव्हानाच्या मुद्रेतील फणा अवनत झाल्या. आपल्या तारणहाताच्या मुखातून काय बाहेर पडतेय याची वाट बघत त्या वळवळणाऱ्या जीवांनी स्वतःला त्या थंडगार नि खरबरीत जमिनीवर स्वतःला झोकून दिले...
(क्रमशः)
(क्रमशः)