गायब भाग 3 Gayab horror story by marathighoststories
सून बाई चल लवकर घरी जाऊयात... फार विचित्र आहे ते म्हणत मिसेस नेने धावत घरी आल्या... सून आणि मिसेस नेने घरी आल्यावर त्यांनी घराचे मुख्य दार लावले त्याला कडी लावून ते घरातील हॉल मध्ये आले... ह्या दोघींना घाबरलेले बघून घरातील लोकांनी विचारपूस केली... त्यांनी त्यांचा अनुभव सांगण्यास सुरवात केली... अनुभव सांगत असतानाच मुख्य दरवाज्यावर काही तरी आदळले आहे असा आवाज झाला... सर्वांना तो आवाज आला, ह्या दोघीनी सांगत असलेला अनुभव ऐकून बाकीचे खूप घाबरले होते आणि त्यातून आता मुख्य दरवाजा जवळ कोण आले आहे याची सर्वांना भीती वाटू लागली...सर्वत्र शांतता पसरून एक वेगळी भीतीचे लहर आली होती... आता त्या दरवाज्यावर कोणीतरी जोरात नखे मारत असल्याचा आवाज येत होता....काहि क्षणात आता तो दरवाजा तुटून ते कोणी जे बाहेर आहे ते आत येणार ह्या भीतीने सर्व जण घरातील एका रूम मध्ये गेले..कोणाच्याही तोंडातून एक शब्द फुटत नव्हता सर्व जण घाबरलेले होते... आता कसलाही आवाज घरातून किंवा घराच्या बाहेरून येत नव्हता... सगळं काही पूर्वी प्रमाणे झालेले... पहाटेचे 3 वाजून गेले होते, कोणीही दरवाजा उघडला नाही सर्व जण तसेच झोपी गेले... झोप कसली हो त्यांना थोडा कसला आवाज आला की सगळे जागे होत होते...
सकाळ झाली सूर्याच्या किरणांनी घरात प्रवेश केला, भीती काहीशी नाहीशी झाली, पण मिसेस नेने अजूनही मिस्टर नेने यांच्या विचारात होत्या, सगळे मिळून घराचा मुख्य दरवाजा उघडला बाहेर कोणीही नव्हतं, सर्व काही पूर्वव्रत झाले होते.... पण पण त्या दरवाज्यावर कसलीही खाण खून नव्हती...सर्व कामे करून जेवण झाली सर्वांची.... सगळे हॉल मध्ये बसले असता, एक बाई भीक मागण्यास आली कडेवर एक 2 वर्षाच लेकरू असेल उन्हात उभी राहून ती पोटाला काहीतरी तुकडा द्या म्हणू लागली, मिसेस नेने उठून किचन मध्ये गेल्या आणि 2 पोळी आणि एक भाजी त्यात ठेवून ती त्या बाईला दिली आणि ते देत असताना त्यांनी एक भावुक चेहरा करून त्या भीक मागणाऱ्या बाईला विचारले, " ये बाई आमचे हे कुठे दिसले का तुला..??"
ती बाई : "काय झालं ताई कोनाबद्दल विचारत आहात"
मिसेस नेने : "आग काल पासून ते गायब झाले आहेत कुठे गेले आहेत कळेना गेले"
त्यांचं बोलणे चालू असताना सून बाई बाहेर आली...
सुनबाई : "अहो आई तुम्ही त्यांना का विचारत आहात त्यांना काहीही माहीत नसेल..... बाई तुम्ही जावा, सावलीला बसून खावा"
तशी ती बाई गेली...त्या बाई कडे बघून मिसेस नेने सुनेला म्हणाल्या, त्यांनी पण एकदा बोलताना एका भिकाऱ्याचा उल्लेख केला होता, तो त्यांना त्या बागेजवळील बाकड्यावर बसलेले असताना आढळला होता, त्याचे बोलणे फार विचित्र होते म्हणे त्याच्या बोलण्यानंतर त्यांना खूप भीती वाटू लागली म्हणून ते घरी आले आणि हे सर्व काही घडलं.... चल आपण त्या ठिकाणी जाऊन त्या भिकाऱ्याला शोधून काढू, काहीतरी मार्ग सापडेल आपल्याला....
सुनबाई : अहो आई खूप उन्ह आहे थोड्यावेळाने नक्की जाऊ आपण... आणि सर्वत्र शोधुया, चला आत जाऊया म्हणत मिसेस नेने ना धरून सूनबाई त्यांना आत घेऊन गेली... आत जाऊन परत मिस्टर नेने यांचा विषय चालू झाला, मध्येच अचानक पोलीस गाडीचा सायरन वाजू लागला... तो आता जवळ येत आहे याची जाणीव सर्वांना झाली... सुनबाई खूप घाबरली... सायरन वाजत वाजत गाडी लांब गेली,
सुनबाई : बापरे किती घाबरले मी, घरात ह्या अश्या गोष्टी घडत आहेत आणि काही मार्ग मिळत नाही तेवढ्यात पोलिस गाडीचा आवाज भीती वाटली... बाबा सुखरूप असू देत रे देवा म्हणत सूनबाईने हाथ जोडले... मिसेस नेने यांचे डोळे भरून आले....
आई बसा तुम्ही मी एक कॉल करून आले....म्हणत सुनबाई तिच्या रूम मध्ये निघून गेली...
मिसेस नेने घराच्या खिडकी जवळ बसून मिस्टर नेने यांच्या येण्याची वाट पाहू लागल्या होत्या....
"ये ना रे साजणा माझ्या
जीव माझा गुदमरला
अखेरच्या श्वासापर्यंत भाव
तुझा रे मनी उमटलेला"
त्यांनी घेतलेल्या शोपीस ला हाथ लावत मिसेस नेने मनातल्या मनात हसल्या... कारण हा शोपीस आणल्या नंतर त्या मिस्टर नेने यांच्यावर रुसल्या होत्या, तेव्हा त्यांचा रुसवा काढण्यासाठी मिस्टर नेने यांनी चक्क स्वतःच्या हाताने जेवण बनवून मिसेस नेने यांना खाऊ घातले होते....
आई ... आई चला आवरा लवकर आपल्याला ताबडतोब जायला हवे म्हणत सूनबाईने पायात जोडे घातले...
मिसेस नेने : कुठे जायचे आहे आपल्याला आता
सुनबाई : कपाळावरील घाम पुसत... काय आई विसरले का तुम्ही त्या भिकारी गृहस्थाला भेटायचं नाही का आपल्याला...म्हणत सुनबाई आणि मिसेस नेने निघाल्या...
मिसेस नेने मनातल्या मनात विचार करू लागल्या मघाशी तर उन्ह आहे म्हणून हा विषय टाळला, परत पोलीस गाडीचा आवाज ऐकून ही घाबरली...नंतर एक कॉल करून येते म्हणून रूम मध्ये गेली ती घाबरत माघारी आली आणि मला म्हणाली चला लवकर... काय झालं आहे हिला नेमकं, काळजी पोटी करत असणार म्हणत मिसेस नेने काही विचार न करता चालू लागल्या...खूप वेळानंतर सून बाई ने त्यांना एका बाकड्यावर बसवले आणि पाणी आणते म्हणून सुनबाई गेली.... मिसेस नेने एकट्याच बाकड्यावर बसल्या होत्या... तेवढ्यात त्यांच्या जवळ एक भिकारी आला... काहीतरी द्या ओ पोटा साठी, खूप भूक लागली आहे....
मिसेस नेने : अहो आता माझ्या जवळ काही नाही, तुम्ही घराकडे आला असता तर, मी तुम्हाला पोट भरून जेवायला दिले असते..
भिकारी : पैसे असतील तर द्या मग थोडे काहीतरी विकत घेऊन खातो
नेने : आता माझ्याकडे काहीच नाही आहे रे... माझी सुनबाई येईलच इतक्यात तिच्याकडून मी तुला पैसे देऊ करते थांब...
सुनबाई येत असताना दिसल्या...
मिसेस नेने : "थांब बर का ती बघ माझी सुनबाई येत आहे.." तिच्या कडे बोट करून त्या भिकाऱ्याला दाखवू लागल्या पण तो भिकारी तेथून निघून गेला....
सुनबाई : कायझालं आई कोणाशी बोलत आहात...
नेने : आग एक भिकारी आला होता... तू येत आहे म्हणत असताना तो निघून गेला...
सुनबाई : चला आई येथे जवळच पोलीस स्टेशन आहे तसेही 24 तास होतच आले आहेत बाबा गायब होऊन आपण कंप्लेन्ट करून येऊ....
असे म्हणत त्या दोघी पोलीस स्टेशन ला जाऊ लागल्या....चालत जात असताना सुनबाई ने पाठीमाघे वळून पाहिले तर त्या बाकड्यावर तो भिकारी निवांत बसलेला तिला दिसला....
क्रमशः
(अभिप्राय नक्की कळवा)