चकवा__द__सस्पेंस
एक असं सत्य जे फक्त शेवटीच कळेल....!!
•
•
बराच वेळ झाला होता . रात्र गडद होत चालली होती.रातकिड्यांचे कीरकीर्ण अंधाराची झोप मोड करत होत जणू .... वाऱ्याचा भुरभुराट मागून कोणीतरी पाटलाग करत असल्या सारखा बिचकावन्या दाखवत होता.... गर्द झाडी विस्तीर्ण जगल आणि महाकाय असा पुढे दिसणारा सुनसान रस्ता.... रात्रीच्या नऊ वाजून गेल्या असतील...
पावसाळी ट्रीप साठी जंगलात धबधबा बघायला आणि एन्जोय करायला गेलेला राकेश आपल्या इतर मित्रांसोबत वनराईला आला होता.पाच जन आणि प्रत्येकाची बुलेट असल्याने पावसात रायडिंग करण्याची मजा काय वेगळीच असते. प्रतेकजन आपल्या परीने मजा मस्ती करत होता.. सडा वाघापूरला मोकळ पठार आहे तिथे पाहिजे अशी मजा येते आणि महत्वाचे उलटा धबधबा असल्याने तिकडे सगळे गेले होते परंतु गर्द झाडी वेगवेगळे रस्ते असल्याने बाकी सगळे कुठे गायब झाले काहीच कळाले नाही... त्यात कुनाच्याच मोबईल ला रेंज नाही... सगळ काही जसच्या तस ठप्प आले होते ...राकेश खूप भित्रा... पूर्ण रस्ता काळोखात बुडाला होता. पुढे मागे कोणीच दिसत नव्हते राकेश खूप घाबरला होता...

काही अंतर पुढे गेल्यानंतर त्याने कोणत्याही गावात गाडी उभी करून पुढचा पत्ता विचारण्याचा निर्णय घेतला आणि तो वेगात गाडी चालवू लागला... मागून आरश्यात गाडीच्या लाईट दिसल्या राकेशने गाडी सावकाश घेतली आणि मागे फिरून बघितले मागे कोणीच नव्हते. तो आणखीनच घाबरला..त्याच्या गाडीचा आवेग आता वाढला... फाटफाट फाट फाट फक्त गाडीच्या सैलान्सेरचा आवाज.. निशब्द शांतता.अचानक पुन्हा त्याला डोळ्यावर गाडीच्या काचेतून लाईट पडल्याचा भास झाला त्याने मागे बघितले पण मागे कोणतीच गाडी नव्हती आत तो पुरता घाबरला होता...त्याची गाडी वेग घेत होती परंतु रस्त्यात खड्डे असल्याने वेगात गेल्याने दणका बसायचा राकेश आता पूर्ण मागे सरून बसला होता...त्याच्या मनात कोणीतरी मागे येऊन बसले तर असा प्रश येत होता.... मनातल्या विचारात तोगाडी रेटत होता पुढे खूप विचित्र झाडी दिसत होती त्याला कसेही करून त्या गर्द वळणातून बाहेर निघायचे होते.तो खूप व्याकूळ आणि अस्वस्थ झाला होता आणि अचानकच गाडी कोणीतरी मागुन ओढून धरत असल्यासारखी हळू हळू बंद पडत एकदम बंद झाली.. त्याला आता धडकीच भरली होती..गाडीवरून उतरण्याचे धाडस झाले नाही.आणि अचानक पुढे लक्ष गेले तर पुढे कोणीच नव्हते पूर्ण अंधार आणि डोंगर..आता या गाडीला काय झाले म्हणत त्याने मागे बघितले तर मागे खूप भीती दायक चित्र होते त्याने डोळे मिटले आणि तो जोरात किंचाळला...त्याच्या आवाजाचा प्रतिध्वनी त्याला ऐकायला आला.. डोळे उघडले तर काहीच नव्हते.. त्याने घाबरत मोबईल काढला आणि लाईट चालू केली तर प्रकाशाच्या अंतरापर्यंत त्याला काहीच दिसले नाही...!
•
त्याने धाडसाने गाडी उभी केली आणि बघितले तर गाडी मध्ये पेट्रोल संपले होते फोन बघितला तर त्याला रेंज नव्हती.. आता इतक्या लांब फिरायला येऊन खूप पश्चाताप झाला असे त्याला वाटायला सुरुवात झाली होती आणि इतका वेळ झाले कोणी बघायला देखील आले नाही यावरून तो समजून गेला होता की आपला शभर टक्के रस्ता चुकला आहे. आता नाईलाजाने गाडी रेटत जाण्याशिवाय पर्याय नव्हता.त्याला आंता कोल्हेकुई ऐकू येत होती खूप भयंकर वाटत होते कुठ तरी झाडांच्या फांद्या हलण्याचा आवाज आला की तो खूप घाबरत होता...पुढे एक चढ होता आणि त्यानंतर पूर्ण उतार असल्यासारखे वाटत होते.. त्याने आता गाडी ढकलायला सुरुवात केली. आणि अचानक त्याला सळसळ सळसळ ऐकू आले त्याने मोबाईलने लाईट पाडली तर शेजारुनच साप जात होता. त्याच्या अंगातून मुंग्याच आल्या तो कसाबसा तिथून पुढे गेला... आता पावसाने सुरुवात केली होती पाय घसरायला लागले होते. पावसाचा जोर अचानक वाढला.आणि कुठून कसलेही आवाज ऐकयला येऊ लागले.. आता पुढे जाण्यावाचून पर्याय नव्हता कारण मागे खूप विस्तीर्ण झाडी आहे आणि खूप लांब पर्यंत गाव नाही याची कल्पना त्याला होती जर पुढे काही अंतरावर गाव असेल तर आपण तिथेच रात्र काढून सकाळी लवकर गावी जाऊ शकतो हा विचार त्याच्या मनात होता.. त्याने धीर धरत गाडी पुढे ढकलायचि थांबवली नाही.. गाडीची लाईट चालूच होती आणि राकेश गाडी ढकलत होता क्षणभर त्याला वाटले की लाईट बंद करावी जंगली प्राणी असतील तर हल्ला करतील आणि त्याने लाईट बंद केली थोडा पुढे चालला परंतु समोर काहीच दिसत नव्हत अचनक कोणत्यातरी प्राण्याचा आवाज त्याच्या कानावर पडला आणि तो दचकला...त्याला उभ्या पावसात डबडबून घाम फुटला त्याने सेकंदात लाईट चालू केली आणि बघतो तर काय त्याला समोर रस्त्यावर पाटमोरी मुलगी चालताना दिसली. तो जागीच थांबला.त्याची आता बोबडी वळली होती.त्याचे अवसान गळून गेले होते. आता दातावर दात आपटायला सुरुवात झाली होती , आई बाबांची आठवण यायला लागली होती. देवाचे नाव घ्याला सुरुवात करून त्याने हातात दगड घेतले.. त्यामुलीने मागे लाईट कडे बघितले आणि त्याचा श्वास थांबला. भिजलेला ड्रेस मोकळे केस , अंगावर डॉक्टरचा अप्रोन आणि काखेत एक पर्स अशी ती एकटीच चालली होती...घाबरलेला राकेश जाग्यावरच थांबलेला पाहून ती देखील तशीच उभी राहिली.. वरून पाउस सुरूच होता. आणि ती मुलगी राकेश कडे पाहून समोर चालू लागली..राकेश आता थोडा सावरला होता.. आणि त्याला समोर चालत जाण्यावाचून पर्याय नव्हता.. पुढे एका वळणावर ती मुलगी दिसेनासी झाली.. राकेश आणखीनच घाबरला.. त्याचा श्वास वाढला होता..त्याने गाडी ढकलायला सुरुवात केली. पण काय गंमत गाडी मागून कोणीतरी ओढून धरल्यासारखी पुढे जातच नव्हती...राकेशला जाम घाम फुटला घाबरत त्याने मागे बघितले तर कोणीच नव्हते... गाडीला जोरात हिसका दिला तेव्हा दगडातून गाडी वर चढली आणि राकेश पुढे चालू लागला. परंतु गाडी त्याला आता खूप जड लागत होती. कोणीतरी गाडीवर बसल्यासारखे वाटत होते परंतु मागे बघण्याचे त्याचे धाडस होत नव्हते डोळ्यातून भीतीने पाणी यायला लागले होते. तो घाबरत तशीच गाडी ढकलत पुढे निघाला..ते वळण आले जिथे ती मुलगी गायब झाली होती. आता पुढे काही अंतरावर त्याला गाव दिसू लागले होते. ती मुलगी मात्र कुठेच दिसत नव्हती... आजूबाजूला गर्द झाडी होती त्याने गाडीचा लाईट बाजूच्या झाडावर पाडला.. त्या मुलीचा अप्रोन त्याला दिसला आणि त्याला धडकीच भरली ती अगदी जवळ लपलेली दिसली.. न राहून तो पढे गेला आणि झाडामागे बघितले तर ती मुलगी तिथे नव्हती त्याला कोणीतरी मागे असल्यासारखे वाटले त्याने मागे फिरून बघितले ती मुलगी त्याच्याकडे बघत होती.. खूप विचित्र आणि घारे डोळे बघून तो खूप जोरात ओरडला...तो चक्कर येऊन पडणारच होतां इतक्यात त्या मुलीने त्याला शांत केले.
•
ओरडू नको..!
आता राकेश थोडा भानावर आला घाबरत त्याने विचारले तू कोण?
•
मी मंजुळा..इथल्या सरकारी दवाखान्यात नर्स आहे..
इकडे कुठेच काही नाही आणि इकडे रात्रीचे काय करताय तुम्ही ?
•
इथे गावाबाहेर त्या झाडीच्या मगे दवाखाना आहे. आणि मी गावात रहाते एक डिलिव्हरीचे पेशंट होते म्हणून आले होते परंतु पावसामुळे गाडी बंद पडली होती आणि मला घरी जाणे गरजेचे होते म्हणून रस्त्याला गाडी लावून मी घरी निघालेय...
•
मग तुम्ही लपून का बसला होता.?
•
या रस्त्याला सहसा कोणी नसते.. आणि मी रोज येथून ये जा करते त्यामुळे मला काही वाटत नाही...मागून इतक्या रात्री कोण आले आणि जो असेल त्याने निघून जावे म्हणून मी झाडाच्या बाजूला थांबले होते..तुम्ही कुठे जाणार आहात.?
मी रस्ता चुकलोय आणि इथे फोनला रेंज नाही त्यात गाडी बंद पडली आहे माझे मित्र पुढे गेलेत खूप भीती वाटत होती..बर झाले तुम्ही भेटलात.
हो चला आपण पुढे जाऊ.. तसं बघितले तर इथे भुताटकी खूप असते असं इथल्या लोकंचे म्हणणे आहे पण मी इतके वर्ष ये जा करते मला कोणताच अनुभव आला नाही आणि ज्याना अनुभव आले त्यंचे खोटे वाटतात मीठ मसाला लाऊन सांगितले की कोणी इतक्या उशिरा बाहेर नाही जात आणि बाहेरचे पर्यटक देखील नसतात.. हा रस्ता दिवसा देखील खूप सुनसान असतो .गावात प्राथमिक आरोग्य केंद्राला कोणी जागा दिली नाही म्हणून गावाबाहेर दवाखाना बांधला आहे..मला कधी यावे लागत नाही माझी दिवसा ड्युटी असते पण आज खूपच इमेरजन्सी होती आणि पाऊस आणि गरीब पेशंट होता त्यामुळे पुढे पेशंट नेता येत नव्हता.
•
तुम्ही चंगले काम करताय..पाउस खूपच वाढलाय ना.. मी खूप घाबरतो रात्रीचे आणि आज तर खूपच भयंक अनुभव आला..
•
यात काय भयानक आहे.असे अनुभव असावेत आयुष्यात..
•
तुम्ही खूप छान बोलता..तुमच्या सोबत कोण असते...?
thank you मी माझ्या छोट्या मुली आणि सासू सासर्यासोबत रहाते..माझी पोस्टिंग इथे आहे मी मुळची नाशिकचि आहे.मिस्टर काही महिन्यापूर्वी वारले..इथेच मागे एक वडाचे मोठे झाड आहे त्यावर भूत आहे असे गावातले लोक म्हणतात त्यानेच हा अपघात घडवला अशी चर्चा सुरु होती गावात आणि त्या दिवशी आम्ही फिरायला गेलो होतो आणि येताना त्यांचा आणि माझा अपघात झाला होता मला थोड डोक्याला खरचटले होते आणि त्यांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला.
•
अरे रे...सॉरी .पण तुम्ही खूप खचून गेला असाल त्यामध्ये..!
•
हो पण आयुष्य आहे ते जगायलाच पाहिजे...
•
छान..
मला वाटत त्या तिथेच तुमची गाडी बंद पडली असावी..
हो मला खूप भीती वाटतेय,,मी त्यातून बाहेर आलो आणि मला तुम्ही भेटलात.. चला गाव जवळ आले आहे..आता याच गावात मुक्काम करा आणि उद्या पुढे जाते.
तुम्ही इकडेच राहता का..?
(आता पाउस थोडा कमी आला होता आणि गावातली घरे दिसायला लागली होती.राकेशचा जीवात जीव आला होता)
हो मी जाते..इथून पुढे गेल्यावर तुम्हाला बस थाबा मिळेल तिथे लोक असतात त्यांची मदत घेऊ शकता तुम्ही...
thank you very much राकेश पुढे जायला निघाला..
पुढे दोन लोक दिसली राकेश ने त्यांना थांबवले.
मी राकेश साताऱ्याचा सदर बझारमध्ये राहतो. रस्ता चुकलोय माझे चार मित्र संदीप सागर राहुल आणि प्रशांत मला सोडून पुढे गेलेत..मधेच माझी गाडी बंद झाली आहे आणि मोबाईल देखील बंद आहे. मला कृपया मदत कराल का.?
•
अरे या तुमच्या सोबतचे मित्र इथेच बसलेत आमच्याच घरात आम्हीच त्याना इथे आराम करायला सांगितले आहे. पण इतक्या अंधारातून तुम्ही गाडी चालवत आलात तुमाला काहीच भीती वाटली नाही का..?
खूप घाबरत होतो मी पण तुमच्या गावातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील नर्सनि मला इथे आणून सोडले...
काय..? ( सगळे एकत्र घाबरत बोलले)
हो .. पण तुम्हाला काय झाले .?
अहो आमचे खेडेगांव आहे आणि इथे प्राथमिक आरोग्य केंद्र नाही..! मग नर्सचा प्रश्नच येत नाही..तुम्हाला चकवा लागला असल..!
काय..? मग त्या कोण होत्या...
त्ये जाऊ द्या..नशीब तुमचे म्हणून तुम्ही वाचला इथन चला लवकर..एक गावकरी म्हणाला
•
हो हो चला र..चला पाहुण..
सगळे बोलत बोलत निघाले...राकेश त्यंच्या मागून गाडी चालवत होता.. पुढेच त्या गाव्कार्याचे घर आले जिथे सगळे मित्र बसले होते.
त्यातला एकजण त्या सर्व मित्राना उद्देशून म्हणाला ... अहो पाहुण तुमचा मित्र राकेश मागेच राहिला होता तुम्ही चुघेच पुढे आलाय... त्याला का मागे ठेवला बिचारा लय घाबरलाय आणि गाडी पण बंद पडलीय त्याची..त्याला मदत तरी करायला जायचं होत तुम्ही ..
कोण राकेश...? ( सगळे एकत्रच बोलले ) संदीप सागर राहुल आणि प्रशांत च्या चेहर्यावर खूप मोठे प्रश्नचिन्ह होते.
•
गावकरी “ अहो तुमचा मित्र राकेश तुम्हीच संदीप सागर राहुल आणि प्रशांत आहात ना ?
हो पण तो कुठे आहे...
हा काय मागे ... गावकर्याने मागे बघितले पण मागे कोणीच नव्हते... सगळे अचंबित झाले होते.
प्रशांत घाबरत “काका आमचा मित्र राकेश मागच्या वर्षीच इकडे बाईक अपघातामध्ये आम्हाला सोडून गेलाय...!!!
•
•
लेखक ÷ अमोल अशोकराव पवार