😡 शेवटचा प्रयत्न
( आत्महत्या ) 😢
( आत्महत्या ) 😢
मी खरचं कंटाळलोय या आयुष्याला. खरचं जर तुम्ही प्रयत्न करुन काय मिळतच नसेल तर जगण्याचा फायदाच काय. पहिल शिक्षणात अपयश आई बापांची परिस्थिती नसताना मला शिकवण्याची चाललेली धावपळ माझ्यामुळे अपयशी ठरली. आषाढी कार्तिकी करत कसातरी १२ वी पास झालो.
खरंच सारखं अस वाटतं की माझे आईबाप मला भेटायला नको होते. कोणत्यातरी गरीब हुशार मुलाला भेटायला हवे होते.
चांगल्या आईवडिलांना वाईट मुलच का भेटतात हेच कळत नाही. ?
सभ्य पुरुष, प्रामाणिकपणा, निव्यॅसनी असून सुध्दा काही उपयोग नाही. १० वीत दोनदा आणि १२वीत ३ वेळा नापास झालो. माझ्या वयाची मुल आज पदवीधर झाले.
👉दुसर अपयश म्हणजे जीच्यावर प्रामाणिक निस्वार्थ जीवापाड प्रेम केल तिला मी कधी आवडलोच नाही. माझ खर प्रेम तिला कळलच नाही. पुढच्या वर्षी तिच लग्न आहे.
👉 तिसर अपयश म्हणजे चांगली नोकरी १२ वी पासला कशी नोकरी भेटू शकते तुम्हाला सांगायची गरज नाही. आता जगायची इच्छा मेलीय आता. आता डोक्यात फक्त आत्महत्येचाच विचार येतो. जगून काय करुच शकलो नाही हीच भावना होती. पण आत्महत्या केली तर हजार प्रश्न उभे राहणार. १२ वी पास होऊन आत्महत्या का केली ? मुलीच प्रकरण दिसतय. अशा प्रश्नांच्या वादळात माझे आई बाबा फसतील.
मग काय करायच तर मग स्वतःचा खून करायचा कसा हा प्रश्न फिरु लागला डोक्यात. आत्महत्या केली तर LIC चे पैसे पण डुबतील १० वर्ष हप्ता भरुन फायदा काय ? दररोज नोकरीवरुन आईबाबांशी वाद होतात. काय हे जगण आहे ज्यांनी सर्व दिल त्यांच्यावरच स्वतःच्या अपयशाचा राग काढून मी वाद घालत असतो.

एक गोष्ट ठरली आता आत्महत्याच करायची पण अपघात वाटेल अशीच. आत्महत्या करण्यासाठी पण खूप अभ्यास करावा लागेल हे मला चांगलच कळाल होत. कारण आत्महत्येचा प्रयत्न चुकला तर अर्धवट मरण , अपंगत्व मिळू शकत. आणि अपंगत्व म्हणजे मरणापेक्षा भयंकर शिक्षा. 😯
विचार डोक्यात सुरु झाले
१) माफियाच्या लोकांशी मारामारी करायच ठरल. ते नक्की माझा खूनच करतील. हा पण चुकून फक्त हाड पण मोडून हॉस्पिटलमध्ये टाकल तर .... ?
परत आईबाबांना सेवा करावी लागेल माझी.
परत आईबाबांना सेवा करावी लागेल माझी.
२) हायवे क्रॉस करताना ट्रक खाली येऊन मरण पण तिथेही ६०% मरण मिळेल. अर्ध मरण नको बाबा. 😧
३) दोन चार वाईट माणस शोधून त्यांचा खून करुन गुन्हा कबूल करुन फासावर जाऊ. पण तिथे पण आईबाबांची बदनामी होईल. १००% मरणारच पण वाईट माणसांना मारताना नेम चुकला तर ते आपल्याला पकडून मारणार नाहीत तर तडपवणार त्यांना का मारत होता म्हणून. 😲
४) बिल्डिंगच्या गच्चीवरुन खेळताना पडलो. पण ५५ किलो वजनाने चार माळ्याच्या बिल्डींगवरुन पडलो तर डोक्यावरच पडल पाहिजे नाहीतर फक्त हातपाय तुटतील. ७०% मरु शकतो.
शेवटी १० दिवसांच्या अभ्यासानंतर एक मार्ग सुचला तोच योग्य होता. कुणाला काही कळल नसत की ही आत्महत्या आहे. 👇
५) १० वाजून १ मिनटाची भरलेली ठाणे लोकल बेलापूरहून पकडायची कारण ती भरुनच तिथे येते. भरलेल्या लोकलमुळे दरवाजावरच लटकून राहायच आत जायाच नाही. ऐरोली नंतर लोकल एक मोठ वळण वेगात घेते आणि त्या वळणालाच हात सोडून द्यायचे. हात सुटले की मोठ्या वळणात शरीर वजणामुळे हे लोकलच्या चाकातच खेचल जाणार हे नक्की. १००% मरण भेटणारच. आणि अपघात ही वाटणारच. कुणालाही त्रास नाही.
आयुष्याचा शेवटचा दिवस मी ठरवला. सकाळी लवकर उठलो. फिरायला आमच्याइथल्या डोंगरावर गेलो १५ मिनट दीर्घ श्वास घेऊन या सुंदर निसर्गाच आभार मानले.
मन उदास होत कारण रात्रीच आईबाबांशी भांडलो होतो. आईने बनवलेला नाश्ता खाल्ला. तिच्या पायापाडून घराबाहेर पडलो. घर शेवटच बघून घेतल. नंतर गेट वर येऊन आमची बिल्डींग बघितली. निर्जीव, अबोल वस्तू, वास्तूंनी पण आपल्याला भरपूर काही दिल हे तेव्हा जाणवल. तिथून बालकणीत उभ्या असलेल्या आईचा टा टा करुन निरोप घेतला. दररोच अॉफिसला निघताना मी येतो म्हणायचो, आज अॉफिसला निघताना जातो म्हणालो. पुढे गेल्यानंतर रस्त्यात येणाऱ्या गणरायांच्या मंदिरात गेलो. देवाला सर्वच माहिती असतेच. देवाची क्षमा मागितली. कारण त्याने दिलेल्या आयुष्याचा मी फायदा करु शकलो नाही. देवाच्या पाया पडून निघालो.

९ वाजून ४९ मिनटाला मी स्टेशनला पोहचलो. ठाणे लोकलची वाट पाहू लागलो.
१० वाजून १ मिनटाची भरलेली ठाणे लोकल स्टेशन मध्ये आली. मी ती पकडली. दरवाजावर जागा भेटली लोकल सुरु झाली. ८ स्टेशनानंतर मला उडी मारायची होती. छोटी पण चुकी पूर्ण योजना तोडू शकत होती.
मनात एकच विचार येत होता.
मी करतोय ते बरोबर आहे का ? आयुष्यात एक एक सेंकद कमी होत होता. मी मागवलेला मृत्यू हळू हळू जवळ येत होता. आठव स्टेशन आलं. घामाच्या धारा अंगातून वाहत होत्या, त्या गरमीमुळे नाही. तर उडी मारण्याच्या भीतीने. पण इरादा पक्काच होता. आता होईल ते होईल मृत्यूला भेटणारच. ते वळण लांबून दिसल. लोकलचा वेग हळू हळू वाढू लागला. मी पण तयार झालो. वळण आणि वेग एकत्र झाले. कानावर हवेचा दबाव जाणवू लागला. लोकल ने मला हवा तसाच वेग पकडला. मी डोळे मिटले. मला फक्त अंधार दिसत होता. हवेच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या. आणि मी हात सोडून दिले. एका सेकंदात मी पडून मेलो. शेवटी फक्त लोकल मधल्या माणसांचा आरडाओरडा ऐकला.
उडी मारल्यावर भितीने डोळे क्षणासाठी उघडले तेव्हा लोकलची लोखंडी चाक दिसली. आणि कानांना हाड मोडल्याचा आवाज आला. मनाला आपले तुकडे झाले यांची जाणीव झाली. संपल सगळ एका सेकंदात. मला वाटल मी आत्मा बनून परत जिथे मेलो तिथे येणं. चित्रपटात जस पाहतो तस. तस काही झाल नाही.
मी एका भयानक अंधारात पडलो जिथे काहीच नव्हत. फक्त रडण्याचे आवाज आणि जाणवणाऱ्या सावल्या. खरच मी मेलो होतो की नाही यावर विश्वास बसत नव्हता.
रडण्याच्या आवाजावरुन मी नरकात आलो असेन अस वाटतंय. पण तस नव्हत. मी समोर सावली पाहिली. अर्धवट शरीराची. खूप घाबरलो. पण बाजूने आवाज आला.

तोः घाबरु नकोस. ती तुझीच सावली आहे.
मीः कोण ?
तोः माझ अस्तित्व संपल. आता मी फक्त आवाज तुझ्यासारखाच. माझ नाव जयेश होत.
मीः होत म्हणजे ? मी कुठे आहे ? इथं अंधार का आहे.? मी मेलोय का जीवंत आहे.?
जयेशः तु मी आणि इथली भरपूर लोक या शापित जगात अडकलोय.
मीः म्हणजे ?
जयेशः तू आत्महत्या केलीस ना ? मी पण आत्महत्या केलीय आणि आपण या अंधाऱ्या जगात फसलोय. जन्म आणि मृत्यूच्या मधलं जग. इथे आपण जीवंत आहोत पण आणि नाही पण.
मीः हो हे खर आहे. मी लोकल खाली येऊन आत्महत्या केलीय.
जयेशः मी पण पंख्यावर लटकून आत्महत्या केलीय. आणि आता आपण एका पश्चतापाच्या जगात अडकलोय. जिथे फक्त आपण विचार करु शकतो कृती नाही. मी स्वतःला मारुन खूप चुकी केलीय आणि हे तुला पण जाणवेल.
मीः मी बरोबर केल आत्महत्या करुन माझा काही उपयोगच नव्हता जगून. तुम्ही आत्महत्या का केली ?
जयेशः उद्योगधंद्यात मोठा तोटा झाला. कर्जबाजारी झालो. देणेकरी त्रास आणि धमक्या द्यायला लागले. मग घाबरुन जीव दिला.
मीः बर. मी पण परिस्थीती अपयशाला कंटाळून जीव दिला.
जयेशः तुला पश्चात्ताप होतोय का ?
मीः अजिबात नाही. मी योग्यच केल अस मला वाटत.!!!!
जयेशः मला पण काही दिवस असच वाटत होत. इथ येणाऱ्या सगळ्यांना सुरवातीला असच वाटत. पण नंतर सगळेच पश्चात्तापाच्या अग्नीत तडपडतात.
मीः मला नाही वाटत मी तडपेन. तुम्हाला का पश्चात्ताप होतोय ? तुम्ही तर संकटातून सुटला मरुन.
जयेशः अस तुला वाटतय मी सुटलोय. पण मी अडकलोय. माझी चांगली बायको होती. जी माझ्याकडे फक्त माझा वेळ मागायची पण मी तिला वेळ दिला नाही. पैशाच्या मागे धावत राहिलो. माझी एक गोड छोटी मुलगी होती तीच हसणं मला दररोज नवीन प्रेरणा द्यायचं. तीच हसण माझा कंटाळा पळवायचं आणि मला उर्जा द्यायच. मी थोडा वेळ सुध्दा त्यांचा विचार केला नाही आणि आत्महत्या केली. माझ सगळ नीट झाल असत. गाडी, बंगला, घर विकून मी कर्जमुक्त झालो पण असतो. प्रश्नाच उत्तर प्रश्नाच्या बरोबरच जन्म घेत आणि ते मी शोधल नाही. मी चुकीचा होतो. म्हणून मला पश्चात्ताप होतोय. या अंधारात आपण किती वेळ, किती वर्ष अडकून राहणार कुणाला माहिती नाही. मेल तर शांत झोप लागत असावी. पण आत्महत्या करुन अशी झोप लागत नाही. या अंधारात असच पडून जगण्यापेक्षा घाबरुन जगण बर होत.😯😢
मीः बरोबर. तुम्हाला बायको आणि मुलगी आहे म्हणून पश्चात्ताप होत असेल. पण माझे फक्त आईबाबा आहेत. आणि त्यांना दादा वहिणी चांगलच सांभाळतील. मी त्यांना काहीच देऊ शकलो नसतो.
जयेशः अस नाही. बायको आणि मुलगी नसताना पण मला पश्चाताप झालाच असता. आपण माणूस आहोत म्हणून.
मीः ते का ?
जयेशः या विश्वातला सर्वात बुध्दिमान, समजुतदार, भावनाशील प्राणी म्हणजे माणूस. माणूस जन्माला येतानाच मोठ्या जवाबदारीसोबत जन्माला येतो. त्याला आईबाबा नसले तरी असले तरी त्याच्याकडे मोठी जवाबदारी आहे. ती म्हणजे. निसर्गाची सेवा करणे, काळजी घेणे, बाकीच्या सर्व प्राण्याची काळजी घेणे. त्यांना सांभाळणे. माणूस या निसर्गाच्या कुटुंबातला मोठा भाऊच आहे. निसर्ग हे थकलेले आईबाबाच आहेत. आणि प्राणी पक्षी झाड ही छोटी भावंड आहेत. चल तु मला सांग तुझ्या जन्म दिलेल्या आई बाबांसाठी तू काही करु शकला नाहीस म्हणून तू जीव दिलास. पण या कुटुंबासाठी तू काय केलयस.?
मीः काहीच नाही.
जयेशः तुझ्याकडे जीव देण्यासाठी खूप कारण होती. पण जगण्यासाठी किती कारण होती ?
मीः एक पण नाही.
जयेशः हे रागवू नको. मी तुला सल्ला देत नाही. मी पण तुझ्यासारखीच चुक केलीय. मी तुला शिकवत नाही. पण आपण आत्महत्या करुन काही मिळवल काय गमावल हे सांगितल.
मीः बरोबर आहे. तुम्ही कधी आलाय इथ.
जयेशः इथ वेळ वर्ष वय काही नाही. आपण फक्त रडण ऐकायच, आणि पश्चात्ताप करायचा. बाकी कृती करण्यासाठी काही नाहीच इथे.
मीः तुम्हाला पश्चातापाची जाणीव कशी झाली.
जयेशः मी इथ आलो तेव्हा खूश होतो. पण बघता बघता इथ आत्महत्या करुन आलेल्या असंख्य माणसांना भेटलो. त्यात मुल, मुली, पुरुष, स्री. सर्वांनी वेगवेगळ्या कारणासाठी जीव दिला. कुणी परिक्षेत नापास झाल म्हणून, कुणी प्रेमात हरल म्हणून, कुणी वादांमुळे, कुणी नोकरीमुळे, सर्वांकडे खूप कारण होती. पण या अंधारात येऊन सगळ्यांनाच पटल इथ येण्यापेक्षा आपण जगण्याच कारण शोधल पाहिजे होत. त्याच्या या बोलण्यामुळेच मला माझ्या चुकीची जाणीव झाली.
मीः मला पण माझ्या चुकीची जाणीव होतेय तुमच्या बोलण्यामुळे. अभ्यासाचा कंटाळा न करता कंटाळा का येतोय याच कारण शोधून अभ्यास करायला पाहिजे होता. अभ्यास चांगला झाला असता तर नापास झालो नसतो, नापास झालो नसतो तर पदवीधर असतो, पदवीधर असतो तर सरकारी नोकरी मी मिळवलीच असती स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करुन, चांगली नोकरी असती तर चांगली मुलगी आरामात मिळालीच असती. आणि आईबाबा पण खुश असते. मला अस तडपडत अंधारात जगायच नाही. पश्चातापाच्या आगीत जळायच नाही. कृपया तुम्ही माझी मदत करा. मला इथून बाहेर काढा.
जयेशः माफ कर मित्रा. सर्वजण तो बाहेर पडण्याचाच मार्ग शोधत आहेत. पण कुणाला मिळाला नाही.
मीः अरे बापरे. म्हणजे रडत बसणं हेच आयुष्य आता. मला ते पटत नाही. जर आत्महत्येसाठी मी अभ्यास करुन मरु शकतो तर इथून बाहेर पडण्यासाठी पण मार्ग मी १००% शोधू शकतोच. मी जगणार परत. आणि ते पण अभिमानाने जगणार. मी या अंधाराला चिरुन बाहेर पडणार. जगण्याची इच्छाशक्ती मला मार्ग दाखवेल. चला येतो सर.👋
जयेशः कुठे चालला आहेस ?
मीः जगण शोधायला. तुम्ही जगण शोधायला प्रयत्न केले नाहीत. म्हणून पश्चाताप करत रडत बसलाय. मी जगण्याचा मार्ग शोधून सर्वांना या अंधारातून मुक्त केल्याशिवाय गप्प बसणार नाही.
जयेशः व्वाह व्वा ...पहिल्यांदा सकारात्मक विचार ऐकला. जा, यश तुझच आहे मित्रा.
अंधारातून धावत सुटलो. खूप पळलो तरी अंधार संपत नव्हता. आता पळून मेलो तरी चालेल पण थांबायच नाही या उद्देशाने पळत सुटलो. आणि डायरेक्ट एका न संपणाऱ्या खड्ड्यात जाऊन पडलो. जोरात लागल हाताला. डोळे उघडले तर मी घरातच पलंगावरुन पडलो होतो. कुठेही अंधार नव्हता. सावल्या नव्हत्या. ते स्वप्न होत. सगळ घर प्रकाशाने चमकत होत. आणि बाजूला आईबाबा हसत होते.
कालची भांडण विसरुन आई बोलली.
आईः बाळा तू लग्न कर. बायकोला बाहेरच्या बाजूला झोपव तु भिंतीच्या बाजूला झोप म्हणजे पलंगावरुन पडणार नाहीस.
मीः कायपण आई.😊
आईः लवकर आटप अॉफिसला जायचं आहे.
ती सकाळ म्हणजे माझा आत्महत्या करायचा दिवस. मला अजून विश्वास बसत नव्हता.अस वाटत होत मी अंधारातून पळत पळत मागे आलो होतो. कारण माझे पाय खूप दुखत होते. अंगातल बनियन घामाने पूर्ण भिजलं होत. खर काय ते समजतच नव्हत.
आत्महत्या करुन मी आता मूर्खपणा करणार नव्हतोच. मरण्यासाठी माझ्याकडे हजार कारण होती. पण आता जगण्यासाठी मी करोडो कारण शोधेन. एका सकारात्मक विचारांनी मी सुंदर दिवसाची सुरवात केली. एकच मनाशी ठरवलं. कितीही वाईट झाल तरी मागे हटायच नाही. मार्ग शोधायचा, चुका शोधायच्या, आणि यश गाठायच. अॉफिसला निघालो. ठाणे स्टेशनला उतरताना मला जयेश दिसला. विश्वासच बसत नव्हता. म्हणजे ते स्वप्न नव्हत . जयेश पण माझ्याप्रमाणे अंधारातून बाहेर पडला असेल का ? तो माझ्याकडे बघून हसला. म्हणजे त्याने मला ओळखल. मी त्याच्याकडे जाणार तोपर्यंत तो गर्दीत गायब झाला.
एक कळल होत. प्रत्येकजण यशस्वी होणारच. फक्त प्रत्येकाचे मार्ग वेगळे, वेळ वेगळी असते आणि माझी वेळ अजून आली नाहीच. मी त्या वेळेची वाट पाहणार सकारात्मक विचार करुन, प्रयत्न करुन, मेहनत करुन. दुसऱ्याच्या यशाची तुलना मी स्वतःशी कधीच करणार नाही.
माझी स्वप्न असतील 💖
माझ्या चुका असतील
माझे प्रयत्न असतील
माझी मेहनत असेल
माझा मार्ग असेल
आणि माझच यश असेल
माझ्या चुका असतील
माझे प्रयत्न असतील
माझी मेहनत असेल
माझा मार्ग असेल
आणि माझच यश असेल
आयुष्य सुंदर आहे आणि ते मी अजून सुंदर बनवण्याचा प्रयत्न करेन.
शिकण्याच, स्वप्नाच,
सकारात्मक विचारांच वय कधीच संपत नाही.
शिकण्याच, स्वप्नाच,
सकारात्मक विचारांच वय कधीच संपत नाही.