हॉन्टेड_बीच
लेखन---#शशांक_सुर्वे
(नवीन वाचकांच्यासाठी #repost)
"अहो डॉक्टर रूम नंबर 72 चा पेशन्ट बेड वर नाही आहे"....एक नर्स धावत डॉक्टरांच्या केबिन मध्ये आली...डॉक्टर धावत धावत तिथे पोचले तर खरोखर पेशन्ट जागेवर नव्हता...डॉक्टरांनी रिपोर्ट्स बघितल्या
"ओह्ह माय गॉड... रितेश...पांडू अरे झोपा काढता का तुम्ही लोक...अरे शोधा त्याला...जा लवकर"
तसे पांडू आणि त्याचे सहकारी रितेश ला शोधायला धावले.....9 वाजले असतील शहरवस्ती त्यात गाड्यांची ये जा चालू होती....हायवेवर खोकत खोकत लडखडत रितेश चालला होता...त्याच्या चालण्याचा वेग वाढला..आपल्या मागे आपला कोणी पाठलाग तरी करत नाही ना हे बघण्यासाठी त्याची मान सारखी मागे जात होती....एक जोराच्या हॉर्न ने त्याची पावले थांबली....एक तीक्ष्ण लाईट रितेशच्या डोळ्यावर पडली तसा आपला हात त्याने डोळ्यावर नेला
"का रे xxx...मरायचंय का....दुसरीकडे जा ना...माझ्या गाडीखाली का मरतो"
ड्रायव्हर च्या ह्या आवाजाने रितेश ची पावलं रस्त्याकडेला वळली...."होय...मला मरायचंय" स्वतःशीच तो पुटपुटला....त्याने आपल्या हातात घुसवलेल्या सुया उपसून काढल्या...तशी रक्ताची एक धार त्याच्या हातातून वाहू लागली...काहीतरी पुटपुटत तो रागाने रस्त्यावरून चालला होता....कसला तरी जोराचा आवाज त्याला येत होता त्याने त्या आवाजाच्या दिशेने मान वळवली....समुद्राच्या लाटा...जोराच्या आवाज करत किनाऱ्यावर आदळत होत्या...त्या लाटाकडे त्याच लक्ष गेलं....तो त्या दिशेने चालू लागला....सकाळी मॉर्निंग वोकर्स....दुपारी लहानमुले आणि संध्याकाळी प्रेमीयुगुलांचा वावर असणारे हे बीच....रात्री मात्र स्मशान होऊन जायचं....बीच वर भयाण शांतता होती....उसळणाऱ्या लाटा शांतता भंग करत होत्या....लाईट नसल्यामुळे सर्वत्र अंधार होता.....चंद्राचा काय तो उजेड....मोठमोठ्या इमारती आणि झगमगाटाच्या दुनियेत हे बीच खूपच बदनाम होत....स्पेशली रात्रीच्या वेळी.....हॉन्टेड बीच...नावातच दहशत...आणि काहीप्रमाणात खरं सुद्धा होतं..अनेक जण ह्या बीच वर गायब झाले ते परत आलेच नाहीत...काहींची फुगलेली मढी हे बीच पोलिसांना परत करत असे...ह्या बीच ची रेती इतर बीच प्रमाणे नव्हतीच....त्या रेतीचा काळा रंग त्या बीच ला लागलेलं ग्रहनच....ओरडणे,विव्हळणे किंवा वेगवेगळ्या मानवी आकृत्या दिसणे ह्या प्रकारामुळे हे बीच नेहमीच चर्चेत असायचं....
रितेश त्या बीच कडे चालू लागला....काटेरी तारांनी वेढलेल्या बीच ला एकच गेट होते ते सुद्धा बंद दिसत होते....रितेश त्या बंद गेट कडे एकटक बघत रागानेच येत होता....गेट बंद बघून तो गुडघ्यावर बसून त्या बंद गेट कडे बघत होता...त्याला समोर एक बोर्ड दिसला...
"ह्या बीच वर रात्री येणं निषिद्ध आहे...पुढील धोका टाळण्यासाठी ह्या बीचवर येऊ नये...हुकुमावरून"
ही तळटीप वाचून रितेश हसला...त्याला जोराचा खोकला लागला...पोटात प्रचंड कळ येऊ लागली...तो विव्हळत होता मधेच हसत होता...लडखडत शेवटी तो उभा राहिला....आणि पोटातून तोंडात आलेल्या रक्ताची धार त्याने त्या बोर्डवर थुकली...पांढऱ्या सफेद बोर्डावर आपल्याच रक्ताने सोडलेली पिचकारी आणि त्याची ती छटा बघून रक्ताळलेल्या ओठावर हसू फुटलं....शर्टाच्या बाह्याना ते रक्त पुसलं आणि तो गेट पासून थोडा बाजूला गेला.....
"साले...मरायला आलेल्या माणसाला मरणाची भीती दाखवतात...ब्लड कँसर च्या लास्ट स्टेजचा माणूस मी..मला भीती दाखवता का रे हराम्यानो"
स्वतःशीच पुटपुटत त्याने ती काटेरी तार हाताने फाकवली आणि कशाचीही पर्वा न करता तो आत शिरला...त्याचा शर्ट त्या कुंपणाला अडकला होता...काटे लागून हातातून रक्त वाहत होते....अडकलेला शर्ट तसाच सोडून तो पुढ आला....आणि त्या उसळणाऱ्या सागराकडे जाऊ लागला...त्याची पावलं वेगाने समुद्राकडे जात होती...अचानक त्याला जहाजाचा आवाज ऐकू येऊ लागला...त्याला नवल वाटलं कारण सरकारने ह्या बीच वरून मालवाहतूक बंद केली होती...सागरावर झुलत हे जहाज जवळ येत होतं....त्याला त्यात हातात मशाली घेतलेली लोक दिसले....हे बघून त्याची पावले वेगात चालू लागली.....त्या निळ्या सागराला त्या रात्री काळी छटा आली होती....एखादी उसळणारी पांढरी लाट त्या काळ्या सागराला छेदत होती....त्याला समोर एक वृद्ध बाई दिसली....आता ही कोण??आणि इथे काय करते??
त्या वृद्ध बाईचा हात रितेश ला बोलवत होता....पण तो त्या मनस्तीतीत नव्हता....तो त्या वृद्धेकडे बघत पुढे जात होता...त्या बाईच बोट आता सागराकडे वळलं....तशी रितेश ची नजर सागराकडे गेली...प्रचंड सडलेला वास त्याच्या नाकात शिरला....त्याने आपलं नाक दाबलं...आणि समोरून त्या लाटेबरोबर मानवी मृतदेह वाहत येत असतानाचे त्याला दिसले....फुगलेली प्रेते...तो घाण वास.....त्याच्या पायाजवळ बदाबद ते मृतदेह पडत होते....त्याच्या पायाला लागणाऱ्या पाण्याचा रंग आता लाल झाला होता....रक्तच ते....फेसळणार्या लाटा आता लाल दिसत होत्या....त्याने मागे बघितलं....ते पडलेले मृतदेह लडखडत उभे राहत होते....आणि त्याच्या मागे सरपटत येत होते....त्याच्या पायाचा वेग वाढला..तो आता पळू लागला...बाजूला एक तरुण तरुणीचे प्रेत पडले होते....माश्यांनी खाऊन फेकलेले अर्धकच्च प्रेत बघून रितेश घाबरला...मागून अनेक भयाण चेहऱ्याचे लोक त्याचा पाठलाग करत होते....त्या किंचाळी आणि त्याचे ते भयाण आवाज कानठळ्या उठवणारे होते...तो त्या बीच वर सैरावैरा पळत होता....अचानक कसल्यातरी अडथळ्याने तो खाली आपटला...त्याने आपल्या पायाकडे बघितलं....त्याच्या पायाला एका हाताने पकडलं होत...तो हात अक्षरशः रेतीच्या आतून आला होता....त्याला प्रचंड थकवा आणि तो जीवघेणा खोकला आला त्याच्या तोंडातून रक्त बाहेर आलं ते रक्त त्या रक्ताळलेल्या पाण्यात मिसळत होतं...तो सर्व ताकतीनिशी उभा राहिला आणि त्याअमानवी हातातून आपला पाय सोडवण्याचा प्रयत्न करू लागला.....त्याने आपली शक्ती लावली......पण सगळं व्यर्थ....त्या हाताची पकड खूप मजबूत होती...त्या हाताने रितेश ला जमिनीत ओढण्याचा प्रयत्न केला....तो तडफडू लागला....समुद्रातून आलेले मुडदे त्याच्या आसपास गोळा झाले ....भयाण चेहरे....सडलेले
अचानक त्याला समोर त्याला कसली तरी आकृती दिसली....तिच्या पायात दगड बांधला होता....दगड ओढत ती भयाण आकृती रितेश जवळ येत होती.....ती आकृती रितेश समोर उभी राहिली....भयाण पाण्याने फुगलेली...अर्धवट माश्यांनी खाल्लेली ती काया....त्या आकृतीने इशारा केला...तसे ते भयाण चेहऱ्याचे लोक मागे सरकू लागले...रितेश ला जमिनीत ओढणाऱ्या हाताची पकड सुद्धा ढिली झाली आणि तो हाथ परत जमिनीत निघून गेला....रितेश एकटक त्या आकृतीकडे बघत होता....तिच्या तोंडून कर्णकर्कश आवाजात शब्द बाहेर पडले "सुप्रसिद्ध इंजिनियर रितेश"
त्या आकृतीच्या तोंडून आपलं नाव ऐकून रितेश गोंधळला ....तो कसा बसा उभा राहिला...त्याने निरखून बघितलं आणि त्याच्या अंगावर काटा आला त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडले
"मिस.सुनीता....तू??तूच ना ती बांधकाम अधिकारी????...............

रितेशच्या तोंडून आपलं नाव ऐकून समोर उभी असलेली ती सडलेली भयाण आकृती जोर जोरात हसू लागली....स्मशान शांतता असलेल्या त्या बीचवर त्या बाईचा आवाज अजून भयाण वाटत होता....रितेश समोर उभा होता त्याच्या नाकातून रक्त वाहत होतं....डोळ्याभोवती काळी वर्तुळं आणि अंगाचा झालेला सांगाडा कसा बसा उचलून तो उभा होता त्याच्याकडे बघत ती काळ्याकुट्ट दातांची बाई बोलली
"शेवटी तुला तुझ्या पापाची सजा मिळालीच....अरे बघ जरा स्वतः कडे...भारतातील नंबर वन इंजिनियर...अरे बघ स्वतः कडे काय हालत झाली तुझी....तू आणि तुझ्या बॉस ने माझ्या बरोबर जे केलं त्याची हीच शिक्षा तुला....मर आता सडून मर"
विचित्र आवाजात विद्रुप चेहऱ्याच्या सुनिताकडे बघून रितेश ला खात्री पटली की ती आता ह्या जगाची नाही तर ह्या बीच ची राक्षशिण बनली आहे ज्याच्यावर त्याचा विश्वास नव्हता पण आता चित्र वेगळं होत.....आपल्या बद्दलचे असे बोल ऐकून रितेश जाम चिडला आपल्याला सावरत तो त्या बाईकडे बघत बोलला "इथे येऊन जीव दिलासा आपल्या कर्मांनी....गेलीस पळून ना तुझ्या यार बरोबर आणि तो सोडून गेला म्हणूंन जीव दिलास...कर्माची फळ मी नाही तू भोगतेस xxx साली"
रितेश च्या तोंडून हे शब्द ऐकून सुनीता गुरगुरु लागली ती आता रितेश च्या दिशेने येऊ लागली आपल्या पायाला बांधलेला दगड ओढत ती ती रितेश जवळ येत होती...ती येताना बघून रितेश घाबरला आणि मागे मागे सरकू लागला...एका मोठ्या लाटेने पायाला मार बसल्याने तो खाली पडला पाणी त्याच्या डोक्यावरून गेलं पाण्यात तो हातपाय मारू लागला....त्याचा गळा कुणीतरी पकडला...त्याने दोन्ही हातांनी तो सोडवण्याचा प्रयत्न केला पण....तो वर उचलला गेला...त्या सुनीताचे त्याला जवळजवळ 3 फूट वर उचललं....रितेशच्या गळ्याला फास लागत होता....त्याच तडफडणे बघून सुनीताच्या लाल भडक डोळ्यातील भाव अचानक बदलले...तिने रितेश ला बाजूला फेकून दिलं आणि त्याच्याकडे बघत बोलली
"जीव नव्हता दिला मी...मारलं गेलंय मला....आईबाप गरीब...मला शिक्षणाची आवड....घरची परस्तीती बेताची माझ्या मागे लहान भाऊ....बाप आर्मी ऑफिसर "आपल्या इमानदारी बरोबर कधी गद्दारी करायची नाही प्रामाणिक पणे काम करायचं ही त्याची शिकवण....माझ्या शिक्षणासाठी झटत होता बिचारा..मला पण त्याच कष्ट दिसत होतं...मी सुद्धा मन लावून अभ्यास करायची.....बापानं माझ्या शिक्षणासाठी घर गहाण ठेवलं....शेवटी कष्ट करून रात्रीचा दिवस करून पास झाले....बापाने तर सगळ्या गावात पेढे वाटले होते.....आईवडीलांचे पांग फेडायची वेळ आता माझ्यावर होती....सिलेक्शन झालं ह्याच शहरात "बांधकाम अधिकारी"
सुरवातीला ठरवलं की स्वच्छ कारभार करायचा पण हे शहर आणि इथले लोक किती वाईट आहेत हे हळू हळू कळू लागलं...अनेकांनी आपली चुकीची टेंडर पास करण्यासाठी लाच द्यायचा प्रयत्न केला...पण अक्षरशः हाकलून लावलं त्यांना...काहींना तर चुकीच्या कामाबद्दल जेल मध्ये सुद्धा पाठवलं....पण माझा काळ ठरला तो तुझा बॉस...विल्सन.. .त्याच्याबरोबर काम करायचास ना तू....लाखो कमवायचास म्हणे....तू पण आला होतास त्या दिवशी माझ्या ऑफिस मध्ये मला तुझा प्रोजेक्ट्स समजावून सांगायला पण एका प्ले ग्राऊंड साठी आरक्षित जागा विल्सन कॉप्लेक्स साठी देणं माझ्या तत्वात बसत नव्हतं....तुझ्यासमोरच तो प्रोजेक्ट रिजेक्ट केला मी....पण दुसऱ्या दिवशी घरात एक बॅग मिळाली विल्सन कडून पैशाने भरलेली....सोबत त्याची चिठ्ठी....कधी वाटलं घ्यावं हे पैसे ...बापाचे कर्ज आणि दुःख दूर होईल...पण नंतर विचार आला लाच घेऊन कर्ज फेडलं तर स्वाभिमानी असलेला माझा बाप जीव देईल....शेवटी ते पैसे त्या विल्सन च्या तोंडावर मारले....खूप भडकला तो....त्या दिवसापासून घरावर दगड पडू लागले कधी वाटेत गुंडाकडून माझी छेड काढली जाऊ लागली...कधी कधी फोनवरून धमक्या....ऑफिस मध्ये त्याच्या चमच्यांनी माझं आणि आमचे सहकारी विजय ह्यांचे अनैतिक सबंध असल्याची अफवा उठवली...किती हा त्रास...अगदी आत्महत्या करण्यापर्यंतचा...मग मीच केस केली होती पोलीस स्टेशन मध्ये....त्याला अटकही झाली पण दुसऱ्या तासाला तो बाहेर आला....त्या दिवशी मी ऑफिस मधून घरी येत होते....काही अपडेट्स चेक करता करता लक्षात आलं की गाडी कुठेतरी दुसरीकडे जात आहे...ड्रायव्हर ला विचारलं पण तो एक शब्द बोलेना....शेवटी ह्या इथे त्याची गाडी थांबली...काही बोलायच्या आता त्याचे गुंड गाडीत शिरले आणि...आणि त्यांनी मला उचलून एका बोटीवर आणलं....वाजले असतील 6.....सूर्य मावळत होता आणि..आणि....तो आलाच....बांधलेली मी...पायात हा दगड बांधलेला...."काय ग साली...औकात आहे काय तुझी...विल्सन...विल्सन म्हणतात मला...ह्या ह्या जागी तुझ्या सारखे कित्येक दफन केलेत मी" अस बोलत होता...मी गयावया करत होते...माझ्याकडे पर्यायच नव्हता....पण त्याने मला त्या पाण्यात फेकली....तो दगड आणि मी....खोलवर जाऊन पडलो...गेला जीव...आणि आले मी ह्या कधीही न सम्पणार्या भूतयोनीत...सांग ना माझी चूक काय होती??...प्रामाणिकपणे काम करणं चुकीचं आहे का??का मारलं त्यांनी मला....4,5 दिवसांनी माश्याना खाल्लेल्या अवस्थेत माझं प्रेत ह्या पाण्यावर तरंगत होतं...आणि अनैतिक सबंधातून...आत्महत्या हे लेबल लावलं मला....काय हे? अरे न्याय आहे का नाही तुमच्या मानवी राज्यात?? माझ्या आईबापाला काय वाटलं असेल?? प्रामाणिक पणे काम करू नये का? जाऊ दे तुला काय कळणार म्हणा...तू पण त्यांच्यातला....तुझ्या अवस्थेवरून वाटतय तू जास्त वेळ जगणार नाहीस...."

एवढं बोलून सुनीता मागे वळली..आणि परत समुद्राकडे जाऊ लागली....तिला थांबवत रितेश म्हणाला "मिस..सुनीता...विल्सन अस काही करेल हे मला नाही वाटत...कारण माझ्याबरोबर खूप चांगलं वागतो तो....मी अनाथ...लहानपणी शिकून काबाडकष्ट करून शिक्षण पूर्ण केलं...चांगली नोकरी लागली....तिथेच माझी भेट विल्सनशी झाली...त्याने मला लाखो रुपयांचं पॅकेज ऑफर केलं...मी फक्त त्याच्या डिझाइन काढून देत होतो...त्याचे काही काळे धंदे मला माहित होते...पण मला माझ्या कामाशी मतलब....माझे दिवस सुद्धा चांगले चालू होते...काही दिवसांनी मला रोझी भेटली....माझी प्रेयसी...लवकरच आम्ही लग्न करणार होतो...पण काही दिवसांनी मला त्रास सुरू झाले....आजार वाढला...रिपोट्स मध्ये ब्लड कँसर निघाला...माझी तर दुनियच बदलली ह्या रोगाने...माझं कामातील लक्ष गेलं...आणि मी काही दिवसच जगणार हे ऐकून माझी प्रेयसी सुद्धा....माझा आजार वाढत होता...अक्षरशः रक्त ओकत आहे मी...फक्त एक दोन आठवडे आयुष्य आहे माझं...पण ते सुद्धा विव्हळण्यात जात होतं...प्रचंड त्रास होत आहे...कश्याला जगायचं असं?? त्यापेक्षा मेलेले बर...म्हणून जीव द्यायला आलो होतो इथं....पण आता तुझ्याबद्दल ऐकून मला वाईट वाटलं....तुझ्याबद्दल मला सहानुभूती आहे आणि ह्या त्रासाला कंटाळलो आहे...माझी आत्महत्या तर फिक्स आहेच
"पण मी माझी आत्महत्या एक दिवस पुढे ढकलतो"
अस बोलून रितेश तिच्याकडे बघत मागे फिरला आणि लडखडत चालू लागला...आजूबाजूला चित्रविचित्र भुतं त्याला बघत होती त्या घोळक्यातून वाट काढत तो चालत होता ..........
बीच वरून त्या भुतांच्या घोळक्यातून रितेश बाहेर आला...अर्धनग्न अवस्थेत तो रस्त्यावरून चालत होता...वाटेत सुनीताचे तिच्यावर झालेल्या अन्यायाची कहाणी तो आठवत होता....ज्याने आपल्याला आधार दिला नोकरी दिली तो बॉस बरोबर की काही वेळा पूर्वी आपली कहाणी सांगून आपल्या बॉस ला व्हिलन ठरवणारी सुनीता बरोबर ह्या द्विधा मनस्थिती मध्ये तो अडकला होता....ब्लड कँसर चा त्रास त्याचा जीव घेत होता...वाटेतच तो कितीवेळा तरी कोसळला होता...अखेर लडखडत तो आपल्या फ्लॅट मध्ये पोचला....त्याने थंड पाण्याचा बाथ घेतला...सुनीताची कहाणी आणि तिचा तो केविलवाणा चेहरा त्याला अस्वस्थ करत होता....त्याने आपल्या गोळ्या घेतल्या...त्याला काहीप्रमाणात आराम मिळाला...पण झोप नाही...सारखा तो सुनीताचा भयाण सडलेला चेहरा आणि तिने सांगितलेली ती कहाणी...त्या सडलेल्या चेहऱ्यात सुद्धा तिच्या डोळ्यातले भाव त्याला विचार करायला भाग पाडत होते...
सकाळ झाली...त्याने आवरायला सुरवात केली...अंघोळ करून त्याने ब्रेकफास्ट केला...अधून मधून खोकला आणि ते रक्त त्याला आपल्या अवस्थेची जाणीव करून देत होत....त्याने आपल्या गोळ्या तोंडात कोंबल्या चराचरा चावून खाल्ल्या...गोळ्या पोटात जाताच त्याला प्रचंड वेदना होऊ लागल्या तो फरशीवर विव्हळत पडला...काही वेळाने हा त्रास कमी झाला...त्याने आपला नवीन शर्ट अंगावर चढवला...वर कोट चढवला...कँसर मुळे डोक्यावर थोडेच वाचलेले केस त्याने सावरले....आरशासमोर उभा राहिला असता त्याची त्यालाच भीती वाटली...एके काळी "हँडसम हंक" असलेला रितेश आज ह्या रोगामुळे विद्रुप बनला...आरश्यातलं त्याचच रूप त्याला भीती घालत होतं...तो आरश्यात बघून जोरात किंचाळला आणि ओल्या डोळ्यांनी त्याने तो आरसा फोडून तो आपल्या प्रवासाला निघाला

रात्रीचे 11 वाजले असतील....एका बार समोर तो उभा होता...."विल्सन बार" त्याचा बॉस विल्सन चाच होता तो...ह्या वेळी तो तिथेच असणार ह्याची रितेश ला खात्री होती...dj चालू होता...dj च्या तालावर बेफाम होऊन लोक नाचत होते....त्या गर्दीतून वाट काढत तो एका सिक्रेट रूम मध्ये पोचला...विल्सन चा खास माणूस अशी रितेशची ख्याती होती...बाहेर उभारलेल्या दोन गार्डस नी त्याला आत सोडले...दोन बारबाला घेउन विल्सन आरामात आपल्या सोफ्यावर बसला होता....त्याच्या सिगारचा धूर सगळ्या रुम मध्ये पसरला होता...रितेश आता येताच त्या वासाने त्याला परत खोकला लागला..त्याने आपले तोंड दाबले परत रक्ताची उलटी...त्याने ती रुमालाने पुसली...अनपेक्षित पणे रितेशला बघून विल्सन गोंधळला.... मांडीवर बसलेल्या बारबालाना त्याने इशारा करून बाहेर जायला सांगितले
"अरे..री..री...रितेश...अरे तू तर आजारी होतास ना...तुला तर हॉस्पिटलमध्ये असायला हवं होतं"
विल्सनला बघून रितेश ने आपला कोट झटकला आणि सोफ्यावर बसला
"काय बॉस...एवढी कामं केली तुमची मी...भेटायला पण अपॉइंटमेंट घेऊन येऊ का आता"
अनपेक्षित वाक्य ऐकून विल्सन गोंधळला आपला दारूचा ग्लास खाली ठेवून तो म्हणाला
"अरे तस नाही...जोसेफ बोलला तू खूप सिरीयस केस आहेस..मी भेटायला येणारच होतो...पण माझी परदेशी टूर निघाली .आणि तुला तर माहीत आहेच की माझे विरोधक किती वाढलेत..सगळ्यांना सांभाळावे लागते बाबा...परवाची ती xxx सुनीता...अरे किती त्रास दिला तिने....पण गप्प केली की नाही तिला...धंदा आहे धंदा कराव लागतं...सगळेच प्रामाणिक निघाले तर आपल्या सारख्यानच कसं होणार....चल ते जाऊ दे...सोड तो विषय...बोल काय करतोस सध्या"
"काही नाही बॉस थोडं सोशल वर्क चालू केलंय मी" समोर पडलेली सिगरेट तोंडात धरून पेटवत रितेश बोलला
"काय?? सिरियसली?? तू आणि सोशल वर्क?? अरे पैशाला हापापलेला तू..हालत बघ स्वतःची...तुला नीट उभं राहतं येत नाही....तू कधी पासून सोशल वर्क चालू केलंस??" समोरच्या टेबलावर पाय ठेऊन विल्सन तोंडातून धूर सोडत बोलला
"काल रात्री पासून सुरू केलय बॉस"
रितेश च्या तोंडून हे वाक्य ऐकून विल्सन हसत बोलला "बरं...बरं असू दे...बोल मग का आलास इथे...डोनेशन वैगेरे हवं आहे काय तुला?"
तोंडातून आपली सिगार काढून रितेश ने आपल्या पायात विझवली आणि विल्सन कडे बघत तो बोलला
"हे बघा बॉस तीन गोष्टी जाणून घेण तुम्हाला गरजेचं आहे...पहिली गोष्ट...मी कँसर च्या लास्ट स्टेज ला आहे...जास्तीत जास्त 4 दिवस आयुष्य असेल माझं...ते पण हालाकीत जात होते....आता दुसरी गोष्ट...हे विव्हळत मरण्यापेक्षा एकदाच जीव द्यावा म्हणून मी जीव द्यायला त्या हॉन्टेड बीच वर गेलो तर तिथे मला ती सुनीता भेटली"

सुनीताचे नाव ऐकून विल्सन ताडकन उभा राहिला
"अहं...ती जिवंत नाहीय...तिचं भूत भेटलं होत मला....तिने मला सांगितलं की कसं तुम्ही तिला त्रास दिलात...अस तिला तुम्ही पायाला दगड बांधून समुद्रात ढकलून दिलं...काहीतरी तुमचा फेव्हरेट पॉईंट सांगत होती ती...तिथेच तुम्ही...शेट्टी,शिर्के,डिसोझा आणि कित्येक तरी शत्रूंना आणि तुमच्या काळ्या कामात आडवं येणाऱ्या लोकांना त्या खोल समुद्रात ढकलून दिलं....मला ह्या गोष्टीवर विश्वास बसला नाही...अरे एवढा चांगला पगार देणारा आपला बॉस अस कस करेल अस मला नेहमी वाटत होतं...मग मी सुनीताच्या ऑफिस मध्ये गेलो...तिथे मला तिच्याबद्दल समजलं की ती कशी होती वैगेरे वैगेरे....नंतर मी तुमच्या खास माणसाला गाठलं तोच तो जोसेफ....त्याच्या पोरीला शाळेतून किडण्याप केलं...मग काय पोपटासारखा बोलला तो...त्याने सगळं सांगितलं की कसं कस आणि कुणाकुणाला तुम्ही ठार करून हे विल्सन एमपायर उभारलं....सुनीताबरोबर वाईट केलं सर तुम्ही..तिचे आईवडिलांना तिचाच आधार होता...अजून पण तिचा बाप तिची वाट बघतोय म्हणे..वेल डन सर वेल डन...तुम्ही जिंकलात
रितेशच्या तोंडून हे सगळं ऐकून विल्सन थरथरू लागला त्याला प्रचंड राग आला "अरे ए xxx..माज आला का तुला?? काय बोलतोस तू? बहुतेक तुला पण सुनिताकडे पोचवावं लागेल"
रितेश ने त्याला मध्येच थांबवलं आणि "अरे अरे एक महत्वाची आणि तिसरी गोष्ट सांगायची मी विसरलोच"
"मी आज सकाळीच एक #पिस्तुल खरेदी केलीय"
रितेश उभा राहिला आणि त्याने आपला हात पाठीकडे गेला पाठीमागे खवलेलं पिस्तुल त्याने काढलं
पिस्तुल काढून समोर उभा असलेला रितेश बघून विल्सन जाम घाबरला त्याने आपल्या हातातला काचेचा ग्लास खाली आपटला आणि जोरात ओरडला
पिस्तुल काढून समोर उभा असलेला रितेश बघून विल्सन जाम घाबरला त्याने आपल्या हातातला काचेचा ग्लास खाली आपटला आणि जोरात ओरडला
गार्डसsssssss
रितेश ने क्षणार्धात विल्सन वर बंदूक रोखली आणि बंदुकीचा चाप ओढला...गोळी विल्सनच्या डोक्यातून आरपार गेली...तो टेबलावर कोसळला...त्याच्या डोक्यातल रक्त काचेच्या टेबलावर पसरलं
गोळीचा आवाज ऐकून दोन्ही गार्ड खोलीत आले...टेबलावर डोक्याचा भुगा झालेला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला विल्सन बघून एका गार्ड ने रितेश वर बंदुकीने फायर केलं...गोळी रितेशच्या पाठीवर लागली...त्याने लगेच बंदुकीची नळी गार्ड च्या दिशेने फिरवली...आणि एका गार्डच्या पायावर गोळी चालवली...तो गार्ड विव्हळत खाली कोसळला...दुसऱ्या गार्डवर त्याने बंदूक रोखली
"तुम्हाला मरायचं नाही आहे मला...तुमच्या गन इकडे द्या आणि हाथ वर करा"
रितेशच्या डोळ्यातली आग त्या गार्डस वर भारी पडली दुसऱ्या गार्ड ने आपल्या बंदुका रितेश कडे दिल्या...पाठीतून रक्त वाहत असल्याने रितेशला वेदना असह्य झाल्या....त्याने एका गार्ड ला बोटाने इशारा केला...तसा तो समोरची बॅग घेऊन आला ती बॅग त्याने रितेशच्या हातात दिली ..बॅग काढून त्याने विल्सनच्या लॅपटॉप उघडला...त्याचे डोळे जड होत होते...त्याने काहीतरी बटन्स मारले आणि परत बंदुकीची नळी दुसऱ्या गार्ड कडे केली...

"तू...हा..तू...ह्या विल्सन ला माझ्या गाडीत घाल...जरा जरी हालचाल केली तर इथेच ठोकिन दोघांना"
गार्डने विल्सन च्या मृतदेहाला रितेशच्या गाडीत घातले...रितेश लडखडत गाडीजवळ आला...त्याच्या पाठीतून रक्त वाहत होत...मधून मधून तो खोकला आला की तोंडातून सुद्धा रक्त येई....त्याने त्याच अवस्थेत गाडी चालू केली...रात्रीच्या सुनसान सडकेवरून त्याची ति गाडी वेडीवाकडी जात होती....तो आता हॉन्टेड बीच जवळ आला....त्याने समोरच बंद गेट बघितलं आणि गाडीचा स्पीड वाढवला...गेट तोडून गाडी आत शिरली....त्या भयाण काळ्या रेतीच्या बीच वर पाणी उडवत रितेशच्या गाडी शिरली....त्याचे डोळे जड होत होते....आपला काळ जवळ आलाय अस त्याला वाटलं...पण समोरच त्याला ती दिसली....पायात दगड आणि उदास ...तिला बघून रितेश ने ब्रेक मारला तशी गाडी समोरच्या दगडावर आदळली....त्याच डोकं हॉर्नवर आदळलं..त्या भयाण शांत बीच वर त्याच्या हॉर्नचा आवाज घुमु लागला....तो बेशुद्ध...काही वेळानंतर एक प्रेमळ हाक रितेशच्या कानावर पडली....हळू हळू त्याच्या पापण्या वर गेल्या
"अरे ही तर पूर्वीची सुनीता...जिला रितेश ने पहिल्यांदा ऑफिसमध्ये बघितली होती...किती सुंदर दिसते ही"
कालच विद्रुप भयाण चेहऱ्याची सुनीता आज हसतमुख बघून रितेश च्या रक्ताळलेल्या ओठावर हसू फुललं...त्याने गाडीच दार उघडलं आणि तो बाहेर पडला...समोर सुनीता उभी होती...हसतमुख...त्याने आपला बोट गाडीच्या मागच्या सीटकडे केलं....विल्सनच्या मृतदेहाकडे.....त्याच्याकडे बघून सुनीताच्या चेहऱ्यावर वेगळंच समाधान होतं....तिने रितेशकडे बघितलं....आणि आपल्या जवळ येण्याचा इशारा केला...तसा रितेश उभा राहिला ..ती त्या बीच वरून चालत होती..मागे तो
समोर उभ्या असलेल्या छोट्या होडीत ती बसली....तसा तो तिच्याकडे बघत होता...तिच्या त्या डोळ्यातले भाव त्याला कळत होते....त्याने आपल्या रक्ताळलेल्या हातानी समोरचा एक मोठा दगड सर्व ताकतीनिशी उचलला.. त्याला नीट उभही राहता येत नव्हतं...पण तिचा तो तेजस्वी चेहरा तिला बळ देत होता...त्याने सर्व ताकतीने ती होडी पाण्यात ढकलली आणि आपण सुद्धा बसला....ती अर्धी तुटलेली नाव...ते तुटलेले वल्हे...त्याला त्या ठिकाणी जाण्यापासून रोखणार नव्हते...त्याने पाण्यात वल्हे चालवायला सुरवात केली पाठीतून रक्त...त्याला प्रचंड वेदना होत होत्या पण समोरचा तिचा समाधानी चेहरा बघितला की तो सर्व विसरून जायचा.....अखेर ते ठिकाण आलं....सुनीता त्या होडीतून पाण्यावर आली आणि ती आता त्या पाण्यात गेली....थोड्या खोलीवरून ती रितेश ला बोलवत होती...त्या काळ्या पाण्यात तिच्या तेजाने तो भाग उजळून निघाला...तिला बघून रितेश हसला आणि त्याने आपल्या पायाला दगड बांधला...आणि तो दगड त्याने पाण्यात फेकला आणि समोर दिसणाऱ्या झगमगणार्या शहराकडे त्याने निरखून पाहिलं....त्याची नजर खाली गेली पाण्यात सुनीता त्याला बोलवत होती...त्याने पाण्यात उडी घेतली दगड आपलं काम करत होता...तो रितेश ला खोल खोल नेत होता....पाण्यात त्याचा जीव गुदमरत होता ...पण समोर तेजस्वी चेहऱ्याची सुनीता होती तिच्या भोवती एका वेगळ्याच उजेडाच वलय होतं... ती रितेश ला स्पर्श करत होती पण तो स्पर्श त्याच्या शरीरातून आरपार जात होता....त्या स्पर्शाची जाणीव लवकरच रितेशला होणार होती....तो आता खोल जाऊ लागला...ती सुद्धा त्याच्याबरोबर येत होती....त्याने आपल्या बरोबर रक्ताचा लाल रंग सुद्धा आणला होता त्या रक्ताची मेजवानी घेण्यासाठी काही मासे धावून आले....सुनीताच्या तेजात ते मासे अजूनच सुंदर दिसत होते....अचानक सुनीता रितेशच्या डोळ्यापासून दूर जाऊ लागली....त्याचे डोळे बंद झाले....काही वेळात त्याचे डोळे उघडले....आता त्याच्या हाताला सुनीताने पकडलं होत...काहीवेळा पूर्वी फक्त काल्पनिक असलेला हा स्पर्श अचानक वास्तविक कसा झाला हा प्रश्न रितेशला पडला...त्याची नजर खाली गेली....तो कँसर वाला रितेशचा देह खाली खाली जात होता....तो दगड त्याला खाली नेत होता...आणि सुनीताबरोबर तरंगणारा हा देह तिच्यासारखाच झाला होता....तिने रितेशला वर काढलं
समोरच दृश्य बघून रितेश मंत्रमुग्ध झाला....एखादा सनसेट बघावा तसा समोरचा नजरा होता...रात्र असून देखील सूर्योदय व्हावा तसा भासत होता...काळ फेसाळ पाणी आज निळाशार वाटत होतं...त्याने आपल्या पायाकडे बघितलं ते त्या पाण्यावर तरंगत होते....त्याने स्वतःला चाचपल....तोच पूर्वीचा रितेश...हँडसम...त्याने आपल्या चेहऱ्याच प्रतिबिंब बघितलं...त्याच्या डोक्यावरचे केस उडत होते त्याच्या डोळ्याभोवतीची काळी वर्तुळं गायब झाली होती...कित्येक दिवसांनी त्याच्या चेहऱ्यावर समाधानच हसू आलं होतं...समोर पांढऱ्या शुभ्र वस्त्रात सुनीता उभी होती तिने त्याच्याकडे बघत स्मितहास्य केलं

"वेलकम टू हॉन्टेड बीच....रितेश"
अस बोलून सुनीता वाऱ्याबरोबर उडत किनाऱ्याकडे जाऊ लागली तिचा पाठलाग करत रितेश सुद्धा तिच्यामागे धावला.....सगळे समुद्र किनारे फिके पडावेत असा काहीसा किनारा तो दिसत होता...तो जेव्हा इथे आला तेव्हा त्याला घाबरवणारी माणसं आज त्याला हसून दाद देत होती....ज्या प्रेमीयुगुलानी इथे आत्महत्या केल्या ते एकमेकांच्या बाहुपाशात अडकून फिरत होते...रितेश ची नजर हे सगळं दृश्य डोळ्यात साठवून घेत होती...आणि शोधत होती सुनीताला....लोकांसाठी भूत असलेल्या पण आता सहकारी असलेल्या लोकांच्या घोळक्यात तो तिला शोधू लागला...ती बसली होती एका दगडावर...तो तिथं पोचला
"काय ग...हॉन्टेड बीच हे नाव ह्याला बरोबर वाटत का? हे तर हेवन बीच आहे"
हे वाक्य ऐकून सुनीता हसली "हम्म ते आपल्यासाठी हेवन आहे पण लोकांसाठी हॉन्टेडचं"
आणि हो मिस्टर हँडसम रितेश हे अस हँडसम रूप घेऊन इथे नाही फिरायचं...लोकांना घाबरवतो आपण...सो बिईंग भयानक"
सुनीताच्या तोंडून हे वाक्य ऐकून रितेश तिच्या बाजूला जाऊन बसला "अहो मॅडम तुमच्यासाठी आताच एक मर्डर केलाय मी...भयानक बनणं काय अवघड आहे..आणि हो एक महत्वाची गोष्ट सांगायची राहून गेली...मी आज तुझ्या ऑफिस मध्ये गेलो तिथे तुझ्या घरचा अड्रेस मिळाला...विल्सनच्या लॅपटॉप वरून मी जमवलेले 4 कोटी रुपये मी माझ्या मित्राच्या अकाउंट वर ट्रान्सफर केलेत आणि तुझ्या घरचा अड्रेस त्याला सेंड केलाय...उद्या जाऊन तो ते पैसे तुझ्या आईवडिलांना देईल...तुझ्या भावाचं शिक्षण पूर्ण होईल"

हे ऐकून सुनीता भरवली तिने त्याचा हात आपल्या हातात घेतला आणि डोळ्यात पाणी आणून बोलली "थँक्यू"
रितेश ने आपल्या हातानी तिचे डोळे पुसले...आनी त्या दोघे निळ्याशार सागराकडे बघत बसले...सुनीताने आपले डोके त्याच्या खांद्यावर ठेवले...त्याचे हात सुनीताच्या केसातून फिरत होते...अचानक सुनीता उठली
"अरे सकाळ व्हायची आणि आपली जायची वेळ झाली....चल आता"
"अरे सकाळ व्हायची आणि आपली जायची वेळ झाली....चल आता"
त्याने तिच्याकडे बघितलं "पण आपण जायचं कुठे"
तिने त्याचा हात पकडला आणि हसऱ्या चेहऱ्याने ती त्याला समुद्राच्या मधोमध घेऊन गेली आणि तिथेच त्या खोल सागरात ते दोघे अदृश्य झाले.........(समाप्त)