लेखक:- अॅड. अंकुश सू. नवघरे. (पालघर)
पुनः प्रकाशन:- दि.०५.०६.२०१९
©Ankush S. Navghare ®२०१९
(ह्या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत)
नमस्कार मित्रांनो ह्या कथांचे विडिओ मध्ये रूपांतर करण्यासाठी मी ह्या कथा काही लोकांना दिल्या होत्या त्यातील 3 कथांचे विडिओ मध्ये रूपांतर झालेले आहे. परंतु आता त्याचे विडिओ बनणार नाहीत, आणि कुठे तसे आढळून आल्यास मला कळवावे.
आज मीनलचा हॉस्पिटल मधला पहिलाच दिवस होता आणि नर्स झाल्यापासून चा पण पहिलाच. कामाचा अजिबातच अनुभव गाठीशी नसल्याने जरासा ताण आला होता. परंतु तिच्या सुदैवाने आज कुठलीही इमेर्जेंसी नसल्याने जास्त काम नव्हते म्हणून ती आणि जोत्सना नर्स दोघेही निवांत गप्पा मारत बसल्या होत्या. डॉक्टर त्याच बिल्डिंग मध्ये राहत असल्याने काही इमेर्जेंसी आलीच तर त्यांना कॉल करणार होते. खाली वाचमेन असल्याने तसे घाबरण्याचे कारण नव्हते. अचानक बाळांच्या स्पेशल रूम मधून बाळाच्या रडण्याचा आवाज येऊ लागला म्हणूंन जोत्सना मीनलला म्हणाली की जा ग जरा पाहून ये कुठलं बाळ रडतेय. जोत्सना सिनियर असल्याने मीनलला जाणे भाग होते. मीनल ला हॉस्पिटल ची पार्श्वभूमी माहीत नसल्याने ती बिनधास्त गेली, आणि पहाते तर काय, एक नर्स एक बाळाच्या पाळण्यापाशी उभी राहून बाळाकडे एकटक पाहत होती, पण बाळ तर शांत झोपलेल दिसत होते, पण मग आवाज कुठल्या बाळाचा येत होता.
मीनल ला आश्चर्य वाटले म्हणून ती त्या नर्स च्या जवळ गेली, तिचा पहिला दिवस असल्याने तिला वाटले की अजून एखादी नर्स ड्युटीवर आलेली असेल. तिने मिस अशी हाक मारली पण काहीच उत्तर आले नाही म्हणून तिने त्या नर्सच्या खांद्याला हात लावला. त्या नर्स ने मागे वळून न पाहता मीनल च्या हातावर हात ठेऊन म्हटले, शुsss बाळ आताच झोपलेय हळू बोल, बाळाचा आवाज थांबला होता, त्या नर्स चा स्पर्श एकदमच थंड आणि अंगावर शिरशिरी आणणारा लागला होता, पण AC च्या हवेमुळे असेल कदाचित म्हणून मीनल पण जास्त काही विचार न करता परत ज्योत्स्ना कडे आली. ज्योत्स्ना ने तिला विचारले की काय झालेलं, त्यावर तिने सर्व सांगितल आणि विचारलं की ती दुसरी नर्स कोण आहे, त्यावर ज्योत्स्ना म्हणाली की कुठली नर्स? आज आपण दोघीच आहोत नाईटला, त्यावर मीनल म्हणाली नाही सिस्टर टिकडे एक नर्स होती, त्यावर ज्योत्स्ना नर्स म्हणाली चल दाखव मला, असे म्हणत ज्योत्स्ना आणि मीनल तिकडे गेल्या पण तिकडे कुणीच नव्हते, मीनलला आश्चर्य वाटले म्हणून ती ज्योत्स्नाला जोर देऊन म्हणाली की ज्योत्स्ना सिस्टर अहो खरच तीकडे नर्स होती, तिने माझ्या हाताला हात पण लावला, हे बघा असे म्हणून तिने ज्योत्स्ना मिस हात दाखवत असताना तिच्या तोंडातून आवाजच निघेनासा झाला, ज्योत्स्ना मिस ने हात पाहिला असता तिला दिसले की मीनलच्या हातावर कोणाच्यातरी बोटांचे लालसर काळपट ठसे उमटलेले होते. ते बघून हळूहळू मीनलची शुद्ध हरपली, जाग आली तेव्हा तिलाच ऍडमिट केलेलं होते. त्याच दिवशी तिने डिस्चार्ज घेतला आणि ती जी घरी गेली ती परत आलीच नाही.
समाप्त.