लेखक:- अॅड. अंकुश सू. नवघरे. (पालघर)
पुनः प्रकाशन:- दि.०७.०६.२०१९
©Ankush S. Navghare ®२०१९
(ह्या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत)
नमस्कार मित्रांनो ह्या कथांचे विडिओ मध्ये रूपांतर करण्यासाठी मी ह्या कथा काही लोकांना दिल्या होत्या त्यातील 3 कथांचे विडिओ मध्ये रूपांतर झालेले आहे. परंतु आता त्याचे विडिओ बनणार नाहीत, आणि कुठे तसे आढळून आल्यास मला कळवावे.
एकट्याने ओटी मध्ये जायला सर्वच नर्स घाबरच्या. का तर रात्रीच्या वेळी म्हणे तिकडे कसले कसले आवाज येत असत. रात्रीचे २ वाजून गेले होते, मोठे डॉक्टर बाहेरगावी असल्याने सर्व भार आज नवीन आलेल्या डॉक्टर सुमन ह्यांच्यावर आलेला होता, डॉक्टर सुमन त्यांच्या रूम मध्ये काहीतरी वाचत बसल्या होत्या, इतक्यात रूमची बेल वाजली. त्यांचा चेहरा चिंताग्रस्त झाला कारण ही इमेर्जेंसी आल्यावर वाजणारी बेल होती. डॉक्टर सुमन ने अप्रोन चढवला आणि त्या लगबगीने ओटी कडे जायला निघाल्या. जाताजाता त्या विचार करत होत्या की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार. त्यांनी नर्स रूम मध्ये नजर टाकली पण सर्व शुकशुकाट होता. त्यांना वाटले की सर्व ओटी मध्ये तयारीला लागले असणार, म्हणून डॉक्टर सुमन तडक ओटी कडे निघाल्या. ओटी च्या बाहेर पण कोणीच नव्हते, पण वरचा लाल लाईट चालू होता, म्हणजे सर्व आत असणार होते. डॉक्टर सुमन दरवाज्यातून आत गेल्या, आत एक बाई ओटी टेबलावर विव्हळत होती, पोट खूपच वर आलेले होते, आत अजून एक नर्स होती पण ती डॉक्टरांना पाठमोरी उभी होती, डॉक्टर आल्याची चाहुल लागली असूनही तिने मागे वळून पाहिले नाही, डॉक्टरांनी पण ते मनाला लावून घेतले नाही कारण कदाचित ओपेरेशनच्या तयारीच्या गडबडीत तिला ते सुचले नसावे, डॉक्टरांनी त्या टेबलावरच्या बाईला तपासले आणि त्या नर्सला विचारले की झालीय का सर्व तयारी, अजून दोन नर्स ना पण बोलवा आणि डॉक्टर शिंदेंना पण कॉल लावा, केस खूपच क्रिटिकल वाटत आहे, लवकर स्टेप्स घ्यायला हव्यात, पेशंटचे नातेवाईकांना मला लगेच भेटायला सांगा, कोण आहे ह्या पेशंटच्या सोबत. डॉक्टर सर्व सूचना देत होत्या परंतु त्यावर ती नर्स काहीच बोलत नव्हती, फक्त होकारार्थी मान हलवत होती, जसेकही तिला सर्व पूर्वकल्पना होतीच की पुढे काय होणार आहे. गडबडीत असल्याने डॉक्टरांनीही तिच्या तशा वागण्याकडे जास्त लक्ष न देता त्या, त्या नर्सला म्हणाल्या की मी लगेच फ्रेश होऊन येते आणि तू व्यवस्तीत सर्व तयारी करून ठेव. डॉक्टर फ्रेश होता होता काहीतरी विचार करत होत्या. आज त्यांना काहीतरी चुकचुकल्या सारख वाटत होत. काहीतरी वेगळं पण लक्षात येत नव्हतं. अचानक त्यांना काहीतरी राहिल्यासारखं आठवल म्हणूंन त्या आवरून लगबगीने बाहेर आल्या आणि नर्स रूम कडे निघाल्या, पहाते तर काय तिथे सर्व नर्स झोपल्या होत्या, त्यांनी त्यातील रोझी नर्स ला उठवले, त्या नर्स खडबडून जाग्या झाल्या आणि डॉक्टरांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागल्या. त्या सिनिअर नर्स होत्या पण तरी डॉक्टर तिच्यावर जराश्या भडकल्या आणि तिला ओपेरेशन च्या तयारीबद्द्ल विचारणा केली असता ती अजूनच प्रश्नार्थक नजरेनं पाहू लागली. त्यावर डॉक्टर तिला म्हणाल्या की पाहताय काय अशा, तिकडे इमेर्जेंसी आहे आणि तुम्ही इकडे सर्व झोपल्या आहात, त्या नर्स अजूनच बुचकळ्यात पडल्या पण लागलीच त्यांना काहीतरी वेगळीच शंका आल्याने त्यांनी डॉक्टर सुमन ना हळू आवाजात विचारले की तुम्ही बरोबर २ वाजता इमेर्जेंसी ची बेल ऐकली होती का. त्यावर डॉक्टर सुमन ने होकारार्थी मान हलवल्यावर लागलीच त्या नर्सचा चेहरा पांढराफटक पडला, म्हणून तिने त्वरित डॉक्टर सुमन आणि अजून एक वार्डबॉय ला सोबत घेतले आणि त्या ओटी कडे जायला निघाल्या. तिकडे पोहोचल्यावर डॉक्टर सुमन ह्यांनी पाहिले की ओटी ची लाल लाईट बंद होती आणि बाहेरून लॉक होता. त्यांनी लॉक उघडून डॉक्टर सुमन ना आत नेले, परंतु आतमध्ये कोणीच नव्हते, पण ऑपरेशन ची सर्व तयारी केल्यासारखी सर्व गोष्टी रचून ठेवल्या होत्या. त्यांची नजर सहज आधीची ती नर्स जिकडे उभी होती तिकडे गेली असता त्यांना एक गोष्ट आठवली जी त्यांना त्यावेळी दिसली होती परंतु त्यावेळी घाई असल्याने त्यांनी ती नोटीस केली नव्हती आणि ती म्हणजे त्या नर्स चे उलटे पाय...समाप्त
अंकुश नवघरे...