फक्त पिता- bhutkatha |
अवघ्या वयाच्या 12 व्या वर्षी त्यांच्या मुलाला ब्रेन ट्युमर चे निदान झाले होते,,,एकुलता एक मुलगा होता त्यांचा तो,,,पायाखालची जमीन सरकली होती त्यांच्या,, आईचा तर हॉस्पिटल मधेच अश्रूंचा बांध फुटला होता,,,,जवळचे नातेवाईक होते तिथे त्यांची ही मने हेलावली होती,,,पण तिथे एक खंबीर व्यक्ती उभी होती,जी सर्वांना आधार देत होती,,तो होता त्या मुलाचा बाप!!!!!!
अर्थात तो आतून तुटलेलाच होता परंतु तसे जराही न दाखवता उभा होता,,डोळ्यापुढे अंधार दाटला होता आणि त्या दाटलेल्या अंधारात तो आपल्या मुलाचे भविष्य शोधत होता,,,,,मनात देवासोबत भांडत होता की माझा निष्पाप मुलगाच का??? मला तो आजार होऊ द्यायचा होता,,,मी सहन केले असते,,,जर कर्ता करविता तू असशील ना,,,,तर माझ्या मुलाला ह्यातून बाहेर काढायचा मार्ग तूच मला दाखवला पाहिजे,,, असंख्य विचार त्याच्या मनात कलह करत होते,,,कंठ दाटून येत होता पण त्याला हरायचे नव्हते,,मुलाला यातना मधून बाहेर काढायचा त्याने ध्यासच घेतला होता,,,,,,
लग्नानंतर 4 वर्षांनी त्यांच्या आयुष्य वेलीवर कोमल फुल उमलले होते,,,खूप गोड मुलगा होता तो,,त्याला समज खूप लवकर येत होती,,,लहान वयातच तो आज्ञाधारक बनला होता,,,दुसरे पालक त्यांच्या मुलांना त्याचे उदाहरण देत असत,,म्हणून ह्याच्या आई बापाला कोण आनंद होत असे,,,परमेश्वराने इतका गुणी बाळ आपल्या पदरात टाकला ह्या साठी ते परमेश्वराचे नेहेमी आभार मानत असत,,,,, परंतु आता नियतीने त्यांना दुःखात घेरले होते,समोर आपल्या काळजाच्या तुकड्याला मृत्यू च्या दाढेत पडलेलं पाहून त्यांना अतोनात वेदना होत होत्या,,,,डॉक्टर म्हणाले होते की तुम्ही थोडासा उशीरच केलात,,ट्युमर शेवटच्या टप्प्यात आहे,,,जरा अवघड आहे,,,,!!
हा "अवघड" शब्द त्यांचे काळीज भेदून गेला होता,,,,त्यांचा मुलगा यातना सोसत असताना देखील आई बापाकडे पाहून हसायचा,,, आणि त्याचे ते केविलवाणे हसणे त्याच्या आई बापात उभारी निर्माण करत होते,,,म्हणजे त्या लहान मुलाने देखील हात टेकले नव्हते,,,,होता होत दिवस जात होते,, मनाने कितीही खंबीर असले ना तरीही हे नश्वर शरीर कधी कधी साथ सोडत असते,,,त्या मुलाचे देखील तेच व्हायला लागले,,,तो दिवस दिवस खंगत चालला होता,,,,डोळ्याभोवती दाट काळी वर्तुळे त्याच्या गंभीर आजाराचा परिचय देत होती,,,,त्याचा श्वास आज जड होत होता,,थोडेफार बोलणारा तो आज काहीच बोलत नव्हता,,,फक्त एकटक बापाकडे नजर होती त्याची,,,,आईला घरीच ठेवले होते,,तिच्या मुलाच्या तब्यतीत हळूहळू सुधारणा होत आहे अशी खोटी आश्वासने तिच्यापर्यंत पोहचवली जात होती,,
कदाचित आज तो दिवस उजाडला होता,,,!!!नियतीने त्याला यातना मधून मुक्त करण्याची तयारी केली होती,,, त्या बापाचा सहनशीलतेचा आता अंत झाला होता,,,नाही,, माझ्या मुलाला मी माझ्या डोळ्यासमोर मरू नाही देणार,,,आणि तो तेथून निघाला,,,,ज्या परमेश्वराची तो मनापासून भक्ती करत आला होता तिथेच तो गेला होता,,,,
कोणाचे वाईट केले मी सांग मला??? हा खेळ माझ्यासोबतच का??? तुझी आजपर्यंत भक्ती केली ती चूक केली का???? तुझी भक्ती करून सुद्धा तू तुझ्या भक्ताला त्रासापासून वाचवू शकत नाहीस आणि तू स्वतःला ईश्वर म्हणवतोस???? आज इथे तुझा भक्त नाही,,,एक निरागस मुलाचा बाप उभा आहे,,,मला उत्तर हवय,,,
इतक्यात त्याचा फोन वाजला,,तो दवाखान्यातूनच होता,,,त्याने रिसिव्ह केला,,,मोठ्याने रडण्याचा आवाज त्याने ऐकला आणि लगेच फोन जमिनीवर टाकून दिला,,,,,
त्याने ओळखले होते,,,,,,त्याचे लेकरू काळोखात गेले होते,,,देवाकडे एक रागाने कटाक्ष टाकून तो निघाला,,,उंच पूल होता तेथे गाडी थांबवली,,,,आणि त्या बापाने आपल्या मुलाच्या विरहात स्वतःला नदीत झोकून दिले,,आतापर्यंत साथ दिलेलं त्याच खंबीर मन,,,त्याच्या मुलाच्या जाण्याने तुटले होते,,,
पाण्यात त्याचे शरीर पडले होते,,, त्याचे शरीर खोल नदीच्या तळापाशी पोहचले होते,,,,त्याला त्या पाण्यात शुभ्र प्रकाश दिसला,,,,,,आणि त्याला त्यात एक आकृती दिसू लागली,,,
दमलास मला बोलून????!!!!
कोण आहात आपण,,,?
आणि मी पाण्यात पडून सुद्धा जिवंत कसा,,,???
अरे मी तोच आहे,,ज्याच्या आदेशा शिवाय ह्या धरतीवर पाण सुद्धा हलत नाही,,,पण आज माझ्या एका भक्ताने तर माझे अस्तित्वच नाकारले,,,,,,माझ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले,,,का??? सांग मला,,,,,सांग,,,,
तू सगळे जाणतोस ना,,,,आणि तरीही मला विचारतो आहेस??? माझ्या मुलाला मरताना तू दाखवलेस मला देवा,,,तुझ्यावरची माझी श्रद्धा निकामी ठरली,,,तू हिरावलस माझ्या बाळाला माझ्यापासून,,,म्हणून असह्य होऊन मी सुद्धा मरण पत्करले,,,,
परमेश्वर हसून म्हणाला,, अरे पण मृत्यू हे तर त्रिवार सत्य आहे,,,ते कोणालाच चुकले नाही,,,जो येतो त्याला जावेच लागेल,,,,,
अरे देवा पण तो निष्पाप जीवच का,,,???त्याने तर अजून आयुष्य देखील पाहिले नाहीये,,,जीवन जगायच्या आधीच त्याचे जीवन संपवले तू,,,,???
हे विधी लिखित होते माझ्या बाळा,,,,,
वा परमेश्वरा वा,,,,,,एकीकडे मला बाळ म्हणतोस,,,आणि माझ्या बाळाला हिरावून घेतोस,,,हा न्याय करतोस तू,,????
तो,,,जो या विश्वाचा कर्ता आहे त्याला हा बाप निरुत्तर करत होता,,
शेवटी एक मायेचा हात आपल्या पाठीवर पडल्याचे त्या बापाला जाणवले,,,,दिसत तर कोणीच नव्हते,,,,,फक्त आवाज,,,
"""ह्या अखंड विश्वाचा पिता,, आज एका मुलाच्या पित्या समोर हरला आहे,,,,,जा बाळ,,जा,,,तुझा मुलगा तुझी वाट पाहतोय!!!!!!!!
स्वप्न उघडावे तसे त्याने डोळे उघडले होते,,,ज्या पुलावरून त्याने उडी मारली होती,, त्याच पुलावर तो उभा होता,,,,,,सारे काही तो समजून चुकला होता,,,,क्षणाचा विचार न करता त्याने थेट हॉस्पिटल गाठले,,,आणि धावतच मुलाच्या रूम कडे गेला,,,,,तो बाळ आईच्या कुशीतून टकमक सगळीकडे पाहत होता,,,,ते दृश्य पाहून,,,तो पिता,,, खाली बसून हमसून रडू लागला,,,इतक्या दिवस मनात दाटून ठेवलेले सर्व दुःख अश्रू सरशी वाहत चालले होते,,,,,आपल्या बापाला पाहून तो मुलगा आईची कूस सोडून आपल्या पित्याच्या गळ्यात जाऊन पडला,,!!!!!!!!
आज त्याने पहिल्यांदा आपल्या बापाला इतके रडताना पाहिले होते,,,आणि हे सर्व त्याच्यासाठी होते,,,,,मुलगा कुशीत असताना मात्र तो त्या विधात्याचे आभार मानणे विसरला नाही,,,,,
ही त्या बापाची हिम्मत होती जो जराही न डगमगता आपल्या मुलासाठी थेट जगाच्या उधारकर्त्या ला जाऊन जाब विचारून आला होता,,,
आणि इतके सर्व होत असताना हॉस्पिटल चे सर्व डॉक्टर मात्र कोड्यात पडले होते,,,जिथे आपण हात टेकले होते,,,तिथे हा चमत्कार कसा झाला,,,,,???पण त्यांना माहीत नव्हते की,मृत्यूलोकाला हरवून त्या बापाने आपल्या मुलाला परत आणले होते,,,,,
फक्त पिता,,,,,,,,