Marathi Bhutachi Gosht आज तीन दिवस झाले रामा उपाशी होता... अशक्तपणा आणि पोटातल्या भुकेन त्याच्या डोळ्यांवर झापड येत होती. तसाच तो आपल्या सायकल वर बसुन घरी निघाला.. रामा हमाली करून आपल कुटुम्ब चालवायचा, पण काही दिवसापुर्वी कुुठेतरी धार्मिक दंगल झाल्यान मागच्या चार दिवसापासुन पुर्ण कोल्हापुर शहर बंद होत. त्यामुळे त्याच्या कुटुम्बावर उपासमारीची वेळ आली होती... आजही दिवसभर फिरून काहीच उपयोग झाला नाही... रात्रिचे दहा वाजायला आलेले. त्यातच बंद पुकारल्याने रस्ता रिकामाच होता, कधीतरी एखाद वाहन समोरून हॉर्न देत निघुन जायच... काही अंतर पुढे येताच त्याला नेहमीचा मांस जळालेला दर्प नाकात शिरला... नेहमी प्रमाणे पंचगंगा नदीकाठच्या स्मशानात एक प्रेत चितेवर जळत होत... खुप अशक्त वाटत असल्याने रामा सायकल वरून उतरला आणि खाली स्मशानाच्या पायरीवर बसला, भुकेन त्याचा जिव व्याकुळ झाला होता. सगळ काही त्याला अंधुक दीसत होत, एक कावळा भीर्रर्रर्र भीर्रर्रर करत रामाच्या जवळून गेला तस त्याच्या पायाच्या पकडीतून जमीनीवर काही तरी पडल्याच जाणवल. हात पुढे करून रामान उचलुन पाहिल तर तो एक मिठाईचा तुकडा होता... रामा उठून उभा राहीला आणि चालत चालत खाली निघाला... पेटणा-या चितेच्या तांबड्या लाल प्रकाशात त्याला काही खाण्याच्या वस्तु दिसत होत्या ज्या मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांति मिळावी यासाठी ठेवल्या होत्या... त्याला कावळे टोच्या मारताना दीसले... |
चार दिवसापासुन उपासमारीने व्याकुळ झालेल्या रामाला आता काहीच सुचत नव्हत..आधाश्यासारखा तो त्या खाण्याच्या चिज वस्तुवर तूटून पडला. बर्फी, पेढे, समोसा, चिकनचे तुकडे. आपल्या पोटाची आग शांत करू लागला... पोट आता चांगलच भरल तशी पाण्यासाठी त्याची नजर इकडे तिकडे फिरू लागली. उन्हाळ्याचे दिवस असल्याने नदीतले पाणीदेखील खुप कमी झाले होते. अचानक नजर समोर जाताच त्याच्या काळजात धस्स झाल, कारण काही अंतरावरच एका कठड्याला तक्या देऊन बसलेल कोणीतरी रामाकड किलकील्या नजरेन पहात होत.. डोक्यावरून अंगाभोवती एक मळलेली फाटकी चादर गुंडाळलेली होती, आपले मुंडके दोन्ही गुडघ्यांमधे खुपसून ती व्यक्ति तिरक्या नजरेने एकटक रामाकडे पहात होती. त्या व्यक्तिला समोर पहाताच रामान तिथुन काढता पाय घेतला... जाता जाता थोडी मिठाई मुलांसाठी कागदात बांधुन घेतली.. कारण चार दिवसापासुन मुलानाही पोटभर खायला मिळाल नव्हत... स्मशानातून बाहेर पडणार तोच ती व्यक्ति उठून उभी राहीली आणि रामाच्या दिशेन चालू लागली... रामान त्या व्यक्तिकडे पाहुन न पाहील्यासारख केल आणि आपली मान खाली घालून आपल्या चालण्याचा वेग वाढवला, इतक्यात त्या व्यक्तिन रामाला हाक दीली. "थांब रे...." थरथरत्या नजरेन मागे पाहील पण अंधार असल्यान स्पष्ट काही दीसत नव्हत, रामाच्या हातातील खाऊ भरून घेतलेल्या त्या पिशवीकडे पहात ती व्यक्ति बोलू लागली." काय खायच ते इथच खा, पण इथल काहीही घरी घेऊन जाऊ नको... आणी का...? ते पण विचारू नको....." बर बर म्हणत रामान ती पिशवी तिथेच कोप-यात ठेवली आणि स्मशानातून बाहेर पडला. सायकलवर बसुन त्या स्मशानाकडे पाहील पण ती व्यक्ति कुठेच दिसली नाही... " च्यायला कुठ गायब झाला...? जाऊदे....काय करायच आपल्याला..." स्वता:शीच बडबडत रामा हळू हळू घराच्या दिशेने निघाला... "पिंकी.......ये..पिंकी......." रामान दोन तीन हाका मारल्या तस पिंकी न दार उघडल.. "बाबा इतका वेळ कसा लागला .. मी वाट बघत कधी झोपले समजलच नाही..." पाणी देत पिंकी म्हणाली... "पिंकी..... जेवायला वाढू नको... " रामा खिशातून कागदाची पुडी काढत म्हणाला... "आणि हे घे....तु आणि राजु दोघे ही मिठाई वाटून खा..." ती मिठाई आपल्या मुलीच्या हाती ठेवली... पिंकीचा चेहरा आनंदाने खुलला, कितीतरी दिवसानी तीच्या बाबानी खाऊ आणले होते... पण लगेच ती नाराज झाली.." बाबा कशाला पैसे खर्च केले.. आईच्या आजारपणात आधीच आपल्याला खुप कर्ज झालय, आई जिवंत असती तर ती ही तुम्हाला रागवली असती.... लोक तुम्हाला पैशासाठी बोलतात ते मला नाही आवडत..." रामा काहीच न बोलता अंथरूणावर पडला... पिंकीने ती मिठाई झाकुन ठेवली आणि जाऊन झोपली.. "काय रे.... तुला सांगितलेल होत ना...काय खायच ते तिथच खा....घरी घेऊन जाऊ नको म्हणून....का आणलस घरी...... घात करुन घेतलास तू स्वताचा.... घात करून घेतलास.... घात करून घेतलास......" स्मशानात भेटलेला तो माणुस रामाच्या छाताडावर बसून किंचाळत त्याच्या गळा दाबत होता..त्याचे लाल रक्ताळलेले डोळे, क्रूर चेहरा पहून रामा थरारला.... "आई.........आई........." जोराने किंचाळत रामा झोपेतून जागा झाला... अंग घामाने भीजल होत...."बाबा काय झाल..." अंगणात झाडु मारणारी पिंकी धावत आत आली....तो अजुनही थरथरत होता... त्यान आजुबाजूला पाहील... ...समोरच्या घड्याळात साडेसाहा वाजले होते...आज रामाला मनातून भिती वाटली... " राजु...राजु कूठाय... आणि ती मिठाई इकड आनं... फेकुन येतो..." रामान पिंकीला विचारल... "मिठाई......? आहे थोडी...राजुन थोडी खाल्ली आणि मित्रांसोबत नदीला पोहायला गेलाय...काय झालं बाबा..." पिंकी काळजीपोटी विचारू लागली. रामा काहीच न बोलता ताडकन उठला, मिठाईची पुडी हातात घेऊन बाहेर कच-यात फेकुन आला... पिंकीला समजत नव्हत तीचे वडील असे का वागत आहेत??...
कुठ काम भेटतय का पहायला रामा पुन्हा सायकल वरून बाहेर पडला... आज त्याला थोड काम मिळाल होत पण काम संपायला रात्र झाली. त्याला आज खुपच अस्वस्थ वाटत होत. सायकल वरून तो घरी जायला निघाला.. भकास वातावरण, रस्त्याकडेच्या एखाद्या खांबावरील दिवा बंद चालू व्हायचा जणु अंधाराशी लपंडाव सुरू आहे ... दुरूनच त्याला स्मशानात जळणारी चीता दीसत होती... पण तिकडे पहाण्याची त्याची हिम्मत होत नव्हती... काही वेळातच तो त्या स्मशाना जवळ आला तसा त्यान सायकलचा वेग वाढवला पण नेमकी त्याच्या सायकलची चेन पडली, आणि बरोबर तो स्मशानाच्या समोरच जाऊन थांबला...रामा गडबडीने खाली उतरला आणि चेन बसवू लागला पण अंधार असल्याने त्याला नीट बसवता येत नव्हती. तोच त्याच लक्ष समोर गेल आणि काळजात चर्रर्रर्रर्र कन झालं. रामाच्या समोर तोच माणुस बसला होता... दोघामधे फक्त दोन तीन फुटाच अंतर असेल.. किलकील्या नजरेन तो पहात होता. डोक्यावरून अंगाभोवती पांघरलेली चादर , त्याला पाहून रामा एकदम दचकून पाठीमागे पडला. ती व्यक्ति उठून उभी राहीली... त्यान पांघरलेली चादर खाली पडली तसा रामाला दरदरून घाम फुटला..कारण समोरच एक काळीकट्ट आकृति उभी होती, लाल रक्ताळलेली हाताची नखे , लाल बुंद डोळ जे एकसारखे रामाला पहात होते, आता मात्र रामाचा आवाजच बंद झाला. रामा ऊठणार तोच समोर उभ्या त्या आकृतिचा हात इतका लांब झाला की रामाच्या छातीत त्यान आंगठ्याच लांब नख रूतवल, तसा तो वेदनेन कळवळला, त्याला पुन्हा जमीनीवर पाडून ते पिशाच्च जोरात किंचाळले " घात करून घेतलास स्वताचा. घात करून घेतलास स्वताचा.. घात करून घेतलास स्वताचा.." नख छातीत घुसेल तसा रामा वेदनेन कळवळत होता.. पण ते पिशाच्य किंचाळत होते सहनशक्ती संपली तसा रामा बेशुद्ध पडला... बाजूने येणा-या वाहनाच्या हॉर्न च्या आवाजाने रामा भानावर आला . पण ती आकृति कुठच नव्हती. त्याची नजर पुन्हा त्या स्मशानाकडे गेली... मघाशी दीसलेली आकृति पेटणा-या चितेकडे पाठमोरी उभी होती...
रामा कसलाच विचार न करता सायकल तीथच टाकून घराच्या दिशेने धावत निघाला... "पिंकी..........ए पिंकी....." रामा एकसारखा दरवाजा वाजवू लागला... भेदरलेल्या नजरेन आजुबाजूला पाहात दरवाजा वाजवत राहिला पण खुप वेळ झाला पिंकी दार उघडत नव्हती. खिडकीतून आत पाहील तस त्याच्या काळजाच पाणी पाणी झाल. स्मशानात दिसलेल ते पिशाच्च रामाच्या घरात उभ होत... त्याला पाहून रामाच्या सर्वांगावर झर्रर्रर झर्रर्रर झर्रर्र काटा येऊ लागला. इतक्यात त्याला कोणीतरी वेदनेन कण्हत असल्याचा आवाज येऊ लागला. त्याची नजर खाली गेली तसा रामान हांबरडा फोडला. पिंकी जमीनीवर रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत पडून कण्हत कण्हतच बोलत होती... " राजु......इथुन पळुन जा...... पळुन जा... " तीच्या छातीवर, मानेवर खोल जखम झालेली... रामा जोराने ओरडत, किंचाळत आजुबाजूला राजुचा वेध घेऊ लागला... इतक्यात त्याची नजर एका बाजुला भिंतीला चिकटून उभा असलेल्या राजु वर गेली... तो भीतीने थरथर कापत होता.. आपली मुल अशा अवस्थेत पाहुन रामाला वेड लागायची पाळी आली... तो जोरजोरात ओरडू लागला, दरवाजा वर लाथा, बुक्या मारून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करू लागला पण काही उपयोग होत नव्हता... आपल्या मुलाला हाक मारू लागला तस त्या काळ्या आकृतिन रामाकड पाहून विद्रुप हास्य केल आणि पुन्हा राजुकडे पाहू लागली...
" ये सोड माझ्या मुलांना....तुला पाहीजे तर माझा जिव घे......पण त्यांना सोड..." रामा जिवाच्या आकांताने ओरडत होता, रडत होता, खिडकीच्या लोखंडी सळ्यांवर डोक आपटून आपल्या मुलांच्या जीवाची भीक मागत होता... पण ते पिशाच्च तसच राजुकडे पाहात आपला हात पुढे करू लागले.. इतक्यात रामा ताडकन उठला आणि रस्त्यावर धावत सुटला... रस्त्यावर भयान काळोख होता.. रामा आजुबाजूच्या लोकांच्या घराचे दरवाजे बडवून मदत मागू लागला... पण कोणीच बाहेर येत नव्हत... खुप वेळ तो मदतीसाठी धावत राहीला पण काहीच उपयोग झाला नाही... शेवटी तो पुन्हा आपल्या घराकडे धावत सुटला... खिडकीतून पाहील तर राजुही तसाच जख्मी होऊन पडला होता... छातीवर, गळ्यावर खोल जखम झाली होती. राजुच पुर्ण शरीर झटके खात होत... त्याच्याच बाजुला पिंकी जख्मी अवस्थेत पडली होती.. आणि अशा अवस्थेतही आपल्या भावाच्या जखमा पाहून तीच्या डोळ्यातून एकसारख पाणी वहात होत... आपल्या मुलांना असे पाहून रामा किंचाळून ओरडून बेशुद्ध पडला...
" बाबा......बाबा...." रामा खाडकन जागा झाला.... सकाळ झाली होती... "पिंकी...... राजु.... तुम्ही यवस्तीत हायसा.....चला पोरांनो दवाखान्यात जाऊया...लय लागलय तुमाला.. " मुलांच्या जखमा पाहून त्याला रडू कोसळल, मुलांन घेऊन दवाखान्यात जाणार तोच पिंकीन त्याचा हात पकडला, आणि त्याला पाठीमागे पहाण्यास खुणावले तस रामान मागे फिरून पाहील तर त्याच्या घराशेजारी खुप गर्दी जमलेली... इतक्याूत एक पोलिस कॉन्स्टेबल घरातून बाहेर येऊन इन्पेक्टर समोर उभा राहीला "साहेब दोन्ही मुलांचा अमानुष खुन झालाय.. आणि रात्रि नदीकाठच्या स्मशानाजवळील रस्त्यावर सापडलेल प्रेत यांच्या वडिलांच आहे..." रामाच्या छातीवरची खोल जखम पाहून पिंकीच्या डोळयांमधे पाणी आल, हूंदका आवरत ती म्हणाली, " बाबा... तुम्ही या जगातून गेल्यावर या समाजातील पिशाच्चानी रोज माझ्या शरीराचे लचके तोडले असते किंवा संधीतर शोधत राहिले असते... म्हणून मलाही या जन्मातून मुक्त केले असेल ...बाबा..या देशात एकटी मुलगी सन्मानाने नाही जगु शकत हो.... " पिंकीचे शब्द ऐकुन रामाच्याही डोळ्यात पाणी आले रामान पिंकीचा, राजुचा हात पकडून आपल्या जवळ घेतले आणि तिघे ही शववाहिकेला पहु लागले, त्यांची निर्जीव शरीरे घेऊन ती शववाहिका दूर दूर जात होती ...........!!!
---------------
---------------
Manoj D. Chavan
स्मशानभूमीबद्दल प्रत्येक माणसाच्या मनात एक प्रकारचं गूढ आकर्षण असतं, तसंच भीतीही असते. पूर्वीच्या काळी स्मशानभूमी ही गा वाच्या बाहेर असायची. मात्र आता वाढत्या शहरीकरणामुळे स्मशानं शहरांमध्येच येऊ लागली आहेत. तरीही संध्याकाळनंतर स्मशानाच्या दिशेने जाऊ नये असं लोक सांगतात. स्मशानापासून दूर का राहावं, असा प्रश्न आजच्या तरुणांना पडणं स्वाभाविक आहे, तसंच घरातील जुने जाणते लोक असं सांगतात, तेव्हा त्यामागे काहीतरी कारणही असेलच. कारण ही नुसती अंधश्रद्धा असू शकत नाही. या मागचं कारण म्हणजे रात्रीच्या प्रहरी स्मशानामध्ये नकारात्मक शक्ती मोठ्या प्रमाणावर उत्सर्जित होत असतात. या शक्तींचा वापर वामपंथी, अघोरी वृत्तीचे लोक आपल्या फायद्यासाठी करतात. मात्र सर्वसामान्य व्यक्ती या नकारात्मक शक्तींच्या प्रभावाखाली सहज येऊ शकतात. उदास मनःस्थितीतील किंवा भावनाशील व्यक्ती या नकारात्मक शक्तींच्या प्रभावाखाली आल्यास तिचं मनःस्वास्थ्य ढळण्याची शक्यता वाढते. मनामध्ये सतत नकारात्मक आणि अशुभ विचार येऊ लागतात. यामुळे कुठल्याही चांगल्या गोष्टी घडत असताना आपल्याच हातून त्या बिघडवण्याचं कामही अशा व्यक्ती करतात. आणि यामुळे नैराश्याला सामोरं जावं लागतं. यामुळे रात्रीच्या काळात स्मशानाकडे जाणं टाळावं.