अवि तसा हट्टाकट्टा.... मजबूत बांधा, कमावलेली पिळदार शरीरयष्टी आणि त्याची उंची त्याला रुबाबदार बनवायची. एखाद्या ससपेन्स सिनेमामध्ये हिरो शोभावा असं त्याचं व्यक्तिमत्त्व आणि आवाज होता. घरच्या बेताच्या परिस्थितीमूळे त्याने शिक्षण सोडले आणि पोलिसांत भरती झाला.
"घोरपडे??"
"यस सर!"
अविने आपल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला सॅल्युट मारला आणि आदेशाची वाट पाहू लागला.
" मध्यवर्ती कारागृहाच्या कैद्यांचे रुग्णालय आहे. तिथे जनरल वार्डमध्ये तुमची ड्युटी लावतोय...नाईट ड्युटी असेल..संध्याकाळी 4 ते रात्री बारा पर्यंत... तुमचं घर तिथून जवळ आहे, म्हणून तुम्हाला देतोय..जमेल ना?"

"येस सर!"
तुमच्या नंतर बारापासून पाटील याची ड्युटी लावतोय..एकमेकांना काही अडचण आली तर मदत करा. निघा आता.."
नाही म्हणायची अविला कधीच सवय नव्हती. त्याला जोखीम पत्करायला लहानपणीपासून आवडायचं. नवीन असला तरी साहेबांच्या विशेष मर्जीतील पोलिसांमध्ये तो एक होता. त्याचा प्रामाणिकपणा सगळ्यांना आवडायचा.
आज त्याच्या कैद्यांच्या वार्डमध्ये ड्युटीचा पहिला दिवस होता. बरोबर दुपारी चार वाजता तो वार्ड मध्ये हजर झाला. साधारण एकावेळी पंचवीस रुग्ण दाखल करता येतील एवढा मोठा तो वार्ड होता...लांबच लांब एका बाजूने भिंत आणि त्याच्या विरुद्ध दिशेला खिडक्या आणि मध्ये खाटांच्या २ लांब रांगा बाजूला अविसारख्या लोकांना बसायला एक बाक होता.
उन्हाळा चालू असल्याने जास्तीत जास्त कैदी जुलाबाची, उलटयाची लागण झालेले होते. सगळे कमजोरीमूळे मलूल दिसत होते...चेहरा सुकलेले...खिन्न...एकाकी...नातेवाईकांपासून दूर...एका हॉस्पिटलच्या वार्डमध्ये खितपत पडलेले...कैदी असले म्हणजे काय झालं? ती ही माणसंच असतात...परिस्थिती त्यांना गुन्हेगार बनवत असते...पण त्यांनाही मन असेलच...जे मन दूरवर असलेल्या त्यांच्या आई, बायको, मुलांकडे जाऊन येऊन परत तुरुंगाच्या चार भिंतीत स्वतःला कोंडून घेत असेल...त्याला कैद्यांची मनातून सहानुभूती वाटत होती...
चार दिवस हॉस्पिटलमध्ये ड्युटी लागल्यापासून अविनाशला गुन्हेगारांची मानसिकता जवळून कळत होती. सुरुवातीला त्याला ही ड्युटी खूप आवडली कारण कैदी आजारी असल्याने त्यांच्यावर फार निगराणी ठेवायचं काय नव्हतं...की पळून जाण्याची रिस्क नव्हती. शिवाय एरव्ही 12 तासांच्या डे शिफ्ट ही 8 तासांची नाईट शिफ्ट कमी थकवणारी होती...पण चार पाच दिवसांनी त्याला याचा कंटाळा येऊ लागला...कैद्यांचे ते मक्ख चेहरे न्याहाळून न्याहाळून त्याला स्वतःला आता आजारी असल्याचे फीलिंग येऊ लागले.पूर्ण वेळ एकाच बाकड्यावर बसून राहायचं... फार बोअर झालं तर पेपर घेऊन वाचायचा...तेही झालं की मग पेपरमधलं शब्दकोडं सोडवत बसायचं आणि हे सगळं झालं की उगाच पाणी प्यायला वॉटरकुलर जवळ चक्कर मारायची...

सहाव्या दिवशी :
नेहमीप्रमाणे संध्याकाळी चार वाजता अवि ड्युटीवर आला, तेव्हा त्याने पाहिले की इतर कैद्यांना डिस्चार्ज मिळून त्यांची रवानगी परत सेंट्रल जेलमध्ये करण्यात आली होती...एकाच दिवशी 10-12 पेशंटला डिस्चार्ज मिळाल्याने वार्ड एकदम रिकामा दिसत होता. आता वार्ड मध्ये एकच पेशंट उरला होता...तो होता सत्तरीच्या पुढे गेलेला एक जक्ख म्हातारा कैदी... कैदी नंबर 123 ..
मरणासन्न अवस्थेत असलेला...डोळे खोल गेलेले असले तरी ते भेदक दिसत होते; कारण त्याच्या अंगावर मांस उरलेच नव्हते. हाडाचा जिवंत सापळाच जणू तो दिसत होता..शरीरावर कुठेही...इतकंच काय पार्श्वभागी देखील मांस उरले नव्हते.... त्याला इंजेक्शन, सलाईनसाठी सुई टोचवणं म्हणजे एक प्रकारचा त्याच्यावर अत्याचार करण्यासारखंच होतं... ना त्याला बोलायला त्राण उरलं होतं... ना कोणती हालचाल करायला...इतकंच काय तो डोळे देखील फिरवत नव्हता...त्याची नजर सतत त्याच्या समोर असलेल्या भिंतीवर खिळलेली होती...बुभूळांची ,पापण्यांची हालचाल बंद झाली होती...अन्न पाणी तर केव्हाच बंद झालं होतं.
गेल्या सात तासांत त्याने एकही हालचाल केली नव्हती. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाच्या मनात एकच यायचं,
"म्हातारा अजून किती दिवस असा राहणार कुणाला माहीत? असा जगण्यापेक्षा मेलेला बरा..."
गेले दोन दिवस तो म्हातारा अविला एकाच स्थितीत दिसत होता...अविलाही बघून बघून कंटाळा आला होता...पण का कुणास ठाऊक, हा मनुष्य इतर कैद्यांपेक्षा त्याला वेगळा वाटला... त्याच्याबद्दल त्याला इतर कैद्यांप्रमाणे सहानुभूती वाटत नव्हती..किंवा कीव देखील येत नव्हती...त्याचे ते भेदक डोळे या अवस्थेत देखील भीतीदायक भासत होते...

"हा माणूस नक्कीच खूप क्रूर असावा...त्याचे डोळे तर हेच सांगतात..." अविने मनात विचार केला....
रात्रीचे साडे अकरा वाजत आले होते...वार्ड मध्ये फक्त तो कैदी नं 123 , अवि आणि भयाण शांतता होती...त्या भयाण शांततेत भिंतीवरच्या घड्याळाची टिकटिक फक्त शांतता भन्ग करत होती..
अवि पेपर मध्ये डोकं घालून बसला होता..खरं तर पेपर वाचून झाला होता...पण वेळ जावा म्हणून पुन्हा बातम्यांच्या हेडलाईन डोळ्याखालून घालत होता...शिवाय त्याला आता तिथं बसणं नकोसं झालं होतं...ड्युटी चेंज व्हायची तो आतुरतेने वाट पाहत होता..
अचानक पेपरमध्ये लक्ष असताना त्याला जाणवलं की तो कैदी आपल्याकडेच पाहतो आहे....डोळयांच्या कोपऱ्यात त्याला त्याचे डोळे इकडे पाहत असलेले दिसले...अविला आश्चर्य वाटलं...कारण इतके दिवसांत त्याने पहिल्यांदाच हालचाल केली होती...त्याने कैद्याकडे पाहिले...तो अजूनही अविकडेच पाहत होता.
" आजोबा...काही हवंय का तुम्हांला? पाणी वगैरे??"
म्हाताऱ्याने काहीच होकारार्थी उत्तर दिलं नाही...अविने पाणी आणून त्याच्या तोंडाजवळ धरले पण त्याला पाणीही नको होते...
"मग काय हवं असेल?"
पण आता तिथे कोणीच नव्हतं... अविने डॉक्टरला इंफॉर्म केलं आणि तो परत जागेवर येऊन म्हणजे त्या कैद्यासमोरच्या बाकावर बसला...आता पण तो म्हातारा एकटक अविकडेच पाहत होता...ते भेदक डोळे अविच्या नजरेला नजर मिळवत होते..अविने आता चक्क त्या म्हाताऱ्यासोबत "पहिले कोण पापणी लवतं?" हा गेम खेळायला चालू केला...
प्रत्येक वेळी अविची च पापणी लवत होती...म्हातारा एकटक त्याच्याकडे पाहत होता...अविला इतका हट्टाकट्टा असूनही त्या म्हाताऱ्याची भीती वाटत होती...

घड्याळात बारा वाजत आले..एक एक मिनिट अविला एक दिवसासारखा वाटू लागला...तो दुसरा गार्ड यायची आतुरतेने वाट पाहत होता...पण तो म्हातारा त्याच्यावर ती भेदक नजर रोखुन होता..तो म्हातारा आता त्याला वेडसर वाटत होता.. काहीसा खुनशी..
अचानक...तो म्हातारा हळूहळू उठायचा प्रयत्न करू लागला..अंगात त्राण नसल्याने त्याची हालचाल हळूहळू होत होती...जणू उठून तो अविकडे यायचा प्रयत्न करत होता...
इतका वेळ शांत असलेला अवि आता चक्क हातात रायफल घेऊन उभा राहिला...काही बाका प्रसंग आला तर म्हणून त्याची रायफल तयार होती... अविच्या आयुष्यात हा असा प्रसंग प्रथमच आला होता..
अचानक तो कैदी धाडकन बेडवर कोसळला.. अवि दचकला..इतक्यात..
त्याला ड्युटीवरून रेलिव्ह करायला दुसरा गार्ड आला...अविच्या जीवात जीव आला...त्याने घाईघाईने आपली रायफल त्याच्या हवाली केली आणि वार्डबाहेर पडला...

आज त्याला कधी एकदा घरी जातो आणि झोपतो असं झालं होतं..घर जवळच असल्याने अवि चालत चालतच जात होता...रस्त्यावर रात्रीची कुत्री भुंकत होती...झाडांच्या पानांची वाऱ्याने हालचाल होती...रात्री एकटं घरी जाणं अविच्या सवयीत होतं... त्यामुळं त्याला त्याचं फारसं काही वाटायचं नाही...
आता अवि त्याच्या घराच्या गल्लीपाशी येऊन पोचला...गल्ली लांबच लांब अरूंद होती...त्याचे घर अगदी शेवटच्या टोकाला...घराच्या समोर दिवा मिणमिणता लावलेला असायचा..गल्लीच्या तोंडापासून ते घर दिव्यामुळे त्याला सहज दिसायचं...बाकी लोक रात्री दिवे बंद करून झोपायचे...अविची आई मात्र तो येणार म्हणून दिवा चालू ठेवायची.
गल्लीच्या तोंडाशी आल्यावर त्याने पोलिसी खाक्यात गल्लीत दूरवर घरापर्यंत नजर टाकली...गल्लीत कोणीच नव्हतं. रस्ता निर्मनुष्य दिसत होता.ही त्याची सवयच होती...कारण आजकाल चोरांचा सुळसुळाट वाढला होता...
तो एक एक पाऊल झपझप टाकत चालला होता..
अचानक ...गल्लीच्या अर्ध्यात आल्यावर समोर त्याला एक मानवी आकृती दिसली...ती हळूहळू चालत होती...अविने ओळखले...हा चोर असावा...कारण आधी पाहिलं तेव्हा रस्त्यावर कोणीच नव्हतं... म्हणजे हा चोर लपून बसला होता आणि आता अचानक बाहेर येऊन त्याचा चोरी करायचा इरादा असेल...अविने ठरवलं...या चोराला आता पकडायचंच...एकटा असला तरी....

तो दबक्या पावलात त्या माणसाचा पाठलाग करत त्याच्या जवळ पोचला...तो चोर वाकत वाकत हळूहळू चालत होता...अविने त्याला लगेच गाठले आणि त्याला समांतरपणे उभा राहिला...तो माणूस आता अवीच्या उजव्या बाजूला होता...
कोण आहे, हे पाहायला त्याने मान उजवीकडे फिरविली... आणि त्याला धक्काच बसला...डोळ्यांवर विश्वास बसेना...तेच भेदक डोळे...तो कैदी नं 123 होता!
अविच्या पायाखालची जमीन सरकली...जो माणूस मरणासन्न अवस्थेत आता हॉस्पिटलमध्ये पाहिला होता...तो अविच्या आधी तिथे कसा आला? का आला?
अविची भीतीने गाळण उडाली...पोलीस असूनही तो घाबरून पळू लागला... त्याने मागे पाहिले तर तो म्हातारा त्याच्या मागे मागेच येत होता...अवि आणखी घाबरला...त्याने पटकन घर गाठले आणि दरवाजा अक्षरशः तुटेपर्यंत वाजवू लागला...दरवाजा लगेच आईने उघडला...ती झोपेत होती...अवि सर्रकन घरात शिरला आणि त्याने दरवाजा ताबडतोब बंद केला...
त्याच्या काळजाची धडधड वाढली होती...शरीरावर घाम आला होता...तोंडाला कोरड पडली होती...आईला सांगून त्याला तिला त्रास द्यावा वाटला नाही...तो लगेच आपल्या झोपायच्या खोलीत शिरला...ती खोली रस्त्याच्या बाजूला होती...खिडकीतून रस्ता दिसत होता...खिडकी उघडीच दिसत होती...ती लावायला म्हणून अवि खिडकीजवळ गेला...बाहेर पाहतो...तर तो म्हातारा खिडकीबाहेर उभा होता....तीच भेदक नजर...तोच चेहरा...अविची भीतीने गाळण उडाली...त्याने खिडकी धाडकन लावून घेतली..तो इथे का आला असेल, या विचाराने त्याच्या डोक्यात थैमान घातले होते...त्याचं डोकं चालत नव्हतं...झोपही येत नव्हती...

बाहेर तो म्हातारा कण्हत होता...रडत होता...विव्हळत होता...पण अवि बाहेर गेला नाही...त्याला प्रचंड भीती वाटत होती...भीतीने काळीज बाहेर येते की काय इतक्या जोरात ह्रदय धडधडत होतं... पंधरा वीस मिनिटे झाली आणि त्या म्हाताऱ्याच्या विव्हळण्याचे, कण्हण्याचे आवाज बंद झाले...
नंतर अविच्या लक्षात आले,
"अरे, आपण त्या गार्डला हॉस्पिटलमध्ये फोन करून विचारू शकतो की म्हातारा इथे कसा काय? इतका वेळ भीतीने आपल्या लक्षात आलंच नाही!"
त्याने आपला मोबाईल हातात घेतला. मोबाईल मध्ये घड्याळात एक वाजला होता. एक ...स्क्रिन ऑन केली तर एक मेसेज फ्लॅश झाला.. त्याला गार्डचाच मेसेज आला होता..मेसेज 12:25 लाच आला होता.

" अरे, अविनाश...उद्या ड्युटीवर येऊ नको... सुट्टी घे...तू इथुन गेल्यानंतर लगेच तो म्हातारा कैदी, कैदी नं.123 मेला...मी पण सुट्टी घेतोय...घरी जातोय... परवा दिवशी आपण त्या म्हाताऱ्याचं डेथ सर्टिफिकेट साहेबांना देऊ.."
अविला आणखी एकदा झटका बसला...12 वाजता मेलेला तो कैदी इतका वेळ त्याच्या घराबाहेर कण्हत होता...
आज पहिल्यांदा त्याचा सामना एका भुताशी झाला होता...तो बेशुद्ध पडला.
दुसऱ्या दिवशी जेव्हा आईने त्याला उठवले तेव्हा त्याला फणफणून ताप आला होता.....
© ऋतुजा विशाल.