ब्ल्यू साडी... Part 1..
©️ श्रद्धा भट...
"प्यार की राह में चलना सिख.... इष्क के राह में जलना सिख.... "
Imperior blue ची ad डोकयात वाजत होती...
"साला काय जिंदगी आहे...?? अजून life मध्ये कोणी भेटत नाही.. "
मी माझ्या तुंदील तनुला सांभाळत लिफ्टच्या लाईन मध्ये उभा होतो.... आणि इतक्यात ती दिसली..
ब्लू कलर शिफॉन साडी, पिंगट कुरळे केस, केसात अडकवलेली छोटीशी diamond पिन, उजव्या खांद्यावर स्लिंग बॅग.. मार डाला !!!!....लिफ्ट आली तसं इतरांना डावलून मी तिच्या मागोमाग लिफ्ट मध्ये शिरलो.. बाजूला ती उभी, तिने मारलेला मंद परफ्यूम सगळीकडे दरवळत होता..
आई टी हब.... मोठी काचेची चकचकीत इमारत !!सारा स्टाफ educated आणि Sofisticated !!! कोणीही विनाकारण दुसऱ्यासाठी वेळ न देणारा....
माझी मोठीच पंचायत झाली... कसं बोलणार??
एका सेकंदात लिफ्ट 10व्या मजल्यावर येऊन थांबली. "ती ब्ल्यू साडी "मंद स्माईल देत बाहेर पडली..

"दिलके तुकडे.. तुकडे करके मुस्कारकें चल दिये "उगाच गाण्याच्या ओळी ओठांवर आल्या... त्याच नशेत 12व्या मजल्यावर, माझ्या ऑफिसला येऊन पोहचलो..
त्या दिवशी काही कारण नसता देखील मी दोन -तीन वेळा 10व्या मजल्यावर डोकावलो पण "ती "काही दिसली नाही.... सुजय... माझा जिगरी दोस्त म्हणाला देखील....
"अमित.... कुछ तो गडबड हैं !!""लेका एरव्ही एका डेस्क वरून दुसरीकडे जायला देखील तुला वेळ नसतो... सांगा महाशय.... कुठं पाणी मुरतंय????
पण मीही वस्ताद त्याला बिलकुल दाद लागू दिली नाही..
सुजय.. !! माझा नवीन मित्र.. दिसायला देखणा, उंचापुरा, घारे पण भेदक डोळे...ऑफिस मध्ये सहा महिन्यापूर्वी लागला होता...अगदी मनकवडा!! आमची खूप छान मैत्री झाली होती... माझ्या सगळ्या आवडी निवडी त्याला ठाऊक होत्या पण पठ्या स्वतः बद्दल मात्र काहीच सांगत नव्हता... का कोणास ठाऊक??" त्या ब्ल्यू साडी "च गुपित मीही त्याच्या पासून लपवून ठेवलं..असे दोन- तीन दिवस निघून गेले...
दोन दिवसांनी ती पुन्हा दिसली...!! आजही ती लिफ्ट पाशीच दिसली... छान दिसत होती... पुन्हा मन बेचैन झालं... आजही ती ब्ल्यू साडीत होती... !!काही करून आज ओळख करून घ्यायची असं ठरवलं... लिफ्ट मध्ये बोलण्याचा प्रयत्नहि केला पण तिने दाद दिली नाही काहीसं हिरमुसलं होऊन मी आजूबाजूला पाहिलं... लिफ्ट मध्ये असलेले सारेच माझ्याकडे आश्चर्याने पाहत होते.. त्यात सुजय ही होता.. !! मी थोडंसं दुर्लक्षच केलं त्याच्या कडे !!उगाच माझा पत्ता कट व्हायचा... !!!
मी तिच्या पाठोपाठ लिफ्टच्या बाहेर पडलो... पण नेमकं काय झालं माहित नाही.... तिची आणि माझी चुकामूक झाली... सगळीकडे फिरलो पण ती काही दिसली नाही.. अपसेट होऊन मी माझ्या ऑफिस मध्ये परतलो...
सारे माझी वाटच पाहत होते.. स्स्स्सला सुजय !!ही आग त्यानेच लावली असणार???
"अमित... असं मध्येच का निघून गेलास?? कोठे होतास तू आणि काय दशा करून घेतली आहेस ही??? त्यानं असं पाहताच मी चमकून स्वतः कडे पाहिलं...
माझा पांढरा शर्ट रक्ताने माखला होता.. चेहऱ्यावर सुद्धा ओरखडे होते.. मानेला छोटी जखम झाली होती आणि आता ती फारच दुखत होती.. माझ्या हातातील बॅग चा पट्टा तुटून खाली पडणार होता... !!! हे सारं नेमकं काय झालंय, मला काहीच कळत नव्हतं..
अमित... अमित... काय होतंय तुला??? Are you alright?? सुजय मला विचारत होता
आणि कोणाला एव्हढं निरखून पाहत होता? लिफ्ट मध्ये तर तू, मी, सदा मुळीक आणि 14व्या floor चा थोडा स्टाफ एव्हढेच होतो..?? सगळे तुलाच बघत होते.. तू कोणाला smile देत होतास??
Thank God... म्हणजे सुजयने तिला पाहिले नव्हतं तर !!
मला तरीही हायसं वाटलं.. मी शांत बसून राहिलो. मनात
मात्र !! हे कधी झाले याचा विचार करीत होतो...मी फक्त 10मिनिटं घालवली असतील... पण सुजय तर म्हणत होता मी जवळ जवळ दोन तासांनी परतलो होतो...!!

क्रमशः