कथेचे नाव :- अतृप्त इच्छा
ही कथा मला माझ्या नातेवाईक ने सांगितली आहे. त्यांच्या गावात घडलेली एक सत्यघटना.
ही घटना घडून खूप वर्ष झाली.
पण आजही ती घटना ताजी आहे.
एप्रिल महिना संपत आला होता.मे महिन्याची चाहूल लागली होती.
झाडावर आंबे ,फणस,काजू,बदाम,
करवंदे यांनी झाडे फुलून गेली होती.
एव्हाना शाळेतील मुलांच्या परीक्षा पण संपल्या होत्या.
सगळी गावातील मूल आता दंगामस्ती करण्यात दिवस घालवत होते.
शेतावर जाणे,कच्च्या कैऱ्या जमवणे,पाण्याच्या हौदात, किंवा नदीवर पोहणे. मस्ती करणे हा सगळ्यांनाच नित्यक्रम च होता.
अशातच एका गावात जोशी काकांच एक श्रीमंत कुटुंब राहत होते.घरात सगळ्या सुख सोयी होत्या.कसलीच कमतरता नव्हती. त्या घरात जोशी काका त्यांच्या पत्नी,आणि 4 मुलगे सुना नातवंडे असा मोठा परिवार एकत्र सुखाने राहत होता.जोशी काकांनी खूप नावलौकिक कमावला होता.सगळे जण त्यांचा आदर करत असत.गावात त्यांना लोक खूप मानत असत.
जोशी काकांची सगळ्यात लहान काव्या नावाची नात होती. जेमतेम 4 वर्षाची होती.
लहान असल्याने तिला इतर भावंडासोबत बाहेर जाऊ देत नसत.त्यामुळे ती घरीच खेळत असायची.
असच एकदा दुपारच्या वेळेला सगळे जेऊन वर माळ्यावर बसले होते तर छोटी काव्या.शेतातून आणलेल्या कैऱ्या खात एकटीच अंगणात बसली होती.हे कुणाच्या च लक्षात आलं नाही.दुपारी जेऊन सगळे आराम करत असत पण त्या दिवशी काव्या झोपली नव्हती.सगळे झोपले तशी ही अंगणात येऊन बसली कच्ची कैरी खात.
भर दुपारची वेळ होती.काव्या कैऱ्या खाण्यात गुंतली होती. त्या वेळी त्यांच्याच गावातील एक बाई काव्याच्या घरासमोरून जात होती. तिने काव्याला कैऱ्या खाताना पाहून तिलाही कैऱ्या खायचा मोह आवरता आला नाही. तिने आजूबाजूला पाहिलं सगळीकडे दुपारची भयाण शांतता पसरली होती. कोणी चिटपाखरूही नव्हतं.ही संधी साधून ती बाई काव्याच्या समोर जाऊन उभी राहिली.पण काव्या कैऱ्या खाण्यात इतकी मग्न होती की तिला आपल्या बाजूला कोणी आलंय याची कल्पनाही त्या चिमुकल्या जीवाला नव्हती.त्या बाईने हळूच काव्याला हाक मारली. तशी काव्या घाबरली आणि वर बघू लागली तिने त्या बाईला पाहिलं आणि घाबरली.तिला अस घाबरलेल बघून ती बाई बोलली,बाळा घाबरू नकोस,तू कैरी खातेस ना त्यातील थोडी मलाही दे ना,मला खूप आवडतात.
तशी काव्या काही न बोलता गप बसली.
परत ती बाई बोलली की ,बाळा दे ना मला कैऱ्या खायला.
तशी काव्या तिला बोलली मी नाही देणार जा.
कारण त्यांच्या घरात शेतातून कैऱ्या आणल्या की आधी तिची आई ,आजी बाजूच्या घरात वाटत असत. घरात काही पदार्थ केला तरीही बाजूच्या घरी पाठवत असत. कारण गावाची रीत तशी होती .काही आणलं शेतातून तर बाजुच्या घरात द्यायची.त्यामुळे काव्या च्या आजी ने आणि आई ने शेजारच्या घरात ही कैऱ्या दिल्या होत्या.त्या बाईला ही दिल्या होत्या पण ती अजून कैऱ्या काव्या जवळ मागत होती. पण काव्या तिला नाही देणार म्हणून सांगते.जर या बाईला कैऱ्या दिल्या तर आई ओरडले या भीतीने काव्या तिला कैऱ्या देत नाही.
इतका वेळ मागून सुध्दा काव्या कैऱ्या देत नाही हे बघून त्या बाई ला राग ला आला. आणि रागाने निघून जाते.आणि जाता जाता ती काव्याला बोलून जाते बघतेच तुला मी.
आपण कैऱ्या दिल्या नाही म्हणून ती बाई रागाने गेली हे काव्याला समजत पण आता पुढे जीवघेण संकट तिची वाट बघत आहे याची त्या चिमुकल्या जीवाला कल्पना नव्हती.ती परत कैऱ्या खाण्यात गुंग झाली.

काही दिवस चांगले गेले.
पण एक दिवस ती बाई कोणत्या तरी आजाराने मरण पावते.
ती बाई मरून तिच्यावर अंत्यसंस्कार झाले आणि इकडे काव्याला त्रास होऊ लागला सुरुवातीला तिला ताप आला.
नंतर अंग जड जड वाटू लागले, नंतर हळू हळू सगळया अंगाला सूज येऊ लागली. सगळी बॉडी सुजून फुगली. खूप असह्य वेदना त्या चिमुकल्या जीवाला होऊ लागल्या. वेदना सहन करण्यापलीकडे असल्याने काव्या बेशुद्ध होती.

डोळेही बंद होते.शुद्धीवर आली तर डोळे उघडता येत नव्हते.शरीर सुकून गेलं होतं,पूर्ण निस्तेज पडली होती काव्या.तिला अस पडलेलं बघून सगळ्यांना च काळजी वाटत होती. कालपर्यंत हसणारी खेळणारी काव्या अचानक अशी कशी झाली?काय झालं असेल नक्की?अशा अनेक विचारांनी घरचे हादरून गेले होते.
घरातील सगळे गडी माणसे विचार करत अचानक काय झालं?घरात कोणालाच अन्न पाणी गोड लागत नव्हते,की कशात मन लागत नव्हते सगळे काव्याच्या टेंशन मध्ये होते.
काव्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली होती.अनेक डॉक्टर झाले मोठं मोठे वैद्य झाले.पण कशाने च फरक पडत नव्हता.काव्या जागची हलत सुद्धा नव्हती.तिची अशी अवस्था बघून तिची आई तर पूर्ण तुटून गेली होती, आईची ही तब्येत खालावली होती.कोणालाच कळत नव्हते काय करू ते,असे काही दिवस गेले खूप उपचार करून पण गुण येत नाही हे बघून काव्या जिवंत राहील की नाही कोणालाच समजत नव्हतं. हे सगळं बघून गावातील एक माणूस बोलला जोशी काकांना की जे साधंसूध प्रकरण दिसत नाही आहे यावर औषधाचा काही परिणाम होणार नाही.दुसऱ्या गावात एक बाबा राहतो त्याला आणा तो सगळं बघेल,आता परिस्तिथी हाताबाहेर जातेय लवकर घाई करा, त्या माणसाच्या सांगण्यावरून जोशी काकांनी घरातील गडी बैलगाडी घेऊन त्या बाबाला आणायला पाठवलं. गडी जाऊन त्या बाबाला घेऊन आला,जोशी काकांनी त्याला सगळी हकीकत सांगितली. आणि माझ्या नातीला वाचवा असे आर्जव करु लागले. आणि ते बाबाला घेऊन काव्या च्या खोलीत गेले,काव्याला बघून तो बाबा क्षणभर घाबरला.आणि काही तरी मंत्र म्हणत एक हात कपाळावर ठेवला व डोळे बंद करून ध्यान लावून बसला.त्यांना ध्यानात सगळी घटना दिसली. थोड्या वेळात त्यांनी डोळे उघडले आणि जोशी काकांना सांगितले,की काही दिवसांपूर्वी गावात एका बाईचा मृत्यु झाला आहे.ती बाई काही दिवसांपूर्वी म्हणजे मरण्याआधी तुमच्या इथे आली होती, तुमची नात तेव्हा कैऱ्या खात होती,त्या बाईने हिला कैऱ्या मागितल्या पण हिने दिल्या नाहीत म्हणून तिला राग आला आहे रागाने ती निघून गेली तिला कैऱ्या हव्या आहेत, तिची कैऱ्या खायची ईच्छा अतृप्त राहिलीय.आज काहीही करून कैऱ्या मुलींच्या अंगावरून फिरवून बाहेर झाडाखाली फेकून द्या, नाहीतर पोरीचा जीव जाईल आणि मी हा अंगारा देतो तो तिच्या अंगावरून कैऱ्या फिरवून टाकल्यावर तो अंगारा तिच्या कपाळाला लावा आणि जेव्हा डोळे उघडेल तेव्हा पाण्यात टाकून थोडा अंगारा पाजा.असे सांगून तो बाबा निघून गेला. हे सगळं ऐकून घरातील सगळेच घाबरले आणि मग जोशी काकांनी वेळ न घालवता बाबांनी सांगितल्या प्रमाणे सगळे विधी केले .आणि थोड्या वेळाने अंगारा काव्याच्या कपाळाला लावला.तशी हळू हळू तिच्या शरीराची हालचाल होऊ लागली.तोंड उघडायचा प्रयत्न करु लागली. तेव्हा तिला पाण्यातुन पाजला.
नंतर हळूहळू काव्या पूर्ण शुद्धीवर येऊन हालचाल करू लागली, काही दिवसांत तिला फरक पडला.आणि पूर्णपणे बरी होऊन पहिल्या सारखी खेळू लागली.आता तिला कसलाच त्रास होत नाही.आता ती ही खुप मोठी झालीय.स्वतःच्या आयुष्यात सुखी आहे.
समाप्त...🙏