काळरात्र -marathi bhutachi katha |
" काळरात्र "
हि कथा माझ्या पत्नीने मला सांगितलेली आहे.म्हणजे आमच्या लग्ना-पूर्वीची हि गोष्ट आहे. तेव्हा तिची मावशी नुकतीच बाळंत झाली होती. आणि तिला मुलगी झाली होती.तेव्हा ते मुंबईतील चेंबूर मध्ये मैत्री पार्क येथे सिद्धार्थनगर मध्ये भाडेतत्वावर चाळीमध्ये राहायला होते. चाळींची रचना काही समांतर अंतर ठेऊन समोरासमोरच होती. चाळ असल्यामुळे सार्वजनिक शौचालय होते. स्त्रीयांसाठी वेगळे आणि पुरुषांकरिता वेगळे होते. माझ्या पत्नीने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. म्हणून तिला मावशीची आणि तिच्या बाळाची देखभाल करण्याकरिता गावाकडून मुंबईला आणले गेले. तेव्हा मुंबईतील सगळं माझ्या पत्नीसाठी नवीनच होतं.बाळ मोठं गोंडस होतं. महिन्याभरातच त्याला चांगलं बाळसं धरलं. जावळही त्याला भरपूर होतं.
बाळंत झालेल्या बाईला म्हणे पाया सूप करून दिल्याने तीची बाळंतपणातील झीज भरून निघते असं म्हणतात. म्हणून त्या दिवशी तिच्या काकांनी सकाळीच पायाचे मटण आणले होते. काकांना सेकंड शीप होती. म्हणून दुपारनंतर काका कामावर गेले. ते रात्रीच घरी येणार होते. त्या दिवशी शनिवार होता. साधारणपणे संध्याकाळच्या ७ - ८ ची वेळ होती. बाळ पाईपला बांधलेल्या पाळण्यात शांतपणे झोपलं होतं. मावशीने मटण स्वच्छ करायला घेतले. मटण साफ केल्यावर तिला शौचाला जावेसे वाटले. ओली बाळंतीण असल्यामुळे डोळ्यात काजल घातलेले. त्यात अंगाला मटणाचा वास लागलेला अशा अवस्थेत ती साधारणपणे रात्री ९ च्या सुमारास शौचास गेली. जाताना ती व्यवस्थित होती पण आल्यावर मात्र तिच्यामध्ये काहीतरी बदल झालेला माझ्या पत्नीच्या लक्षात आले. पण ती कुणाशी काही बोलली नाही. गप्प - गप्पच होती. रात्रीची जेवणं आटोपली . माझी पत्नी बाहेरील खोलीत बाळाच्या पाळण्याला झोका देत बसली होती. बाहेरील खोलीत त्या वेळेस माझी पत्नी आणि बाळ दोघेच होते. तोच तिचं लक्ष समोरच्या चाळीतील खिडकीतून दिसणाऱ्या शौचालयाकडे गेले. आणि तिकडून एक आकृती हवेतच उडत त्यांच्याकडे येताना दिसली. माझ्या पत्नीला हे पाहून दरदरून घाम फुटला. ती आकृती एका स्त्री पिशाच्चाची होती. धडापासून वरचा भाग हवेत तरंगत होता. चेहरा जळाल्यासारखा भयंकर विकृत दिसत होता. ती आकृती वेगाने घरात आली आणि बाळाच्या पाळण्याभोवती तरंगत वर फिरू लागली. आणि बाळाकडे बघून जोरजोराने विकृत हसू लागली. माझ्या पत्नीला हे सर्व दिसत होते पण तोंडातून आवाजच फुटत नव्हता. कमरेखालुन हात पाय गळल्यासारखी अवस्था झाली. ती तिच्या मावशी - काकाला हाक मारू पाहत होती. पण तिच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. शेवटी बाजूलाच पडलेल्या पर्सकडे तिची नजर गेली. गावी तिची एक मावशी राहते. तिने तिला एक मंतरलेले लिंबू रक्षणासाठी ठेवायला दिले होते. तिने पर्स मधून ते लिंबू बाहेर काढताच ते पिशाच्च जोराने किंकाळून बाहेर निघून गेलं. आणि त्या क्षणी बाळ दचकून जागं झालं. आणि मोठ्याने रडायला लागलं. माझी पत्नी सुद्धा रडायला लागली.
या दोघांचे रडणे ऐकून काका आणि मावशी दोघे धावतच बाहेर आले. आणि माझ्या पत्नीला रडायला काय झालं म्हणून विचारू लागले. माझी पत्नी भीतीने थरथर कापत होती. तोंडातून शब्द फुटत नव्हता. बऱ्याच वेळाने तिने घडला प्रकार काका - मावशीला सांगितला. ते देखील घाबरून गेले. काकांनी खंडोबाचा भंडारा घरभर फेकला. आणि भितभितच त्या रात्री ते सगळे झोपी गेले. माझी पत्नी ते लिंबू जवळ घेऊनच झोपली. पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा जाग आली. तेव्हा जे घडू नये ते घडलं होतं. बाळ निपचित पडलं होतं. त्याच्या सर्व हालचाली थांबल्या होत्या. ते रात्रीचं पिशाच्च रात्रीच बाळाला त्याच्यासोबत घेऊन गेलं होतं .
अनेकांना या पिशाच्चाचा अनुभव आलेला होता. कुण्या एका बाईने गरोदर असताना नवऱ्याशी भांडण झाले म्हणून शौचालयात जाळून घेऊन आत्महत्या केली होती म्हणे. तिचंच पिशाच्च अशाप्रकारे त्रास देतं असं लोकं म्हणत होती. पण आता वेळ निघून गेली होती. या दुर्दैवी घटनेनंतर तिच्या मावशीने ते घर सोडले. आणि माझी पत्नी देखील महिन्या दीड महिन्याने परत आपल्या घरी निघून गेली.