सायको भाग दुसरा
पहिल्या भागाची लिंक👇👇👇
प्रकाशचे डोळे उघडले....तो एका आलिशान खोलीत होता.....त्याची नजर चौफेर फिरत होती....तो स्वतःला चाचपू लागला कारण त्या जंगलात आपल्या छातीवर एक मोठ्ठा आघात झाला होता आणि तिथेच आपण बेशुद्ध झालो होतो इतकंच त्याला माहित होतं.....प्रकाशने आपला फोन चेक केला
"बापरे....6 तास मी बेशुद्ध होतो"
तो बेड वरून उठू लागला....अचानक दरवाजा उघडला गेला.....तो प्रकाशकडे बघून हसला
"स्मिथ वेलेरियस"
प्रकाशला काही कळेना त्याने त्याला प्रतिप्रश्न केला
काय?? मी काही समजलो नाही
तसे त्याने मागे लपवलेले एक जुने चित्र त्याच्या समोर ठेवले....चित्र तसे खूप जुने वाटत होते....त्यात एक माणूस जो एका दगडावर बसला होता....त्यांच्या अंगावर अनेक नाग होते.....काही नाग त्याला दंश करत होते पण त्याच्या चेहऱ्यावरील हास्य काहीतरी वेगळंच सांगत होते.....चेहऱ्यावरचे हास्य त्यातही एक वेगळाच क्रूर भाव होता.....चित्रकाराने तो बरोबर रेखाटला होता.....त्याच्या हाताची मुद्रा आकाशाकडे होती आणि चित्रकाराने आकाशात सैतान दाखवला होता...जणू काही सैतानाकडे जाण्याचा मार्ग तो सुचवत होता....त्याने त्या चित्रासमोर आपली मान झुकवली आणि म्हणाला
"हे आहेत स्मिथ वेलेरियस पंधराव्या शतकातील महान सैतानाचे उपासक.....ज्यानी दैववादी लोकांचा पराभव करून सैतानी राज्य आणण्यासाठी प्रयत्न केले होते....पण
जाऊ दे तो इतिहास....पण महत्वाची गोष्ट अशी की....तुझ्या इच्छेनुसार आणि तुझ्या संमतीने स्मिथ वेलेरियस यांनी तुझ्या अंगात जागा घेतली आहे....."
जाऊ दे तो इतिहास....पण महत्वाची गोष्ट अशी की....तुझ्या इच्छेनुसार आणि तुझ्या संमतीने स्मिथ वेलेरियस यांनी तुझ्या अंगात जागा घेतली आहे....."
हे ऐकून प्रकाश ताडकन उठून उभा राहिला
"क....क....काय.....माझ्या अंगात....."
तसा त्याने लगेच प्रकाशचा खांदा दाबला आणि त्याला खाली बसवले
"घाबरू नको प्रकाश.....अरे सैतानाचे एक प्रसिद्ध उपासक होते स्मिथ वेलेरियस.....आणि हो सैतानी नियमानुसार जर एखाद्या पिशाच्याने एखाद्याचा देह काही काळ वापरायला घेतला तर त्याला किंवा दुसऱ्याला इजा करता येत नाही....अरे तू औषधाचा विचार कर साईड इफेक्टस ची चिंता सोड.....हे औषध तुला ताकतवान बनवेल....तुझ्या क्षेत्रात तू यशस्वी होशील....इतका की तुला कुणीही मागे टाकू शकणार नाही.....ह्या यशाच्या बदल्यात स्मिथ वेलेरियस यांना 4 तास दिलं तर काय बिघडलं.....ह्या 4 तासात ते आपली साधना करतील आणि बाहेर पडतील....पण विचार कर त्यानंतर रोज एक पुस्तक आणि....एक नवीन उपाधी......"लेखक प्रकाश"
भोवताली फिरून त्याचे ते शब्दाचे जाळे...आणि त्या जाळ्यात प्रकाश बरोबर अडकत होता....एक वेगळंच विश्व त्याची वाट बघत होतं.....
"ठीक आहे.....ठीक आहे मी तयार आहे.....मला महान भयकथा लेखक बनायचं आहे त्यासाठी मी काहीही करायला तयार होतो आणि आहे......धन्यवाद तुम्ही माझी मदत केली.…...बाय द वे...तुमचं नाव काय??"
तो हसला आणि म्हणाला
"माझं नाव अस आहे की जे घेऊ नये म्हणतात.....आणि हो धन्यवाद तर तुझे मानायला हवेत कारण 400 वर्ष स्मिथ वेलेरियस यांना कुठलंही रक्त जागृत करू शकले नाही पण आज.....अरे सैतानी कथा लिहताना सैतानाची मदत घ्यावी लागते....."
प्रकाशने त्याचे धन्यवाद मानले आणि घरी आला.....एक वेगळ्याच उत्साहात तो होता....पण ते 4 तास??.....काही वेळ विचार केल्यावर त्याने आपल्या बायकोला आणि मुलीला लगेच काही दिवस माहेरी पाठवलं.....पहिली रात्र....तो झोपी गेला....सकाळी उठला तर सगळं अगदी सुस्थितीत होत त्याने आपले शरीर चाचपले सगळं अगदी व्यवस्तीत होते.....काही विचार करून त्याने डोळे मिटले आणि मनात विचार केला
"मला एक चांगली स्टोरी लिहून हवी आहे"
त्याचे डोळे उघडले तेव्हा त्याची खोली थोडी अस्ताव्यस्त झाली होती.....समोर बघितलं तर एक वही आणि पेन होतं.....त्याने ती वही उघडली त्यावर विचित्र भाषेत काही शब्द लिहले होते.....खाली सुंदर मराठी भाषेत काहीतरी लिहलं होतं.....प्रकाश ते वाचू लागला......त्याची बुबुळे त्या प्रत्येक ओळीवरून फिरत होती....प्रत्येक ओळ वेगळी आणि एका वेगळ्याच दुनियेत नेणारी......वाचता वाचता त्यांच्या अंगावर काटे आले इतकी रोमहर्षक कथा त्याने आपल्या आयुष्यात पहिल्यांदा वाचली होती.....तो आनंदित झाला आणि डोळे झाकून स्मित वेलेरियस चे आभार मानले.....पण डोळे मिटले असताना त्याच्या कानात आवाज घुमला
"ह्या कथेचे पुस्तक बनव खूप यश मिळेल तुला....पण एक महत्वाची गोष्ट....कथा लिहताना मी जो वरती मंत्र लिहला आहे ना तो जश्याचा तसा त्या पुस्तकात आला पाहिजे मगच तुला यश मिळेल....आणि ज्या दिवशी तू मला माझ्या साधनेला वेळ दिलास तर दुसऱ्या दिवशी लगेच मी तुला ह्या पेक्षा चांगली कथा देईन"
प्रकाशने आनंदाने मान डोलवली आणि त्याने त्वरित एक संपादक ऑफिस गाठलं.....ती कथा वाचून तो संपादक उडालाच
"ओह्हह माय गॉड....मिस्टर प्रकाश काय कथा लिहली तुम्ही....आय एम शॉकड.....काय बोलू सुचतच नाही....हे पुस्तक बाजारात आले तर आग लावेल आग....हे....हे घ्या सायनिंग रक्कम....5 लाख आहेत.....पुढे अजून देऊ.....अश्या कथा असतील तर आमचं प्रकाशन आणि तुम्ही कुठल्या कुठे पोहचू"
प्रकाश तो चेक न्याहळत होता 5 लाख ही रक्कम आयुष्यात पहिल्यांदाच त्याच्या हातात पडणार होती
"साहेब.....माझ्याकडे अश्या खूप आयडिया आहेत....आणि असा मोबदला मिळत असेल तर"
संपादक साहेब खुर्चीवर उठले
"प्रकाश राव.....लिहा आता....आम्ही छापू.....अशी प्रतिभा असेल तर मग तयार रहा.....प्रसिद्धीसाठी"
प्रकाश खुश होता.....फेसबुकच्या आभासी दुनियेतून निघून तो आता पुस्तकी दुनियेत आला होता.....पुस्तक प्रकाशित झालं.... सुरवातीला अल्प असलेला प्रतिसाद अचानक वाढू लागला......"के प्रकाश" हे नाव अचानक गाजू लागलं......प्रकाशाच्या पहिल्याच पुस्तकाची मागणी वाढू लागली.....संपादकांची धावपळ उडाली होती प्रकाशचे पुस्तक गाजत होते.....बायको सोडून इतर कुणाचेही फोन कॉल न येणाऱ्या प्रकाशचा फोन पाच पाच मिनिटाला खनानत होता....."तुमचं पुस्तक आवडलं.....पुढे लिहा ना..." असे शब्द त्याच्या कानावर पडत होते....एरव्ही फक्त तारीफ वाचणारा प्रकाश आज तारीफ ऐकून सातव्या अस्मानात होता....लोक अगदी वेड्यासारखे त्याच्या स्टोरी वाचू लागले.....त्याचे यश आणि यशमागचे कारण......पण त्या यशामागे प्रत्येक एका पुस्तकामागे एक बळी होता ह्या सत्यापासून प्रकाश दुर होता....त्याने म्हणजे त्याच्या आतील सैतानाने लिहलेली प्रत्येक ओळ ही गरीब लोकांच्या रक्ताने लिहलेली होती....प्रकाश रात्रीचे 4 तास आपल्या आतील सैतानाला देत होता...आणि ह्या 4 तासात तो सैतान शिकारीला निघायचा रस्त्यात झोपलेले भिकारी,नाईट शिफ्ट करून येणारे कामगार आतापर्यंत त्याने 6 लोकांची बळी दिली होती......प्रत्येकाचे बोट कापणे आणि त्या बोटाने भिंतीवर वेगवेगळ्या आकृत्या काढणे आणि त्याला तडपवून मारून टाकणे हे नेहमीचे बनले होते.....शहराच्या विविध ठिकाणच्या भिंती लालभडक रक्ताने रंगल्या होत्या....शहरात भीतीचे वातावरण होते "कुणीतरी "सायको" किलर फिरत आहे ह्या भीतीने रात्री 9 नंतर रस्ते ओस पडत होते.....सायको ची धास्ती पोलिसांना सुद्धा होती....पोलीसांची गस्त वाढत होती.....
तिकडे लागोपाठ 6 पुस्तके लिहून "के प्रकाश" प्रसिद्ध झाला होता....इतका की त्याचे इंटरव्ह्यू घेतले जाऊ लागले......लोकांनी त्याच्या कथा इतक्या डोक्यावर घेतल्या होत्या की छपाईपूर्वीच बुकिंग होत होते....मोबाईल च्या जमान्यात पुस्तकांबद्दलचे हे वेड बघून भल्याभल्या लेखकांनी तोंडात बोटे घातली होती....ते ही भुतांच्या गोष्टीची पुस्तके....प्रकाशच्या लेखनात एक वेगळीच जादू होती प्रत्येक शब्द जादुई...वाचकाला आकर्षित करणारा.....हे वेड 30,40 वर्षांपूर्वी "के श्रीधर " ह्यांच्या कथासाठी होते...अचानकपणे गायब होणारे श्रीधर हयात असते तर भयकथाना चांगले दिवस असते.....प्रकाश आणि श्रीधर ह्यांची लेखन शैली मिळतीजुळती आहे असं जाणकारांचे मत होते.....फेसबुक वरचे लेखक सुद्धा आश्चर्यचकित होते की प्रकाश ने इतकी प्रतिभा मिळवली कुठून???पण आता तो त्यांच्या हाताबाहेर गेला होता....अमाप पैसा मिळवून त्याने स्वतःचा बंगला बांधला होता.....बायको मुलीला खुशीत बघून त्याला सैतान स्मिथ वेलेरियस शी केलेला सौदा फायद्याचा वाटत होता.....पण शेवटी सैतानाच तो......प्रकाश ला इजा न पोचवण्याचा शब्द त्याने पाळला खरा पण ......रक्तरंजित साधना तो पूर्ण क्षमतेने करत होता.....(क्रमशः)
तिकडे लागोपाठ 6 पुस्तके लिहून "के प्रकाश" प्रसिद्ध झाला होता....इतका की त्याचे इंटरव्ह्यू घेतले जाऊ लागले......लोकांनी त्याच्या कथा इतक्या डोक्यावर घेतल्या होत्या की छपाईपूर्वीच बुकिंग होत होते....मोबाईल च्या जमान्यात पुस्तकांबद्दलचे हे वेड बघून भल्याभल्या लेखकांनी तोंडात बोटे घातली होती....ते ही भुतांच्या गोष्टीची पुस्तके....प्रकाशच्या लेखनात एक वेगळीच जादू होती प्रत्येक शब्द जादुई...वाचकाला आकर्षित करणारा.....हे वेड 30,40 वर्षांपूर्वी "के श्रीधर " ह्यांच्या कथासाठी होते...अचानकपणे गायब होणारे श्रीधर हयात असते तर भयकथाना चांगले दिवस असते.....प्रकाश आणि श्रीधर ह्यांची लेखन शैली मिळतीजुळती आहे असं जाणकारांचे मत होते.....फेसबुक वरचे लेखक सुद्धा आश्चर्यचकित होते की प्रकाश ने इतकी प्रतिभा मिळवली कुठून???पण आता तो त्यांच्या हाताबाहेर गेला होता....अमाप पैसा मिळवून त्याने स्वतःचा बंगला बांधला होता.....बायको मुलीला खुशीत बघून त्याला सैतान स्मिथ वेलेरियस शी केलेला सौदा फायद्याचा वाटत होता.....पण शेवटी सैतानाच तो......प्रकाश ला इजा न पोचवण्याचा शब्द त्याने पाळला खरा पण ......रक्तरंजित साधना तो पूर्ण क्षमतेने करत होता.....(क्रमशः)