भेट_भुताची- A Marathi Horror Story
#अनुप_देशमाने
कॉलेज सम्प्ले, तसं थोडे दिवस घरीच थांबू असा विचार करत मी घरी निघालो...मधेच मित्राचं दुकान लागलं त्यामुळे तिथेच गप्पा रंगल्या..चहा पाणी होऊन मी परत घरी निघालो... घरी मी आल्यानंतर डायरेक्ट माझ्या रुम मध्ये गेलो आणि तेथील आराम खुर्चीवर बसून वर छता कडे बघत बसलो....पुढे काय करायचं, कोणती नोकरी बघावी, कुठे फिरून यायचं असे अनेक विचार करत मी बसून राहिलो...तेवढ्यात काय माहीत टेबल वर ठेवलेले आजचा न्युज पेपर पडला... वारा नसताना देखील तो कसा पडला हा सात्विक विचार माझ्या मनात आला... तस आज न्यूज पेपर पण वाचला नव्हता म्हणून उठून तो न्यूज पेपर घेऊन मी परत आराम खुर्चीवर येऊन बसून वाचू लागलो....देशाची अर्थव्यवस्था याबाबत भरपूर मोठा लेख आला होता तो वाचत वाचत बोर होयला लागलं म्हणून न्यूज पेपर मधील मनोरंजन विश्व हे पान वाचत बसलो... त्या पानावरील एक बातमी वाचून अंगावर काटाच आला आणि हसू देखील, एका गावाची माहिती आली होती त्या तिथे म्हणे रोज रात्री भुते येतात आणि लोकांना दिसतात...2 ते 3 वेळा ही बातमी वाचली आणि ठरवलं की ह्या सुट्टीत त्याच गावी जाऊन भेट द्यायची आणि भुतांना भेटायचं, नेमकं भुते कशी असतात ते पहायचं का तेथील लोक आपल्या गावचे नाव प्रसिद्ध व्हावे म्हणून करत असलेला खटाटोप तरी कळेल.....
मग काढला लॅपटॉप बाहेर आणि गूगल बाबा ओपन करून त्या गावाबद्दल एक करून माहिती घेऊन ती माझ्या डायरी मध्ये लिहू लागलो...तसा मी कधी कोणाला घाबरत नाही आणि भुताला तर नाहीच नाही कारण भुताचा अनुभव यावा लागतो ना घाबरायला...गूगल वरून पत्ता काढला त्या पत्या प्रमाणे मी बस ट्रेन चे शेड्युल ठरवले...तिकीट देखील भेटले ते ही 2 दिवसानंतर चे, त्यामुळे मी लगेच माझी बॅग भरण्यास सुरवात केली...बॅटरी, पॉवर बँक, लॅपटॉप, 2 ते 3 ड्रेस आणि माझ्या प्रिय व्यक्तीचा फोटो घेऊन ती बॅग भरली.. कोणी सोबत असेल तर चांगलेच होईल म्हणून मित्रांना कॉल करून सांगितले...पण एक ही मित्र तयार झाला नाही उलट त्यांनी माझीच चेष्टा केली...मी पण चला ठीक आहे म्हणून सारे सावरून घेतले...आता सर्वात मोठा प्रश्न हा राहिला की घरच्यांना काय सांगायचं..ह्या विचारात मी आपलं झोपेला जवळ केले आणि झोपी गेलो...
खर ना नवीन अनुभव घेण्यास मी कधीही तयार असतो, मानवी अमानवी शक्ती नेमकी काय , ती कशी दिसते, भुते असतात का की नुसता भास...
आला तो दिवस घरी सांगितले की नोकरी साठी 2 ते 3 दिवस मित्राकडे जातोय... तेव्हा होकार मिळाला आणि मी माझी बॅग घेऊन निघालोच #भुताच्या_भेटीला,
पहिला प्रवास मला बस ने करायचा होता तेव्हा मी बस स्टॉप वर थांबून बस ची वाट बघत होतो, रात्रीचे जेमतेम 8 वाजले असतील, बस आली आणि माझ्या प्रवासाचा श्रीगणेशा झाला...पुढील प्रवास रेल्वेने होणार होता आणि तेथून लोकल ट्रान्सपोर्ट टमटम ने त्या गावाकडे जायचं होतं म्हणजे मी पहाटेच तेथे पोहचणार हे नक्की होते..रेल्वे ने थांबा घेतला मी उतरलो, वातावरण तस थँड होते पण मस्त वाटत होते अश्या थंड वातावरणात एक कप चहा म्हणजे संजीवनीच जणू, एक टपरी सापडली तिथे मस्त पैकी चहा चालू होता...एक मस्त गरमागरम चहा घेत मी त्या चाहवाल्याला त्या गावाबद्दल आणि तेथील भुताच्या भाकिता बद्दल विचारपूस केली असता मला जाणवले की त्याला त्या बद्दल माहिती असून तो मला काही सांगणार नव्हता... त्याचे पैसे देऊ केल्यानंतर मी आपलं त्या गावाला जाणाऱ्या लोकल गाड्यांची वाट बघत बसलो... त्या गावचे नाव सांगितल्या वर सर्व लोक माझ्याकडे कुतुहुलने बघत होते... आणि माझा इंटरेस्ट वाढत जात होता... कस बस एक टमटम मिळाले पण त्याने सांगितले की त्या गावापासून लांब 3 किलोमीटर वर मी तुम्हाला सोडणार मी ही त्याला मानेने होकार देऊन टमटम मध्ये बसलो.... खूप वेळ झाला होता टमटम हळू हळू रस्ता कापत होते..जसे जसे त्या गावाजवळ टमटम येऊ लागले तसे तसे त्या टमटम वाल्याच्या तोंडातून देवाचे नाव येऊ लागले त्याच्या कपाळावर घाम आणि चेहऱ्यावर भीती दिसत होती.... टमटम ला थांबवले आणि मी उतरलो... पैसे त्याला देताना त्याने जे शब्द माझ्या कानावर टाकले ते ऐकून मी त्याच्या तोंडाकडे बघतच बसलो..... तो मला म्हणाला की होता होईल तेवढं तुमचं काम करून निघायचं बघा गाव शापाने ग्रासले आहे तेथे भुताटकी चा तांडव असतो.....थोडीशी भीतीची लहर माझ्या ही मनामध्ये उठली पण आता दिवस उजडणार होता पहाटेचे 5 वाजतच आले होते मी चालत चालत च निघालो होतो...ज्या गावाची मी आतुरतेने वाट बघत होतो ते गाव आता माझ्या समोर येत होते..जस गाव माझ्या नजेरला दिसू लागले तसे माझे पावलं पटापट चालू लागले...भुताला भेटायची ओढ मला तिकडे ओढत नेत होती... गावाच्या बाहेर एक भले मोठे पिंपळाचे झाड होते त्या पिंपळाच्या झाडावर बसलेले कावळे मला बघताच काव काव करू लागले...पहाटेची शांतता आता कावळ्यांच्या आवाजाने भंग पावली होती... आणि विशेष म्हणजे ते सर्व कावळे माझ्या कडे बघूनच ओरडत होते मला ही नवलच वाटले पण त्यांच्या कडे दुर्लक्ष करून मी त्या गावात प्रवेश केला... प्रवेश करताच जाणवलं की जशी मनुष्याच्या मनावर मरगळ येते तशीच ह्या गावावर एक वेगळ्या प्रकारची मरगळ आलेली आहे... मला पहाताच गावातील लोकांनी आपल्या आपल्या घरात जाऊन दारे लावले...मला हसावे की घाबरावे कळेना गेले... मग गावातील एका झाडाच्या कट्ट्यावर मी टेकलो.. बॅग मधून पाणी काढून दोन घोट घेतले, उजेड चांगलाच पडला होता पण लोक काही दिसत नव्हते मग आता कोणाला विचारायचे, भुताची भेट कशी होणार ह्या विचारत मी वर झाडाकडे पाहिले तर काय एक काळी मांजर माझ्या कडे डोळे मोठे करून घुरकत असल्याचे जाणवले... मी ही थोडा खोडकर म्हणून त्या मांजरकडे मी पण बघून ओरडू लागलो... पण ती मांजर काहिकेल्या घाबरेना मग मीच दुर्लक्ष करून गावाकडे एक टक बघत राहिलो... इतक्यात त्या मांजरान माझ्या मानेवर झडप घेऊन त्याचे चारही दात माझ्या मानेत खवले आणि त्याच्या पंज्यातील नख्याने माझी पाठीवर वार करू लागली...अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मी घाबरलो पण क्षणात सावध होऊन मी त्या मांजराला धरून लांब फेकून दिले... खिशातील रुमालाने झालेल्या जखमांना मी पुसत बसलो.... तेवढ्यात एक गृहस्थ मला येताना दिसला आणि माझ्या चेहऱ्यावर एक आशेचा किरण जागृत झाला....
क्रमशः