अंधारकोठडी - भाग ८
लेखक : कनिश्क हिवरेकर...
रहस्य, गुपित किंवा गूढ उलगडल्यानंतर मानवी मेंदूची अस्वस्थता थांबते परंतु जर का रहस्य उलगडल्यानंतर हे समजले कि त्या रहस्याचा निष्कर्ष आपल्याच जीवावर बेतणार आहे तर ? विष्णू , प्राचार्य आणि मोहन तिघांना हि प्रोफेसर गोडे उर्फ राकाच गुपित समजल होत.परंतु एक गोष्ट मात्र
नक्की होती बाहेर उभा असणारा राका अर्थात प्रोफेसर गोडे याचा नेमका हेतू काय होता याची कुणालाही कल्पना नव्हती. बाहेरून राका दरवाजा ठोठावत होता. " सर पण एवढ्या रात्री इथे येण्याचा म्हणजे तुमच्याकडे येण्याचा त्याचा काय हेतू असू शकतो ? " विष्णू म्हणाला... " काय असू शकेल ? "
"त्यांना माहिती नाहीये कि आम्ही दोघे इथे आहोत. याचा अर्थ ते इथे तुम्हालाच भेटायला आले असणार. आणि राकाच्या मते आता सध्या इथे तुम्ही एकटेच आहात. याचा अर्थ सर तो इथे... " विष्णू बोलता बोलता गप्प झाला. प्राचार्यांकडे त्याने नजर टिकूनच पाहिलं... " माझा खून करण्यासाठी आला आहे... " प्राचार्य आपल्या शब्दांना भीतीमध्ये गुरफटत उद्गारले...
" आता सर काही मार्ग ? इथून बाहेर हि पडता येत नाही. दरवाजा उघडला तर तो आत येईल आणि आपल्याला तो जिवंत सोडणार नाही... " विष्णू म्हणाला इकडे प्रोफेसर गोडेने दरवाजा आणखीन जोरात वाजवायला सुरुवात केली... " सर दरवाजा उघडा सर, तुम्ही आहात ना आतमध्ये " आता मात्र त्याच्या शब्दातील सूर बदलले होते.
त्याच्या शब्दाच्या गोड स्वरामध्ये एक धारदार घाताचा सुरा लपलेला होता. दरवाज्याच्या पलीकडे प्रोफेसर गोडे म्हणजेच राका आपल्या पाठीमागे हातात एक भयंकर धारदार सुरा घेऊन उभा होता. दुसऱ्या हाताने तो दरवाज्यावर थाप मारत होता. कदाचित ते क्षण जवळ आले होते... इकडे दुसऱ्या मजल्यावर खोलीत झोपलेल्या शिंदे सरच्या कानावरती
कसला तरी आवाज पडला. काहीतरी सरपटत सरपटत जात होत. त्या आवाजाच्या त्रासानेच शिंदे प्रोफेसरला जाग आली. " कोण ? " शिंदे उठले व आपल्या दरवाज्याजवळ गेले त्यांनी दरवाजा किंचित उघडला व बाहेर तो आवाज कुठून येत आहे ते पाहू लागले. शिंदेनी आपल्या हातात दिवा घेणे टाळले..
कारण कॉलेजमध्ये चाललेल्या भयंकर घटनांना नजरेखाली ठेवता आपण जेवढ अंधारात राहू तेवढच सुरक्षित राहू आपल्या खोलीतून त्यांनी किंचितच डोकाव्रून बाहेर पाहिले समोरच गच्ची होती तिथूनच खाली शिंदेने थोडे पुढे सरसावणे सोयीचे समजले... खालती अचानक नजर पडताच शिंदे गुरुजीचे डोळे एका भीतीने धस्सकन मोठे झाले.
त्यांना समोरचे दृश्य दिसताच काळीज घश्यात आल्या सारखे जाणवले... पावसाच्या सरीमध्ये विजांच्या कडकडाटीतच शिंदेला एक भयंकर गोष्ट ग्रंथालयाच्या दिशेने जाताना दिसली. ते काहीतरी जोरजोरात ओढत नेत होते शिंदे आपल्या खोलीतून किंचित बाहेर आले त्यांनी पाहिलं तसे त्यांना दिसून आले.
एक भयंकर दानव त्या हवालदाराचे छिन्नविछिन्न झालेले मुडदा प्रेत ओढत घेऊन जात होता. सबंध फ्लोरवरती वरतून पडणाऱ्या पावसाच्या पाण्यानी रक्ताचा लाल रंग पसरला होता अगदी भयावह दृश्य होते ते. त्या सैतानाच महाकाय शरीर दिसताच धक्क्याने शिंदे मागे सरकले मागे सरताच मागे
जाऊन आपल्या दरवाज्याला धडकले. मागे धडकताच दरवाज्याला लागलेला कडीचा आवाज झाला...शिंदेची तेव्हाच नजर वरती पडली तिथे प्राचार्यच्या खोली बाहेर त्याला कोणीतरी उभे दिसले तिथे लटकवलेल्या दिव्याच्या प्रकाशात शिंदेला काहीतरी चमकताना दिसले... " कोण असेल तो ? " शिंदेच्या नजरेसमोर
एका क्षणामध्ये जीवनमरणाचा प्रश्न येऊन पडला होता त्याने पटकन आपली नजर तिथे खाली वळवली हा मात्र आता त्याच्यासाठी तिसरा धक्का ठरला कारण त्याने जेव्हा खाली पाहिले तेव्हा तिथे हनम्या हवालदारच्या प्रेताखेरीज दुसरे काहीही नव्हते ते जे काही होत ते शिंदेच्या नजरेपासून गायब
झाल होत.शिंदेला उमगून आले कि त्याने आपल्याला पाहिले शिंदे आपल्या खोलीत शिरले आणि त्याने खोलीचे दार कडी लाऊन बंद केले... " ते काय असेल ? आणि तो व्यक्ती तो कोण होता. मला काहीतरी कराव लागेल... कॉलेजच्या उंच मनोऱ्यातील ते भव्य घड्याळ प्रत्येक क्षणाची घटना टिपून
ठेवत होत ते एकमेव साक्षीदार होत या सर्वांचा... " हे बघा माझ्याकड एक मार्ग आहे तुम्ही दोघे तिथ पोहोचाल तर तुमचा जीव वाचेल... " प्राचार्य म्हणाले..." कसला मार्ग सर ? " विष्णूने विचारले " अंधार कोठडी...! तिथेच आहे ती मूर्ती आणि त्या अंधारकोठडीचा मार्ग माझ्या व्यतिरिक्त कोणालाच माहित नाहीये अगदी या राकाला सुद्धा. तुम्ही दोघे तिथे सुरक्षित राहाल..."
" आणि माझ एक ऐक विष्णू... हि मूर्ती कांतारला परत करायची आहे कुठल्याहि परिस्थितीमध्ये या मूर्तीचा शोध राकाला लागता कामा नये या लवकर माझ्यासोबत..." विष्णू व मोहन तसेच प्राचार्यच्या मागे गेले प्राचार्यांनी आपल्या केबिनमधील कपाट उघडले... विष्णूला काहीक्षणासाठी जाणवले प्राचार्य त्यांना दडवत आहेत पण गोष्ट मात्र वेगळीच होती.
प्राचार्यांनी तिथेच टेबलावरती ठेवलेला दिवा उचलला व तो विष्णूकडे दिला. या घाईमध्ये त्या तिघांच्याहि एक ध्यानात आले कि दरवाज्यावर होणारी ठकठोक अचानक थांबली होती. " तो गेला वाटत ? "विष्णू आणि प्राचार्य दोघांचे हि ध्यान त्या दरवाज्यावरती टिकून राहिले. इकडे आपल्या खोलीत स्वतःला बंद करून घेतलेल्या शिंदे प्रोफेसरची देखील नजर त्या दरवाज्यावर खिळून राहिली होती.
त्या दोन्ही दरवाज्याच्या पल्याड काळ आपले तोंड आ वासून उभा होता. तोच "धडधडधड !!! " दोन्ही दरवाज्यावर आता एकसाथ थाप पडली होती. " घाई करा लवकर " असे म्हणत प्राचार्यांनी त्याच कपाटांच्या दरवाज्याचा हेंडल दोन वेळा वरती खाली केला तोच जणू एखादे कुलूप उघडल्या सारखा खट खट आवाज झाला..
आणि बघता बघता विष्णू आणि मोहनच्या डोळ्यासमोर त्या कपाटाच्या मागच्या बाजू आतल्या दिशेने उघडल्या गेल्या त्या उघडताच क्षणी दरवाजे धाडकन आदळले गेले....त्यांचा आवाज न जाने त्या मागे असलेल्या काळोखात कितीतरी दूर आणि खोल घुमत गेले. तिथूनच आतमध्ये जाण्यासाठी विष्णू आणि मोहन दोघांना पायऱ्या दिसल्या...
" घाई करा मुलांनो... आपल्यावर आलेल्या संकटातून सुटण्यासाठी या खेरीज दुसरा कुठलाच मार्ग नाहीये... तुम्ही दोघ पुढे व्हा... " प्राचार्य उद्गारले परंतु त्यांच्या शब्दामधून एक उदासीनता स्पष्ट दिसून येत होती.. " आणि आपण सर ? " विष्णू प्रश्नावला... " मी...येईन तुमच्या मागोमाग आता जा...तुम्ही दोघे निघा इथून हाच मार्ग तुम्हाला त्या मूर्तीपर्यंत पोहोचवेल आणि इथूनच खाली आहे ती
अंधारकोठडी.. जा आता " असे म्हणत प्राचार्यांनी दोघांनाहि आतमध्ये ढकलले व मागचे दरवाजे लावून घेतले...तोच इकडे केबिनचा मुख्य दरवाजा धाडकन उघडला गेला... तिथूनच आतमध्ये प्रोफेसर गोडे उर्फ राका मांत्रिक आतमध्ये आला... " हुश्श... तुम्ही इथे आहात ! मी बाहेरून सर तुम्हाला किती हाका मारल्या मला वाटले तुम्हास काही झाले कि काय ? "
एकावडे गुरुजींनी आपल्या चेहऱ्यावरचे भीतीचे भाव लपवले आणि किंचित हास्य आणून ते त्याच्याशी अगदी सामान्य रीतीने बोलू लागले...जणू काही झालच नाहीये काठी टेकवत टेकवत प्राचार्य आपल्या डेस्कजवळ येऊ लागले... " एवढ्या रात्री कस येणे झाले प्रोफेसर गोडे तुमच ? " गुरुजींनी त्याला विचारले...
प्रोफेसर गोडे आपल्या जागीच स्तब्ध उभा राहून चेहऱ्यावरची राक्षसी मुद्रा लपवू शकत नव्हता त्याच्या चेहऱ्यावर छद्मी हास्य उमटले व तो म्हणाला... " सर तुम्ही मला अजून मूर्ती बद्दल काहीच सांगितले नाही...... कुठे ठेवली आहे..... ती मूर्ती..... कुठे आहे ती ' अंधारकोठडी' ? " तोच राकाने प्राचार्यांच्या माथ्यावरून खाली येणारा घामाचा एक ओघोल पाहिला..
त्याच्या हास्यात त्याच्या चेहऱ्यात आणखीनच असुरी रूप अवतरू लागले... " ती जिथे आहे सुरक्षित आहे...तुम्हाला त्याची चिंता करायची गरज नाहीये.... " प्राचार्य नकार देत होते हे पाहून प्रोफेसर गोडे (राका ) चा पारा चढला... संतापाने तो लालबुंद झाला..." कुठेय ती मूर्ती ? " राका गरजला...
" माझा जीव जरी घेतलास तरी तुला ती परत मिळणार नाही ....राका ! " विजेच्या कडकडत्या थयथयाटामध्ये राकाचा चेहरा आश्चर्याच्या धक्क्याने संतापाच्या भावाने थरथरून गेला.... " ओह अस आहे तर, तुला समजलच शेवटी मी कोण आहे ते...पण हे कस शक्य आहे ? मी तर..., अच्छा समजल आता समजल तुझ्यानंतर त्याचीच बारी आहे.... ह्ह्ह...तुझ्या मरणानंतरच मला ती मूर्ती भेटणार आहे तर तसेच होईल... "
राका ने एक आसुरी गर्जना केली एका झेपेतच त्याने आपल्या हातात सुरा काढला व खच्चकण तो सुरा प्राचार्यच्या छातीमध्ये घुसवला त्या धारदार शस्त्राने राका प्राचार्यच्या छातीत प्रहारवर प्रहार करू लागला... " तू माझा ९९ वा बळी होतास, बस्स शेवटचा एकच राहिला आहे आता... आणि तो तुझा असेल .....विष्णूSSS !"
राका आपल्या भयान सुरात विष्णूच्या नावाने दरडला... कारण तो समजून गेला होता आपली ओळख आपल गुपित उघड करणारा दुसरा-तिसरा तो युक्तिवान कोणी नसून विष्णू स्वतः होता. प्राचार्यांमध्ये आपले शेवटचे श्वास उरले होते. " नराधमा ! तू तुझ्या हेतूला कधीच साध्य करू शकणार नाहीस...दैव प्रबळ आहे तेव्हा हि तू हरला होतास आणि आज हि तू हरशील...आंSSS..."
" मला कोणी नाही हरवू शकत बस आता शेवटचा बळी तो त्या हरामखोर विष्णूचा असेल...मग मी अमर होऊन जाईल कांतारच्या मूर्तीची सबंध शक्ती माझ्या मुठ्ठीमध्ये येईल आणि या काळ्या साम्राज्यावर मी राज्य करेन मला अडवणारा कोणीही नसेल.. आणि हो तुला भेटायला कोणीतरी आल आहे...."
" मालक आतमध्ये या...! तुमचा भोग तयार आहे...! हीहीहीsssस्स्स" तसे बोलून राका प्राचार्यसमोरून बाजूला हटला तोच दरवाज्यामध्ये प्राचार्यांच्या मरत्या नजरेस सैतान दिसला...खुद्द कांतार प्राचार्यांनी त्या सैतानाच्या हाती येण्यापूर्वीच आपला प्राण सोडला. त्यांच्या शेवटच्या दृष्टीत कांतार च सैतानी रूप
प्रतिबिंबित झाले होते...कांतार प्राचार्यच प्रेत घेऊन तिथून अंधारात नाहीसा झाला... " कुठे असेल ती अंधारकोठडी...? या भाड्याने तिथेच ठेवली असणार मूर्ती...कुठेय ? कुठेय ? कुठेय ? " इकडे तिकडे पाहत असतानाच राकाची नजर प्राचार्यच्या उघड्या कपाटाजवळ गेली... राका त्या कपाटाजवळ पोहोचला...
"तो इथे काय करत असेल.." त्याने एका झपाट्यातच सगळे पुस्तके आणि काही उपरणे तिथे ठेवलेली काढून खाली फेकून दिली..त्याला आतमध्ये काही एक सापडले नाही तोच किंचित तोलजात असलेल एक पुस्तक खाली पडले व त्याचा आवाज झाला परंतु तो आवाज त्या कपाटाच्या मागोमाग घुमत गेला...
परत फिरलेला राका त्याने आपले पाउल जागीच थांबवले आणि मागे वळला... तो आवाज कसला हे पाहण्यासाठी त्याने कपाटांच्या मागच्या बाजूस आपला कान लावला व तिथे ठोठावले... " ठक ठक..." तो आवाज आतमध्ये दूरपर्यंत खोल पसरला... पायऱ्या उतरून खाली पोहोचलेल्या विष्णू आणि मोहन दोघांच्या हि कानावर तो आवाज पडला...
तो आवाज आलेला ऐकून दोघेही दचकले एकमेकांकडे पाहत त्यांनी आपली नजर काहीक्षण पायऱ्यावरून वरती असलेल्या त्या दरवाज्यावर टाकली " तो आला.....! " विष्णू उद्गारला... " मोहन चल लवकर आपल्याला ती मूर्ती शोधायची आहे..." मोहन आणि विष्णू दोघेही त्या गुप्त रस्त्याने खालती असलेल्या तळघरात पोहोचले होते.
इथे तर आजुबाजूला सर्व विचित्र आणि कोंदट आहे " मोहन म्हणाला... " कसे हि असो हि वेळ फक्त आपला जीव वाचवायची आहे. ती मूर्ती प्राचार्यांनी याच तळघरात दडवून ठेवली आहे...चल आपण शोधूयात... विष्णू आणि मोहन दोघेही हातामध्ये कंदील घेऊन समोर असलेया अरुंद मार्गाने पुढे सरसावत होते विष्णूचा आधार घेऊन मोहनहि त्याच्या सोबत चालत होता.
खालच्या सर्व भिंती शेवाळून गेलेल्या होत्या हिरवट ओलसर कुबट होत सर्व उंदरांच्या रांगा लागल्या होत्या कोळ्यांची जाळ जागोजागी पसरली होती...वरती राका तो दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागला... " घ्हर्र्र...SSS आत जायला कुठून तरी मार्ग असेलच... " पाहता पाहता त्याचा हात कपाटाच्या हेंडलवर पडला राकाने तो हेंडल आपल्या हाताने पकडून वर खाली केला तसा
खड्ड खड्ड खट खट करत तो समोरचा गुप्त दरवाजा त्याच्यासमोर उघडला गेला... " हSSहSSहाSS... हाSS मी अमर होणार , विष्णो शेवटचा बळी तुझाच असेल "
कदाचित नशीब बलवत्तर होते म्हणूनका शिंदे प्रोफेसरचे प्राण त्या सैतानाच्या तावडीतून सुटले. शिंदे गुरुजीने आपल्या खिडकीमधून वाकून बाहेर पाहिले तसे बाहेर न तो सैतान होता न आणखी काही. परंतु त्याला प्राचार्याच्या केबिनचा दरवाजा मात्र उघडलं दिसला... " मला घडला प्रकार प्राचार्यांना सांगाव लागेल त्यांना सावधान कराव लागेल मला... " एवढ बोलून शिंदेने आपला जवळचा दिवा उचलला...
आणि दरवाजा उघडून त्याने आधी बाहेरचा कानोसा घेतला जोरात उरात श्वास व एक हिम्मत भरली आणि शिंदे गुरुजी थेट प्राचार्यच्या खोलीकडे निघाले... इकडे मुलांच्या हॉस्टेलवरती विष्णू आणि मोहन दोघेही गायब झाले होते हे पाहून कल्ला उठला होता हॉस्टेललां वार्डन नव्हता पण नवीन आलेला तो गार्डच सिक्युरिटी साठी होता.
वरती जाऊन त्याने पहिले तसे त्याला समजले कि दोन मुले परत एकदा नाहीशी झाली आहेत... " ए हे बघा पोरानो...! मला तुमच इथल काहीही माहिती नाहीये रे ! माझ्या नौकरीचा सवाल आहे तुम्ही जर गोंधळ कमी करून मला मदत केली त्या दोघांना शोधायला तर बर होईल..! " त्या गार्डच्या विनवणी करण्यावरून फ्लोरचे सर्व मुले आपल्या खोलीतील कंदील छत्र्या सर्व घेऊन बाहेर पडू लागली...
इकडे पोलीस इन्स्पेक्टर कदम आपली ड्युटी संपवून घरी जाण्यासाठी निघाला होता. गाडीमध्ये बसल्यावर त्याने आपला वायरलेस चालू केला व इकडे हनम्या आणि सुकडे हवालदार दोघांना संपर्क केला. " हेल्लो सुकडे कमिंग ? हणमंत ? हेलो ? कोणी आहे का तिकडे ? " सुकडे आणि हनम्या हवालदार दोघेहि आपला वायरलेस
मोटार सायकलवरतीच विसरून गेले होते...हॉस्टेलमधून मुले एक एक करून बाहेर पडू लागली होती विष्णूने त्या सर्वाना सावरल होत भीतीच्या संकटांच्या वेळी तो नेहमी सर्वांच्या मदतीला उभा राहिला होता आज त्याच्यावरच संकट आलेल पाहून सर्व मुले हिमतीने निघाली होती प्रत्येकाच्या मनात बळ एकवटल होत.
" आज तो जो कोणी सैतान असेल त्याचा नायनाट करायचा आपण सर्वांनी पोरानो चला रे.. " इकडे इन्स्पेक्टर कदम वायरलेसवरून कोणाचा प्रतिसाद येत नाहीये हे पाहून चिंतेमध्ये पडले... " मलाच तिथ जाऊन बघाव लागेल...काहीतरी गडबड वाटतेय... ए कोण आहे रे तिकडे सख्या तुक्या रामा सगळेजन चला माझ्यासोबत...इकडून इन्स्पेक्टर कदम देखील आपली फोर्स घेऊन कॉलेजच्या दिशेने निघाले...
पाहूयात पुढील आणि शेवटच्या भागात मित्रहो... मनुष्य आणि सैतानाच्या या लढाईमध्ये कोणाचा विजय होतो ते
क्रमश :