सायको -- भाग पहिला
"आsssss मारू नका ओ मला म्या गरिबानं काय बिघडवलय तुमचं"
एक बोट कट झाल्यावर जिवाच्या आकांताने शिरप्या ओरडत होता.....बोट तुटल्यामुळे बोटातून घळाघळा रक्त वाहत होतं.....शिरप्या थरथरत होता.....पण त्याच्यावर काहीही परिणाम होत नव्हता....त्याने शिरप्याला फरफटत गावापासून दूर एका बंद बंगल्यात आणलं होतं....शिरप्याचे तुटलेले बोट हातात पकडून त्या रक्ताने तो एका वेगळ्याच भाषेत काहीतरी लिहत होता....लिहताना त्याचा हात थरथरत होता पण शब्द अजिबात थरथरत नव्हते....काहीतरी विचित्र बडबडत तो त्या भिंतीवर लिहत होता.....अचानक त्याच्या कपाळावर आठ्या उमटल्या काहीतरी मिसिंग आहे असं त्याला वाटत होतं....त्याने विव्हळत बसलेल्या शिरप्या कडे बघितलं....शिरप्या घाबरला.....त्याने कंबरेला खवलेला रक्ताळलेला चाकू काढला आणि सपासप शिरप्या च्या अंगावर वार केले....शिरप्या किंचाळू लागला....प्राणाची भीक मागू लागला....वेदनेने ते किंचाळण त्याला आनंद देत होत...त्याचे कान तृप्त होऊ लागले शिरप्याच्या जखमेतून ओघळणार्या रक्तात त्याने ते बोट बुडवलं आणि परत तो भिंतीवर लिहू लागला....डोळे बंद करून शिरप्याच्या आर्त किंचाळी वर तो एका सॉफ्ट म्युझिक प्रमाणे थिरकू लागला....मध्येच त्याच्या घोघरा आवाज काहीतरी विचित्र बडबडायचा....हळूहळू शिरप्याच्या आवाज शांत होऊ लागला....त्याचा जीव वाहणाऱ्या रक्ताबरोबर कधीच बाहेर पडला होता.....त्याची नजर इकडे तिकडे फिरू लागली.....काहीतरी मंत्र म्हंटले गेले आणि शिरप्याचा आत्मा त्याने खेचून आपल्या अंगात ओढून घेतला....एका वेगळ्या शक्तीचा त्याला अनुभव आला.....त्याने शरीराकडे बघितले हातावरचे रक्ताचे डाग त्याने चाटून साफ केले.....मान फिरवून तो मागून पुढून स्वतःला न्याहाळत होता....त्याने आपल्या चपला कडे बघितले त्याला शिरप्याचे रक्त लागले होते...तो गुरगुरत समोरच्या मैदानात गेला आणि पाय मातीत घासून ते रक्त पुसून काढले त्याने घड्याळाकडे बघितले.....घड्याळ बघताच तो अस्वस्थ झाला....तो धावत सुटला....कुत्री भुंकत होती पण त्याने आपले दात दाखवताच पळून जायची....दुसऱ्या फ्लोर वर त्याची एक वेगळी रुम होती....जमिनीवरून एक मोठी उडी घेऊन तो त्या खोलीत पोहोचला आणि अंगावर चादर ओढून तो झोपी गेला.....
सकाळ झाली मोठ्या लगबगीने तो उठला आपल्या बायको आणि आपल्या लाडक्या मुली बरोबर काही वेळ घालवून तो परत आपल्या "त्या" खोलीत शिरला....."त्या" खोलीत त्याच्या शिवाय कुणालाही आत जायची परवानगी नव्हती....."त्या" खोलीबद्दल कोणी विचारलं की त्याची चिडचिड होत असे....अगदी त्याची पत्नी सुद्धा त्याला ह्याबद्दल विचारत नव्हती....तो आपल्या खोलीत शिरला...आतून कडी लावून घेतली आपल्या डेस्क वर तो बसला एक मोठी वही आणि अनेक पेन त्या डेस्क वर होते.....सगळी तयारी झाली....त्याने डोळे बंद करून काहीतरी पुटपुटले त्याचे डोळे बंद झाले.....त्याची मान खाली पडली बोटं थरथरू लागली त्या थरथरत्या बोटांनी त्याने समोरचा पेन उचलला....तो थरथरता पेन समोरच्या वहीच्या ओळीवर स्थिरावला......थरथरणारा हाथ आता लयबद्ध रीतीने त्या वहीच्या पानावर फिरू लागला....पाने पालटली जाऊ लागली त्याचे डोळे बंद होते मान निर्जीव मूडद्याप्रमाणे खाली पडली होती.....पण त्या सळसळणार्या पेनधारी हाताने 100-150 पानं अगदी काही मिनिटात लिहून काढली....काही मिनिटांनी तो पेन स्थिरावला....त्याची बोटं कडक झाली....मान गरागरा फिरू लागली.....तो धाडकन खाली पडला.....त्याचे डोळे उघडले....स्वतःला सावरत तो उभा होता....त्याने त्या सुंदर अक्षरांनी भरलेल्या वहिकडे बघितलं.....आडवी पडलेली खुर्ची सरळ करून त्याने ती वही वाचायला घेतली....त्याची बुबुळे त्या प्रत्येक शब्दावरून फिरत होती प्रत्येक शब्द त्याच्या गालावर हसू आणि प्रत्येक प्यारेग्राफ त्याच्या भुवया उंचावत होत्या... शेवटी काही तासात ते लिखाण वाचून झाल्यावर तो ती वही कवटाळून उभा राहिला आणि स्वतःचं किंचाळला
सकाळ झाली मोठ्या लगबगीने तो उठला आपल्या बायको आणि आपल्या लाडक्या मुली बरोबर काही वेळ घालवून तो परत आपल्या "त्या" खोलीत शिरला....."त्या" खोलीत त्याच्या शिवाय कुणालाही आत जायची परवानगी नव्हती....."त्या" खोलीबद्दल कोणी विचारलं की त्याची चिडचिड होत असे....अगदी त्याची पत्नी सुद्धा त्याला ह्याबद्दल विचारत नव्हती....तो आपल्या खोलीत शिरला...आतून कडी लावून घेतली आपल्या डेस्क वर तो बसला एक मोठी वही आणि अनेक पेन त्या डेस्क वर होते.....सगळी तयारी झाली....त्याने डोळे बंद करून काहीतरी पुटपुटले त्याचे डोळे बंद झाले.....त्याची मान खाली पडली बोटं थरथरू लागली त्या थरथरत्या बोटांनी त्याने समोरचा पेन उचलला....तो थरथरता पेन समोरच्या वहीच्या ओळीवर स्थिरावला......थरथरणारा हाथ आता लयबद्ध रीतीने त्या वहीच्या पानावर फिरू लागला....पाने पालटली जाऊ लागली त्याचे डोळे बंद होते मान निर्जीव मूडद्याप्रमाणे खाली पडली होती.....पण त्या सळसळणार्या पेनधारी हाताने 100-150 पानं अगदी काही मिनिटात लिहून काढली....काही मिनिटांनी तो पेन स्थिरावला....त्याची बोटं कडक झाली....मान गरागरा फिरू लागली.....तो धाडकन खाली पडला.....त्याचे डोळे उघडले....स्वतःला सावरत तो उभा होता....त्याने त्या सुंदर अक्षरांनी भरलेल्या वहिकडे बघितलं.....आडवी पडलेली खुर्ची सरळ करून त्याने ती वही वाचायला घेतली....त्याची बुबुळे त्या प्रत्येक शब्दावरून फिरत होती प्रत्येक शब्द त्याच्या गालावर हसू आणि प्रत्येक प्यारेग्राफ त्याच्या भुवया उंचावत होत्या... शेवटी काही तासात ते लिखाण वाचून झाल्यावर तो ती वही कवटाळून उभा राहिला आणि स्वतःचं किंचाळला
"येसsssss.....काय मस्त लिहलय.....हे पुस्तक आग लावेल आग......"
शेवटच्या लाईनवर त्याने आपले नाव लिहले
लेखक
के.प्रकाश
लेखक
के.प्रकाश
सौदा तर तसाच होता....सगळं ठरल्याप्रमाणे होत होतं....प्रकाश एक सामान्य नोकरदार माणूस होता....त्याला वाचनाची प्रचंड आवड.....मोठं मोठी पुस्तके खरेदी करणे शक्य नसल्यामुळे त्याने सोशल मीडियावरील लेख,कथा,कविता ज्यांना आपलं सोबती बनवलं होतं....वेगवेगळ्या विषयावरील कथा पेज त्याने लाईक करून ठेवले होते.....त्यातच त्याने एक भयकथा पेज लाईक केले होते....त्यातील कथा तो नेहमी वाचायचा....लेखकांनाही दाद द्यायचा.....काही लेखक प्रकाशच्या कमेन्टची वाटच बघायचे....कारण त्या कमेंटमध्ये आपल्या शब्दभांडारातील निवडक शब्द निवडून त्या लेखकाची अशी स्तुती करायचा की ती लेखक भारावून जात असे.....त्याच्या कमेंट्स ला लाईक करणारा एक वेगळा वर्ग होता....बहुत लोकांनी त्याला आपल्या मित्रयादीत घेतले होते.....कित्येक लोकांच्या "तुम्ही सुद्धा कथा लिहा" ह्या रिप्लायनी त्याला अखेर एक भयकथा लिहायला भाग पाडले....कथा लिहण्याचे त्याने मनावर घेतले ...पहिलाच प्रयत्न...त्याने त्या कथेत असे काही नावीन्य दाखवले की वाचक थक्क झाले....कथेचे लाईक्स आणि वेगवेगळ्या तारीफ करणाऱ्या कमेंट्स नी प्रत्येक सेकंदाला त्याचा मोबाईल मेसेज टोन्स नी खणानु लागला....लोकांना माझ्या कथा आवडतात हे बघून तो अगदी "सातव्या आस्मानावर" होता.....प्रत्येक वेळी काहीतरी नवीन घेऊन तो वाचकांच्या समोर यायचा....प्रत्येक आठवडी त्याची कथा त्या ग्रुपवर यायची....लोकांच्या तारीफेमुळे त्याला एक वेगळंच सुख मिळत होत....लोक आतुरतेने त्याच्या कथेची वाट बघायचे.....काही महिने असेच गेले....त्याची मित्र संख्या हजारोंच्या घरात गेली होती सोबत हजारो फॉलोअर्स....त्यांच्या अपेक्षाचे ओझे घेऊन नव्या उमेदीने आपलं लिखाण घेऊन येई....इतर लेखकांनी सुद्धा त्याचे यश बघून आपल्या लेखन कौशल्याचे हत्यार त्या युद्धात उतरवले....एक वेगळीच स्पर्धा त्या ग्रुप वर लागली....वाचकांना नवनवीन कथेची मेजवानी मिळत होती.....पण लेखकांचे अघोषित कथा युद्ध चालू होते.....कालांतराने ह्या युद्धात प्रकाशच्या तलवारीची धार बोथट झाली....त्याच्या कथेला पाहिजे तेवढे लाईक मिळेनासे झाले....दुसऱ्यांच्या कथा आणि त्यावर मिळणारी तारीफ बघून प्रकाश खूप चिडला....घरात सुद्धा त्याचे वागणे बदलले....प्रकाश चिडचिडा बनला....फक्त कथा कथा आणि कथा.....त्याच्या डोक्यात तेच सुरू होतं....भयकथा लिहायची पण सुचत नव्हतं.....त्याने कित्येक रात्री जागून काढल्या पण काही विशेष सुचत नव्हतं....जे काही लिहायचा त्यात वाचक दोष आणि खिल्ली उडवायचे.....त्याला वाचकातून लेखक बनायचं होत....भयकथेत बुद्धीचा कस लागतो हे त्याला माहित होतं त्यामुळे प्रथम ह्या प्रकारात त्याला लिहायचं होत पण आजकल त्याला इथेही अपयश मिळत होत....दुसऱ्या लेखकांची प्रगती त्याला सहन होत नव्हती....काहीतरी भन्नाट लिहलं पाहिजे ह्या विचाराने तो त्या दिवशी गुगल वर वेगवेगळ्या साईट्स शोधू लागला....वेगवेगळ्या तंत्रमंत्र विद्या भुताटकी पेज वर तो काही लिखाना योग्य मिळते का?? हे तो बघू लागला...काही वेगवेगळे विषय त्याने वाचून काढले.....एक सिक्रेट साईट त्याला दिसली....भयाण आणि कधीही न पाहिलेली भयानक क्रूर चित्रे तिथे होती....लॉगिन कॉलम बघून तो थक्क झाला....जन्म तारीख,ब्लड ग्रुप असे काही विचित्र प्रश्नांची उत्तरे त्याने त्या कॉलम मध्ये भरली...कथेसाठी तो कुठल्याही थराला जायला तो तयार होता.....सबमिट केल्यावर काही वेळातच त्याच्या मेसेज बॉक्स मध्ये एक मेसेज आला.....त्यात एक पत्ता होता.....त्याच्या शहरापासून काही किलोमीटर अंतरावर एका ठिकाणचा तो पत्ता दिसत होता.....पण जावे की नको हा प्रश्न अजूनही प्रकाशाच्या मनात होता....अचानक समोर स्क्रीनवर त्याला दुसऱ्या लेखकाची कथा दिसली....त्याचे नेहमीचे वाचक भरभरून त्या कथेवर कमेन्ट करत होते....त्याची तारीफ वाचून प्रकाश ताडकन उठला आणि त्या शहराबाहेरच्या पत्त्यावर जाण्यासाठी निघाला....त्याची बाईक धावत होती सोबत डोक्यात विचारचक्र....आपल्या पूर्वीच्या कथांवर मिळालेली दाद आठवून तो गाडी चालवत होता शहरी सिमेंटच्या जंगलाची जागा आता खऱ्याखुऱ्या जंगलाने घेतली....वेडीवाकडी वळणे सर करत तो त्या पत्त्यावर पोहोचला.....बंगला तर आलिशान वाटत होता....बाहेर 4-5 महागड्या गाड्या थांबल्या होत्या....त्या गाड्या बघून त्याने आपली बाईक बाहेरच पार्क केली....आत असलेली माणसं बाहेर आली.....प्रकाश कडे विचित्र नजरेने बघून ती काहीतरी कुजबुजत होती....प्रकाश ला हे सगळं अनपेक्षित होतं.....प्रकाश त्यांच्या समोर उभा होता...अचानक ती माणसं एका विशिष्ट मुद्रेत प्रकाश समोर झुकली जणू काही ती प्रकाशला मुजराच करत होती....सूट बूट वाली माणसं एका सामान्य माणसासमोर झुकली हे बघून प्रकाश जरा चाचपला आणि झटकन बंगल्यात शिरला.....शांत वातावरण....आत प्रवेश करताच हॉल मध्ये चित्रविचित्र पेंटिंग लावल्या होत्या त्याकडे बघत असताना तो थबकला....समोर एक हिप्पी टाइप माणूस बसला होता तो प्रकाश कडे बघून हसत होता.....त्याच्या हसण्याचे कारण प्रकाश समजू शकला नाही....त्या माणसाने जिन्याकडे बोट दाखवले.....तसा प्रकाश जरा घाबरत घाबरत वर जाऊ लागला....त्याची नजर अवतीभवती फिरत होती.....एका दारासमोर येऊन तो उभा राहिला... तस ते दार आपोआप उघडलं त्याने आपले बूट बाहेर काढले......लाल भडक लाईटीचा प्रकाश त्या खोलीत पसरला होता.....त्या खोलीत वेगवेगळ्या प्राणी वेगवेगळ्या काचेच्या बरणीत भरून ठेवले होते उग्र वास पूर्ण खोलीत पसरला होता काहीतरी जळत होतं....त्या धुराच्या दिशेने तो जाऊ लागला....अचानक समोर बघून दचकला.....समोरच्या बेड वर एक गरोदर बाई झोपली होती...पण सामान्य गरोदर बाई सारखी ती दिसत नव्हती... तिचे पोट खूप मोठे दिसत होते हे दृश्य बघून प्रकाश घाबरला....मागे फिरण्याचा विचार त्याच्या मनात आला अचानक आतल्या खोलीतून आवाज आला
"लेखक महाशय.....इथून मागे फिरू नका बरं.....इथून मागे फिरला की मागेच रहाल....खूप काही लिहायचं आहे तुम्हाला.....अहो माहीत आहे आम्हाला भयकथा लिहता तुम्ही"
हे शब्द ऐकून प्रकाश ची पाऊले तिथेच थांबली.....आतल्या खोलीतून आवाज येत होता....प्रकाश आपोआप त्या खोलीकडे जाऊ लागला....बारीक हाडापासून त्या खोलीचा पडदा बनला होता.....बहुतेक ती बोटांची हाडं होती...फुलमाळे प्रमाणे ओवून त्या दाराला अडकवली होती.....शेकडो लोकांची हाडे वापरली असतील त्या फक्त पडद्यासाठी.....पडद्यामागे काय असेल??? शेवटी प्रकाश ने तो पडदा बाजूला केला....एक उग्र वास त्याच्या नाकात शिरला......प्रकाशने खिशातून रुमाल काढून नाकाला लावला.....विचित्र खोली....कसल्या कसल्या वेगवेगळ्या भाषेच्या मंत्रांनी,आकृत्यांनी भिंती रंगल्या होत्या....लाल भडक उजेड सगळीकडे पसरला होता त्यात काहीतरी जळत होतं त्याचा उग्र वास खोलीत पसरला होता.....तसा मागून एक हात प्रकाशच्या खांद्यावर आला....प्रकाश दचकला त्याने मागे वळून बघितले......लांब केस असलेला काळाकुट्ट धिप्पाड माणूस त्याच्या समोर उभा होता.....त्याच्या त्या हाताला रक्त लागले होते....आपले लांब केस बाजूला करून त्याने प्रकाशला बाजूच्या खुर्चीवर बसायला सांगितले.....प्रकाश त्याच्याकडे एकटक बघत होता....आजूबाजूचे भयाण वातावरण बघून त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते......अवतीभवती नजर फिरत असताना एका आवाजाने त्याची नजर समोर स्थिरावली
"अहो लेखक महोदय.....सैतानाचा इलाका आहे हा....आणि तुम्ही तर भयकथा लेखक ना??तरीही घाबरताय....तुमच्या कथा वाचतो मी.....तुम्ही खिळवून ठेवता लोकांना"
प्रकाशला घाम फुटला होता....घाम पुसतच तो बोलला
"नाही म्हणजे....ते....ते फक्त लिहतो.....बाकी असा अनुभव वैगेरे काही नाही....आपली चर्चा झाली होती ह्या विषयावर....म्हणजे मला एक प्रसिद्ध लेखक व्हायचं आहे आणि माझ्या मनाची अवस्था मी बोलून दाखवली होती की.....मला वाटलं काही अनुभव नवीन कल्पना ऐकायला मिळतील....पण"
"नाही म्हणजे....ते....ते फक्त लिहतो.....बाकी असा अनुभव वैगेरे काही नाही....आपली चर्चा झाली होती ह्या विषयावर....म्हणजे मला एक प्रसिद्ध लेखक व्हायचं आहे आणि माझ्या मनाची अवस्था मी बोलून दाखवली होती की.....मला वाटलं काही अनुभव नवीन कल्पना ऐकायला मिळतील....पण"
पण ह्या वाक्याचा अर्थ त्याने बरोबर समजला....खुर्चीवरून ताडकन पुढे येऊन त्याने समोरच्या टेबलावरची सिगरेट उचलली
पण....पण काय.....अहो साहेब तुम्हाला आता जरा स्पष्टच सांगतो.....हे जे इथे आला आहात ना....हे एक केंद्र आहे....सैतानी केंद्र....इथे येणारे लोक हे सैतानाचे उपासक आहेत.....बाहेर जे महागड्या गाड्या मधून आलेले लोक तुम्ही बघितले असतीलच.....ते ही एके काळी तुमच्या प्रमाणे भ्रमिष्ट फिरत होते....पण आता बघा सैतानाच्या कृपेने......"
प्रकाशने मान खाली घातली....कसला तरी विचार तो करीत होता.....समोरच्या पडद्यावरील हाडे एकमेकाला घासत होती त्याचा आवाज प्रकाशला बैचेन करत होता
"पण मला हे चुकिचे वाटते म्हणजे....ही जागा....ते बाहेरचे विचित्र लोक....आणि हे भयाण वातावरण....म्हणजे तुम्ही समजला असेल मला काय म्हणायचे आहे ते"
आपली सिगरेट विझवत त्याने प्रकाशकडे बघितलं
"हे बघा प्रकाश साहेब....आम्ही सैतानी उपासक जरूर आहोत....पण शब्दाचे पक्के आहोत....आम्ही जरी समोरच्याला वापरत असलो तरी ज्याचा वापर करतो त्याला कुठलीही हानी पोचवत नाही.....आमचे पूर्वज फक्त साधना करतात आणि त्याचा देह त्याला परत देतात पण मोबदल्यात त्याचे एक काम...मग ते कुठलंही असो पूर्ण करतात"
हे ऐकून प्रकाशच्या कपाळावर आठ्या फुटल्या....अनेक प्रश्न त्याच्या मनात थैमान घालत होते
"म्हणजे मी काही समजलो नाही....वापर....देह....मोबदला"
तसा तो उठून उभा राहिला त्याने आपले केस बाजूला केले....तो एका सैतानी पेंटिंग जवळ जाऊन उभा राहिला....
"सांगतो सगळं सांगतो प्रकाशराव.....कलियुग हे सैतानी युग मानलं जातं...त्यात लवकरच आस्तिक संपून जातील राहतील ते फक्त सैतान उपासक....आता आमच्या पंथात जे येतात त्याने काही वेळ म्हणजे मोजून 4 तास हे सैतानाला द्यायचे असतात.....एखाद्या हिप्नॉटीस प्रक्रियेप्रमाणे.....म्हणजे त्या संबंधित मनुष्याचा देह तो आतील सैतानी उपासक वापरत असतो....आता हे उपासक पूर्वी मोठे मांत्रिक होते पण काही कारणामुळे ते आता अशक्त आहेत....त्यांना सैतानाची भक्ती करून आपली ताकत वाढवण्यासाठी दुसरा मानवी देह लागतो.....आपली उपासना झाली की 4 तासांनी ते संबंधित व्यक्तीचा देह सोडतात आणि बदल्यात त्याच्या इच्छा पूर्ण करतात....पण ज्याने देह दिला आहे त्याला काहीही इजा किंवा त्रास होत नाही....आता बघा तुम्हाला प्रसिद्ध लेखक व्हायचं आहे....मग बघा काय करताय.....हा मौका परत नाही मिळणार....."
प्रकाश विचारात पडला....त्याच्या मनात नको ते विचार येऊ लागले....खरंच सैतानाशी सौदा करावा का?? हा प्रश्न त्याला पडला...त्याचं डोकं दुखत होतं....
प्रकाश डोकं धरून बसलेला बघून त्याने विषयाला हात घातला
"शंतनू मोरे.....त्याचाही मेसेज आला होता कालच मला....त्यालाही हे कथेचे वेड आहे तुम्हाला माहीत असेलच....तुमचाच प्रतिस्पर्धी ना तो....वाटेल ते करायला तयार आहे"
शंतनू मोरेचे नाव ऐकून प्रकाश ताडकन उभा राहिला....कारण शंतनू सुद्धा फेसबुक वर कथा लिहत होता...प्रकाशचे वाचक आता शंतनू कडे वळले होते.....आणि त्यात तो सैतानी ताकतीचे आवाहन करतोय म्हंटल्यावर प्रकाशची तळपायाची आग मस्तकात गेली
"मी तयार आहे....अगदी वाट्टेल ते करायला....पण मला अद्भुत शक्ती पाहिजे....बोला काय करावं लागेल..."
तो हसला आणि त्याला हाताने इशारा करून बाहेर बोलावले....प्रकाश त्याच्या मागून जात होता....तो घनदाट अरण्यात शिरत होता....झाडेझुडपे बाजूला करून प्रकाश त्याच्या मागे चालत होता....तो थांबला....समोर तीन मुर्त्या दिसत होत्या....ओबडधोबड पण सुस्थितीत होत्या.....अचानक त्याच्या तोंडून मंत्र सुरू झाले....तो गरागरा मान फिरवत होता......वातावरण भीतीदायक बनले.....अचानक त्याने प्रकाश चा हाथ पकडला....आणि खिशातून चाकू काढून क्षणार्धात प्रकाशाच्या हातावरून फिरवला....प्रकाश ओरडू लागला...पण त्याच्या अफाट ताकतीपुढे त्याचा निभाव लागत नव्हता....हातातून रक्त वाहू लागलं....त्याने तो रक्त सोडणारा हात त्या मूर्त्यावर पकडला त्या मूर्त्यावर रक्ताचा अभिषेक होऊ लागला.....त्या काळ्याकुट्ट दगडी मुर्त्या प्रकाशाच्या रक्ताने लालभडक झाल्या.....काही वेळाने त्याने प्रकाशचा हाथ सोडला....काही वेळ निघून गेला....मंत्र चालू होते...मंत्र म्हणत तो डोलत किंचाळत होता..अचानक एका मूर्तीने पेट घेतला ....प्रकाश घाबरला होता असा भयाण चमत्कार तो पहिल्यांदा बघत होता....त्याची पावले मागे मागे सरकू लागली......त्याने एकनजर प्रकाश कडे बघितलं.....अचानक एक स्मितहास्य केलं त्या हास्याबरोबर त्याचे ते वाढलेले सुळे प्रकाशला दिसले... एक प्रकाश बाहेर पडून प्रकाशच्या छातीवर आदळला....प्रकाश दूर जाऊन पडला....त्याची शुद्ध हरपली होती..........तो धापत पडला होता आकाशाकडे बघत एक वेगळंच समाधान त्याच्या चेहऱ्यावर फुललं होतं.....त्याने आपल्या गळ्यातील लॉकेटचा मुका घेतला...आणि दूरवर पडलेल्या बेशुद्ध अवस्थेत असलेल्या प्रकाश जवळ तो पोहोचला.........(क्रमशः)