लेखन:-शार्दुल सुधीर मोडक..
समज......
सकाळची वेळ रेडिओ वर भक्ती गीते चालू होती,गोविंदराव खुर्चीवर बसून गरम गरम चहाचा आस्वाद घेत होते,थंडी चांगलीच जाणवत होती,गोविंदराव चहा पिऊन वर्तमानपत्र वाचू लागले,अरे अरे अग आशा हे बघ काय बातमी आलीये वर्तमान प्रत्रात!!!अहो काय झालं का एवढे किंचाळत आहेत??? अशा गोविवदरावांची पत्नी स्वयंपाक घरातून बाहेर येत म्हणाली!!अग काही नाही ही बातमी वाच!!!
काल संध्याकाळी दुचाकीवर स्टंट करताना झालेल्या अपघातात पंचवीस वर्ष्याचा तरुण मरण पावला!!काय अवस्था झाली असेल त्याच्या आई वडिलांची देवास माहीत!!आणि एकुलता एक मुलगा होता,गोविंदराव खिन्न पणे म्हणाले!!
काल संध्याकाळी दुचाकीवर स्टंट करताना झालेल्या अपघातात पंचवीस वर्ष्याचा तरुण मरण पावला!!काय अवस्था झाली असेल त्याच्या आई वडिलांची देवास माहीत!!आणि एकुलता एक मुलगा होता,गोविंदराव खिन्न पणे म्हणाले!!
लोकांचे जाऊद्या स्वतःच्या मुला कडे लक्ष द्या!!काल पण कारट दारू पिऊन आलं होतं,आजून नाही वेळ गेली नाही,बोला अमेय शी !!आशाबाई रागाने गोविंरावाना म्हणाल्या!! हो बोलतो आता बोलावेच लागेल,उदास होऊन हातातील वर्तमानपत्र टेबलवर ठेवत गोविंदराव म्हणाले!!!इतक्यात गोविंदरावांचा मोबाइल वाजला,आता सकाळी सकाळी कोणाचा फोन आला म्हणत वैतागून गोविंदरावांनी फोन उचलला,हॅलो काका मी श्रीपाद बोलतोय हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने बाबांचे निधन झाले आता थोड्यावेळा पूर्वी !!!श्रीपाद फोनवरच रडू लागला!!काय ???गोविंदराव जागेवरच उडाले,त्यांचा विश्वास बसेना!!श्रीपाद चे बाबा म्हणजे गोविंदरावांचा सख्खा लहान भाऊ विकास,वय जेमतेम पंचे चाळीस वर्षे,विकास त्याची बायको आणि एकुलता एक मुलगा असे त्याचे कुटुंब, स्वभाव लाघवी,मन मिळाऊ, समजूतदार,सांगळ्याशी प्रेमाने वागणारा,हॅलो काका बोला ना काही तरी!!श्रीपदच्या बोलण्याने गोविंदराव भानावर आले,श्रीपाद काळजी करू नको मी आलो, आई ला सांभाळ बेटा,गोविंदरावांनी फोन ठेवला,आहो काय झालं??रडायला काय झालं???बोला काही तरी??अशाबाईंनीचा संयम सुटत चालला होता..
आशा विकास गेला आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचे निधन झाले,गोविंदराव रडू लागले,आशा बाईंनीचे डोळे पाणावले,काय भाऊजी गेले!!!हो आशा गेला विकास!!!आशाबाईंनी गोविंदरावांना धीर दिला,गोविंदरावांनी स्वतःला सावरले,आणि दोघे ही विकासाच्या घरी जाण्यासाठी निघाले!!!काही वेळातच दोघे विकास च्या घरी पोहचले,विकासाची बायको म्हणजे राधा विकासाच्या निर्जीव देहाकडे टक लावून पाहत बसली होती,गोविंराव आणि अशाबाईंनी पाहून तिच्या स्वतःवरील ताबा सुटला,ती जोरजोरात रडू लागली,आक्रोश करू लागली,आशाबाईंनी तिला कसबस सावरलं,रडून रडून तिचे डोळे सुजले होते....गोविंदराव सगळं असह्य होत होते,पण श्रीपाद आणि राधाला ते धीर देत होते......
एव्हाना शेजारी पाजारी नातलगांनी तिरडी बांधली होती,सर्व तयारी झाली,राम नाम सत्य हे म्हणत अंत्ययात्रा निघाली,थोड्याच वेळात अंत्ययात्रा म्हशानभूमीत पोहचली,म्हशानभूमीत गर्दी होती,आधीच्या तीन जणांचे अंतविधी होयचे होते,
म्हणून गुरुजींनी गोविंदरावांना थांबण्यास सांगितले,तीन जणांच्या तिरड्या रांगेत ठेवल्या होत्या,अंतविधीला वेळ लागणार म्हणून आलेले लोक आपला आपला गट करून उभे राहिले, कुठे तरी विसावा घ्यावा म्हणून गोविंदराव बसण्यासाठी जागा शोधू लागले,गर्दी असल्यामुळे बसायला कुठेच जागा नव्हती,काही अंतरावर एक झाडा खाली एक तरुण मुलगा बसला होता,गोविंदराव त्या मुला जवळ जाऊन म्हणाले,तुझी हरकत नसेल तर बाळा मी बसू का थोडया वेळ येथे???आहो काका विचारताय काय ???बसा निवांत!!!तो मुलगा गोविंदरावांकडे हसत बघत म्हणाला!!!

काही वेळ शांततेत गेल्यावर तो मुलगा म्हणाला,काका तुमचं कोण गेलं???हम्म माझा सख्खा लहान भाऊ गेला,खूप प्रेमळ स्वभावाचा होता!!गोविंदराव खिन्न होऊन म्हणाले!!सॉरी काका!!अरे नाही अरे असू दे!!मरण काय आपल्या हातात असत का ???त्याच बोलावं ण आलं की निघायचं !!रिकाम्या हातानी दुसरं काय!! आयुष्य भर मिळवलेले प्रेम,माया,आपुलकी,चांगुलपणा, हीच आपली शिदोरी जी शेवट घेऊन जायची!!! तुम्ही बरोबर बोलताय काका,तो मुलगा गोविंदरावांकडे पाहत म्हणाला!!!तुझे नाव काय रे ?? गोविंदरावानी त्या मुलाला विचारले,मी मुकेश आपटे!!छान नाव आहे तुझे!!तुझ्या वयाचा मुलगा आहे माझा!!पण वाईट संगतीने घात केलाय त्याचा,दारू काय सिगारेट काय, पूर्ण वाया गेलाय तो,माझं ही ऐकत नाही,एकुलता ऐक मुलगा म्हणून मला आणि माझ्या बायकोला काळजी वाटती त्याची,आम्ही गेल्यावर कसं होणार त्याच....गोविंदरावांचे डोळे पाणावले...
काका एक बोलू का??तुम्हाला राग येणार नसेल तर??मुकेश नी गोविंदरावांना म्हणाला!!हो बोल की!!काका त्याच्या या पारिस्तिथीला त्याच्या इतकेच तुम्ही पण जवाबदार आहेत,वेळीच तुम्ही त्याची चूक दाखवून दिली असती तर ही वेळ आली नसती,याचा अर्थ मी त्याच्या वागण्याचे समर्थन करत नाही,तू चुकलाच आहे,पण काका विचार करा,आज काल आपण पैसे मिळवण्यासाठी रक्ताचं पाणी करतो,कुणासाठी आपल्या मुलाबाळांसाठी,पण कधी निवांत बसून त्याच्याशी बोललो का आपण??कधी त्याला बरोबर आणि चूक यातील अंतर समजावून सांगितले आहे का??आई वडील दोघे ही नोकरी करतात मग घरात एकट्या राहणाऱ्या मुलावर त्या एकटेपणाचा किती विचित्र परिणाम होत असेल,
आपण आपल्याला मुलाला चांगले संस्कार देण्यात अपयशी ठरतो,आणि मूल ही आपल्या आई वडिलांना काहीच किमंत देत नाही,वेळोवेळी त्यांचा अपमान करतात,मग आपण मुलाला दोष देत बसतो,हे कुठं तरी थांबावे लागणार आहे,सुरवात आपल्या पासूनच करू यात!!येथून गेल्यावर एक वडील नाही एक मित्र म्हणून बोला आपल्या मुलाशी, बघा फरक पडेल,एकदा वेळ गेली की पश्चाताप करण्या पलीकडे आपण काही करू शकत नाही,मी खूप लहान आहे तुमच्या पेक्ष्या,लहान तोंडी मोठा घास घेतला,मला माफ करा !! मुकेश नी गोविंदरावांचे पाय धरले!!

अरे उठ उठ हे काय करतो मुकेश!!इतक्या लहान वयात एवढी समज???तुझं कौंतुक करावे तेवढे कमी आहे,वेळ निघून गेली की काही उपयोग नसतो या समज असण्याचा!!म्हणजे मी नाही समजलो!! गोविंदराव प्रश्नार्थक नजरेने पाहत मुकेशला म्हणाले,जाऊद्या काका हे पहा कोण तरी बोलवत आहे तुम्हाला!!!
गोविंदरावांनी पाहिले त्यांचे नातलग बोलवत होते,चाल मुकेश येतो मी तू सांगितल्या प्रमाणे माझ्या मुलाशी वडील नाही तर मित्रा म्हणून बोलेल,त्याला सगळ्या व्यसनातून बाहेर काढेन,,आणि हो तुझे कोणी गेली आहे का ??हो काका!!मग झाला का अंतविधी ??गोविंदराव जागेवरून उठत म्हणाले,नाही काका तुमच्या भावाच्या मागे माझा नंबर आहे!! बर बर चाल येतो मी म्हणत गोविंदराव निघाले!!नातलग सांगत होते,आता आपला नंबर आहे,गोविंदरावानी होकारार्थी मान हलवली!! अरे आपण मुकेशला विचारायचे राहिले की त्याच कोण गेलं ते???गोविंदराव स्वतःची पुटपुटले,त्यांच्या मागे एक पनाशीतली व्यक्ती आक्रोश करत होती,गोविंदरावांनी शेजारी उभ्या असलेल्या व्यक्तीला विचारले,त्याने सांगितले काल संध्याकाळी दुचाकीवर स्टंट करताना त्यांचा तरुण मुलगा गेला....

गोविंदरावांना आठवले सकाळी वर्तमान पत्रात याचीच बातमी वाचली होती,सहज म्हणून गोविंदरावांनी त्या मुलाला पाहावे म्हणून त्याच्या तिरडी जवळ गेले,तशी त्यांच्या पाया खालची जमीन सरकली,त्या तिरडी वर मुकेश होता,गोविंदरावांना कळून चुकले आपण इतक्या वेळ मुकेशच्या आत्म्या बरोबर बोलत होतो,त्याला पश्चाताप झाला त्याच्या वागण्याचा हे त्याला उमजले,पण वेळ निघून गेली होती,वेळ गेल्या वर त्याला समज आली,आपल्या बाबतीत घडले ते माझ्या मुलाच्या बाबतीत घडू नये असे त्याला वाटत असावे,म्हणून तो मला सांगत होता,
गोविंदरावांनी मागे वळून पाहिले मुकेश त्याच झाडाखाली बसला होता,त्याच्या चेहऱ्यावर समाधान होते,गोविंदरावांकडे तो हसत पाहत होता.....
गोविंदरावांनी मागे वळून पाहिले मुकेश त्याच झाडाखाली बसला होता,त्याच्या चेहऱ्यावर समाधान होते,गोविंदरावांकडे तो हसत पाहत होता.....
समज.......