अघोर भाग ९
लेखक कनिश्क हिवरेकर....
“ कुणाच्या नावाने आलय ते पत्र जखोबा...” सरपंचाने जखोबाला विचारले... “ मालक हे तर...विश्वासरावच्या नावाने आलय पत्र....” जखोबा उद्गारला...घडले असे विश्वासच्या घरी त्याची दुसरी भेट घेण्यासाठी जयदेव तिथे जाऊन पोहोचला होता परंतु नकळत आणि योगायोगाने सखारामने पाठवलेली तार ती जयदेवच्या हाती लागली...जयदेवने पत्रपेटीतून ती तार पावसाच्या पाण्याने भिजूनये म्हणून हातात काढून घेतली तरी देखील तिचा काहीसा भाग पाण्याने भिजला होता त्यामुळे आतमध्ये असलेल पत्र बाहेर आल होत आणि त्यातील मजकूर देखील नजरेस पडत होता. जयदेवाने घराच्या आजूबाजूच्यांना विचारले तेव्हा त्याला समजून आले कि हे सर्व लोक अगदी सकाळीसकाळीच गाडी आणि सामान घेऊन निघून गेले... आणि त्यावरती नाव वाचले जे संध्याच्या नावाने कोणी तरी सखामामा ने पाठवले होते. काय असेल यामध्ये मनात किंचित संकोच ठेवतच जयदेवने ते पत्र उघडले आणि एक एक करून त्या पत्रात लिहिलेल्या ओळी वाचू लागला...त्यात लिहिले होते कि... “ पोरी आजपर्यंत मी तुला तुझ्या आईबद्दल तुझ्या जन्मदात्या बद्दल काहीही सांगितल नाही लहानपणी तुझ्या खेळण्या बागडण्याच्या आयुष्यात तुला रमू दिल कधी तुला तुझ्या आईबापाची आठवण नाही येऊ दिली...पण बरेच रात्री होऊन गेल्या अश्या ज्यात तुझी आई, माझी ताई सावित्री.... रोज माझ्या स्वप्नात येते...तिचा तो दीनवाणा चेहरा तिची ती दुर्दैवी अवस्था....”
“ दुर्दैव ?” पत्र वाचताना जयदेवच्या मुखातून तो शब्द बाहेर पडला... “समथिंग इज goin on...” जयदेव पत्र हातात घेऊन उद्गारला म्हणत जयदेव तिथेच खाली पायरीवर बसला आणि एक एक ओळ तो अगदी लक्षपूर्वक वाचू लागला...इतक्या वर्षांनी जयदेवाने आपल्या मित्राची भेट घेतली होती आणि पहिल्या भेटीतच त्याला जाणवून आले कि विश्वास आणि संध्याच वेगळच जग आहे...हि चिट्ठी येणे...भेटलेल्या रात्री विश्वासच ते संध्याच्या बाबतीत सांगणे....हा प्रकार नक्कीच कुठे न कुठे तरी जुळून येतो आहे...जयदेव पत्र वाचता वाचता थांबला आणि विचारात पडला... “ या आठवड्यात सावित्रीताईच श्राद्ध आहे...तोच एक मार्ग आहे पोरी...तोच एक मार्ग आहे तिच्या मुक्तीचा...तुझ्या जुन्या आठवणी तुलाही निद्रेत येऊन जागवतात...आणि त्याच मला हि....जसे कि ती मला बोलवतेय मला विचारतेय तिची पोर.... तिची संध्या...” जयदेव एका एका ओळीसकट त्या चक्रात गुंगला जात होता ज्याचा त्याच्याशी काहीएक संबंध नव्हता परंतु मित्रत्वाच्या नात्याने त्याला आतमध्ये ओढायला सुरुवात केली होती. “याचा अर्थ विश्वास सांगत होता ते खर होत...पण हे मुक्ती, मोक्ष हे आजही ? या काळात ?” वाचता वाचता जयदेव पत्राच्या शेवटी आला...
“या पत्राच्या पत्त्यावरच मी भेटेन आणि आजवर मी तुझ्या पासून दडवून ठेवलेलं....... विश्वासरावाना कळव आणि अनुला प्रे...” जयदेव पुढचा शब्द वाचू शकला नाही कारण पावसाच्या पाण्याने तिथे शाही विरघळून गेली होती. “oh no...! काय लिहील असेल हे...?” जयदेव ते वाचण्याचा प्रयत्न करू लागला पण स्पष्ट काही दिसत नव्हत जयदेवने ते उचलून प्रकाशात धरून पाहण्याचा प्रयत्न केला तसा अंधुक अंधुक त्याला एक शब्द दिसून आला.... “ गुपित....?”
जयदेवने हातातले पत्र खाली सोडले हात त्याचा गुडघ्यावरच लटकत होता त्यात पत्र होत. ते पत्र वाचून झाल्यावर जयदेवाचा हसरा चेहरा गंभीर झाला होता अगदी दीर्घ विचारात गुंगला होता. “ काय असेल ते गुपित ? संध्या आणि विश्वास दोघे.... तिकडेच त्याच गावी तर गेले नसतील....या पत्त्यावर ? पण हि चिट्टी तर मीच उघडलीय...oh my god...! तेव्हा जयदेवला आपलीच गोष्ट आठवली जी त्याने विश्वासला सांगितली होती... “विश्वास जर तुला संध्याच्या त्रासाचा उपचार करायचा असेल तर त्या त्रासाच्या मुळा शी पोचायला हव...”
“या सर्वांचा या चिठ्ठीचा संध्याच्या त्या स्वप्नांचा आणि वीस वर्षापूर्वीच्या गुपिताचा आणि माझ्या मित्राचा व त्याच्या कुटुंबाचा छडा लावायचा असेल तर एकच मार्ग उरतो तो म्हनजे रत्नापूरकडे कूच...या आधी विश्वासला सावध केल पाहिजे... ”
जयदेवने हातातली चिठ्ठी मुठ्ठीतच बंद केली...आणि आपल्या नियतीने नेमून दिलेल्या एका विधिलिखित चक्रव्युव्हांच्या भेदासाठी मार्गस्थ झाला...”
मानसशास्त्र, तर्कशास्त्र, भावना आणि विज्ञान या सर्वांचा सामना त्यांच्याच सिमेपलीकडे विधात्याने रचून ठेवलेल्या अज्ञात सकटांशी होणार होता फासे पडले होते खेळ सुरु झाला होता.
***
ढगांच्या गडगडाटीने वाड्याच बाह्य रूप निळसर काळसर प्रकाशात एखाद्या घात घालून डोळे मिटून बसलेल्या सैतानासारख वाटत होत. वाड्याच्या चहू बाजूनी जंगलाचा घेराव होता दूर दूर पसरलेली गर्द झाडी आणि त्यातच वसला होता तो भयाण वाडा...दिवसभराच्या चालण्याने सर्वजण थकून झोपी गेले होते. वाड्याच्या ओसरीवरच बकुळा गोधडी पांघरून पडली होती. तिच्या जवळच एक कंदील जळत होता. झोपण्याआधी सखारामने वाड्याचा मुख्य दरवाजा आतमधूनच एक पोलादी कडी लावून बंद करून घेतला होता. “ बाईसाहेब कशाला आल्या असतील बया या गावात हा काय वाडा दिसतोय होय...अस वाटतय जस कोण भूतच राहतय इथ...” बकुळाच्या म्हणण्या सोबतच नजाणे कुठून वाऱ्याचा हलकासा झुळूक आला आणि तिच्याजवळच्या कंदिलाची ज्योत फडफडली...बकुळा ते पाहून जागीच उठून बसली... “ अग बया...! ह्ये काय झाल ?” बकुळाने आपला हात वाढवत कंदिलाची ज्योत वाढवली आणि डोळे मिटून निजण्याचा प्रयत्न करू लागली. परंतु खिडक्यांच्या कुठल्यातरी खाचेतून वाऱ्याची शिळ बनून तिच्या कानात वाजत होती. बकुळाचा डोळ्याला डोळा लागलाच होता कि तिला अचानक वाड्यात थंडी आणखीनच जास्त वाढली... “ सगळ दरवाज तर बंद केल मग गारवा कुठून सुटलाय....?” बकुळा हातात कंदील उचलूनच आपल्या जागची उठली...तसे समोरच्या ओसरीपलीकडे पाहून ती जरा दचकलीच कारण सखारामने तिच्या डोळ्या समोरच वाड्याचा मुख दरवाजा कडी घालून बंद केला होता.आणि आता मात्र तो दरवाजा बकुळाच्या डोळ्यासमोर सताड उघडा पडलेला दिसत होता. आणि वाड्या बाहेरच काळोखात पसरलेलं ते जंगल त्याच दरवाज्यातून बर्फाच्या गारठ्याचा वारा भूतासारखा वाड्यात शिरू लागला होता. बकुळा स्वतःशीच पुटपुटली... “ह्यो कसा काय उघडला ?” बकुळाने हातात कंदील घेतला आणि जाऊन तो दरवाजा बंद केला व त्याला कडी घातली...आणि माघारी फिरली तशी दोन चार पावले पुढे गेली होती न होती कि बकुळाच्या कानावर तो आवाज आला...
“कर्रर्रर्रर्रsss....” बकुळाचे पाय मात्र आता जमिनीत धसल्यासारखे झाले तिच्या पावलांना जणू दगड बांधले गेले तरीही तिने हळू हळू मागे वळून पाहिले...”हः...” मागे वळताचक्षणी बकुळाच्या तर काळजाचा धोकाच चुकला फुफुसात तिला जणू श्वास नव्हे तर विषारी हवा भरल्यासारखे वाटू लागले अंगातून सररर सररर करत मुंग्या आल्या माथ्यावरची त्वचाछिद्रे उघडून त्यामधून घामाचे ओस तिच्या कपाळावर उमटले...कारण परत एकदा तो दरवाजा जसाच्या तसा उघडला होता. बकुळाच्या हातातला कंदिलाचा काच आता थरथरू लागला...आणी बकुळाचा कंदीलावरचा हात सुद्धा दरवाजा बंद करण्याखेरीज काहीएक मार्ग नव्हता पण बंद तरी कितीवेळा करणार हि तिसरीवेळ होती बकुळाने आपल्या जागेवरूनच निश्चित केले कि बाहेर कोणी उभ तर नाही...तसेच सावकाश चालत ती पुन्हा तिसऱ्यांदा त्या दरवाज्यात पोहोचली...बकुळाने हातातला कंदील तिथेच ठेवला आणि दोन्ही हातांनी दरवाजाची कवाडे लावायला सुरु केली....दरवाजा बंद व्हायला आलाच होता कि दोन्ही दरवाज्याच्या फटीमधून तिला दिसून आले कि एक काळसर आकृती माणसाच्या आकराची हुबेहूब दरवाज्याच्या अगदी दरवाज्याच्या समोरून चालत चालत गेली...जणू एखादा माणूसच तिथे वावरत होता....दरवाजा बंद करते वेळीच बकुळाने ते पाहिले आणि चटकन अर्धा बंद केलेला दरवाजा उघडला व म्हणाली.... “ कोण हाय र तिकड ?” असे म्हणत ती बाहेर आली परंतु बाहेर पडल्यावर मात्र वाड्याच अंगण तिला अगदी सामसूम दिसल नजरेसमोर घनदाट जंगल पसरल होत कुठेतरी कोपऱ्यात घुबडाच्या “ व्हुऊ व्हूउ....” करत घुत्कारण्याचे आवाज येत होते रातकिडे किरर्र किरर्र किरर्र करत रात्रीची शांती भंग करत होते...बकुळा दिवा घेऊन चौकटीतून बाहेर आली “ कोण हाय तिकड...? ए कोण हाय ?” बकुळाच्या वाढत्या आवाजात एक भीतीचा कंप होता थरथरतच पण आवाज वाढवत ती त्या संदिग्ध माणसाला शोधत होती. बघता बघता तिची नजर जंगलाच्या घनदाट उंच उंच झाडांवरती पडली... आजूबाजूला कुणीच नाही हे तिने पाहिले पण जेव्हा ती माघारी जायला वळली तसे तिच्या डाव्या बाजूला वाड्या पासून काही अंतरावरच एक विहीर दिसत होती. आणि त्याच विहिरीच्या पलीकडे तोच इसम बकुळा दुरून त्याला नीट पाहू शकत नव्हती बस एवढच म्हणत ती त्याला पाहायला पुढे पुढे जाऊ लागली.... “क्क् कोण हाय ?”
“पुत्रांदी देक्षाय भवती..त्राहीम्न रगतो पर्जीतो....”
बकुळा जसे जसे त्या विहिरीजवळ जाऊ लागली त्या विहिरीच्या आतमधून एक भयंकर करडा आवाज बाहेर पडू लागला कोणीतरी अदैवी दानवी अघोर मंत्र उच्चारणा करत कोणाला तरी हुकुम सोडत होत...
“बघsss बघsss ....वीस वर्षांनी कुणीतरी भक्ष्य आलय बघ.....”
बकुळा विहिरीपासून दूर उभी ते ऐकत होती परंतु विहिरीच्या आतमध्ये डोकावून बघण्याची तिची हिम्मत होत नव्हती....विहिरीच्या पल्याड उभी ती काळी आकृती आता हळू हळू आपल्या वास्तविक रुपात येऊ लागली...त्याच्या चेहऱ्यावर जबडा अवतरू लागला सुळ्यासारखे तीक्ष्ण दात बाहेर आले डोळ्यांच्या खोबण्या भयंकर बुभळ विरहीत पांढऱ्या गाभ्याने भरले....हाताचे पंजे त्याला लांबलचक अनुकुचीदार नखांची बोटे...
“ माझ्या लाडक्या....! भूक भागव रे तुझी....” त्या विहिरीतून परत एकदा तो आवाज आला..ती आज्ञा सुटताच क्षणी ते जे काही उपद्रव होत ते एखाद्या माकडासारख्या उड्या घेत ढांग टाकत बकुळाच्या दिशेने अगदी किनराच्या हास्यासकट चिरकाव करत आले...मरण आपल्या दिशेने धावत येतय हे बघूनच बकुळाच्या भीतीने तिच्या आत्म्याला तिच्या शरीरापासून वेगळ केल ह्रदयाचा एक जोराचा धक्का तिला बसला आणि जागेवरच तिने आपले अंग सोडून दिले...तिच्या बंद होत्या डोळ्यांना फक्त शेवटच एवढच दिसून आल एक भयानक जबड्याने तिचा चेहरा आपल्या सुळ्यामध्ये पकडला...
“हिहीईहि.....रगताचा पाट अन मांसाचा घास...आता कुठ धावणार तू ....हाय या काळोख्या संग गाट...ईइहिहिहि...”
***
“बकुळा ? बकुळामावशी ?” सकाळी सकाळी संध्या आपले स्नान अंघोळ उरकून खाली येऊन बकुळाला शोधत होती कारण सर्वांची नाश्ता चहा करायची वेळ होती. त्या भयान रानाच्या जंगलात सूर्याचा एक सुद्धा कवडसा यायला परवागनी नव्हती आणि असणार तरी कशी काळोखाच साम्राज्य होत ते...संध्या बकुळाच्या नावे हाका मारत होती तेव्हा सखाराम तिला भेटला... “ काय ग पोरे ? कुणाला शोधतेय ?”
“मामा बसून तुमच्याशी खूप काही बोलायचंय पण आता विश्वास आणि अनु दोघांना सवय आहे उठल्यावर नाश्ता करायची निदान जे भेटेल ते बनवेन पण हि बकुळा...मामा ?”
“हा बोल कि पोरे ?”
“मामा इथ देवघर कुठंय...वाड्यात ?” संध्याने देवघरा बद्दल विचारताच सखाने एक नजर तिच्यावर टाकली आणि एकवेळ संपूर्ण वाडा त्याने नजरेखाली घालून घेतला...
“ पोरे! तुला या वाड्यात एक सुद्धा देवघर भेटायचं नाही...”
“काय ? का ? असे का मामा ? देवघर नाही म्हणजे ?आणि हे..”
तोच वाड्याच्या दरवाज्यावर कुणाची तरी थाप पडली.... “सखा...? ओ सखाभाऊ हे बघा ...” वाड्याच्या दरवाज्यात एक माणूस धापा टाकीत उभा होता जरासा म्हातारा मध्यमवयीन दिसयला....तो जखोबा होता. त्याच्या हातात ती तार होती. ते पत्र ज्याच्यावरती विश्वासच नाव लिहील होत...
“हि बघा...तुमच्या शहराकडून एक तार आलीय....” ते पत्र आलेला पाहताच सखा आणि संध्या दोघेही ज्खोबाजवळ गेले “ये कि आत जखोबा असा बाहेर का थांबलायस..”सखा म्हणाला...
“ नाही मी इथच या चौकटीच्या बाहेर बरा हाय...आतमध्ये त्याच्या वाड्यात तर नाहीच नाही...”संध्याने त्याच्या कडे भुवई आकसत पाहिलं आणि त्याच्या हातातल पत्र त्याने दिल्यावर संध्याने ते पाहिलं आणि म्हणाली “कोणाला माहिती झाल असेल विश्वास बद्दल आणि आमच्या बद्दल ती तार हातात घेऊन संध्या त्या व्यक्तीच नाव शोधू लागली आणि...ते नाव होतं
“जयदेव ?”
क्रमश:
MARATHI HORROR STORY ALL PARTS ,BHAYKATHA AGHORI,PART-1 , PART-2, PART-3 ,PART-4 , PART-5 , PART-6 , PART- 7, PART-8 ,PART-9
PART-10 ,PART-11 ,PART-12 ,PART-13,PART14,PART-15,PART-16, PART-17,END OF THE STORY -AGHOR-BHUTACHI GOSHT PART-18