कलावंतीण -३
पुढे असेच काही दिवस गेले. यशवंत वेळ मिळेल तेव्हा कधी रामा सोबत तर कधी एकटाच तमाशा बघायला जात होता. त्याच्या ठराविक जागेवर बसून समोरील कलाकारांना दाद देत असायचा, आपली नृत्य कला सादर करताना 'ती' सुद्धा त्याच्या कडे विशेष लक्ष ठेवून असायची,दोघांची नजरानजर आणि खाणाखुणा सुद्धा सुरु असायच्या.
घरी परत आल्यानंतर सुद्धा यशवंत आजकाल बैचेन दिसत होता. मागील काही दिवस तो एका वेगळ्या विचारात गुंतला होता, अखेर त्या दिवशी सकाळीच तो वाड्यातून बाहेर पडला.
वेशी जवळच्या महादेव मंदिरात दर्शन घेऊन मंदीराच्या मागे जाऊन थांबला, तेथून रस्ता नदीच्या काठाकडे जात होता.
नदीवर स्नान करण्यासाठी आणि कपडे धुण्यासाठी सर्व तमासगीर बायका त्या रस्त्याने नेहमी दररोज ये जा करत असत.
हास्यविनोद आणि गलका करत त्या बायकांचा घोळका तेथे आला. रत्ना ने काही अंतरावरूनच यशवंतला तेथे उभे असलेले पाहिले होते, त्यामुळे ती इतरांपेक्षा थोडी मागेच राहिली. जवळ गेल्यानंतर तो आपल्याशी काहीतरी बोलेल, अशी अपेक्षा तिला होती. पण तो काहीही बोलला नाही, ती पण न पाहिल्या सारखे करुन पुढे निघालीच पण तेवढ्यात त्याने अचानक तिचा हात पकडला. पुढे काही अंतरावर गेलेला बायकांचा घोळका जागेवरच थांबला.
"पाटील हात सोड; सख्या बघतायेत."
तिने हात सोडवण्याचा प्रयत्न केला, पण त्याची पकड घट्ट होती.
"येवढी घाबरतीस व्हयं सख्यांना?"
"तुज्या नादाला लागले तर माजी बदनामी होईल, लोकं वाईट नजरेनं बघतील, कोणी लगीन सुद्धा करणार नाही माज्याबरं"
बायकांच्या कुजबुजण्याचा अस्पष्ट आवाज त्यांच्या पर्यंत पोहोचत होता.

"दुसरं कुणी करणार नाही; पण मीच तुझ्या बरं लगीन केलं तर?"
"आपलं लगीन समाजाला मान्य होणार नाई, तुझा आन माझा मेळ बसत नाई."
"तुज्या पिरेमापुढं मी समाजाला मानत नाही, एकदा ईस्वास ठेव, धरलेला हात सोडणार नाही. फडाच्या पालावर नाही तर वाड्यात राणी बनुन राहशील. तुला पायात चाळ बांधून सगळ्यांसमोर नाचावं लागणार नाही, दोघजण आपल्याच शेतात राबू आपण. . कदी नाचायची इच्छा झालीच तर बंद खोलीत नाचत जा, तुला बघणारा तिथं फक्त मी एकटाच असल.. समाजात कायम मान वर करुन चालशील, आणि तवा पण ह्या तुज्या सख्या अशाच दुरुन तुला पाहत राहतील.."

रत्नाने दोन क्षण यशवंतच्या डोळ्यात पाहिले, एकदा दुरवर उभ्या असणाऱ्या सख्याकडे मान वळवून पाहिले आणि पुढच्या क्षणाला अलगदपणे यशवंतला मिठी मारली.
★★★★★★★★★★★★★★★
"ओह! ही त्या यशवंत आणि रत्नाची लव्हस्टोरी आहे का?" हिमांशू ने मला प्रश्न विचारला.
"तसं पण म्हणता येईल; तुम्हा आजकालच्या मुलांना पटत नसल्या तरी आमच्या काळात अशाच साध्या सुध्या लव्हस्टोरीज रंगत असायच्या"
"तसं पण म्हणता येईल; तुम्हा आजकालच्या मुलांना पटत नसल्या तरी आमच्या काळात अशाच साध्या सुध्या लव्हस्टोरीज रंगत असायच्या"
"नाना! चला आपण त्या झाडाजवळ जावून यायचे का एकदा? मला एकदा जवळून पाहायचयं" हिमांशू उठून उभा राहिला.
"नको रे, आता अंधार पडेल. आपल्याला घरी परत जायचय ना? चल मग" आम्ही परत चालत गावाच्या दिशेने निघालो.
"नाना! पण मग पुढे काय झाले? यशवंत आणि रत्नाचे मॅरेज झाले होते का?"
"नको रे, आता अंधार पडेल. आपल्याला घरी परत जायचय ना? चल मग" आम्ही परत चालत गावाच्या दिशेने निघालो.
"नाना! पण मग पुढे काय झाले? यशवंत आणि रत्नाचे मॅरेज झाले होते का?"
"लग्न? ते एवढे सोपे होते का? त्या दोघांची कितीही इच्छा असली तरी, समाजातील दोन वेगवेगळ्या स्तरांतील लोकांनी एकमेकांशी लग्न संबंध जोडणे हे त्याकाळी कोणालाही मान्य नव्हते."
"का पण? जर ते दोघे एकमेकांना लाईक करीत असतील तर मगं त्यांचे लग्न व्हायला काय हरकत होती?"
नव्या पिढीतील हिमांशूच्या प्रश्नावर माझ्याकडे उत्तर नव्हते.
"का पण? जर ते दोघे एकमेकांना लाईक करीत असतील तर मगं त्यांचे लग्न व्हायला काय हरकत होती?"
नव्या पिढीतील हिमांशूच्या प्रश्नावर माझ्याकडे उत्तर नव्हते.
"सांगा की नाना, मगं पुढं काय झालं? यशवंत ने रत्नाला फसवले होते का?"
हिमांशूची उत्सुकता वाढली होती, त्यामुळे परत एकदा माझ्या स्मरणशक्ती वर ताण देऊन मी माझ्या बालवयात अनुभवलेली ती कथा पुढे सांगण्यास सुरुवात केली.
हिमांशूची उत्सुकता वाढली होती, त्यामुळे परत एकदा माझ्या स्मरणशक्ती वर ताण देऊन मी माझ्या बालवयात अनुभवलेली ती कथा पुढे सांगण्यास सुरुवात केली.
"काहीजण असे म्हणतील सुद्धा की, यशवंतने रत्नाला प्रेमामध्ये धोका दिला होता; पण मी असे म्हणणार नाही, कारण एकंदरीत बराचसा घटनाक्रम मी स्वतः पाहिलेला होता."
★★★★★★★★★★★★★★★★★
यशवंतने आता तमाशाला जाण्याचे बंद केले होते. कारण जिच्यासाठी तो तमाशाला जात होता, ती काही ना काही कारण काढून अधेमधे स्वतःहून त्याला भेटण्यासाठी येत होती. स्वयंपाकासाठी लागणारे सरपण गोळा करण्यासाठी रानात जाणाऱ्या रत्नाला आता आधीपेक्षा जास्त वेळ लागत होता, याकडे कोणाचे लक्ष गेले नाही, किंवा लक्ष गेले असले तरी कोणी तिला त्याबद्दल विचारणा केली नाही. तिच्या तमासगीर सख्यांच्या सततच्या कुजबुजी ला तितकेसे महत्त्व देण्याची गरज तिला वाटत नव्हती. आजकाल तिच्या वागण्यात आणि बोलण्यात एक वेगळीच तरतरी आली होती.
कुठल्या न कुठल्या निमित्ताने दर तीन -चार दिवसाआड त्यांची भेट नदीच्या काठावरील त्या मोठ्या वडाच्या झाडाखाली होत असायची, तेथे तासनतास त्यांच्या प्रेमाच्या गप्पा गोष्टी चालायच्या. येसू आणि रत्ना यांच्यातील प्रेम प्रसंगांचे आणि खाजगी क्षणांचे एकमेव साक्षीदार म्हणजे ते नदीकाठचे वडाचे झाड असे म्हणले तरी चालेल. बरेच दिवस हे सगळे निर्वेधपणे चालू होते, पण अजून किती दिवस चालणार होते?
"ऐ येसू! अजून किती दिस मला फडावरच ठेवणार हायेस? अजून किती दिस असा लपून भेटायला येणार हायेस? तुज्या वाड्यात कधी नेतोस लगीन करुन?" एके दिवशी रत्नाने त्याला विचारले.
"आताच चल की माज्याबरं"
"व्हयं? आणि तुज्या घरचे मंडळी, त्यांची परवानगी हाये का तुला लगीन करायला?"
"मायला, हे तर माज्या डोक्यातच नाही आलं; थांब थोडं दिस, आबांचा स्वभाव तापट हाये, त्या़ंना कसतरी पटवावं लागेल."

"कधी सांगणार हायेस तु घरी येसू? पुढच्या काहि दिसात दुसर्या गावची यात्रा येईल, आम्हा समद्यांना हिथला फड आवरून तिकडं निघून जावं लागलं, तवा मी काय करु?"
रत्नाच्या बोलण्यामुळे यशवंत आता भानावर आला होता, आजवरचा घटनाक्रम हा जरी त्याच्या हातात असला तरी येथून पुढील प्रकरण हे तितकेसे सोपे नव्हते, याची कल्पना त्याला आली होती.
रत्नाच्या बोलण्यामुळे यशवंत आता भानावर आला होता, आजवरचा घटनाक्रम हा जरी त्याच्या हातात असला तरी येथून पुढील प्रकरण हे तितकेसे सोपे नव्हते, याची कल्पना त्याला आली होती.
यशवंत चे वडील 'आबासाहेब' हे गावातील एक बडे प्रस्थ होते. वंशपरंपरागत देशमुखी संपलेली असली तरी गावाच्या निर्णय प्रक्रियेत त्यांचा विशिष्ट मान आणि समाजात एक प्रकारचा रुबाब अजूनही कायम होता.
आजकाल यशवंत त्यांच्या पुढे पूढे करायला लागला होता, लहान सहान गोष्टींमध्ये त्यांची मर्जी सांभाळण्यासाठी प्रयत्न करत होता. अनेक दिवस वाट पाहूनही त्याला मनातली गोष्ट सांगण्यासाठी योग्य ती वेळ येत नव्हती, अखेर त्या दिवशी यशवंतने एकांतात असताना आबासाहेबांना रत्ना विषयी सांगितले तसेच आपण तिच्याशी विवाह करण्याचे वचन दिले असल्याचे सुद्धा सांगितले. पण यशवंतला ज्याची अपेक्षा होती, त्यापेक्षा अगदी वेगळी परिस्थिती निर्माण झाली.

आबासाहेबांनी मोठा गोंधळ घालून वाड्यातील सर्वच सदस्यांना तेथे गोळा केले.
"बघा! हा हxxxर काय म्हणतोय? थोबाड रंगवून तमाशात नाचणारी ती कोलाटीण ह्या वाड्यात सून बनून येणार हाये म्हणून!"
आबासाहेबांचा संतापाने लाल झालेला चेहरा पाहून सर्वजण स्तब्ध झाले होते. पण यशवंत अजूनही त्याच्या निर्णयावर ठाम होता.

"होय आबा! मी निर्णय घेतला हाये, लगीन करीन तर फक्त रत्नासोबतच नायतर करणार नाही."
यशवंत च्या उत्तराने उपस्थित सर्वजण स्तब्ध झाले. त्यांनी यशवंत ची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.
पण बराचवेळ समजावून सांगूनही यशवंत त्याच्या निर्णयावर ठाम होता. .
यशवंत च्या उत्तराने उपस्थित सर्वजण स्तब्ध झाले. त्यांनी यशवंत ची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.
पण बराचवेळ समजावून सांगूनही यशवंत त्याच्या निर्णयावर ठाम होता. .
"सोपान! ह्याला सांग, त्या तमासगीरी बरोबर लगीन करायचं असलं तर आत्ताच तोंड काळं कर ह्या वाड्यातून" आबासाहेब रागाने थरथरत होते.
"तसं असलं तर जातो मी; जिथं माजी किम्मत नाही, तिथं मला पण राहायच नाही. तमाशाच्या फडात जाऊन राहीन मी; त्याशिवाय लोकांच्या नजरेमधला 'रत्ना' आणि माज्यातला फरक संपणार नाही"
"तसं असलं तर जातो मी; जिथं माजी किम्मत नाही, तिथं मला पण राहायच नाही. तमाशाच्या फडात जाऊन राहीन मी; त्याशिवाय लोकांच्या नजरेमधला 'रत्ना' आणि माज्यातला फरक संपणार नाही"
यशवंतने प्रत्त्युत्तर दिले आणि आबासाहेबांचा पारा सुटला, ते धावत आतल्या खोलीत गेले आणि भिंतीवर टांगलेली बंदूक घेऊन आले. जनावरांच्या शिकारीसाठी उपयोगी पडणारी ती बंदूक गेली कित्येक वर्षे वापरलेली नसली तरी वेळप्रसंगी उपयोगी पडेल अशी सुस्थितीत ठेवलेली होती.
संतापलेल्या आबासाहेबांनी बंदुकीची नळी यशवंतच्या दिशेने रोखली तसे सगळ्यांच्या हातात पायातील त्राण गेले. यशवंतने डोळे बंद केले आणि निमुटपणे जागेवर उभा राहिला.
संतापलेल्या आबासाहेबांनी बंदुकीची नळी यशवंतच्या दिशेने रोखली तसे सगळ्यांच्या हातात पायातील त्राण गेले. यशवंतने डोळे बंद केले आणि निमुटपणे जागेवर उभा राहिला.
आबासाहेबांनी चाप ओढला, गोळी सुटल्याचा मोठा आवाजही झाला, पण गोळी यशवंतला लागली नाही, त्याने डोळे उघडले, सोपान तात्याने आबांचा हात धरला होता, बंदुकीची गोळी वर कौलामध्ये घुसली होती.
"आबा! काय येडेपणा लावलाय तुम्ही? एका तमासगीर पोरीसाठी पोटच्या मुलाला गोळी मारणारं तुम्ही?" तात्यांनी आबांना सुनावले.
"त्या तमासगीरीनीनी ह्या वाड्याची पायरी चढली तर, पुढल्या येळेला मी स्वताच्या डोसक्यात गोळी घालून घेईल; बघा मगं तुम्हाला काय करायचंय ते"
आबासाहेबांचा राग अजूनही शांत होत नव्हता.
आबासाहेबांचा राग अजूनही शांत होत नव्हता.
त्या रात्री वाड्यात चूल पेटली नाही. सर्व मंडळी चिंताग्रस्त दिसत होते, आपले प्रेम प्रकरण एवढे पेट घेईल याची यशवंतला कल्पना पण नव्हती. तो मुकाट्याने ओसरीवर डोक्याला हात लावून बसला होता. आतमध्ये आबासाहेबांच्या खोलीत बराचवेळ सोपान तात्या बसून काहीतरी चर्चा करत होता, काहीवेळाने त्याने बाहेर येवून यशवंतला आवाज दिला, आणि त्याला घेवून तो आबासाहेबांच्या खोलीत गेला.
★★★★★★★★★★★★★
दुसर्या दिवशी दुपारी ठरल्याप्रमाणे यशवंत तमाशाच्या फडावर गेला. रत्ना तिच्या दैनंदिन कामात व्यस्त होती, तिला सोबत घेवून तो शेताच्या दिशेने गेला.
"रत्ने! हे बघ आपलं शेत. हिथ ज्वारी लावलीय, तिकडं उसाचा मळा हाये, त्या लिंबाच्या झाडापाशी विहीर हाये"
"बरं! चांगलं हाये की, पण हे तु मला आज का दाखवत हायेस" तिने विचारले.
"हितं राहायला आवडलं का तुला?" त्याने थेट विचारले.
"म्हंजे! हितं मळ्यात? का पण?"
"आता तुला कसं सांगू, काल रातच्याला मी आबांना आपल्याबद्दल समद सांगितलं, आणि.."
यशवंतने रत्नाला काल घडलेले सर्व प्रकरण सांगितले.
"तु वाड्याची पायरी चढली तर जीव देईल म्हणतं होते आबा, त्यांना माझ्यापेक्षाबी आणि सवताच्या जीवापेक्षाबी त्यांची इज्जत प्यारी हाये. सोपान तात्यांनी रातभर बोलून आबांची कशीतरी समजूत घातली, तवा कुठ आबा तयार झाले; पण त्यांची अट हाये की तु वाड्यात राहायचं नाही, तुज्या साठी हितंच ह्या शेतात एक घर बांधून दे, असे म्हणाले ते" 
यशवंत ने रत्नाला सर्व प्रकार सांगितला आणि रत्नाच्या डोळ्यांतून अश्रुंची धार लागली.
"अन तु...तु तयार झालासं? तुला येक सांगु? गेल्या कित्येक रातीला मला वाड्यात राहायला जायचं स्वप्न पडत हाये. सकाळी लवकर उठून अंगण सारवायचे, तुळशी वृंदावन पुजायचे माजे स्वप्न होते; सांजच्याला घुंगरू आणि तुणतुण्याचा नाही तर टाळ-मृदंगांचा आवाज ऐकण्याचे माजे स्वप्न होते, चारचौघीत ताठ मानेने उठ बस करणारी कारभारीन होण्याचे माजे स्वप्न होते.
पण तु..तु माझ्या स्वप्नांची राखरांगोळी केलीस येसू! आता मी काय करु? माझ्या सख्या मला कायम सावध करत होत्या, पण मी त्यांना जुमानल नाही, आता मी सख्यांना कुठल्या तोंडाने सामोरे जाऊ; त्यांना काय सांगू, मी यशवंतरावांची कारभारीण नाही तर रखेल बनणार हाये म्हणून!!"
यशवंतचा सदरा दोन्ही हातांनी घट्ट पकडून ती मोठ्याने त्याला जाब विचारत होती, आणि सध्यातरी तिचे समाधान करण्यामध्ये यशवंत असमर्थ होता असेच दिसत होते.
"तसं नाही रत्ने! तु वाड्यात राहणार नसलीस तरी माज्या मनात तुझ्याशिवाय कोणतीच स्री बसणार नाही; मी दुसऱ्या कोणत्याच स्त्रीसोबत लगीन सुद्धा करणार नाही. तसंच मी आणि सोपानतात्या आबांचे मन वळवण्याचे प्रयत्न पण सुरू ठेवणार हाये; आज जरी ते रागात असले तरी पुडील वर्षभरात ते तुझा स्वीकार करतील असं मला वाटतंय; इस्वास ठेव माझ्यावर? दुसर कुणीच मला समजून घेत नाही, तु तरी समजून घे.."
यशवंत ने तिची समजूत घातली. पण रत्ना ऐकायला तयार नव्हती.
"नाही! मला नाय राहायच इथं, मी तमाशाच्या फडावरच राहील, माझ्या सख्यांसोबत; तुला कवा माझी आठवण आली तर तवा तुच येत जा मला भेटायला तिथं "
येसूचा हात झिडकारून ती शेतातून पळत माघारी निघून गेली, यशवंतने तिला अडवण्याचा जास्त प्रयत्न केला नाही.
क्रमशः: