कलावंतीण - १
यशवंतने अखेर नाईलाजाने बैलांच्या पाठीवर सपकन आसुड ओढला. पाठीवर पडणाऱ्या फटक्यांच्या भितीने गाड्याला जुंपलेले बैल पायाखालच्या कच्च्या व ओबडधोबड रस्त्याची पर्वा न करता सुसाट धावत सुटले.
आठवडी बाजारा निमित्त आज सकाळीच तालुक्याच्या ठिकाणी गेलेला तो.. गावाकडे परतण्यास एवढा उशीर होईल असे त्याला वाटले नव्हते. आज कित्येक वर्षानंतर तो संध्याकाळ उलटून गेल्यानंतर त्या रस्त्याने परत येत होता.
आठवडी बाजारा निमित्त आज सकाळीच तालुक्याच्या ठिकाणी गेलेला तो.. गावाकडे परतण्यास एवढा उशीर होईल असे त्याला वाटले नव्हते. आज कित्येक वर्षानंतर तो संध्याकाळ उलटून गेल्यानंतर त्या रस्त्याने परत येत होता.
सुर्य मावळल्या मुळे आता वातावरण अंधारून आले होते पण आकाशातील पोर्णिमेचा चंद्र आणि अंधुकपणे उगवलेल्या चांदण्या लवकरच सुर्याची कमतरता भरुन काढतील अशी चिन्हे दिसत होती. वाटेच्या दुतर्फा दुरवर पसरलेले बाभळी आणि इतर खुरट्या झाडांचे वन मागे टाकत त्याची बैलगाडी गावाच्या दिशेने वेगाने सरकत होती. काही वेळातच त्याला गावातील चमकणारे मंदिराचे शिखर दिसू लागले होते, गुडघाभर पाणी असलेले नदीचे पात्र ओलांडून पुढे गेले की गावाची वेस लागणारच होती, इतक्यात त्याचे लक्ष डाव्या बाजूला गेले. रस्त्यापासून काही अंतरावर असणारा तो भलामोठा,भरदार बहरलेला वटवृक्ष भोवतालच्या अंधारातही चमकताना त्याला दिसले. त्याने बैलगाडी जागेवर थांबवून कपाळाला हात लावला.
"येस्या! काय केलंस हे? तुला म्हणल होतं की रं, सरळ रस्त्याने चल, इकड तिकडं पाहू नको म्हणून..अजूनबी येळ हाये, बघं इचार कर.." तो स्वतःशीच पुटपुटला.
काही क्षण जागेवरच विचार करत असलेल्या त्याने त्याची बैलगाडी आता नदीच्या अलीकडेच डाव्या बाजूला गेलेल्या पायवाटेच्या दिशेने आत वळवली.
हळूहळू तो त्या महावृक्षाच्या दिशेने गेला, त्या झाडामध्ये काहीतरी आकर्षण असावे असे वाटत होते. जवळ गेल्यानंतर हातातील कासरा सोडून त्याने बैलगाडीतून खाली उडी मारली, आणि चालत तो झाडाच्या जवळ पोहोचला.
पोर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशाने न्हाऊन निघालेल्या त्या वृक्षाच्या समोर उभा राहिला, वार्यामुळे फांद्या व पाणांची होणारी सळसळ, हवेत लोबंणार्या लहान मोठ्या पारंब्याची होत असणारी हालचाल तो न्याहाळत होता.

अचानक कुठूनतरी पायातील घुंगरांचा आवाज त्याच्या कानात घुमला, आणि तो दचकला. भिती आणि आश्चर्य यांच्या मिश्रणाने त्याच्या अंगावर शहारे उमटले..इकडे तिकडे पाहू लागला.
पारब्यांच्या मागे लालसर रंगाच्या नऊवारी साडीचा पदर वार्यावर उडत असल्या सारखा त्याला दिसला आणि तो आपसूकच त्या दिशेने गेला.
पारब्यांच्या मागे लालसर रंगाच्या नऊवारी साडीचा पदर वार्यावर उडत असल्या सारखा त्याला दिसला आणि तो आपसूकच त्या दिशेने गेला.
"रत्ना..!!" तो खोडाच्या मागे लपलेल्या त्या सौंदर्यवतीच्या जवळ पोहोचला होता. अनेकविध दागिने परिधान केलेल्या, नऊवारी साडी नेसलेल्या, केसामध्ये गजरा माळलेल्या व साजशृंगाराने नटलेल्या त्या तरुणी कडे तो पाहातच राहिला.
"आलासं व्हंय माज्या येसू? लई दिस लावलेसं की, कवापासून तुझी वाट पाहातेय मी" तिच्या मधुर स्वरात तिने संवादाची सुरुवात केली.
"होय रत्ना! उशीरच झाला खरा! अनेक वेळा वाटलं, तुला भेटायला यावं, तुझी खुशाली इचारावी..दिसाच्या वेळेस तर कैकवेळा नदीच्या वाटेनं गेलो होतो, पण कदी हिकडं वळायची हिंमत झाली नाही. पण आज अंधारात झाडाकडं पाहिलं आणि असं वाटलं, कोणीतरी आपल्याला हिकडं बोलावतयं. ह्या झाडाच्या ओढीनं हिकडं आलो आणि आपसूकच तुझी भेट झाली.. ते पण आज एवढ्या वर्षानंतर.."
यशवंताच्या आवाजात तिला भेटून झालेला आनंद दिसून येत होता.
यशवंताच्या आवाजात तिला भेटून झालेला आनंद दिसून येत होता.
"व्हंय का! तुला आठवणंच येत नव्हती म्हणून सांग की; बरं ते जाऊदे, परं येवढा सुकून का गेलाय माजा पैलवान गडी? आन हे डोसक्यावरचे केसं पण पातळ झालेत वाटतं" यशवंताच्या डोक्यावरचे पागोटे काढत ती म्हणाली.
"दहा वरीस झाले असतील ना आपल्याला शेवटचं भेटून, त्यामुळं वाढलेल्या वयाचा परिणाम जाणवत असलं तुला माझ्यात..तसंबी माझं मन कुठच रमत नाही. कसतरी जगायचं म्हणून जगतोय बघं, अन्न गोड लागत नसल तरी दोन घास खातो, रातनदिस शेतातच राबत असतो, कवातरी काही काम निघालं तरच गावात येत असतो. रुपाकडं, शरिराकडं बघायला कुठं येळ राहिला आता? पणं तु मातर धा वर्षापुर्वी जसी होतीस तशीच आजही हायेस, तेवढीच देखणी, रुपवान.."

"बरं बरं! तुझं आपलं कायतरीच! मगं झाली आता आपली भेट; जा आता घरला परत.. रात पण वाढत चाललीय, घरच लोकं काळजी करत असतील ना?"
"तुला सोडून जाऊ? तेवढं आता सांगू नको..जगात तुझ्या खेरीज मला कुणाशीच भेटाव वाटत नाही गं, मला माहित हाये येवढ्या वर्षांनंतर पण तुझा माझ्यावरला राग कमी झाला नसल, तरीपण तु मला समजून घे. तु नाही घेणार तर कोण घेणार?"
यशवंत चे बोलणे ऐकून रत्नाच्या चेहर्यावर हास्याची लकेर उमटली.

"नाही रं, माझ्या राजा! तुझ्यावर रागावून मी काय करू? आणि राग धरणारी मी हाये तरी कोण तुझी? तेवढा अधिकार मला कोणी दिला? मी एकटी हितं खुष हाये, जा तु घरला आणि परत हिकडं येऊ पण नगंस"
"ठिक हाये; जातो मी, पण फक्त एकदा तुझ्या मांडीवर डोकं ठेवून एक घटकाभर झोपायची इच्छा हाये. नाही म्हणू नगंस.. उठलो की मग मी घरला जातो; आणि परत कदी माघारी येणार पण नाही."
"ठिक हाये; जातो मी, पण फक्त एकदा तुझ्या मांडीवर डोकं ठेवून एक घटकाभर झोपायची इच्छा हाये. नाही म्हणू नगंस.. उठलो की मग मी घरला जातो; आणि परत कदी माघारी येणार पण नाही."
यशवंताने आग्रह केला, आणि रत्ना झाडाच्या खोडाजवळ खाली गवतामाती मध्ये निवांतपणे बसली. यशवंताने तिच्या कमरेभोवती आपल्या हातांचा विळखा घालून आपले डोके तिच्या मांडीवर टेकवले.
आपल्या प्रियतमाच्या स्पर्शाने रत्नाचेही अंग शहारले असेलचं.
"रत्ने! घटकाभराने नक्की उठव बरका मला.."
रत्नाने मान हलवली, लाल मेहदींने रंगलेल्या तिच्या सुगंधीत हाताची बोटे अलगदपणे त्याच्या डोक्यावरील केसातून फिरु लागली. निरनिराळ्या विचारांमध्ये गुंगलेल्या यशवंताला झोप कधी लागली हे समजलेच नाही.

मालक कासरा सोडून गाडीतून उडी मारून कुठेतरी निघून गेला, आता बराच वेळ झाला होता, एकाच जागेवर उभे राहून बैलजोडी कंटाळून गेली होती, मालकाची कुठलीही चाहूल न लागल्याने त्यांची चुळबुळ वाढली होती. अखेर मध्यरात्रीच्या सुमारास नाईलाजाने ते आल्या रस्त्यावरून माघारी फिरले. नदीमध्ये उतरल्यावर पुढील रस्ता त्यांच्या नेहमीच्या सरावाचाच होता. मोकळी गाडी ओढत ती बैलजोडी गावाच्या वेशीतून आत शिरली आणि रस्त्यावर वरून पुढे जाऊ लागली, वेशीवरच्या पहारेकऱ्यांना मोकळी बैलगाडी जाताना पाहून आश्चर्य वाटले. त्यांनी आपसात चर्चा करुन काही गावकऱ्यांना याबद्दल माहिती दिली. यशवंतच्या नातेवाईकांना ही गोष्ट समजल्यानंतर एकच गोंधळ उडाला. गावातील काही तरुण मंडळी हातात मशाली घेऊन ताबडतोब यशवंताच्या शोधार्थ निघाले. गावाच्या आजूबाजूला बराच वेळ शोधून पण त्यांना काहीच सुगावा लागला नाही. अखेर पहाटेच्या सुमारास अंधार कमी झाल्यानंतर ती मंडळी नदीच्या कडेकडेने शोधत निघाली आणि त्यांचा शोध त्या वटवृक्षाच्या खाली जाऊन थांबला.
त्या झाडाखाली त्यांना यशवंत झोपलेला दिसलेला. जमीनीतून वर आलेली एक दणकट मुळी त्याच्या डोक्याखाली उशाशी होती. गावकऱ्यांनी आवाज देऊन आणि हलवून त्याला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न केला. पण तो उठला नाही, गाढ झोपेत असताना रात्रीच केव्हातरी त्याचा श्वास थांबला होता, हे काही वेळातच गावकऱ्यांना कळून चुकले होते.
★★★★★★★★★★★★
"नाना! ही पहा निमंत्रण पत्रिका, आताच पोस्टाने आली आहे"
सुहासने एक पत्रिका हातात दिली. मी चहाचा कप बाजूला ठेवून ती वाचुन काढली.
सुहासने एक पत्रिका हातात दिली. मी चहाचा कप बाजूला ठेवून ती वाचुन काढली.
"हंम्म! काल फोन पण आला होता सरपंचाचा. ग्रामभुषण पुरस्कारासाठी माझे नाव घोषित केले आहे, असे म्हणत होता"
"बर्याच वर्षांनंतर गावकऱ्यांनी आठवण काढली तुमची नाना, तुम्हाला जायलाच पाहिजे " सुहास म्हणाला.
"हा, आता सगळे आग्रह करतच आहेत तर जाऊन येतो, तु पण सोबत आला असता तर.."
"मी आलो असतो, पण त्या दिवशी नेमकी माझी क्लाइंट मिटींग आहे, नंतर एखादे दिवशी जाऊ आपण वेळ काढून "

"पप्पा नाही आले तरी मी येणार तुमच्या सोबत नाना! मला पण आपले गाव बघायचेय, आजवर तुम्ही कधी मला तिकडे नेली नाही" अचानक हिमांशू मागून गळ्यात येऊन लटकला.
हिमांशू हा सूहासचा मोठा मुलगा म्हणजेच माझा नातु. वय वर्षे तेरा, वयाने अजून लहान असला तरी बुद्धीने तल्लख. स्कुलमध्ये नेहमी टॉपर असणारा तो बाकी ॲक्टिविटी मध्ये पण नेहमी पूढेच असतो.
हिमांशू हा सूहासचा मोठा मुलगा म्हणजेच माझा नातु. वय वर्षे तेरा, वयाने अजून लहान असला तरी बुद्धीने तल्लख. स्कुलमध्ये नेहमी टॉपर असणारा तो बाकी ॲक्टिविटी मध्ये पण नेहमी पूढेच असतो.
"हा बरोबर! याला घेऊन जावा; या विकमध्ये एक्जाम पण संपत आहे त्याची, मूड फ्रेश होऊन जाईल".
"ठिक आहे चल, नाही तरी अजून तु गावाकडे कधी गेलेलाच नाहीस, या निमित्ताने तरी बघता येईल."
मी पत्रिका खाली ठेवून पुन्हा चहाचा कप घेतला.
"ठिक आहे चल, नाही तरी अजून तु गावाकडे कधी गेलेलाच नाहीस, या निमित्ताने तरी बघता येईल."
मी पत्रिका खाली ठेवून पुन्हा चहाचा कप घेतला.
पुढील आठवडाभर मला व्यवस्थित झोप सुद्धा लागत नव्हती. सतत गावाचाच विचार डोक्यात घोळायचा, सुमारे पन्नास वर्षांपूर्वीच आम्ही 'संग्रामपुर' सोडून शहरामध्ये येऊन स्थायिक झालो होतो. सुरुवातीची काही वर्षे सुट्टी मिळाली की गावाकडे जायचो पण नंतर शिक्षण, नोकरी , बिझनेस अशा वेगवेगळ्या गोष्टी मध्ये रमल्यानंतर गावाची आठवण सुद्धा राहिली नव्हती. आता अचानक एवढ्या वर्षानंतर जायचे म्हणाल्यावर एक वेगळेच दडपण जाणवायला लागले होते.