इलाज भाग क्र :- ३

(ह्या कथेचे आधीचे भाग वाचायचे असेल तर वरती माझ्या नावावर क्लिक करून वाचू शकता)
(काही दिवसांपूर्वी...........)
उन्हाळ्याचे दिवस होते....आनंदा त्या सुनसान जंगलात एकटाच चालत होता....तरी दुपारचे 2 वाजले असतील....30 वर्षाचा तरुण आनंदा त्या जंगलात एकटाच चालला होता..ऊन अगदीच रणरणते होते...पण आनंदाला रोखू शकत नव्हते कारण धिप्पाड देहाचा आनंदा जणू अश्या बिकट परिस्थितीसाठीच बनला होता.....जिज्ञासू लोकांना त्यांची जिज्ञासा स्वस्थ बसू देत नाही असं म्हणतात....आनंदा सुद्धा ह्याच जिज्ञासू स्वभावाचा होता....तो जॉब साठी एका मोठ्या सिटीमध्ये आला होता....चांगला पगार स्वतःच घर...घरात तो एकटाच राहत होता त्याची फॅमिली गावाकडे होती आता त्याने ह्या घराचा आता त्याने बंगला केला होता त्यात तो फॅमिलीला शिफ्ट करून त्यांना सरप्राईज देणार होता.....झालं असं की आनंदाची एक फॉरेन ट्रिप कॅन्सल झाली त्यामुळे आता काही दिवस तो फ्री होता....त्याला अलौकिक गोष्टी जाणून घेण्याचा खूप छंद होता आता तो भूत ह्या विषयांवर रिसर्च करत होता म्हणजे हे त्याचे प्रोफेशन नव्हते पण हा छंद आनंदाने जोपासला होता....तो भारतातील अनेक हॉंटेड जागी भेट देऊन आला होता तिथल्या काही नोट्स सुद्धा बनवल्या होत्या....काही शॉर्ट व्हिडीओ सुद्धा तयार केले होते.....आनंदाला जेव्हा जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा तेव्हा तो अश्या हॉंटेड जागी जायचा.....त्याला इथला एकांत आवडायचा.....त्याच्याकडे पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी कॅपचर करणारी काही उपकरणे सुद्धा होती हॉंटेड जागी त्यावर रिडींग मिळाले की आनंदा जाम खुश व्हायचा...आता आता तर आनंदाला ह्या सगळ्या गोष्टींची आवड जास्त निर्माण झाली कारण मागच्या महिन्यात तो संगमेश्वरच्या घाटावर गेला होता...त्याला कळलं होतं की आमावस्येच्या रात्री इथे काही अघोरी लोक साधना करून सिद्धी करून ताकत वाढवतात....वास्तविक आनंदाला ह्या गोष्टींवर विश्वास नव्हता....ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत असं तो मानत असे.....आनंदाचा भुतांच्या वर थोडा विश्वास होता त्याचे मत असे होते की पॉझिटिव्ह दैवी शक्ती बरोबर ह्या जगात निघेटिव्ह शक्ती सुद्धा अस्तित्वात आहे.....तरी आनंदाला नवनवीन गोष्टी बघायला खुप आवडत असे....तो हे अघोरी विधी बघायला संगमेश्वर घाटावर पोहोचला....मध्यरात्री हे विधी होत असत.....तेव्हा कुणीही तिथं आसपास भटकत नसे.....कारण लोकांना माहीत होतं की हे अघोरी साधू थोडे सनकी असतात पण आनंदा तिथे पोहोचला....सगळीकडे अंधार पडला होता वातावरण खूपच गंभीर होतं.......संगमेश्वर तसा खूप पवित्र घाट होता.....इथे दहन केलेल्या व्यक्तीला मोक्ष लवकर मिळतो अशी काहीशी लोकांची धारणा होती....त्यामुळे त्या घाटावर 5,6 प्रेते जळत होती.....वास्तविक इथे जाणे म्हणजे धाडसाचे काम होते कारण अस म्हणत की हे साधना करायला आलेले अघोरी जळती प्रेते जळत्या चितेवरून ओढून खातात....म्हणजे काही साधना चांगल्या असतात पण रात्री इथे जास्तकरून वाईट शक्तींची साधना होत असे....आनंदा सुद्धा हे ऐकून होता....आणि झालं तसच एक अंगाला प्रेताची राख लावलेला अघोरी हातात भाजलेल्या मासाचा तुकडा घेऊन खात बसला होता...आनंदा हे बघून दचकला नाही....आनंदा त्या घाटावर अगदी आरामात चालू लागला....घाटावर सरकारी दिवाबत्तीची सोय होती त्यामुळे तो घाट उजळून निघाला होता....आनंदा त्या चितेजवळ बसलेल्या अघोरीकडे एकटक बघत चालू लागला....त्या अघोरीने सुद्धा आनंदाकडे एकटक बघायला सुरवात केली....आतापर्यंत आमवस्येचं इथं कुणीच आलं नव्हतं....एवढंच काय तर आमवस्येच्या रात्री अघोरीच्या भीतीने इथे प्रेत सुद्धा जाळायला लोक आणत नसत.....पण जिज्ञासू आनंदा इथे पोहोचला तो सगळं काही बघत होता अगदी जवळून जाऊन पण कुणाला त्रास देत नव्हता....एक चिता जळत होती त्याच्या बाजूला आनंदाला एक अघोरी दिसला इतर साधूंच्या पेक्षा हा अघोरी खूपच कृश आणि खंगलेला होता....बाकीचे अघोरी साधू त्या चितांच्या धुरात आरामात साधना करत बसले होते पण हा अघोरी मात्र सतत खोकत चालला होता.....अचानक त्या अघोरीची नजर आनंदावर गेली....तो अघोरी आता आनंदाकडे एकटक बघतच राहिला....तो अगदी पापणी सुद्धा हलवत नव्हता....त्याची ती करडी नजर आनंदाला अस्वस्थ करत होती.....तो कसले तरी मंत्र पुटपुटत होता....त्याने त्या चितेवर आगीत काहीतरी फेकले तसा आगीचा एक मोठा लोट उठला तो अघोरी आता तिथून गायब झाला होता....आनंदा थोडा चक्रावला....आता क्षणभरापूर्वी तो अघोरी इथे बसला होता....आनंदा त्याला इकडे तिकडे शोधू लागला....मागून त्याच्या हात कुणीतरी ओढून पकडला...आनंदा चपापला....त्याने झटकन मागे बघितले.....मागे तोच गायब झालेला अघोरी होता....तो आनंदाचा हात पकडून वास घेत होता......आनंदा घाबरला अचानक झालेल्या बेसावध हल्ल्याने त्याने हात मागे ओढण्याचा प्रयत्न केला पण तो अघोरी आनंदाचा हात घट्ट पकडून वास घेत होता....शेवटी कसबस आनंदाने आपला हात सोडवून घेतला.....पण तो अघोरी एकटक आणि खुनशी नजरेने आनंदाकडे बघत होता....ही नजर थोडी विचित्र होती त्याच्या चेहऱ्यावरचे स्मितहास्य असे होते की आनंदाविषयी त्याला बरच काही माहिती आहे....आनंदा त्या नजरेला घाबरला होता....आनंदाने तिथून काढता पाय घेतला....तो वळून वळून त्या अघोरी कडे बघत होता पण अघोरीची भेदक नजर अजूनही आनंदावर होती.....
मागच्या महिन्यातली ही संगमेश्वर घाटावरची गोष्ट सांगण्याचे कारण म्हणजे....आनंदा ह्या जंगलात एका हॉंटेड जागेवर आला होता निघेटिव्ह एनर्जी शोधण्यासाठी.....त्याचा पॉईंट होता व्हील्सन पॅलेस.....एका इंग्रजाने शहरी वस्तीपासून दूर निसर्गाच्या सानिध्यात बनवलेला सुंदर दगडी बंगला.....पण आता हा बंगला पडीक झाला होता....कारण सुद्धा तसच होतं....100 वर्षांपूर्वी व्हील्सन साहेब आपल्या कुटुंबासह वस्तीला असताना काही डाकूंनी ह्या बंगल्यावर हल्ला केला....सगळी संपत्ती लुटून व्हील्सन त्याचे चार पाच गार्ड आणि व्हील्सनची पूर्ण फॅमिली ह्यांना एकत्रित रित्या ठार केले....नंतर पूर्ण बंगला जाळून टाकला....अस म्हणतात की अजूनही ह्या व्हील्सन पॅलेस मध्ये त्या अतृप्त आत्म्यांचे वास्तव आहे.....अजूनही तिथून रडण्याचे ओरडण्याचे आवाज येतात....म्हणून थोडा रिसर्च करण्यासाठी आनंदा इथे आला होता.....जंगल पार करत करत अखेर आनंदा आता त्या जळक्या पडीक झालेल्या व्हील्सन पॅलेस जवळ आला....पूर्णपणे भकास अशी वास्तू होती ती....तिच्याकडे बघूनच मनातून एक किळस वाटत होता....आनंदाला तिथे आल्यावर थोडं बेचैन वाटत होतं...अस हे पहिल्यांदाच होत होते.....तो एवढ्या हॉंटेड जागी जाऊन आला पण न जाणो त्याला आता खूप अस्वस्थ वाटत होतं....तरी थोडं धाडस करून आनंदा त्या पडक्या बंगल्यात गेला.....दगडी बांधकाम होते....आग लागल्याने सगळं काही जळून खाक झालं होतं फक्त दगडी अवशेष शिल्लक होते....आनंदा आत पोहोचला....पडझड बरीच झाली होती त्यामुळे तो बंगला एक भुलभुलैय्या झाला होता....आनंदा सगळीकडे नजर फिरवत होता....जुनी वास्तू होती....निघेटिव्ह एनर्जी चेक करण्यासाठी त्याने आपलं गॅझेट बाहेर काढलं.....तो रिडींग घेत होता....अचानक आनंदा दचकला.....कारण तिथल्या कुठल्या तरी भिंतीच्या मागून खोकण्याचा आवाज येत होता.....आनंदाने स्वतःला सावरले....कुणीतरी टुरिस्ट असेल अशी स्वतःची समजूत काढून तो जिथून हा खोकण्याचा आवाज येतोय त्या दिशेने चालू लागला....आनंदा थोडा घाबरला होता कारण ह्या जागेचे वातावरणच तसे होते....दबक्या पावलांनी चालत चालत तो एका पडक्या खोलीजवळ पोहोचला...आणि समोर एक दृश्य बघून भिंतीला टेकला.....समोर तोच महिन्यापूर्वी संगमेश्वर घाटावरचा विचित्र अघोरी ज्याने आनंदाचा हात पकडला होता...तोच बसला होता..अंगावर एक मळकट सदरा मळकट विजार...त्याचे हात रक्ताने लाल झाले होते..त्याने समोर एक कवटी ठेवली होती....त्या भोवती रांगोळीने कसले तरी कडे बनवले होते....चारी बाजूला चार बकर्यांची मुंडकी ठेवली होती....तो कसले तरी मंत्र पुटपुटत होता....आनंदा तिथे येताच त्या अघोरीने तिरप्या नजरेने आनंदाकडे बघितले....परत तीच भेदक नजर....आनंदा घाबरला....तिथून पळणार इतक्यात आवाज आला
"घाबरू नको.....मी इथे फक्त साधना करायला आलो आहे"
आनंदाला हा आवाज बराच मधुर आणि विश्वासार्ह वाटला....तो तिथेच थांबला....ते जे समोर मांडले होते त्याकडे बघू लागला....पक्ष्यांची पिसे,कसलीशी हाडे वैगेरे वैगेरे समान अगदी रचून ठेवले होते....आनंदा हे सगळं निरखून बघत होता...
"खूपच जिज्ञासू मुलगा आहेस तू....अलौकिक आणि ज्या गोष्टी डोक्या बाहेरच्या आहेत त्या जाणून घ्यायला आवडते.....बरोबर??"
आनंदा ह्या अचानक आलेल्या प्रश्नाने गोंधळा आणि म्हणाला......."हो....ब....ब....बरोबर....पण हे तुम्हाला कस कळलं??"
अघोरी हसला आणि म्हणाला
"अरे आम्ही काळ्या शक्तीचे साधक आहोत....समोरच्या बद्दल सगळं जाणून असतो....आम्ही कित्येक वर्षे उपाशी राहू शकतो आणि आपल्या शक्तीच्या जोरावर एका जागेवरून क्षणात दुसऱ्या जागी प्रकट होऊ शकतो"
आनंदा गप्प होता.....त्याच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य होते....ह्या अघोरीने जे काही सांगितलं होतं त्यावर तो हसला होता....अघोरीने त्याच्या मनातले भाव बरोबर टिपले होते...त्याच्याकडे बघत तो म्हणाला
"तुला ह्या सगळ्या गोष्टीच्या वर विश्वास नसेलच....मला माहित आहे....आणि अशी आव्हाने मी नेहमी स्वीकारतो....."
अस बोलून अघोरीची समोर असलेल्या मानवी कवटीवर आपला हात ठेवला आणि मंत्र म्हणू लागला.अधून मधून त्याला जोराचा खोकला सुद्धा लागत होता..आनंदा लक्ष देऊन बघत होता कारण त्याला माहित होते हे लोक हातचलाखी करतात....डोळ्यांची पापणी सुद्धा न लवता आनंदा बघत होता....क्षणात ती कवटी गायब झाली होती....आनंदा हे बघून घाबरला.....त्याच्या चेहऱ्यावरचे ते भाव बघून तो अघोरी हसला आणि म्हणाला
"आता तुझी ही बॅग चेक कर"
आनंदाने आपली बॅग खाली ठेवली आणि बॅग ची चेन उघडली....त्याचे हात थरथरत होते कारण ती कवटी त्याच्या बंद असलेल्या बॅगेत आली होती.....आनंदाने पहिल्यांदा असलं काहीसं बघितलं होत....त्या अघोरीला जोराचा ठसका लागला होता....स्वतःला सावरत सावरत तो आनंदाला म्हणाला
"क...क....काय मग पटली का खात्री??"
आनंदाने होकारार्थी मान डोलावली.....लगेच तो अघोरी म्हणाला
"हे बघ बाळ मी काही जास्त काळ जगणार नाही....मला एक दुर्धर आजार जडला आहे....मी माझ्या विद्या वारसा म्हणून तुला देऊ इच्छितो....तू तयार आहेस का??...तुझ्या मनाला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुला माझ्या विद्येने मिळतील....सोबत तू अनेक शक्तींचा मालक होशील जस की काळी तंत्र विद्या...एका जागेवरून दुसऱ्या जागी क्षणात पोहोचणे...समोरच्याच्या मनातले जाणून घेणे अश्या अनेक शक्ती....बोल स्वीकारशील?? मला जाणवतंय की तू ह्या शक्ती पेलू शकशील""₹
आनंदा डोळे विस्फारून त्या अघोरीचे शब्द ऐकत होता....न जाणो कस पण आनंदाला त्या अघोरीच्या बोलण्यात सत्यता वाटू लागली....आणि अश्या ह्या विद्येचा नमुना त्यानं प्रत्यक्ष बघितला होता....आपल्याकडे अश्या शक्ती असल्या तरी किती मज्जा येईल....शिवाय आयत्या मिळत आहेत ह्या शक्ती म्हंटल्यावर आनंदाने मान हलवून अघोरीला क्षणात होकार दिला....तसा अघोरी हसला....त्याने ती कवटी परत मागितली कवटी घेऊन अघोरीने ती कवटी आहे त्या जागी ठेवली....तो सतत खोकत होता आपला चेहरा पुसत होता....तो आता खोकत खोकत मंत्र म्हणू लागला....समोर एक गोल रिंगण आखले होते.....अघोरीने इशारा करून आनंदाला त्या पिठाच्या रिंगणात बसायला लावले.....खोकत खोकत तो कसले तरी मंत्र म्हणत होता वातावरणात एक कंपन निर्माण झाले.....अघोरीचा आवाज वाढत चालला होता....आनंदाचे डोळे विस्फारले करणं समोरची कवटी आणि बकर्यांची चार मुंडकी हवेत तरंगू लागली....हे बघताच अघोरी आनंदाकडे बघून जोरात ओरडला.....माझं नाव आहे सुधाकर.....माझं हे नाव तू तीन वेळा जोरात उच्चार...आनंदा गोंधळला आणि ताडकन बोलला
"सुधाकर.....सुधाकर.....सुधाकर"
तिकडे तो अघोरी सुद्धा जोरात ओरडला
"आनंदा.....आनंदा.....आनंदा"
त्याच बरोबर समोर ठेवलेल्या सगळ्या वस्तू पेट घेऊ लागल्या.....अचानक आनंदा आणि अघोरी दोघेही जोरात उडून मागच्या बाजूला फेकले गेले.....आनंदा मागच्या एका दगडाला डोके जोरात आपटल्याने बेशुद्ध झाला होता....त्याचे डोळे हळूहळू बंद होत होते....किर्रर्रर्रर्र असा आवाज वातावरणात पसरला होता
काही वेळाने आनंदाला जाग आली....त्याने आपल्या डोक्याला हात लावला....त्याचं अंग अशक्त झालं होतं....त्याला नीट उभं सुद्धा राहता येत नव्हतं....आनंदाने समोर बघितलं....समोरचे वातावरण एकदम शांत होत....त्याचं डोकं जाम ठणकत होत....आनंदाने एकवार आपल्या शरीराकडे नजर फिरवली.....आश्चर्याचा धक्का....कारण त्याचे शरीर हलके झाले होते अंगावर सुरकुत्या होत्या....आनंदा गोंधळला......त्याने स्वतःला चाचपले....मळकट शर्ट मळकट विजार.....त्याने डोक्यावर चेहऱ्यावर हात फिरवला तो सुद्धा सुरकूतलेला होता....डोक्यावर टक्कल पडले होते....आनंदाला काय करावे सुचेना....त्याला अस वाटत होते की त्याला अनेक विद्या येतात....आता इथे असलेल्या आत्म्यांचा आवाज सुद्धा आनंदाला ऐकू येऊ लागला होता..काही क्षण गोंधळल्यावर आनंदाला सगळं काही समजलं...आनंदाच्या लक्षात आलं की अघोरी सुधाकरने मायावी काळ्या शक्तीच्या जोरावर माझे तरुण शरीर घेतले आहे आणि त्याने आपले वृद्ध रोगट शरीर मला दिले आहे....सुधाकरने सांगितल्या प्रमाणे आता आनंदाला अनेक विद्या येत तरी होत्या पण त्या विद्येबरोबर सुधाकरने त्याला आपले वृद्ध शरीर सुद्धा दिले होते आणि आनंदाचे तरुण शरीर घेऊन तो निघून गेला होता..."परकाया प्रवेश विद्या"....आनंदाला हे सगळं जाणवत होते...तो हताश होऊन खाली बसला....आता त्याच्यासाठी सगळं संपलं होतं....सुधाकर त्याचं सगळं काही घेऊन गेला होता त्याने फक्त आनंदाच्या खिशात त्याच्या सिगरचे एक पाकीट ठेवले होते....आनंदा पूर्णपणे संपला होता....सुधाकरचा हा वृद्ध देह अजून किती काळ टिकणार होता....मधून मधून त्याला रक्ताच्या उलट्या सुद्धा होत होत्या....लडखडत लडखडत आनंदा त्या व्हील्सन पॅलेस मधून बाहेर पडला....अंधार पडला होता....समोरचं काहीच दिसत नव्हतं....वाट मिळेल तिथे आनंदा ठेचकळत ठेचकळत चालत होता....रडत होता....त्याने जे काही कमावले होते ते सुधाकर घेऊन गेला होता....आनंदाच्या डोळ्यासमोर त्याचे आईवडील येत होते....चालून चालून आनंदा दमला होता....धापा टाकत होता त्या जंगलात वेड्यासारखं किंचाळत होता.....आता जगून तरी काय फायदा?? असा विचार करून त्या जंगलातल्या झाडांच्या वर डोकं आपटून आपटून घेत होता....एका मोठ्या झाडाजवळ येऊन त्याची शुद्ध हरपली....डोकं आपटल्याने डोक्यातून रक्त वाहत होते...आनंदा बेशुद्ध झाला होता.....किती वेळ?? काहीच कल्पना नाही
उन्हाची कोवळी किरणे आनंदाच्या चेहऱ्यावर पडली तसा तो जागा झाला.....वरती भल मोठं वडाचे झाड होते.....त्या पानातून कोवळे किरण त्याच्या अंगावर पडत होते त्याने आपल्या डोक्याला हात लावला...कुणीतरी त्याच्या डोक्याला झाडपाल्याचा लेप लावला होता..आनंदा आजूबाजूला बघून गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करत होता.....एका बाजूने गुरगुरण्याचा आवाज येत होता त्या गुरगुरण्याला सुद्धा एक लयबद्धता होती....आता मात्र नवीन काही बघण्याचं आनंदाचे धाडस होत नव्हते पण त्याने समोर जे बघितलं ते बघून आनंदाच्या रोगट शरीरावर शहारे उमटले....एक मोठी शिवपिंडी होती त्यावर एक कमीत कमी 10 फुटाचा धिप्पाड केसाळ त्याच्या डोक्यावर दोन शिंगे होती...काळा केसाळ देह...नक्कीच राक्षस होता तो....त्याने एकवार आनंदाकडे बघितलं...चमकदार लालभडक डोळे....भयानक चेहरा रान डुक्कराप्रमाणे दोन बाहेर आलेले सुळे.....पण त्याला राक्षस म्हणावे कस?? त्याने त्या गेंड्याच्या कातडी सारख्या कडक त्वचेवर जागोजागी भस्म लावले होते....जानवे परिधान केले होते....तो पिंडीवर एक एक फुल वाहत वाहत तो शिवस्तोत्र म्हणत होता....आनंदा शुद्धीवर आलाय हे पाहून त्याने शिवाला एकदा हात जोडले....आणि उभा राहिला....आनंदा घाबरला....एक भलामोठा राक्षस होता तो चालताना जमीन हलत होती...त्याची तीक्ष्ण नखे आनंदाला दिसत होती... पण अंगावर जानवे,भस्म बघून आनंदा थोडा शांत राहिला....तो राक्षस आता आनंदा समोर बसला आणि ध्यानस्थ मुद्रेत बसून त्याने डोळे बंद केले....एक कर्कश घोगरा आवाज त्या वातावरणात घुमला
"मी काय सांगतो ते नीट ऐक.....मला पृथ्वीवरच्या प्रत्येक गोष्टीची ज्ञान आहे....अस म्हणत त्याने आनंदाला जवळ येण्याचा इशारा केला....आनंदा घाबरत घाबरत त्याच्या जवळ आला....त्या राक्षसाने आनंदाचा हात घट्ट पकडला काही क्षण थांबून तो बोलू लागला
"अघोरी सुधाकरने आपल्या शक्तीचा परत गैरवापर केला आहे..त्याने मानवकल्याणाचे सगळे नियम मोडले आहेत.....त्याचा हा तिसरा परकाया प्रवेश आहे.....तुझं शरीर घेऊन तो उत्तरेकडे एका गुहेत साधना करून तो आपली शक्ती परत मिळवेल...तू...तू...गेल्या जन्मात माझा शिष्य होतास तू एक पवित्र आत्मा आहेस...मी तुला अंधकारात ढकलुन देणार नाही....मी तुझा गेल्या जन्मी गुरू होतो आताही तुला मार्ग दाखवेन...सुधाकर तिथं पोहोचण्याआधी तू सुधाकर ला रोखलं पाहिजेस.....आता काट्याने काटा काढला पाहिजे.....मी तुला फक्त साक्षात्कार देऊ शकतो....सुधाकरशी लढण्याची शक्ती तुला दुसरीकडून मिळवावी लागेल...ती शक्ती सुधाकरला तुझ्या जवळ आणून उभं करेल....इथून थोडं लांब शिवापूर गाव आहे तिथे सुधाकर पेक्षा शक्तिशाली अघोरी हरिबा होऊन गेला आहे....त्याने स्वतःला एका वाड्यात कैद करून घेतलं आहे....तो त्याच्या सोन्याचे रक्षण करत आहे...हरिबाने त्या वाड्यात अनेक घातक आणि शक्तिशाली आत्म्यांना कैद केले होते आणि अजूनही ते तिथेच कैद आहेत....हरिबाला आता काही काळानंतर मुक्ती मिळणार आहे त्यामुळे तो नियमानुसार कुणी सजीव उत्तराधिकारी शोधत आहे जो त्याच्या सोन्याचे रक्षण करील....हरिबाला लोभी,विलासी माणसे आवडत नाहीत....त्याला जर आपला वारस मिळाला तर आपली सगळी शक्ती,कैद केलेल्या आत्मा सगळं त्याला देईल.....तेव्हा तू हरिबाचा वारस हो.."
एवढं माफक मोजके बोलून त्या राक्षसाने आनंदाच्या डोक्यावर हाथ ठेवला आनंदाच्या डोळ्यासमोर सगळं चित्र फिरू लागलं तो भूतकाळात पोहोचला....हरिबा...त्याचं सोनं...तो वाडा तिथे कैद असलेल्या शक्ती हे सगळं आनंदाच्या डोळ्यासमोरून जाऊ लागलं...सगळं काही सत्य आनंदाच्या डोळ्यासमोरून फिरत होत....सुधाकर किती दृष्ट आहे हे ही त्यांना त्या हस्तस्पर्शाने कळलं होतं....काही वेळाने त्या राक्षसाने आनंदाच्या डोक्यावरून हात काढला आणि परत शंकराची साधना करू लागला...एक वेगळाच चमक्तारी स्पर्श होता तो....एक वेगळाच आत्मविश्वास आनंदाच्या त्या खंगलेल्या देहात आला
आता आनंदाकडे एका गावचे नाव होते....सोबत सुधाकरची शक्ती होती आणि एक योजना..एक आशेचा किरण त्याला दिसू लागला..आनंदाने आपल्या कंबरेला हात लावला....सुधाकरने आपल्या कंबरेला एक काळा दोरा गुंडाळला होता तो त्याने तोडून काढला आणि हातात घेऊन काहीतरी विचित्र भाषेत बडबडू लागला....एखादी कला शिकल्यावर जशी ती आयुष्यभर सोबत असते अस काहीसं आनंदाला वाटत होतं....सुधाकरने आनंदाला आपला वृद्ध देह दिला होता सोबत आपल्या काळ्या शक्ती सुद्धा दिल्या होत्या कारण तो आता एक सामान्य आयुष्य जगणार होता....आता त्याला ह्या तंत्र विद्या जड झाल्या होत्या त्याला ह्या विद्या आतून कुरतडत होत्या...आतून खात होत्या म्हणून आता तो ह्या विद्या आणि देह त्यागणार होता....तरुण झालेल्या सुधाकरला माहीत होतं की आपलं आयुष्य कमी आहे आणि आनंदा आपला पाठलाग करू शकत नाही पण इकडे आनंदा पूर्णपणे तयार होता आपला बदला घेण्यासाठी....आनंदाने तो काळा दोरा तोडून 3 तुकडे केले आपल्या पायात आपल्या हातात आणि एक दोरा आपल्या शेंडीला बांधला....हा अभिमंत्रित धागा आनंदाचे रक्षण करणार होता....कुणीही त्याच्या मनात काय चालू आहे हे वाचू शकत नव्हतं....अगदी कुणीही...ही सगळी तयारी करून आपल्या छातीवर हात ठेवून त्याने आपल्या शक्तीच्या जोरावर आपल्या छातीवर हात ठेवून व्हील्सन पॅलेस ते शिवापूर मधला हरिबाचा वाडा असा प्रवास अदृश्य होऊन काही सेकंदात पूर्ण केला होता
तो इथे आला तेंव्हापासून त्याने नाटक चालू केलं...त्याला स्वतःचा इलाज करून घ्यायचा होता.....आजारी तर तो होताच पण हरिबा ज्या ज्या परीक्षा घेत होता त्याला आमिष दाखवत होता त्या आमिषाला आनंदा जराही बळी पडत नव्हता.....दोन नग्न स्त्रिया जेव्हा त्याचा हात पकडून त्याला आकर्षित करत होत्या तेव्हा आनंदाचे डोके थोडे बधिर झालं होतं....त्या नग्न स्त्रियांना कुणीही भुलले असते पण आनंदाने मनावर ताबा ठेवला होता ..त्याला ह्या श्रापातून मुक्तता हवी होती...त्याला तेव्हा डोळ्यासमोर त्याचे आईवडील दिसत होते त्यामुळे त्याने हात आवरता घेतला....आनंदाला माहीत होतं की इथं त्याच्या मनात जराही लोभ आला तर हरिबा त्याचे चिथडे उडविला....आनंदाने स्वतःला भानावर ठेवले आणि तो झाला हरिबाचा वारस....
हरिबा इथून मुक्त झाल्यापासून आनंदा आता इथला मालक होता...आनंदाने लगेच दुसऱ्या दिवशी सगळ्या काळ्या शक्तींना त्या मुख्य हॉल मध्ये बोलावले....प्रत्येक काळ्या शक्तीला एक एक काम दिलं....हे सगळं तो डोळे बंद करून बोलत होता आणि त्या त्या बंदिस्त शक्तींना आदेश मिळत होता....त्याने दोन पिशाच्चाना आपला म्हणजे आनंदाचा फोटो दाखवला तो कुठे असेल हे ही आपल्या तंत्र विद्येने त्यांना सांगितलं....त्याबरोबर ते दोन पिशाच्च आनंदाचा आदेश पूर्ण करण्यासाठी निघाले....सोबत एक एक विधीसाठी लागणाऱ्या वस्तू जमा होत होत्या....मानवी कवटी,चार बकर्यांची मुंडकी,काही पक्षांची पिसे,अस काहीसं जमा झाले....आनंदाने ही सगळी पूजा मांडली...आणि दम लागल्याने तो तिथल्या एका आलिशान खुर्चीवर बसला....डोळे बंद करून त्याने एक आदेश सोडला त्याच बरोबर एक पिशच्चीनी एका सुंदर स्त्रीचे रूप घेऊन तिथे आली.....जगात नसेल इतकी सुंदर स्त्री होती ती....लाडिकपणे ती आनंदाच्या मांडीवर बसली आणि त्याला प्रेम करू लागली....आनंदा अधून मधून खोकत होता...आनंदाने खिशातून ती मोठी सिगार काढली जी सुधाकर त्याच्या खिशात कोंबून गेला होता...ती सिगार त्याने तोंडात ठेवली...आणि त्या सुंदर स्त्रीला जवळ ओढले....त्या सुंदर स्त्रीने ती सिगार पेटवली....आनंदा एका राजाच्या ऐटीत बसून ती सिगार ओढत त्या पाठवलेल्या दोन पिशाच्चाचीं वाट बघू लागला...आनंदाच्या तरुण देहात असलेल्या त्या पिशाच्चानीं हिमालयातून उचलले ते त्याला घेऊन येत होते....आनंदाला हे सगळं जाणवत होते आता काही क्षणात आनंदाला आपला तरुण देह परत मिळणार होता....सोबत आता त्याला ज्या दुसऱ्या दुनियेतल्या गोष्टी जाणून घ्यायची जिज्ञासा होती त्याचे पूर्ण भांडार आनंदाजवळ होते...इथे कैद असलेली एक एक आत्मा म्हणजे विद्वान होती आणि आनंदा आता आतापर्यंतच्या सगळ्यात श्रेष्ठ अश्या तांत्रिकाच्या म्हणजे हरिबाच्या पूर्ण शक्तीचा त्याच्या संपत्तीचा मालक होता..........(कथा समाप्त)
