मी सायली कुलकर्णी.. परत नवीन भयकथा….
( कथेत काही चुका असतील किंवा सुधारणा करायच्या असतील तर अवश्य सांगा…. )
घरात सणवार असो किंवा कुणाच वर्षश्राद्ध मला बाहेरून आणलेला स्वयंपाक अजिबात आवडत नाही…. घरात पंगती बसायला हव्यात… ताटात सुग्रास…. भरपूर अन्नपदार्थांची रेलचेल हवी.. नुसतेच भरपूर अन्नपदार्थ असून उपयोग नाहीत ते चवीला आणि दिसायला सुद्धा सुंदर असायला हवेत…कस तरी करायचं म्हणून उरका नको…. भात मऊ लुसलुशीत पण मोकळा हवा…. वरण व्यवस्थित शिजलेल असाव… नुसती डाळ डाळ नको…. मसाले भाताचा दरवळ पूर्ण घरभर पसरला पाहिजे…. आमटीला चांगली लसणाची आणि कडीपत्याची चरचरीत फोडणी पाहिजे… जी कुठली भाजी केली आहे ती व्यवस्थित शिजली पाहिजे… कोशिंबीर खमंग असायला पाहिजे…. चटणीत मिरचीचा ठसका असायलाच पाहिजे…. चपाती
(पोळी ) ला चांगले पदर सुटले पाहिजेत…चपाती टम्म फुगली पाहिजे…..जो काही गोडाचा पदार्थ केला आहे तो व्यवस्थित गोड झालाच पाहिजे…. म्हणजे जेवायला आलेल्या व्यक्तीने मनापासून जेवणाचे कौतुक केले पाहिजे… आणि आलेला अतिथी मनसोक्त पोटभर जेवला पाहिजे…. काही जणांना वाटेल हे अतिशयोक्ती…. पण माझा हा हट्टच आहे…. आता काहीजण म्हणजे कोण सांगू का आमच्या सुनबाई… अजिबात कामांचा उरक नाही…. हाताला अजिबात चव नाही… कसं काय माझा मुलगा तिच्या हातचं जेवतो देवाला माहित….. बिचाऱ्याच्या पोटाचे हाल होत असणार हे नक्की ….तरी बरं ते दोघे तिकडे शहरात राहतात…नाही तर आम्हाला पण तिच्या हाताचं खायला लागलं असत…. बेचव अन्न…..सून आणि मुलगा सणासुदीला किंवा वर्षश्राद्धासाठी म्हणूनच गावाकडे येतात…. पण मला मात्र अन्नपूर्णा प्रसन्न हो …. माझ्या हाताला एवढी सुंदर चव आहे की मी जर हॉटेल काढल असत ना तर मी बक्कळ पैसा कमावला असता…. आमच्या सुनबाई इकडे आल्या की मला फक्त वरवरची तयारी करून देणार… फोडण्या घालायच काम नेहमीप्रमाणे माझ्या कडेच … जरा माझ्या सारखा स्वयंपाक करायला शिक म्हंटल की लगेच कारण द्यायला चालू…. जरा म्हणून शिकायची हौस नाही… पण आता मला स्वयंपाक करणं जरा अवघड जातंय… रोज आमचे हेच जेवण करतात…. त्यात आज वर्ष श्राद्ध… सगळे पाहुणे आहेत आज जेवायला… जास्त माणसं सांगितली नाहीत….. आणि मला बाहेर आचाराच्या हातचं जेवण अजिबात आवडत नाही…. आता सगळ्यांना सुनबाईच्या हातच खायला लागते का काय,.... आल्यात बघा महाराणी स्वयंपाक घरात…. सकाळ चे 6 वाजलेत… सगळा स्वयंपाक करायचा आहे…. मी कोपऱ्यात उभी आहे माझं बारीक लक्ष आहे तिच्यावर…. सगळी कच्ची तयारी करून घेऊ दे…. फोडणी द्यायच्या वेळी तिला धरते ( पछाडते )..... नेहमीप्रमाणे फोडणी मीच देणार आहे.,... आलेल्या पाहुण्यांनी पोटभर जेवायला नको का….. सांगायचं राहिलं तुम्हाला आज माझच वर्षश्राद्ध आहे…. मला जाऊन आज बरोबर एक वर्ष पूर्ण झालं…. अजून मुक्ती नाही मिळाली मला…. ( आमचे हे पण वरवरची तयारी करतात आणि फोडणी द्यायच्या वेळी मी ह्यांना पछाडते…. फोडणी मात्र अजूनही मीच देते… )
--------------------------------------------
माणसाची परिस्थिती माणसाला काय काय करायला भाग पाडते ना… सुधा ची पण तशीच अवस्था होती….. घरी ती व तिची आई दोघीच … घरची परिस्थिती बेतास बात असल्यामुळे बिचारीला दवाखान्यात कामाला जावं लागायचं… दवाखान्यात कामाचा जास्त लोड न्हवता आणि पगार पण तसा बरा होता…. पण दवाखाना तिच्या घरा पासून जरा लांब होता …. दवाखान्याला वळसा घालून घरी जावं लागायचं…. घरा कडे नेणारे 2 रस्ते… रात्रीच्या वेळी दोन्ही रस्ते जरा सामसूम च…. आणि त्या रस्त्यावर वस्ती पण तुरळकच…. दवाखान्यातुन 7.30 वाजता निघाल की लांबच्या रस्त्याने घरी जायला 8.30 आणि दुसऱ्या रस्त्याने 8 पर्यंत पोहचता येत असे… पण लांबच्या रस्त्यावर गावातील गुंड प्रवृत्ती ची लोक टाईमपास करत बसायची… वस्तीतील लोक पण ह्या मुलांच्या हुल्लडबाजीला वैतागलेले…. पण त्यांच्या विरुद्ध कोण जाणार ….दारू पिऊन हुल्लड बाजी करत बसायची….लांबच्या रस्त्यावर गुंडाची भीती….. आणि जवळच्या रस्त्यावरून जाताना मनात अनामिक भीती साठायची…. सुधा 1-2 दा जवळच्या रस्त्याने गेली पण त्या रस्त्यावरून जाताना तीला खूप भीती वाटायची…. सुनसान रस्ता…लांब लांब अंतरावर असलेले दिवे…2 दिव्यांच्या मधले अंतर अंधारामय…. दुतर्फा झाडी… निरव शांतता…. मनात नेमके भूतांचे विषय यायचे आणि कधी एकदा आपल्या घरी जातो असं सुधाला वाटायचं… जेव्हा जेव्हा ती लांबच्या रस्त्याने जायची तेव्हा ती टपोरी मुले तिला छेडायची…. टॉन्ट मारायची… तिला बघून मुद्दाम मोठ्याने गाणी म्हण…. मुद्दाम वाटेत अडव… तिची चेष्टा कर… असं काहीस करायची…. एकदा तर हद्द झाली एका टपोरी मुलांन तिची ओढणी पकडली….तो मुलगा अंगचटीला येऊ लागला…. अंगात आहे नाही तेवढी ताकद लावून तिने त्याला ढकलले आणि ती तिकडून पळून आली…. त्या मुलांना माहिती होत ती आज ना उदया त्यांच्या तावडीत सापडणार…. त्या मुलांच्या भीतीने 3-4 दिवस कामावर पण गेली नाही…. पण असं घरी किती दिवस थांबणार??? कामावर तर जायलाच हवं…. शेवटी एक ठरल… त्या जिवंत माणसाच्या भूतांन पेक्षा तो सुनसान रोड बरा… आता रोज त्याच रस्त्यावरून यायच…. त्यादिवशी पासून किंवा त्या रस्त्याने यायच चालू केलं…गरीब परिस्थितीचे भूत हे खऱ्या भूतापेक्षा पण अतिशय भयानक असतं…. आज तिला त्या रोडवर अचानक एक मुलगा उभा दिसला…. रोडवरच्या लाईट पासून जरासा लांबच उभा होता… तिला आता भीती वाटू लागली…. आता आपलं काही खरं नाही… चेहरा घाबरा घुबरा झाला …..इतक्यात त्या मुलाने हाक मारली “ ताई कसलं टेन्शन नको घेऊस हा भाऊ आहे पाठीशी ”.... क्षणात चेहऱ्यावर सुंदर असे हास्य आले…. आपण पूर्ण सुरक्षित आहोत याची भावना झाली…. “ ताई कसली काळजी करू नकोस तुझं घर व्यवस्थित मी पाठीमागे आहे तुझ्या…. तुला सोबत देतो ”.... तिचा तो भाऊ खरच तिचा पाठीराखा झाला… ती तिच्या गल्लीत जास्त पर्यंत त्यानी तिला सोबत दिली… आता हे रोजच झालं होतं रोज तिचा हा मानलेला भाऊ तिला घरा पर्यंत सोबत देत होता …. त्या गाव गुंडाना समजलं सुधा दुसऱ्या रोड ने जाते… आज तिचा बाजार उठवायचा…. ठरल त्यांच…. प्रत्येक जण आधीच त्या रोड वर येऊन लपून बसला… ती त्या रोड वरून चालत आली की तिला घाबरवायच… आणि तिच्या वर **** करायचा…. आणि तिला मारून झाडीत फेकून द्यायचे…. प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी लपून बसला… सुधा त्या रोड वरून आली…. अचानक त्या गावागुंडाच्या पैकी एक जण तिच्या पायाजवळ मरणासन्न अवस्थेत पडला… सुधा खूप घाबरली…. तिला आवाज आला “ ताई घाबरू नकोस मी आहे तुझ्यासोबत ”... सुधा निर्धास्त झाली फक्त आज तिला तिचा भाऊ कुठे दिसत नव्हता…. सुधा जशी जशी पुढे जात होती तसा तसा प्रत्येक गावगुंड तिच्या पायाशी मरणासन्न अवस्थेत येऊन पडत होता… ज्या मुलाने तिची ओढणी पकडली होती तो मुलगा तिच्या पायाशी आला “ दीदी माफ कर परत अशी चूक करणार नाही…” समोर तिला तिचा भाऊ दिसला…. आणि आता तिचं लक्ष तिच्या भावाच्या पायाकडे गेले… त्याला पायच नव्हते…. ते बघून सुधा खूप घाबरली…. तो म्हणाला “ ताई घाबरू नकोस मी तुला माझी बहीण मानतो…. खरं आहे मी जिवंत नाहीये…. याच रोड वरून मी जात असताना मला एका मुलीच्या ओरडण्याचा आवाज आला…. हीच सर्व मुलं तिच्यावर अतिप्रसंग करत होते करत…. मी कस बस त्या मुलीला पळून जायला मदत केली पण मी त्यांच्या तावडीत सापडलो…. मी एकटा होतो… त्यांनी माझे पाय मोडले माझा जीव घेतला आणि इकडेच झाडीत फेकून दिलं….,, पण समाधान होतं की त्या ताईची इज्जत मी वाचवली… बरेच दिवसा पासून यांचा बदला मला घ्यायचा होता…. तू अजिबात मला घाबरू नकोस….. मी कायम तुझ्या आणि तुझ्या सारख्या सर्व बहिणीच्या पाठीशी आहे…. ”
राखी न बांधता पण एक भाऊ त्याचं कर्तव्य चोखपणे बजावत होता….
--------------------------------------------
#लपाछपी….
लहानपण किती छान असतं ना… सर्वजण तुम्हाला सांभाळून घेतात तुमच्यावर प्रेम करतात….तुम्हाला चांगलं माणूस म्हणून घडवायच्या दृष्टीने प्रयत्न करतात… जिथे गरज आहे तिथे तुम्हाला ओरडतात देखील… जेणेकरून तुम्हाला मोठेपणी चूक किंवा बरोबर या गोष्टी समजाव्यात.. पण माझ्या बाबतीत मला कोणी ओरडलंच नाही…माझ्या सर्व चुका पदरात घेतल्या गेल्या… मला कोणी योग्य अयोग्य शिकवलंच नाही… माझी आई मी झाल्या नंतर थोडे दिवसात वारली… माझा बाप खूप श्रीमंत… त्यामुळे माझे नको एवढे लाड झाले… आमच्या घरी नाथा नावाचा एक नोकर होता… गिड्डा… जाड…. काळा…. दोन्ही हाताला 6-6 बोट असणारा…. अतिशय विक्षिप्त आणि खुनशी होता…. पण माझ्यावर अतिशय जीव होता… मला लाडाने “ मालकानू ” बोलायचा……(“मालकानू ”म्हणून हाक मारायचा ) आम्ही लहानपणी लपाछपी खेळायचो…. मी कुठे जरी लपलो तरी तो मला व्यवस्थित हुडकून काढायचा….
“मालकानू तुम्ही कुठं भी लपा…. मी शोधून काढणारच तुम्हास्नी ….” …. आणि तो खरंच मला शोधून काढायचाच…..मला समजायचं नाही त्याला माझ्या लपण्याच्या जागा कशा माहिती होतात….. एकदा लहानपणी माझ्या अंगावर एक कुत्रा धावून आला…. नशीब चांगल म्हणून वाचलो मी नाही तर तो मला चावलाच असता…नाथा ला समजल्यावर त्यानं तो कुत्रा हुडकून त्याला यमसदनी पाठवला….माझ्या सर्व चुका तो लपवून ठेवत असे… मला फार लहानपणापासूनच वाईट संगत लागल्या… मी खूप लहानपणापासूनच वाया गेलो…. जस कळत वय झालं तशी व्यसन चालू केली… दारू….गांजा…सिगरेट….मुली….. माझ्या सगळ्यात चुकांची…. बेताल वागण्याची….लपवाछपवी नाथा करत होता …. आमच्या अप्पाना माझं वागण खटकत होत… पण नाथा वेळ मारून नेत होता… एकदा मी गावातल्या एका मुलीची छेड काढली…. तिचा बाप आमच्या घरी येऊन आमच्या आप्पांना खूप वाईट बोलून गेला…. आप्पांनी मला दोन मुस्काटीत लावून दिल्या… नाथा रागाने धुमसत होता… त्याला अजिबात आवडलं नव्हतं आमच्या आप्पानी मला मारलेलं…. मला पण आमच्या आप्पांचा प्रचंड राग आला होता…. आमच्या घराच्या मागच्या बागेत बायोगॅस प्रकल्प होता…. मी रागाच्या घरात आमच्या आप्पांच्या अंगावर धावून गेले…. आणि पूर्ण ताकतीने त्यांच्या गळा आवळला…. मदतीला नाथा होताच…. आप्पांना आम्ही यमसदनी पाठवलं…… आप्पांच्या बॉडीचे छोटे छोटे तुकडे करून बायोगॅस च्या खड्ड्यात फेकून दिले….. आप्पा आणि मी माझ्या पुढील शिक्षणासाठी शहरात काकांकडे गेलो असं नाथांनी गावभर केले…. नाथा रोज न चुकता मला फोन करत होता….दिवस जात होते…. नाथानी लग्न केल….. नाथा आमचे घर सांभाळत होता…..आज बरेच वर्षांनी गावात परत आलो…. घराच्या मागे दुसरा बायोगॅस प्रकल्पासाठी खड्डा उकरून ठेवला होता…. विजा जोरदार होत होत्या…. मुसळधार पाऊस पडणार हे नक्कीच होतं…. मी मस्त दारू आणि चकणा घेऊन बसलो…. दारूची नशा व्यवस्थित चढत होती…. नाथाची बायको आमच्या घरी स्वयंपाक करायला आली होती… माझ्यातील सैतान जागा झाला…. मी तिच्यावर अतिप्रसंग करताना नाथाने पाहिले …. नाथा माझ्या अंगावर धावून यायच्या आधी मीच नाथाच्या अंगावर धावून गेलो त्याला जोरात मारू लागलो…. त्याच्या दोन्ही पायावर मी गोळी चालवली….. नाथाच्या बायकोने जवळ पडलेला चाकू स्वतःच्या पोटात खूपसून स्वतःची जीवन यात्रा संपवली…. स्वतःच्या बायकोवर अतिप्रसंग झालेला…आणि तीन स्वतः चा अखेर चा श्वास घेतलेला नाथाने पाहिले… तसाच घसरत घसरत बायको जवळ जाऊन….तो तिच्या प्रेताला कवटाळून रडू लागला…. माझ्या डोक्यात अजून सुद्धा दारूची नशा होतिच…. आता मला नाथाचा पण काटा काढायलाच हवा होता नाहीतर त्यांनी गावभर केलं असतं आणि मला जेलची हवा खायला लागली असती…. नाथाच्या डोळ्यात देखत मी नाथाच्या बायकोचे तुकडे केले…. ते बायोगॅस प्रकल्पात टाकून आलो…. नाथाला पण तसेच फरफटत मागच्या खड्ड्यात फेकून दिले…. “ मालकानु चांगलं नाही वागलासा तुम्ही… तुम्ही कुठे बी जाऊन लपा मी तुम्हाला शोधणारच…. ” त्याची टिवटिव जास्तच चालू होती… जवळचा एक मोठा दगड उचलला आणि त्याच्या डोक्यावर टाकला…. खड्यात सगळी कडे रक्ताचा चिखल झाला…. त्याच्या अंगावर माती टाकत होतो… खड्डा मुजवला एकदाचा…. जोरात पाऊस चालू झाला…. मी घरी येऊन बसलो.,.. आणखी दारू प्यायला बसलो…. माझ्याकडून नक्की काय झालं याचा विचार चालू होता…. कसं बाहेर पडायचं हे विचार करत होतो…. सरळ जाऊन झोपलो…. जेव्हा जाग आली तेव्हा तिन्हीसांज झाली होती ….अंगणातला लाईट चालू केला…. आता लक्षात आलं आपण दारू च्या नशेत नक्की काय केल…. खिडकीतून खालती खड्ड्याकडे पाहिलं…. पाऊस पडून गेल्यामुळे सगळीकडे चिखल चिखल झाला होता…. आणि खड्ड्यातली माती साईडला पडली होती… खड्डा रिकामा होता… चिखलात हाताचे ठसे उमटले होते….सहा बोट असलेले ठसे घराच्या आतल्या दिशेने येताना दिसत होते…. घरात नाथा आला होता…. आणि आवाज ऐकू आला….. मेलेल्या नाथाचा “मालकानू चांगलं नाही वागलासा तुम्ही…” ही… ही… ही… चिरक हसत म्हणत होता “मालकानू तुम्ही कुठं भी लपा…. मी शोधून काढणारच तुम्हास्नी ….” मी घाबरून लपून बसलोय…. पण आता तो खरंच मला शोधून काढणार….आमचा लपाछपी चा खेळ परत चालू झालाय…..
Written By - सायली कुलकर्णी 



