#दरीतलं_सोनं
"अरे मर्दा चल की लवकर....दोन वाजले...आता त्या टोल नाक्यावर पोलीस नसतोय....आपल्याला आजच्या रात्रीच पलीकडच्या शहरात गेलं पाहिजे...आणि त्या सराफाला गाठलं पाहिजे"
मनोज च्या पाठीवर विक्रमची थाप पडली आणि मनोजने गाडीचा रेस वाढवला...गाडी सुसाट वेगाने त्या वेड्यावाकड्या वळणावरून त्या अंधाऱ्या घाटातून जात होती....पौर्णिमेचा दिवस ...त्या भयाण जंगलात चंद्राचा स्वच्छ प्रकाश पडला होता....रात्रीचे दोन वाजले होते...पण त्या दोघांच्या चेहऱ्यावर कसलीही भीती नव्हती....गाडी आता भुतांचा घाटाजवळ आली...जवळपास 20 किलोमीटरचा दर्याखोर्यांनी वेढलेला हा रस्ता "भुतांचा घाट" म्हणून प्रसिद्ध होता....अनेक चित्रविचित प्रकार तिथे घडायचे...अनेकांना वेगवेगळ्या आकृती दिसायच्या त्यामुळे तिथे अपघातांचे प्रमाण जास्त असायचे....भुतांच्या घाटातुन रात्रीचा प्रवास म्हणजे साक्षात मृत्यूच....हे समीकरण बनलं होत...रात्री 7 नंतर हा रस्ता पूर्णपणे सुमसान असायचा...ह्या घाटात मनोज आणि विक्रम दोघे सुसाट चालले होते....
मनोजचा रेस वाढत होता....समोरचं दृश्य बघून त्यांना आश्चर्य वाटलं....रात्री 7 नंतर भुतांच्या घाटात काळं कुत्र सुद्धा फिरत नव्हतं....पण समोरच्या रस्त्यावरून त्यांना एक बस येताना दिसली.....ती बस आडवी तिडवी कधी इकडे कधी तिकडे ब्रेकचा खर खर आवाज करत येत होती....हे बघून मागे बसलेला विक्रम बोलला
"अरे मन्या ती बघ बस....अरे त्या ड्रायव्हरनं दारू बिरु पिल्या की काय???.....अरे मरतय.....अरे.....अरे"
नियंत्रण सुटलेली बस अखेर दरीत कोसळली....तसे ते दोघे बाईकवरून खाली उतरले.....बस दरीत पडलेली बघून मनोजने जोरात टाळी वाजवली
"अरे विक्या.....परत लॉटरी लागली......लॉटरी.....चल....चल"
तसे ते दोघे धावत धावत त्याठिकाणी जाऊ लागले....एखाद्या मोठ्या अपघातावर त्यांचे खुश होण्याचे कारण सुद्धा तसेच होते....मागील महिन्यात पहाटे ते दोघे असेच पलीकडच्या गावाकडे जात होते...एक बस अशीच संरक्षक कठडा तोडून दरीत पडली होती....भर उन्हाळा सगळी झाडे झुडपे सुकून गेली होती.....खोल दरीत अस्थावस्त पडलेले मृतदेह त्या दोघांना स्पष्ट दिसत होते.....गावातले सगळ्यात धाडसी तरुण म्हणून मनोज आणि विक्रम ओळखले जात होते....पण धाडसी तितकेच व्यसनी.....दोघांनाही ती तडफडणारी माणसे दिसत होती....अखेर दोघांनी त्या दरीत उतरण्याचे ठरवले....कुठलाही आधार न घेता....दगडाच्या कपारीत....खाचेत हाथ घालून ते दोघे दरीत उतरत होते....झाडावर एका बाईचं प्रेत पडलं होतं....चाळिशीतली होती बहुतेक....विक्रमची नजर तिच्यावर पडली....तिला खूप जखमा झाल्या होत्या रक्त वाहत होतं.....अचानक मनोजची नजर तिच्या दागिन्यांकडे गेली.....त्याने विक्रमकडे इशारा केला....विक्रमने लगेच खिश्यातला चाकू काढला आणि ते दागिने तोडून काढू लागला....दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद होता....दरीत उतरून त्यांनी सगळ्या प्रवाश्यांचे दागिने मोबाईल मौल्यवान वस्तू आपल्या पिशवीत कोंबल्या आणि प्रवाश्यांना तसच सोडून ते परत दरी चढून वरती आले.....ते प्रकरण पूर्णपणे थंड झालं...त्या घटनेला नुकताच महिना झाला....तेच दागिने मोबाईल बाजूच्या मोठ्या शहरात विकून माल कमवायचा त्यांचा उद्देश होता....विक्रमच्या पाठीवरच्या सॅक मध्ये हे दागिने भरले होते.....त्यात आता परत ही घटना म्हणजे त्या दोघांना परत लॉटरी लागल्या सारखं होत....
"मन्या चल लवकर सकाळ व्हायच्या आत सगळा माल लुटला पाहिजे....आता बघ ह्यो माल लुटला की बुलेट गाडी काढतो बघ....काय म्हणतोस"
विक्रमच्या वाक्याला प्रतिसाद देत....मनोज त्याला म्हणाला
"अरे व्हय रं....मी पण माझ्या नटीला स्कुटी घेऊन देईन म्हणतोय...सारखं मागतेय ती"
अस बोलून दोघांनीही घाटात उतरायला सुरुवात केली....त्या खोल दरीत ती तडफडणारी माणसं मुंग्यांसारखी दिसत होती.....तिथे खाली एक बाई पडली होती...तिच्या गळ्यात सोन्याचे दागिने चमकताना विक्रम ने बघितले....एक हलता प्रकाश मनोजला दिसला त्याला बघून तो झपझप दरी उतरणाऱ्या विक्रमला म्हणाला
"अरे विक्या आवर लवकर...खाली बघ...कोण तर फोन लावत आहे...."
तसे ते दोघे खाली उतरू लागले...एका सुकलेल्या झाडाच्या फांदीवर एक माणूस अर्धमेल्या अवस्थेत पडला होता....दरीत उतरणाऱ्या ह्या दोघांकडे बघत
"भाऊ ओ भाऊ वाचवा ओ मला.....पोरं वाट बघत आहेत माझी"
अशी विनवणी करत होता...मनोज त्या आवाजाच्या दिशेने गेला....त्या माणसाचा रक्ताळलेला हाथ मनोजला आपल्याकडे येण्याचा इशारा करत होता...मनोज तिकडे गेला...आणि त्याने विनवण्या करणाऱ्या हातातील अंगठी काढून घेतली...हे बघून "भाऊ...ओ...भाऊ" करत त्या माणसाने प्राण सोडले....मनोजने त्याच्या गळ्यातील चेन आणि खिश्यातली मोबाईल काढून घेतला....इकडे विक्रम खाली उतरत होता....त्याला एका वृद्ध बाईचं प्रेत दिसलं....त्या चंद्राच्या उजेडात तिच्या अंगावरचे दागिने चमकत होते....विक्रमने ते ओरबाडून सॅक मध्ये कोंबायला सुरवात केली...विक्रम आणि मनोज बेभानपणे दागिने मोबाईल लुटत होते....विक्रमला एका झाडावर एका तरुण बाईचं रक्ताच्या थरोळ्यात पडलेलं प्रेत दिसलं....तो तिच्याजवळ गेला....ती त्याला मदतीचे आवाहन करत होती....विक्रमने तिच्या गळ्यातील नेकलेसला हाथ घातला...तश्या त्या बाईने विक्रमचा हात पकडला....विक्रम तो भरजरी नेकलेस ओढत होता...त्या झटापटीत ती बाई त्या खोल दरीत किंचाळत पडली...हातात आलेला सोन्याचा नेकलेस विक्रमने सॅक मध्ये कोंबला....खालून त्या बाईचा आणि इतर प्रवाश्यांचे विव्हळण्याचे आवाज येत होते...मनोज ने विक्रम कडे बघत एक जोराची आरोळी ठोकली
"विक्या.....iphone सापडला मला iphone.....लॉटरी लागली रे लॉटरी....."
मनोजची नजर विक्रमकडे होती....एका प्रवाशाच्या खिश्यातली iphone मिळाल्याचं आनंद अचानक चिंतेत बदलला....त्या चंद्राच्या उजेडात....विक्रमच्या सॅक मधून एक भलामोठा काळा नाग आलेला दिसला...तो नाग फणा काढून विक्रमच्या बरोबर मागे होता....मनोज घाबरला....तो जोरात ओरडला
"विक्या....मागं.....मागं......"
मनोजच्या चेहऱ्यावरील चिंता बघून विक्रमने आपली मान हळूहळू मागे घेतली...मागे सॅक मधून बाहेर आलेला एक काळा नाग फणा काढून उभा होता.....क्षणार्धात....एक फसस्स असा आवाज घुमला ....त्या सापाने आपला अतिविषारी दंश बरोबर विक्रमच्या कपाळावर केला होता....विक्रमचे डोळे विस्फारले.....त्याने एक नजर मनोजकडे बघितलं...त्याच्या तोंडातून फेस आला आणि तो सरळ त्या दरीत पडला....मनोजच्या डोळ्यातून घळकन पाणी आलं....त्याचा जिगरी दोस्त आता त्या दरीने गिळला होता....मनोज आता घाबरला होता...तो आता वर चढू लागला.....त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते...त्याला दम लागला होता....त्याला जाणवलं की कुणीतरी त्याचा पाय पकडलं आहे....त्याने खाली बघितलं....एक पांढरा हात त्याचा पाय घट्ट पकडून होता....मनोज पाय झटकून तो सोडवण्याचा प्रयत्न करीत होता....त्याच लक्ष खाली होतं...एक सडलेल्या चेहऱ्याची बाई आपल्या मोठमोठ्या हातानी त्याचे पाय ओढत होती...मनोज रडू लागला
"सोड मला......सोड.....वाचवा"
त्याचा तो आवाज पूर्ण दरीत घुमत होता....त्याच्या डोक्यावर काहीतरी चिकट पडत होत....त्याने वर बघितलं....मगाशी ज्याच्या खिशातून मोबाईल काढून घेतला होता...तो माणूस त्या दरीत एका दगडावर उलटा लटकत होता...त्याच्या सडक्या रक्ताळलेल्या तोंडातून लाळ मनोजचा डोक्यात पडत होती...त्याच्या तोंडून भेसूर आवाज आला
"का...रे...घाबरलास का....जा ना खाली....घे काढून बायांचे दागिने....माझा तेव्हा मोबाईल घेतला होतास तू...अरे मी अर्धमेला होतो तेव्हा...शुद्धीत आलो तेव्हा मोबाईल शोधत होतो...मदत मागण्यासाठी....पण....पण....."
मनोज घाबरला होता...त्या दरीतून बसचा आवाज घुमू लागला...हॉर्न वाजू लागला....मनोजने आजूबाजूला नजर फिरवली.....लाल भडक चमकणारे डोळे त्याच्याकडे बघत होते....त्यांचे ते मोठंमोठे दात मनोजच्या चिंध्या करायला आतुर झाले होते....दरीतून...चमकणारे डोळे वर येत होते....त्यांनी मनोजला घेरलं त्यातील एक धोतर रक्तात भिजलेला सदरा असलेलं भुत समोर आलं
"पैशे लुटले आमचे...माझ्या पोरगीची फी होती...आता ती ऍडमिशन कशी घेणार...जमीन विकून पैशे उभे केलते....तेच द्यायला चाललो होतो"
एक म्हातारी आपले विस्कटलेले केस मागे सारत आपला जखमांनी भरलेला चेहरा अगदी मनोजचा चेहऱ्याजवळ घेऊन आली....
"माझं दागिनं घेतलं...माझ्या आयुष्याची कमाई..विकून एकुलत्या एक पोराचं ऑपरेशन करणार होते...आता मेला असेल तो"
अचानक एक असह्य असा कुबट वास त्या दरीत पसरला...त्याचे ते सडलेले,रक्तात भिजलेल्या चेहरे बघून मनोज प्रचंड घाबरला सडलेला दर्प त्याला हैराण करत होता...ते लकाकणारे दगड कपरिवर लटकणारे लांब लांब सुळे त्याचा बदला घ्यायच्या आत त्याने आपल्या हाताची पकड ढिली केली ...तो खाली कोसळू लागला...आणि किंचाळत त्या अंधाऱ्या दरीत हरवून गेला.....
"शीट यार आपण एक अकसिडेंट मिस केला...आताच तो किंचाळण्याचा आवाज आला होता....तो शॉट मिळाला असता की आपल्या युट्युब चॅनल वर लाईकचा पाऊस पडला असता"
चिडलेल्या रॉकीला धीर देत दुसरा मित्र म्हणाला....
"अरे जाऊ दे यार....तसं पण आपलं रात्रीचं भुतांच्या घाटातलं शूटिंग पूर्ण झालंय...आपल्या फॉलोअर्सचे चॅलेंज स्वीकारून आपण रात्री येऊन हे शूटिंग केलंयाच की"
रॉकी कठड्यावरून उडी मारून खाली आला
"तस नाही रे मॅक्स...आपल्या चॅनल ची थीम आहे ती...कित्येक अपघातांचे फुटेज ते तुटलेले हातपाय ह्यांना किती पसंद करतात लोक आजकल...."
बोलत असताना त्यांना कसला तरी आवाज आला...पैंजण वाजत होते....एक चाळिशीतली बाई त्यांच्या समोर उभी होती तिला त्या घाटात बघून दोघांना आश्चर्य वाटलं.....त्यांना बघून तिने प्रश्न केला
"काय रे पोरानो....काय करताय इतक्या रात्री ते पण इथे"
तिला बघून मॅक्स वेगळ्या उद्देशाने पुढे आला
"काय नाही काकू....आम्ही भयानक व्हिडिओ बनवतो आणि युट्युब वर टाकतो...."
गालावर हाथ ठेवत ती म्हणाली
"कसले व्हिडिओ आणि काय कुठं टाकता म्हणाला???"
रॉकी पुढे आला
"भयानक व्हिडिओ त्यात अपघात..खून...मारामारी....आणि....आणि...."ते" पण"
रॉकीच्या "ते" चा अर्थ ती समजली.....ती जरा हसली
"अरे पण आता 2 पोरांचा अपघात झाला की इथं...ती बघ त्यांची गाडी....दरीत पडली बिचारी....पण जाऊ दे मी तुम्हाला आता एका लाईव्ह अपघाताचा व्हिडिओ देते....ए तू कॅमेरा चालू कर"
रॉकीने कॅमेरा चालू केला....ती मॅक्सच्या जवळ वेळी तिने आपला हात मॅक्सच्या हातात ठेवला....तिच्या एकदम थंडगार बर्फ़ासारख्या हाताने मॅक्सच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले....रॉकीने कॅमेऱ्यात बघितले.....त्या कॅमेरा स्क्रीन वर ती रक्ताने माखलेल्या साडीत आणि सडलेल्या चेहऱ्यात दिसत होती....रॉकीच्या हातातून कॅमेरा खाली पडला
"भुत........भ.......भ.........भुत"
मॅक्सच्या हातावरची पकड तिने आवळली आणि धावणाऱ्या रॉकीला लांबच्या लांब हाथ करून पकडले...दोघे सुद्धा तिच्याकडे बघून किंचाळू लागले....ती आता आपल्या मूळ रुपात आली होती....मॅक्सची नजर दरी कडे गेली त्या दरीतून चढून अनेक विद्रुप सडके रक्ताने माखलेले चेहरे वर रस्त्यावर येत होते....त्यांचे लालभडक डोळे बघून दोघे सुद्धा जोरजोरात किंचाळू लागले....त्या बाईने इशारा केला तशी एक छोटी मुलगी पुढे आली तिने तो खाली पडलेला कॅमेरा पकडला आणि त्या तिघांच्या दिशेने फिरवला....ती बाई हसली
"अपघातांचे व्हिडिओ पाहिजे होते ना तुम्हाला???अरे असल्या कसल्या औलादी रे तुम्ही "मेलेल्याच्या टाळूवरच लोणी खाणाऱ्या" ए पोरी चालू आहे ना कॅमेरा??"
त्या बाईच्या प्रश्नाला त्या भयानक दिसणाऱ्या मुलीने अंगठा उचलून प्रतिसाद दिला
तिचा अंगठा बघून त्या बाईने एक जोराची लाथ रॉकीच्या पायावर मारली तसा खाडकन आवाज झाला हाड मोडून रॉकी विव्हळत पडला होता...मॅक्सच्या हातावर सुद्धा तिने जोरदार प्रहार केला त्याचं हाड मोडून लटकू लागलं...तसे ते विव्हळत पडले होते ती त्यांच्या जवळ आली...तिने त्यांचा कॅमेरा त्यांच्याकडे फेकला...आपल्या भयाण आवाजात ती म्हणाली
"आता फक्त हाड मोडलंय....परत इथे दिसला तर पोस्टमार्टम करीन....आता लिव्ह तुझ्या चॅनल वर
"भुतांच्या हल्ल्यात दोन तरुण ठार आणि दोन जखमी"
अस बोलून त्या सगळ्यांनी आपल्या माना फिरवल्या आणि परत त्या दरीत दिसेनासे झाले....................(समाप्त)
लेखन-----#शशांक_सुर्वे