विशाल त्या दिवशी नेहमीप्रमाणे कामावरून घरी परती च्या वाटेवर होता! दोनच दिवसां पूर्वी कुटुंब माहेरी गेल्याने तसा तो निवांत होता! बार मध्ये जाऊन व्हिस्कीचा पेग पोटात ढकलला व स्कुटर चालू करून वाट धरली!
एक वळणावर आला असता त्याला एक पन्नाशीचा माणूस काळजीयुक्त चेहऱ्याने एका बाकड्यावर बसलेला दिसला. खरेतर काहीच गरज नव्हती पण विशाल ने गाडी थांबवून विचारणा केली, काय भाऊ, काय प्रॉब्लेम आहे का?
माणसाने मान हलवली व सांगितलं कि माझी बस चुकली व मला चाळीस गाव ला जायचेय! मी आहे भुसावळचा!
विशाल: बर, पण आता तुम्हाले बस नाही भेटणार आता या वेळेला! दहा वाजून गेलेत! नाहीतर एक काम करा, तुम्ही माझ्या घरला चला व उद्या सकाळी चालले जा!
माणूस: (हात जोडून) चालेल मला, आपले उपकार होतील!
विशाल व माणूस घरी आले तेव्हा साडे दहा पावणे अकरा झाले होते!
तशी विशालला भूक नव्हती! पण त्याला विचारले, भाऊ भूक आहे का तुम्हाला?
गृहस्थ: अं? नाही विशेष!
विशाल: बर मग मी आम्लेट बनवतो! मी विशाल सातपुते! आपला परिचय?
गृहस्थ: मी सारंग शर्मा! डॉक्टर आहे व गेली तीस वर्षे भुसावळ ला क्लिनिक आहे! डायमंड क्लब आहे बघा, तेथे मी नेहमी काम बघतो honorary basis वर ! गरजू रुग्ण बघतो!
विशाल: बर, बर!
विशालने पटकन आम्लेट बनवून त्या गृहस्था ला प्लेट दिली व म्हणाला, डॉ. तुम्ही इथे आराम करा, मी वरच्या मजल्यावर झोपतो!
विशाल वर अजूनही व्हिस्कीचा अंमल होताच पण त्या गृहस्थाचे गूढ वागण्याने जरा उतरू लागला होता! उगाच मदत करायची बुद्धी झाली व घेऊन आलो खरे पण हे जरा विचित्र पात्र दिसतेय! भाषणाची पद्धत गूढ!
घरी तो व आपण फक्त बाकी कोणीच नाही! हा कसा असेल, सज्जन कि लफंगा? मला काही इजा पोहोचविणार तर नाही ना? डॉ. आहे सांगतोय ते तरी खरेय का?
का मीच अति विचार करतोय?
बिछान्यावर अंग टाकले खरे पण काहीतरी आवाज येत होता खालून मग विशाल हळूच उठला व दबक्या पावलांनी जिना उतरून खाली बघू लागला तर डॉ. कुठे दिसेना! तितक्यात विशाल केवढा तरी दचकला! त्याच्या डाव्या बाजूस खालीच उभा होता!
मला पाणी हवंय! डॉ. चा गूढ गंभीर आवाज!
पटकन विशालने खाली येऊन फ्रिज उघडला व बाटली त्याला दिली!
वातावरणातील शांतता अस्वस्थ करत होती!
विशालने पटकन वरचा मजला गाठला व बेडवर अंग टाकून दिले!
टिक टिक टिक! घड्याळा च्या आलार्म ने विशाल जागा झाला! दोन चा सुमार!
पायऱ्यांचा आवाज! धडधडत्या छातीने विशाल उठला!
दार थोडे किलकीले करून बाहेर बघतलं तर कोणी नव्हते!
हुश्श, दार लावले व मान वळवली मात्र!
तो बसला होता वरती च कॉम्पुटर टेबला च्या खुर्चीत पाठमोरा!
बापरे! हा कधी आला? दिसला कसा नाही? मान वळवून त्याने बघितलं आणि....विशाल च्या तोंडून अस्फूट.किंकाळी बाहेर पडली!
भेसूर चेहरा, तोंड रक्ताने माखलेलं! हीहीही!!
आई ग!!!!! किंचाळ ला व विशाल झोपेतून जागा झाला!
अरे च्या स्वप्न होते तर!
चादर डोक्यावर ओढून घेऊन पडून राहिला व गपकन डोळे मिटून घेतले!
पुन्हा कसल्या आवाजाने विशाल जागा! यावेळेस त्याचे हृदय अजून प्रचंड गतीने धडधडत होते! समोर बघितलं तेथे डॉ. नव्हता! उठला विशाल व जिन्यातून हळू हळू खालती येत बघितलं तर तो पाठमोरा बेडवर बसलेला व मान काटकोनात हलवत होता!
विशालने बघितलं मात्र, पटकन धूम ठोकली वर, दरवाज्याला कडी लावून ताणून दिली!
पहाटे अलार्म ने जाग आली तर सहा वाजलेले!
विशाल उठला व विचार करू लागला! काल रात्रीचे स्वप्न कोणते व खरे कोणते? डोकेच काम करत नव्हते त्याचे!
जिना उतरून खाली आला पण डॉ. चा मागमूस दिसेना! वॉशरूमचा दरवाजा उघडाच!
सर जी, सर जी, कुठे आहे तुम्ही?
कसलाही आवाज नाही, काही नाही!
तेवढ्यात विशालच्या डोक्यात ट्यूब पेटली! त्याचा एक परिचित तेथे डायमंड क्लब मध्ये होता त्याचा नं. शोधून फोन लावला!
नमस्कार, देशमुख साहेब, तुमच्या इथे डॉ. सारंग शर्मा म्हणून कोणी काम बघतात का हो?
देशमुख: हो, म्हणजे होते आता नाहीत ते! गेल्याच वर्षी त्यान्चे अपघाती निधन झालेय!! पण तुम्ही एकदम का विचारताय?
विशाल: काही नाही, सहज असे कसेबसे बोलून धक्का बसलेल्या विशालने फोन कट केला!!