लख्या
लेखक - अमित रामदास जाधव
आत्ता पर्यंत लख्या ने कुस्ती तर सोडाच साधे कुत्र ही हाकलले नव्हते कधी. समोर जर कधी कोण भांडायला जरी आले तरी समोरच्या व्यक्तीचा लख्या ला बघून पन्नास टक्के जीव जायचा आणि त्या व्यक्ती ला बघून लख्या चा शंभर टक्के जीव जायचा. पण काहीही असो लख्या ला मात्र प्रसिद्ध व्हयाचे वेड लागले होते त्या दृष्टीने त्याने तयारी चालू केली होती.
लख्या ला प्रेमाने गावातील लोक बैल बोलायचे (त्याच्या पाठीमागे) पण हे जर खऱ्या खुऱ्या गोठ्यातल्या बैलाने ऐकले की तो बैल उधळायचा तो भाग वेगळा. लख्या ने कुठतरी वाचले की एखादा चित्रपट लिहिला आणि तो प्रदर्शित झाला की लिहिणारा माणूस फेमस होतो हे वाचल्या बरोबर लख्या तील लेखक जागा झाला आणि त्याने चित्रपटाची कथा लिहायला घेतली (आता कळले का गावातील लोक त्याला बैल का म्हणायचे).
एका महिना भरात लख्या ने मेहनितीने एक चित्रपट लिहिला आणि तडक खूप सारा वशिला लाऊन एका डायरेक्टर कडे गेला त्या डायरेक्टर ला त्याने लिहिलेली कथा दिली कथा पूर्ण वाचल्या नंतर डायरेक्टर ने आपल्या सहकाऱ्यांना बोलावले (लख्या चा सत्कार करण्यासाठी नाही हा) आणि सगळ्यांनी मिळून लख्या ला बेदम हाणला ते बघून रस्त्यावरची कुत्री ही एकमेकांना म्हणाली आपली अवस्था याच्यापेक्षा चांगली आहे रे लख्या ला तुफान मारून झाल्यावर डायरेक्टर ने लख्या ला धमकी दिली की परत जर कथा लिहिली तर जीव घेइन तुझा कारण लख्या ने कथा च अशी लिहिली होती ती कथा पुढील प्रमाणे लिहिली होती.
कथेचे नाव होते मला भाकरी मिळेन का
त्या कथे मध्ये कथेचा नायक हा लहान असताना त्याचे आई वडील मरतात तेव्हा पासून त्या नायकाला काही खायला मिळत नाही तो नायक मोठा होतो त्याला कोणी काम करून देत नाही त्यामुळे त्याला पैसे मिळत नाही आणि काहीही खाता येत नाही शेवटी तो नायक साठ वर्षांचा होतो पण त्याला कोणीही खायला देत नाही शेवटी एका बाईला त्याच्यावर दया येती आणि ती त्याला भाकरी खायला देती आणि ती भाकरी न खाताच तो नायक मरतो कारण त्याला भुख सहन होत नाही आता तुम्ही सांगा अशी जर चित्रपटाची कथा जर लिहिली तर लोक मारतील च ना? असा होता हा आपला लख्या
एके दिवशी लख्या दुसऱ्या गावाच्या जत्रेत गेला आणि हे तिथे एका मुलीकडे बघुन हसत होत ते पाहिल्या बरोबर त्या मुलीने लख्या ला चांगलाच बदडून काढला लख्याने गयावया करत तिची माफी मागितली त्या नंतर ती मुलगी त्याच्या प्रेमात पडली दोघांचे लग्न ही झाले लख्या तिला घेऊन थाटात गावाला घेऊन आला आणि सर्वांना सांगत सुटला की ज्या मुलीने मला मारले तिलाच मी माझी बायको बनवुन आणली (खरे तर मुलीने विचार केला होता लग्नाच्या अगोदरच हा माझा मार खात असेन आणि मला घाबरून राहत असेन तर लग्ना नंतर याला भरपूर बदडून घरातील सगळी कामे याच्या कडून करता येईन) हा भाग वेगळा.
आता गावा मध्ये एक बातमी पसरली की वेशी बाहेर एका पडक्या वाड्यात एक हडळ आहे. मग लख्याचे ठरले की हाडळीचा बंदोबस्त करायचा आणि पंचक्रोशीत प्रसिद्ध व्हायचे मग दुसऱ्या दिवशीच लख्या एका मांत्रिकाकडे गेला आणि त्याला सर्व हाडळीची हकीकत सांगितली हे सर्व ऐकल्यावर त्या मांत्रिक ने स्वतःजवळ चा ताबिझ मंत्रून दिला आणि सांगितले की हडळ समोर आल्यावर तिला तो ताबिज दाखवायचा त्याने ती हडळ घाबरेल आणि खाली पडेन त्याच वेळेस कात्रीने ने तिचे केस कापायचे मग ती हडळ मरून जाईन हे ऐकून लख्या खूष झाला.
जाताना लख्याने मांत्रिकाला प्रश्न विचारला की अंधाराची खूप भीती वाटती जर दुपारचे हाडळीला इकडेच बोलावता येईन का हे ऐकल्यावर मांत्रिकाने त्याला दोन लाथा घातल्या हे वेगळे सांगायची गरज नाही.
तबिज कडे बघून लख्या ने हिम्मत केली आणि तो रात्री वाड्याकडे निघाला वाड्यामध्ये पोहचल्यावर भिंतीकडे बघीतले आणि मोठ्याने ओरडला पण नंतर शांत झाला कारण त्याने भिंतीवरच्या आरशा मध्ये स्वताला बघीतले होते आणि त्यामुळे आज लख्याला पहिल्यांदा जाणीव झाली की आपण किती भयानक दिसतोय. लख्या या रूम मधून त्या रूम मध्ये हडळ चा शोध घेत होता आणि अचानक हडळ त्याच्यासमोर उडी मरून उभी राहिली ते बघून
लख्या ची बोबडी वळली. इतक्यात लख्याला तबिझ ची आठवण झाली आणि त्याने तो ताविझ तिच्या समोर धरला पण त्या हडळ ने त्याचा गळा पकडला आणि लख्या च्या एक मुस्काडीत मारली त्या प्रहराने लख्या बेशुद्ध पडला पण बेशुद्ध पडता पडता तो हाच विचार करत होता की त्या ताविज ला हडळ कशी काय घाबरली नाही मित्रानो इथे ही लख्या चे नशीब खराब होते आता त्याला कोण सांगणार ती हडळ आंधळी होती.
दुसऱ्या दिवशी लख्या ने डोळे उघडले तर तो घरी होता वाड्यातून कोणीतरी सकाळी त्याला घरी आणले होते पण लख्या तेथून जिवंत परत आला हे काही कमी नव्हते त्यामुळे तो सगळी कडे चांगलाच प्रसिद्ध झाला त्या घटने नंतर ती हडळ कोणालाच दिसली नाही पण लख्या रोज गावातल्या लोकांना दिसतो आनंदी राहताना.
समाप्त