*मला आलेला एक अनुभव*
#रात्रीची_शिकवणी
मी डिप्लोमाच्या पहिल्या वर्षाला होतो...
धुळे ला आम्ही चार मित्र म्हणजे मी, संदेश, हितेश आणि रामचंद्र रूम करून राहत होतो!
आमच्यात हितेश सर्वांत मोठा असला, तरी सर्वांत भित्रा होता, तो दिवसासुद्धा रूममध्ये एकटा थांबत नसे!
मला भुतांवर फारसा विश्वास नसला तरीसुद्धा मला कोणाच्याही विश्वासाला नाव ठेवायला आवडत नाही, पण मला भुतांच्या गोष्टी खुप आवडतात!
रात्री ११ वाजेपर्यंत बाहेर फिरणे, रूममध्ये दंगा करणे, आणि रात्री २-३ वाजता झोपणे असा आमचं routine च झालं होतं!
असेच एकदा हितेशला खेचायचं ठरलं आणि आम्ही तिघांनी भुतांच्या काही कथित गोष्टी सांगायला सुरूवात केली, आणि हितेश अक्षरश: रडकुंडीला आला; त्याला हार्टअटॅक नको यायला म्हणून आम्ही विषय बंद करून झोपलो... तोपर्यंत रात्रीचे २:३० वाजले होते...
थोड्या वेळावे सर्व झोपले आणि रूमध्ये अगदी pin drop silence... आणि अचानक मला काहीतरी अस्पष्ट आवाज यायला लागले... सुरूवातीला काहीच कळलं नाही पण थोड्या वेळ्याने आवाज स्पष्ट यायला लागला...
जणू काही आमच्या खालच्या मजल्यावर कोणीतरी बाई लहान मुलाला ABCD, बाराखडी, १-२ शिकवते आहे असा आवाज मला यायला लागला... ती बाई बोलत होती आणि ते लहान बाळ repeat करत होतं...
मी विचार केला रात्री २:३०-३:०० वाजता कोण बाळाला शिकवतंय... पण नंतर वाटलं की, खुप वेळ गप्पा मारल्यामुळे कान वाजत असतील आणि झोपलो, तरीसुद्धा आवाज येतंच होता आणि त्यातंच मला झोप लागली...
पुढे रोज मला ठरल्या वेळेवर तोच आवाज यायला लागला...
हा प्रकार मी कोणालाही सांगितला नाही, नाहीतर हितेशने रूमच बदलायला सांगितलं असतं...
असे दोन एक आठवडे गेल्यानंतर रामचंद्र उर्फ रामू एके दिवशी सकाळी बोलला की, रात्री २:३० - ३:०० च्या सुमारास कोणीतरी लहान बाळाला शिकवतं... मला तेव्हाच कळलं की ज्याला मी आजपर्यंत भास समजत होतो, ते काही तरी वेगळंच आहे... संदेश आणि हितेशने त्याला वेड्यात काढलं... मला विचारल्यावर मीसुद्धा त्या दोघांसमोर त्याचा प्रश्न उडवून लावला, पण नंतर त्याला खरं ते सांगितलं, त्याला वाटलं मी त्याची खेचतोय पण नंतर मी त्याला विश्वासात घेतलं...
मी आणि रामूने बाकी दोघांनाही आम्हाला येत असलेल्या अनुभवांबद्दल सांगितलं, त्या दोघांना खरं तर नाही पटलं पण त्यांनी या वेळेस त्या गोष्टीची टर उडवली नाही...
क्रमश:
#रात्रीची_शिकवणी_ भाग २
रात्री अडीच वाजले आणि आवाज आला, तसे मी आणि रामू सोबतच ओरडलो, "आला बघ"!!! मला आणि रामूला सोडून बाकी दोघांना आवाज येत नव्हता...
दोघे घाबरलो, कारण तो भास तर नक्कीच नव्हता; कारण भास एकालाच होईल, दोघांना पुन्हा पुन्हा एकाच वेळेला कसा होईल...
काही दिवस गेले, आवाज रोज रात्री येतंच होता; आम्ही ठरवलं की खाली विचारायचं...
खाली एक भाडेकरी आणि आमचे घरमालक राहत होते... भाडेकरींकडे बाळ नव्हते म्हणून प्रश्न च नाही; परंतु घरमालकांची ३ वर्षांची मुलगी होती म्हणून तिथे विचारलं की रात्री २:३० - ३:०० वाजता तुम्ही मुलीला शिकवतात का; आधी तर त्या स्वता अशिक्षित असल्याचं सांगितलं आणि आम्हाला वेड्यात काढलं की एवढ्या रात्री कोणी कशाला शिकवणार...
त्या रात्रीपासून आम्हाला आवाजात variety मिळू लागली; कधी भांडे धुण्याचा आवाज, कधी कपडे धुण्याचा तर कधी कुकरची शिट्टी असे रोज वेगवेगळे आवाज यायला लागले...
असा कार्यक्रम आम्ही रूम सोडेपर्यंत रोज रात्री २:३० ला होऊ लागला; अगदी मी रूमवर एकटा असल्यावर सुद्धा...
ते काय होतं माहित नाही, पण भास तर नक्कीच नव्हता; कारण भास हा दोन जणांना एकाच वेळेला, एकाच प्रकारचा होणं शक्य नाही...
पण असा अनुभव आम्हाला दोघांनाच का येत होता, हे माझ्या आयुष्यातील न उलगडणारं कोडं च आहे...
तो भास नव्हताचं
*समाप्त*
अनुभव लेखन: सचिन अरूण सोनवणे(सोनार)