"आरं ए भाड्यानो...चला लवकर.. माल येत असेलच"
सूरज गावातील कुप्रसिद्ध गुंड...देशी दारू विकायचा धंदा होता त्याचा...देशी दारू विकून अमाप पैसा मिळवला...पूर्व गावाला त्यानं स्वस्ताच्या दारूच्या नादाला लावलं होत...परवा गावची जत्रा...त्याची दारू नदीच्या पलीकडं दुसऱ्या जागेत तयार होत होती...पोलिसांच्या भीतीने तो नदिमार्गे होडीतून दारू चे कॅन मागवत होता...गावाबाहेर नदीकड किर्रर्रर अंधार पण गावच्या स्मशानात मात्र लाईट होती त्यामुळं तिथूनच तो दारू वाहतूक करत होता...12 वाजता त्याची दारू घेऊन होडी आली....त्याचे दोन गडी कॅन उतरवून घेत होते....सूरज ने सिगरेट काढली आणि समोर जळत असलेल्या चितेच्या आगीला सिगरेट पेटवून तो गड्याला म्हणाला...."झालं का?? आता जावा आणि माझा ट्रक घेउन या...मी बसतो इथं.....गडी म्हणाला "आवं मालक स्मशान आहे हे..इथं थांबू नका" हे ऐकून सूरज म्हणाला " अय..बापाला शिकवू नको...जा तू निघ" तसे गडी निघाले
सूरज आरामात सिगरेट ओढत बसला होता...इतक्यात त्याला पैंजण वाजण्याच्या आवाज आला....तसा सूरज जरा घाबरला....एक बाई तिकडून येताना दिसली...ती बाजूच्या कट्यावर बसली...तिला बघून सूरज वेडा झाला खूपच सुंदर बाई होती...पण आता या वेळेला ही इथं कशी??काय करते??
सूरज तिच्या जवळ गेला आणि म्हणाला...कोण ग तू??एवढ्या राती इथं काय करतेस??
तशी ती बाई जरा घाबरल्यागत म्हणाली.." माझ्या नवऱ्यानं मला मारून घराबाहेर काढलीय...कुठं जाऊ मी??म्हणून आलेय मसनात
सुरज तिला बघून म्हणाला...अग एवढी देखणी बाई तू...तुला टाकणारा कुणीतरी खुळा असला पाहिजे...सोड त्याला चल माझ्याबरोबर राणी बनवतो राणी
तशी ती विचारात पडली आणि जरा धाडस करून त्याला बोलली....तू कोण रं??तू इथं काय करतोस?
"अग इथं माझं काम आहे...ती बघ त्या कॅन मधी दारू आहे...मी विकतो ती...सगळ्या गावाला नादाला लावलंय मी...तू चल माझ्याबरोबर..." सूरज तिच्याकडे बघत बोलत होता
"हम्मम मला दारुडी माणसं आवडत नाहीत...."ती जरा नाक मुरडत बोलली
"अग असली घाण कोण पितय...मी इंग्लिश पितोय इंग्लिश" चल सोड आता माझा ट्रक येईल आपण जाऊ लगेच
"हम्मम ठीक हाय....पण मी जरा तोंड धुऊन येते" अस बोलून ती नदीच्या दिशेने चालू लागली तसा सूरज सुद्धा तिच्या मागे होता....ती गुडघ्या एवढ्या पाण्यात उतरली...सूरज कडेला सिगरेट फुकत बघत होता...तिच्या गोऱ्या पाठीवरून ओघळणारे थेंब त्याला वेडा करत होते....अचानक तिच्या पाठीवर सूरज ला लाल काहीतरी दिसलं...तो लक्ष देऊन बघत होता...अचानक तिच्या डोक्यातून भळाभळा रक्त वाहू लागलं...ते लाल रक्त तिच्या पाठीवर येत होतं...सोबत तिची एक भयाण किंचाळी.....सुरजच्या कानठळ्या बसल्या....तो घाबरून तिच्याकडे बघत होता...ती हळू हळू मागे वळत होती....तिचे केस विस्कटले होते...डोळे लाल भडक झाले होते...डोक्यातून रक्त वाहत होत त्यांच्यामुळे चेहरा लालभडक झाला होता....सूरज आता घाबरला आणि पळत सुटला....तसा भयाण हसण्याचा आवाज येत होता...अचानक एका चितेजवळ येताच सुरज एकदम कोसळला...त्याचे हात पाय कोणीतरी बांधावे अस त्याला वाटत होतं....ती त्याच्या जवळ आली...तिचं भयाण रूप बघून सूरज तडफडू लागला...पण कोणीतरी पकडून धरालं आहे अस त्याला वाटत होतं...
तो तिच्याकडं बघत बोलला..."सोड मला...कोण हाईस तू??
तसा एक कर्णकर्कश आवाज तिच्या तोंडून बाहेर आला....ती बघितलीस ती चिता माझी जळत आहे...का मेले माहीत आहे तुला...तुझ्याच दारूने जीव घेतला माझा...माझा सोन्यासारखा नवरा तुझं हे विष पिऊन राक्षस व्हायचा...झोडपून काढायचा मला...मी रानात कामाला जाऊन पोट चालवत होती...पण तुझ्या ही दारू पिण्यासाठी त्यानं माझ्याकडं पैसं मागितलं...मी देत नाही म्हंटल्यावर त्यानं माझ्या डोक्यात दगड घातला.....तो बसलाय जेलात...माझी पोरं पोरकी झाली....माझा बा पण तुझीच दारू पिऊन मेला होता....बघ आता तुझं काय करते....अस बोलून तिनं त्या कॅन कडे बघितले तसे ते कॅन सरकत सरकत पुढे आले आणि पालथी झाले....सर्व दारू सूरज च्या आजूबाजूला पसरली...तो दारूने भिजला होता...त्याच्या तोंडातून आवाज फुटेना...ती मात्र जोरात हसत होती...तिच्या एका इशाऱ्याने...तिच्याच चितेतलं जळत लाकूड पुढे येऊन त्या दारूत पडलं...आणि प्रचंड आग लागली...त्या आगीत सूरज पूर्णपणे जळून ठार झाला....आणि ती त्याच विव्हळण बघून कर्णकर्कश हसत राहिली..................(शशांक सुर्वे)