कथेचे नाव :- लावंण्या
लेखक :- मंदार साखरकर
भाग एक
कांता, कळा सहन करीत होती, रेवा तिला डोक्या वरून हात फिरवत बोलत होती. जरा कळ सोस ते गेलेत आहे, राधकाला आणायला.
.
राधका येत रेवाला बोलते जा, लवकर गरम पाणी ठेव. वेळे अगोदर कळ्या चालू झाल्या आहेत.
कांता जरा धीराने, रेवा लवकर कर. वेळ जवळच आली आहे. .
.
रेवा पाणी, घेउन् येत बोलते आजून पाणी तापवत ठेवले आहे असे बोलून कांताच्या बाजूला तिचा हात पकडून बसते.
.
जरा, वेळाने घरत रडण्याचा आवाज येण्यास चालू होतो.
रेवा, बाहेर येत चाकणचा सांगते मुलगी झाली आहे. सगळ्या वस्तीला बोला. तिने जन्म घेतला आहे.
.
चाकण बोलतात, कसे आहे दोघे आणि दिसते कशी. म्हणजे बोलत आहेस ना तू परत जन्म घेतला आहे म्हणून.
.
रेवा, बोलते जरा थांबा तुम्हीच स्वतःहून बघा. म्हणजे समजेल तुम्हाला सरकार.
.
चाकण बोलतात, आजून किती वेळ राधका. .
.
तसे,राधका मुलीला घेऊन बाहेर ये बोलते. तुम्हीच बघा लेकीला, आता पासूनच रंग दाखवते आहे, म्हंटले सरकार.
.
चाकण, बोलतात बघू लेकीला असे, बोलून तिला हातात घेऊन बोलतात लावण्या आज पासून तुझे नाव.
अग हो हो, आवडले वाटते नाव. राधका तू बोलते आह तसेच रूप बदलते बघ.
.
कांता, डोळे बंदनकरून बोलते गुरुजी मुलगी झाली. बघा जरा जन्मकुंडली काढून आणि असे बोलून डोळे उघडते.
रेवाला बोलते, त्यांचे पोट भरले असेल तर लावण्याला आन. तिचे पण पोट भरायचे आहे.
.
रेवा लावण्याला आत आणून, बोलते घे तिला दूध दे. असे बोलून बाहेर जाते.
.
कांता, तिला दूध पाजून तिला. आपल्या बाजूला झोपवून, स्वतःहा पण झोपते.
.
इथे, गुरुजी डोळे उघडून बोलतात. आलीस परत नव्या रुपात आणि नव्या कर्मात. बघू जरा असे बोलून, जन्म कुंडली काढण्यास चालू करतात.
तसे त्यांचे, चेहऱ्यावर शंका येते. ही आली जन्मास, पितृपक्षात पण, म्हणजे तसा योग्य बघायला गेला चांगला आहे आईसाठी, पण वडीलां साठी बघू पुढे जाऊन.
तेवढ्यात गुरुजींच्या कक्षेत, लहान मुलीचा रडण्याचा आवाज येतो.
गुरुजी, बोलतात काय आलीस तू. आल्या आल्या, तशी गुरुजी समोर एक लहान मुलीची निळी आकृती, रुपात येऊन.
गुरुजी समोर , हातवर करून हसत असते.
गुरुजी बोलतात व्हा, असे बोलून तिला उचलून बोलतात. लावण्या खरे मूळ रूप दाखव गुरुजींना.
तशी, लहान लावण्या खऱ्या रुपात येते, गुरुजी तिला बघून बोलतात, लबाड असे बोलून बोलतात. आईस दाखव रूप तुझे फक्त जा आता आई उठेल नंतर भेटू. तशी, लहान लावण्या अदृश्य होते.
.
इथे चाकण, घरात येऊन लावण्याला उचलून बाहेर येत बोलतात. सगळ्यांनी येऊन लहान लावण्याला आशीर्वाद द्या.
तसे, सगळे एक एक करून लावण्याला आशिर्वाद देऊन जातात.
.
चाकण, रेवाला बोलतात जा लावण्याला घेऊन आत.
.
रेवा, तिला आत घेऊन पाळण्यात झोपवते.
.
तेवढ्यात बाहेर, काळी आकृती येऊन बोलते. ही मुलगी सगळ्या जातीचा विनाश करणार आहे. असे बोलून अदृश्य होते.
.
इथे, लहान लावण्या. हसत आपले डोळे लाल करून हात वर करून बोटांची मूठ आवळत, खाली करते.
.
तसे, ती काळी आकृती हवेतून खाली सगळ्यांमध्ये पडत आपल्या रुपात येऊन, राख होते.
.
सगळे, आश्चर्य होऊन एक मेकांनकडे बघतात.
.
कांता, झोपतुन उठून बघते तर लावण्या हसत, आपल्या लहान हाताने टाळी वाजवत असते.
.
खाली, चाकण बोलतात आपला, कट्टर शत्रू माणिक जोगळेकर संपला, हमला करा त्याच्या वस्तीवर चला. लावण्याचा पाय गुन चांगला निघाला. असे बोलून, लावण्याला आणून आकाशाकडे दाखवतो.
.
चाकण, लावण्याला झोपळ्यात ठेवून बोलतात. तुला आजच राग काढायचा होता का त्याला मारून.
.
कांता, बोलते मी काही केले नाही आणि मला समजत नाही का कधी काय करायचे ते.
रेवा, उचल तिला काही तरी. असे बोलून बोलते शेवंताला विचारा ना.
.
कांता, लावण्याला मांडीवर बसून बोलते. काय ग पालण्यातच पाय दाखवून राहिलीस तू. मग मोठी होऊन काय करणार आहेस.
.
दोघे बाहेर गेल्यावर लहान लावण्या, कांताचे एक बोट घट्ट पकडून हसायला लागते आणि आपले खरे रूप दाखवते.
.
कांता, ते रूप बघून तिला उचलून फिरवून, तिच्या चेहऱ्याचे पापे घेऊन बोलते. जागलीस शब्दांला सुरेखा, असे बोलून. काली मातेला बोलते, आई खूप दिले तू मला.
रेवाला, हाक मारून बोलवत बोलते. रात्री सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या घरी जेवण पाठव सांगा कांता मालकीण कडून जा बोल बाहेर जाऊन.
.
रेवा बाहेर येत, सरकारांना सांगते.
.
चाकण, एक दीर्घ श्वास घेऊन सगळ्यांना सांगन आत येत. बोलतात काय हे, सगळ्या वस्तीला जेवण रात्रीचे, काय बोलतील वस्ती वाले.
.
कांता बोलते, त्याची चिंता तुम्ही करू नका. ते मी बघीन जा आता हमाल करू नका.
बरोबर ना, लावण्या असे बोलून तिच्या बरोबर हसत खेळत असते.
.
चाकण बोलतात ठीक आहे, बरे मी दोन दिवस बाजूच्या वस्तीत जाणार आहे.
.
कांता, बोलते ठीक आहे. मी पण गुरुजीकडे जाऊन येते. त्यांच्या कडे न बघता बोलते, मी तुमच्या कामात येत नाही तर माझ्या कामात पण येऊ नका, बरोबर ना लावण्या जायचे ना गुरुजीना भेटायला.
क्रमश