नमस्कार मित्रांनो मी ,कृष्णा खाडे आज तुम्हाला एक अनुभव सांगणार आहे . ही गोष्ट माझा जन्मापूर्वीची आहे माझा आईने मला ही गोष्ट सांगीतली.
आमचा शेजारी एक सुरेश नावाचा मुलगा राहत होता . तो तेव्हा असेल 12 वर्षाचा. खोडकर व बिनधास्त मनाला वाटेल तसा वागायचा.खोडकर पण सर्वांशी प्रेमाने वागणारा.त्याला झाडावर चढायला ,नदीत पोहायला खूप आवडायचं ,ते जिथे राहत होते त्या परिसरात एक मिलिटरी शाळा होती .आणि हॉस्टेल ,मेस ,मैदान ,कॉलेज सगळं एक ठिकाणी म्हणून परिसर खुप मोठा होता. आणि शिक्षकांना राहण्यासाठी रूम होत्या .परिसरात खुप झाड होती.आंबे ,चिंच,आवळा,बोर , सुरेश जा वस्तीत राहत होता त्या वस्ती जवळ एक भिंत होती .त्या भिंतीवर चढून गेलं की दुसऱ्या बाजूला शाळेचा परिसर चालू व्हायचा ,आणि तिथे शिक्षकांचा खोल्या होत्या ,खोल्याना लागून जांभूळ आणि बोरीची झाड होती.
सुरेश कधी ,कधी चोरून लपून त्या झाडांवरून जांभूळ तोडून आणायचा व मित्रांबरोबर वाटून खायचा ,पण एकदा काय झालं की सुरेश जांभूळ तोडायला गेला साधारण संध्याकाळी 6 वाजले असतील ,परिसर खूप शांत असल्यामुळे पाखरांची किलबिल सोडून दुसर काही ऐकायला येत नव्हतं ,आणि झाडांच्या दाटी मुळे लवकरच अंधार पडायचा . मित्रांचा हट्टासाठी सुरेश गेला पण त्याला ती चूक महागात पडणार होती.तो नेहेमीच झाडावर चढायचा त्या मुळे तो अंधारात पण भरभर चढत गेला ,आणि जांभूळ तोडायला सुरुवात केली .पण नेहमी पेक्षा आज पक्ष्यांचा किलबिलाट जास्त होता.पण त्याने काही लक्ष नाही दिल .थोडा वेळात त्याने भर भर जांभूळ तोडून पिशवी भरली. पण नंतर त्याने समोर बघितलं आणि खुप जोरात किंचाळत खाली पडला .तो इतका जोरात ओरडला होता की ,गेटवर असलेला सिक्युरिटी पळत आला. आणि सुरेशला उचलत त्याचा कानाखाली एक लावली आणि भांडू लागला."काय रे किती वेळेस सांगायचं तुला इकडे येत नको जाऊ आणि मेला असता तर झाडावरून पडून? तर रे ?" "अरे ~~बोल ना लागलं का तुला?" आणि सुरेश फक्त समोरच असलेल्या झाडाकडे बघत होता , सिक्युरिटी परत बोलला, अरे ~~"तिकडे काय इकडे बघ मी बोलतोय ना ऐकायला येत नाही का?" आणि जेव्हा सिक्युरिटी ने वरती बघितलं त्याची बडबड बंदच झाली कारण समोरचा झाडावर एक प्रेत लटकत होत त्याचे डोळे बाहेर आलेले आणि जीभ लटकत होती .स्वतःला सावरत सुरेश उठला आणि लंगडत लंगडत पळायला लागला. आणि घरी गेला .
रात्री त्याला काही झोप येईना .त्याचा तोंडासमोर त्या व्यक्तीचा चेहरा सारखा दिसत होता .पण घरचे आधीच भांडायचे याला कॅम्पस मध्ये जाण्यावरून.म्हणून यांने कुणालाच काही सांगितलं नाही त्याला वाटलं घाबरलो म्हणून भास होत असतील म्हणून त्याने जास्त लक्ष दिल नाही . दुसरया दिवशी ऐकायला मिळालं की त्याशाळेत शिकवणाऱ्या शिक्षकाने झाडाला फास घेऊन आत्महत्या केली.शेजारी असलेलं मुलं सुरेश ला सांगायला आले ,तर तो पण सांगू लागला " परत नाही जाणार "बाबा "मी काल स्वतःचा डोळ्यांनी पाहिलं त्या माणसाला लटकताना ,खुप घाबरलो ! झाडावरून पडलो .मी, रात्री पण सारखा स्वप्नात दिसत होता". नकोच बाबा आता नाहीच ! जाणार ! .
सुरेश एक दिवस अचानक रात्री झोपेतून उठून चालू लागला ,त्याला गल्लीतल्या त्याचा एक मित्रांने बघितलं त्याला तो आवाज देऊ लागला त्या झाडाचा दिशेने तो चालला होता . त्याचा मित्र खुप ओरडत होता मागून पण सुरेश काही ऐकत नव्हता. शेवटी त्याचा मित्राने सुरेश चा घरी जाऊन सांगितलं पण तो पर्यन्त तो त्या झाडाजवळ पोहीचला होता .आणि तो खाली बसून कोणाशी तरी बोलत होता . घरचे त्याला भिंतीवर चढून आवाज देत होते पण तो काही ऐकत नव्हता आणि शेवटी घरचे त्याचा जवळ गेले ,त्याचा वडिलांनी एक कानाखाली मारली फटकन!तेव्हा हा भानावर आला आणि त्याचे वडील त्याला ओढत घरी नेऊ लागले .सुरेशला घरी नेऊन विचारले की का गेला होता तिकडे . तर तो त्याचा वडिलांना बोलू लागला, "अहो 'दादा, ते सर लई चांगले आहे मला जांभुळ खायला बोलवलं होत त्यांनी म्हणून गेलो मी ,तस सुरेश चे वडील बोलले, "तुला काय वेड लागल का कुठं कोण होत रे तिकडे ,." सुरेश बोलला," ते *सर *नाही का फाशी घेऊन मेले ते" ,सुरेशचा वडिलांचा तोंडून शब्दच बाहेर पडेना ते खुप घाबरले !होते दुसऱ्याच दिवशी ते सुरेशला एक बाबाकडे घेऊन गेले ,
ते बाबा महादेव मंदिरात पुजारी होते ,त्यांनी सुरेश ला पाहिलं आणि विचारलं, "बाळा तूला काही त्रास होतो आहे का?" , सुरेश बोलला नाही पण का बरं अस का ?विचारताय ! तर ते बाबा बोलू लागले की अरे तू का गेला होता त्या झाडाखाली , तर सुरेश बोलू लागला की मी आधी गेलो होतो ना तेव्हा ते सर मेले होते मी घाबरून पळून आलो ,पण मला त्यांनी स्वप्नात येऊन सांगितलं की ,"तुझे जांभूळ इथेच पडले आहे तुला खायचे आहे ना मी काही नाही करणार घेऊन जा ". "आधी गेलो तेव्हा मला कोणीच नव्हतं बघितलं मी त्यांचा रूम मध्ये गेलो होतो आणि मला त्यांनी चॉकलेट दिल" .खूप चांगले आहे ते पण . "पण काय ?" बाबांनी विचारलं , तर तो बोलला ,का" त्यांना फक्त त्यांची बायको आणि मुलगा होता दुसर कोणीच नव्हतं या जगात त्यांचं ,आणि बिचारे ते पण मेले अपघात होऊन गाडीचा त्यांना चिठी आली होती गावावरून ती चिठी त्यांनी वाचली आणि म्हणून त्यांनी फाशी घेतली ." बाबांनी विचारल ,"तुला कोणी सांगितलं तर सुरेश बोलला," ते सर सांगत होते मला. आणि जांभुळ पण देत होते" , पण ' दादा 'मला घेऊन आले ,ते सर खुप चांगले आहे. आणि आम्ही उद्या त्यांचा गावाला जाणार आहो .हे ऐकून बाबा आणि सुरेश चे वडील खुप घाबरले
.पण बाबा बोलले, "की काही होणार नाही भाऊ तू एक काम कर मी उतारा करून देतो तो उतारा सुरेश वरून उतरून त्याला घेऊन जा आणि त्या झाडाखाली ठेवा पण वळून बघायचं नाही जस सांगितलं तस करा काही होणार नाही काळजी करू नका".
त्या रात्री सुरेश चे वडील त्याला घेऊन गेले आणि सांगीतल ,"सुरेश आपण सरांना खाऊ नेतो आहे त्यांना तो देऊ आणि परत निघून येऊ पण तू परत मागे नको बघू हा" . कारण तू बघितले तर ते खाणार नाही सुरेश हो बोलला ,ते त्या झाडाखाली जाणार तर दुरूनच बघितलं की !, एक काळी आकृती हळु हळु झाडावरून खाली उतरत होती ,सुरेश पण खुप घाबरला होता. पण वडील सोबत होते म्हणून तो पण थोडा धीट झाला. त्यांनी उतारा झाडाखाली ठेवला ,तस सुरेश ला आवाज आला ,"अरे कुठे जातो? इकडे ये आपल्याला गावला जायचं ना उद्या ये लवकर ! , सुरेश चे वडील घाबरले आणि त्याला बोलले मागे बघू नको नाहीतर मी आईला हुसकून देईल घरातून तस सुरेश ने माघे बघितलं नाहीं आणि ते सुखरूप घरी आले .
परत त्याला ते सर दिसले नाही आणि त्याचा वडिलांनी त्याला परत कधीच तिकडे जाऊ दिल नाही,,।
, गल्लीत एकच चर्चा होती का सुरेश ला भूत लागलं होत ".मास्टरच" त्याला अमावस्येला "मास्तर" घेऊन गेला असता. बर! झालं त्याचा "बापानं" नेल बाबांकडे ,कारण अमावस्या होती दुसऱ्या दिवशी बर आधल्या दिवशी गेले हे बाबाकडे आणि उतारा केला,,. हा प्रसंग घडल्यानंतर सुरेश आणि त्याचे घरचे दुसऱ्याच आठवड्यात त्यांचा गावाला गेले.
पण ही गोष्ट गल्लीत सगळ्यांना माहीत होती ,म्हणून आम्हाला पण कधी घरचे जाऊ देत नव्हते त्या झाडांकडे .आणि हट्टच केला तर ही सुरेशची गोष्ट सांगून घरचे भीती घालत ,
। असो गोष्ट कशी वाटली ते नक्की कळवा