कसल्या तरी टेन्शन मध्ये तो होता.....त्याने मोबाईल काढला आणि फेसबुक उघडलं.....तो आपलं अकाउंट बंद करणार होता की अचानक त्याला फ्रेंड रिक्वेस्ट मध्ये लाल डॉट्स दिसला....हे कधी होत नव्हतं उत्सुकतेने त्याने फ्रेंड रिक्वेस्ट चेक केल्या त्यात एक "s.priya" नावाचं एक अकाउंट दिसत होतं....प्रोफाइल ला एक गुलाबाचा फोटो आणि खाली "miss you" असं लिहलं होतं....त्याला हे सगळं नको होतं तरी त्याने ती रिक्वेस्ट स्वीकारली....काही सेकंदातच मेसेज टोन वाजली....तो चपापला.....त्याच्या मनात विचार आला....अरे लगेच रिप्लाय....ही नक्की मुलगीच असेल ना?? की कुणी खोडसाळपणा केलाय...कारण आधीच त्याला टेन्शन आलं होतं....तो सावध होता....पहिला मेसेज तीकडूनच आला
hi
hi...कोण तुम्ही??
are deva...english vachtaa yet nahi vatte tumhala naav lihly ki varti mi
हो नाव दिसलं मला पण मी तुम्हाला नाही ओळखत...आणि मला आता ह्या गोष्टीत जास्त इंटरेस्ट सुद्धा नाहीय
hmmmm....mla tri kuthe hya gostit intrest aahe ho...mla na he aabhasi jag aavdt nahi mla tr real mdhe....
रियल मध्ये काय?? आणि कोण रे तू? हे बघ माझा टाईमपास करू नको हा...मी आधीच जाम टेन्शन मध्ये आहे.....आणि तू कोणी xxx असशील ना....लक्षात ठेव सापडलास ना तर हाडं मोडून टाकीन मी
(एकदा मित्र फेक id काढून त्रास देत असेल असा विचार त्याचा मनात आला...मनातले भाव त्याच्या मोबाईलच्या की बोर्ड वर उमटत होते)
eka mulishi as bolta ka tumhi
जा रे आधीच माझं डोकं फिरलय....तू कोण असशील त्याने मला फोन लाव डायरेक्ट.....तिथे तुझी xxxx
mi mulgi aahe khrch
मुलगी आणि तू....चल जरा दाखव तुझे फोटो...मग बघू कोण आहेस ते
mi kunalahi maze parsnl photo det nahi ok
आलास ना भाड्या औकातवर....चल निघ आणि बांगड्या भरून गावभर फिर xxx..आता आणि परत मेसेज करू नको
(त्याने मोबाईल बाजूला ठेवला....आणि टीव्ही बघू लागला अचानक फेसबुक मेसेजर टोन वाजली...s priya चाच मेसेज असणार ह्या विचाराने तो संतापला त्याने रागाने मोबाईल उचलला आणि स्क्रीन अनलॉक केली समोर त्याच्या इनबॉक्स मध्ये 2,3 फोटो आले होते...चेहऱ्यासोडून खालील शरीर दिसत होतं दुसऱ्या तिचे ते शरीर तो झूम करून बघू लागला....त्याची पापणी सुद्धा मिटत नव्हती....त्याने झटकन मेसेज केला)
हम्मम...के काय कुठल्या तरी वेबसाईटवरून कॉपी करून आणलं असशील....रियल दाखव रियल तेही कपडे काढून आणि पेनाने माझं नाव लिह तुझ्या शरीरावर...तुझ्यात दम असेल तर असे फोटो दे...नाही तर मी समजेन की तू फेक अकाउंट आहेस
(काही वेळात त्याच्या मागणी प्रमाणे फोटो आले....तो झटकन खाली बसला आपल्या दाढी वाढलेल्या गालावर हाथ फिरवत तो फटाफट टायपिंग करू लागला)
सॉरी हा....मला वाटलं माझा कुणी मित्र माझी मस्करी करतोय... काय आहे आजकल असे फेक id बऱ्याच असतात....पण एक सांगा मला का ऍड केलेत तुम्ही??
hmmm aho mla tumchya sarkhi tagdi aani rash mule khup aavdtat tumcha profile bghitlay mi te tlvar ghetlele photo aani to hatat pistool ghetlela photo tr.....ufff...mla aavdtat tumchya sarkhi josh asleli mans
काय जोश असलेली म्हणजे?? मी काही समजलो नाही
khupch bhole distaa tumhi....josh bhrleli mhnje maza 6 mhinya purvi divorce zala aahe.aani mi ajun trun aahe..aata jasti sangayla nko....aani maz kaam zal ki mi tumhala.kdhihi tras denar nahi
कसलं काम??
te nantr kalel tumhala...aajun thodi olkh tr hou det mg bghu kay dyaych kaay ghyaych
(एका मुलीकडून ते ही डायरेक्ट द्याय घ्यायच्या गोष्टी ऐकून त्याला हसू आलं..तिचे ते फोटो बघून तो डोळे बंद करून त्या क्षणात हरवून जाऊ लागला....फक्त त्या स्वप्नांना आता सत्यात उतरायचं होतं....त्या दोघांची आता रोज रोज चॅटिंग चालू झाली....अश्लील चॅट,फोटो,मेसेजेस ने त्यांचा पूर्ण इनबॉक्स भरून जाऊ लागला...तो सावध भूमिका घेत होता....अचानक फेसबुक मेसेंजर वर तिचा कॉल आला....तिचा तो मधुर आवाज ऐकून तो घायाळ झाला "अरे यार हिचा आवाज इतका भारी आहे ही किती भारी असेल" मनातच तो तिचं चित्र रंगवू लागला....इकडं तिकडच्या गप्पा झाल्यावर तिनेच विषयाला हात घातला
kiti divs fakt chat aani photo shere krayche....jra asli jgat yeuyaa ki
अहो तुम्ही फक्त दिवस बोला मी लगेच येतो भेटायला...मला पण तुम्हाला भेटायचं आहे
kaay he....sgli jawani tumchya smor ughdi keli tri tumhi ajun "divsa" bhetaych mhntay....
अग तस नाही ग....मी तर रात्रीच्या खेळाचा चॅम्पियन आहे पण तुझ्या घरचे??
koni nahiy mla ekti aahe mi....lgnantr kahi divsat divorce zalay mazaa...chuklech mi kslya bhitrya mansaa brobr apeksha thevun bsle... tumhi fkt dikhave krta tlwar bandook hatat gheun...dum nahiy tumchyat
(आपल्या पुरुषत्वावर घाला घालणारे शब्द त्याच्या सगळ्या मर्यादा तोडून टाकणारे होते)
ए....घाबरत नाही हा मी....आणि भेटल्यावर कळलं तुला माझ्यात किती दम आहे ते....पत्ता सांग आता...कधी पण बोलव
as ka chal mg ye udya patil malyatlya padkya vihirijval
काय?? पडक्या विहिरीजवळ का?? लॉज वर जाऊ की आपण....त्या रानमाळावर काय आहे??
hmm...ghabrlas na....bhai mhne bhai....are ek mulgi ekti yete tithe aani tuzi yevdhyat fatli ka?? chal sod bangdya bhrun bs aata ghrat
(भागात दहशत असलेला हा आज एका मुलीकडून ऐकून घेत होता....त्याची तळपायाची आग मस्तकात गेली....त्याच्या डोक्यात राग भरला इतका की रागाच्या भरात त्याने )
ए...ए...जास्त बोलून नको काय....चल आज रात्री येतो मी....तू तयार रहा....नाही तुझी सगळी मस्ती उतरवली ना तर नावाचा राज नाही मी
(त्या रात्री त्याने आपली बुलेट काढली....11 वाजले होते घरचे जागे व्हायला नको म्हणून त्याने थोडा अंतर ढकलत आपली बाईक नेली आणि पुढे गेल्यावर त्याने आपली बाईक स्टार्ट केली एका मेडिकल जवळ तो थांबला गरजेच्या वस्तू घेऊन तो मोठ्या खुशीत ऐटीत बुलेट वरून जात होता....शहरातील गरम वातावरण संपून आता हवेत गारठा जाणवू लागला....उसाचे शेत वाऱ्याने सळसळत होते.....मधेच त्याला एक थंड गार शहारा यायचा....कानामागून जोरात एक हवेचा झोत गेला की तो झटकन मागे वळून बघत होता....त्या शांततेत त्याच्या बुलेटची फायरिंग त्याला आधार देत होती पाटलाच्या पडक्या विहिरीजवळ कसली तरी शेकोटी दिसत होती....त्याने बुलेट दूरवर उभी केली....ऊसतोडणी झाली होती उसाचा वळला पालापाचोळा खाली पडला होता त्यातून चर्रर्रर्र चर्रर्रर्र आवाज करीत तो चालला होता....समोर बघितलं तर तो शेकोटी नसून कसला तरी यज्ञ पेटवला होता...त्या विहिरीच्या एका दगडावर रक्त सांडले होते काही थेंब त्या दगडावरून विहिरीत पडले होते..सुकलेले रक्त काळे पडले होते..त्या यज्ञाच्या भोवती सुद्धा रक्ताचे रिंगण आखले होते....अखंडपणे जळणार यज्ञाच्या ज्वाळा विहिरीकडे केंद्रित होत होत्या......बाजूलाच एक सडलेला हाथ पडला होता त्यावर माश्या घोंघावत होत्या....त्या सडलेल्या हाताचे मास कुणीतरी ओरबाडून खाल्लं होत....ते दृश्य बघताच त्याने झटकन नजर फिरवली....काही आशा घेऊन आलेला तो ह्या भयानक दृश्यामुळे पूर्णपणे घामेघुम झाला होता....पण त्याला ती दिसत नव्हती....अखेर त्याला पैंजनाचा आवाज आला...त्या आगीच्या प्रकाशात तो जिकडे तिकडे शोधू लागला....एक अंधुक लाल साडी घातलेली बाई हसत हसत त्याच्या आजूबाजूला पळायची.....तिच्या त्या तालबद्ध पैंजनाच्या आवाजाने परत तो उत्तेजित झाला....समोरच्या भयानक दृश्याचा त्याला विसर पडला होता......चेहरा झाकलेली ती आपल्या अदा दाखवून त्याला घायाळ करीत होती....आपला हात त्याच्या दिशेने करून तिच्या पावलांची छमछम उलट दिशेने जाऊ लागली...तो सुद्धा आतुरला होता....एक वाऱ्याचा झोत आला आणि तिच्या डोक्यावरचा पदर बाजूला गेला....समोर लाल भडक पाण्याने कित्येक दिवस भिजून सडलेल्या चेहऱ्याची ती उभी होती...तो खाली कोसळला)
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी राजच्या घराच्या दारावर कुणीतरी धाडधाड करीत दार वाजवत होतं....राजच्या वडिलांनी दार उघडलं....समोर त्याच्या मित्र रडत उभा होता....राजचे वडील प्रश्नार्थक भावाने त्याच्याकडे बघत होते ते काही बोलायच्या आत त्या मित्राने त्यांना गाडीत बसवलं......दुसऱ्या दिवशी बातमी आली
प्रसिद्ध उद्योगपती व माजी आमदार श्री शेखर वर्मा यांचा मुलगा राज वर्मा ह्याचा मृतदेह पाटील मळ्यातील विहिरीत सापडला....त्याच्या अंगावर ठिकठिकाणी ओरखड्याचे घाव होते त्यामुळे पोलीस घातपात असल्याची शक्यता वर्तवत आहेत....राज वर्मा याचा दोन दिवसांपूर्वी जामीन झाला होता....सोशल मीडियावर एक मुलीचे नग्न फोटो आणि संभाषण व्हायरल करून संबंधित मुलीच्या आत्महत्येस कारण बनल्याचा गुन्हा त्याच्यावर नोंद होता....काही दिवसांपूर्वी जामीन मिळून अचानक हत्या झाल्याने शहरात चर्चेचा विषय बनला आहे....त्याचा मोबाईल सुद्धा त्या ठिकाणाहून गायब आहे....ही आत्महत्या,घातपात की अजून काही ह्याचा तपास पोलीस करत आहेत.......
काही दिवस गेले.....दुपारची वेळ....हातात कसल्यातरी लाल पिशवीत गुंडाळलेल्या काही वस्तू घेऊन ती त्या विहिरीजवळ येत होती...तिच्या उजव्या हाताला बँडेज बांधलं होतं.....तिच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव होते.....दुपारची वेळ त्यात राजच्या खून त्या विहिरीत झाल्यामुळे आजूबाजूला कुणी नव्हतंच.....तिच्या हातात एक कॅडबरी होती तिने ती त्या विहिरीच्या कठड्यावर वर ठेवली भर दुपारी शांत असलेल्या वातावरणात अचानक पानांची हालचाल होऊ लागले हवेत उडणारे केस सावरत ती त्या विहिरीच्या कट्ट्यावर बसली
हे....आलीय मी.....खूप दिवस झाले ना भेटलोच नाही....बोलणार तरी किती काही अर्थ होता का त्याला...तुझ्याशी बोलायची आजिबात इच्छा नव्हती तशी....लहानपणापासून सगळं शेअर करायचीस...अगदी आईने काही बोललं तरी माझ्याजवळ येऊन रडायचीस.....किती वेळा बोलून दाखवत होतीस मैत्रीण नाही बहीण आहेस तू माझी....पण जीव द्यावासा वाटला तुला?? कधीही ह्या विषयावर बोलू वाटलं नाही....बारीकसारीक गोष्टी सांगायचीस पण त्या नालायकाबरोबर मैत्री करून त्याला आपले फोटो शेअर केलेस.....कधीही त्याच्याबद्दल मला सांगितलं नाहीस....माहीत आहे तू हळवी आहेस आणि मी खडूस तूच खडूस बोलत होतीस...मान्य आहे मी खुडूसपणा करत होते कधी तुला खडसावत होते पण माझी तळमळ तुला दिसलीच नाही.....तेव्हाही खोदून विचारत होते तरीही एक शब्द सांगितला नाहीस....मोबाईल मध्ये असायचीस एकटीच काहीतरी बघून हसायचीस.....मी बाजूला बसले असायची तरी दुर्लक्ष करायचीस.....बालपणीची मैत्रीण मी.....पण......माहिती आहे अचानक तू अस्वस्थ झालीस....चिडचिड करत होतीस....किती सावरण्याचा प्रयत्न केला तुला.....लहानपणी माझ्या पायाला दुखापत झाली रक्त वाहत होतं...तेव्हा माझ्यापेक्षा तूच जास्त रडली होतीस....मला तुझी काळजी वाटतं होती कारण ह्या आधी तू कधीही अस्वस्त वाटत नव्हतीस...पण एक दिवस कॉलेज मध्ये मला माझ्या जवळच्या मैत्रिणीबद्दल मला दुसर्याकडून समजलं.....तुझे ते फोटो सगळीकडे पसरले होते....कितीवेळा तुला सांगितलं होतं की अनोळखी लोकांसोबत सोशल मीडियावर ओळख वाढवू नकोस....पण झालं काय?? केलीस ना आत्महत्या शेवटी.....कित्येक दिवस घरात कोंडून घेतलं होतंस स्वतःला.....घरात सुद्धा रागवायचे तुला पण माझ्यापाशी मन मोकळं करायचीस.....त्या दिवशी कित्येक दिवसांनी आपण कॉलेज मध्ये गेलो पण त्या घटनेनंतर मुलांच्या तुझ्यावरच्या नजरा वेगळ्या होत्या....तू तर खाली मान घालून चालत होतीस पण तुझ्यावरच्या त्या वाईट नजरा माझ्या काळजाला वेदना देत होत्या....अग एकदा सांगितलं असतीस तर त्या नालायकाचा खून केला असता आपण आणि गेलो असतो दोघीही जेलात....तिथे तुझी साथ तरी मिळाली असती.....पण आता तुझ्याशिवाय म्हणजे
माहीत आहे का तुला ज्या अघोर साधू मुळे तू एवढी ताकतवान झालीस त्याला तयार करण्यासाठी मी काय काय केलं....त्या दिवशी तो भीक मागत दारात आला अंगाला राख फसली होती....मला बघून तो म्हणाला
"आग दाबून बसलीस तू.....सूड घ्यायचा आहे तुला....नराधम आहे तो नराधम.....त्याची जागा नरकात....मदत करीन मी.....ये रात्री 12 वाजता स्मशानात"
त्या दिवशी मी रात्री बाहेर पडले....तुला तर माहीत आहे की मला अंधाराची किती भीती वाटत होती...पण सूडाच्या आगीत तो अंधार नाहीसा झाला होता....तुझ्या मृत्यूला कारणीभूत नराधम बापाच्या प्रतिष्ठेच्या जोरावर मोकाट फिरत होता.....गेले तिथे.....प्रेत जळत होतं....तो तिथे साधना करीत होता....कधी गेले नव्हते स्मशानात ती हाडे....तो उग्र वास सहन होत नव्हता....अग तुला माहीत आहे का....तुझ्या आणि माझ्याबद्दल त्याने सांगितलेला प्रत्येक शब्द खरा होता....त्याच्या शक्तीची प्रचिती मला येत होती.....मला भूतकाळ ऐकून घ्यायचा नव्हता...मी मध्येच थांबवत त्याला म्हणाले.....
"मला काय करावे लागेल ते सांगा....मी काही पैसे साठवले आहेत...मी हवे ते करीन....पण त्या नराधमाला"
त्याने माझ्या तोंडावर पाणी शिंपडले रागात होता तो
"पैशाचा नाद नाही मला....तू सकाळी वाढलेल्या भातावर वर्ष काढू शकतो मी....तू बघ तुझ्या मैत्रिणीला न्याय देण्यासाठी काय करतेस"
माहीत आहे त्याने काय केलं???अग त्याने मला समोर जळत असलेल्या प्रेताचा भाजलेला तुकडा खायला सांगितला.....तो सुद्धा खात होता....घट्ट डोळे मिटले आणि....आणि.....तुझा चेहरा डोळ्यासमोर आणून खाल्ला मी तो.....त्याने हसून मला मदत करण्याची तयारी दाखवली....15,20 दिवसांनी अमावस्या होती..त्या दिवशी तुला जागृत करून त्या राज ला संपवायचं होतं.....मधेच तो अघोरी भिक्षा मागायला येत होता....गांजा मागायचा....अग त्याला गांजा आणून देण्यासाठी अगदी नको त्या लोकांना भेटले मी...त्यांच्या वाईट नजरा त्यांचे बोल नको नको ते झेलत होते त्यावेळी......10 दिवस आधी त्याचा आदेश आला...तू त्याला ह्या विहिरीजवळ घेऊन ये फक्त....मग तुझं काम झालं म्हणून समज.....पण त्याला बोलवायचं कसं......फेक अकाउंट काढलं....माहीत आहे ...सावध झाला होता तो....त्याला माझं शरीर उघडं करून फोटो द्यायला लागले....किती किळसवाणा प्रकार....तू कसं काय सहन केलंस देव जाणे.....त्याचे ते घाणेरडे बोल...डोक्यात झिणझिण्या आणत होते पण मी सुद्धा त्याला तसच बोलून पटवत होते.....आला शेवटी.....घेतलास ना तू बदला.....किती बरं वाटलं माहीत आहे तुला न्याय मिळाला.....पण तुझी कमी मात्र राहील.....मला तर काहीच सुचत नाही....आपण बालपणापासून घालवलेले क्षण आठवून दिवस काढते....अग मी सुद्धा मारू का पाण्यात उडी....देऊ का जीव....म्हणजे परत आपण त्या दुसऱ्या दुनियेत एकत्र फिरू
(एक जोराचा वाऱ्याचा झोत आला.....तिचे केस उडले)
माहीत आहे....माहीत आहे....अजूनही जीव आहे माझ्यावर तुझा....पण हे बघितलंस का...हा बटवा आहे त्या अघोरीने दिला आहे तो जाळला की मुक्ती मिळेल म्हणतोय तो.....काय करू सांग.....मला नाही आवडणार माझ्या मैत्रिणीने अस मेल्यावर सुद्धा अतृप्त राहिलेलं
(हवेची सळसळ झाली....ती हसली आणि त्या विहिरीच्या कठड्यावर तो लाल बटवा ठेवून त्याला आग लावली....काही वेळात एक पांढरी सावली त्या विहिरीतून आकाशात उडाली.....तिच्या चेहऱ्यावर समाधान होते....आपल्या डोळ्यातील अश्रू पुसत तिने पर्स मधून मोबाईल काढला आणि "s priya" अकाउंट डीऍक्टिव्हेट केले)...............समाप्त
(सहज कथा सुचली होती....लिहून काढली....ह्या पोस्ट बद्दल अभिप्राय कमेन्ट बॉक्स मध्ये नोंदवा......धन्यवाद)