वर्ग: १0 वी अ.- Marathi horror story,bhutachi gosht
रोज प्रमाणे शाळेच सर्व आवरून अमोग शाळेत जायला तयार झाला.त्या दिवशी अमोग शाळेत जायला जरा जास्तच उत्सुक दिसत होता. अमोग ८ वी फ या वर्गात शिकत होता. वर्गातील सगळ्यात शेवटची तुकडी होती ती. न्यु अॅडमिशन असल्या कारणाने त्या वर्षीच्या सर्व ८ वी इ. च्या न्यु कमर्स विद्यार्थ्यांना त्या वर्गात प्रवेश दिला होता. एक महिना उलटला त्या वर्गातील वर्गशिक्षीकेला अमोग हा इतर मुंलाच्या बाबतीत खुप हुशार असल्याच दिसुन आलं..त्यांनी अमोग ला त्याच्यासारख्या इतर २-४ मुलांना त्यांनी शाळेच्या सर्वात वरच्या मजल्यावर असलेल्या ८ वी अ या वर्गात जाण्यास सांगितले. हा तोच दिवस होता. तो खुप उत्सुक होउन आज नविन वर्गात जाणार आहोत या भावनेने तो आनंदित होता.
वर्गातला पहिलाच दिवस पहिलाच तास पाटिल सरांनच्या तासाने सुरु झाला. पाटिल सर खुप शिस्तप्रीय व कडक स्वभावाचे होते हे अमोग चांगलाच जाणुन होता. पाटिल सर इतिहास हा विषय शिकवत असे परंतु त्यांचा मुळ आवडता विषय हा p.t व ncc हा होता. त्यांचा त्यादिवशी शिकवण्याचा मुड न्हवता. त्यांनी अमोग व इतर ते जे त्याच्यासोबत होते त्यांना उभे राहुन त्यांचा इतर मुलांना परिचय करुन दिला. पाटिल सर अमोग ला जरा जास्तच डोळ्यांवर घेत बोलले तुझ्यासारखाच एक माझा विद्यार्थी होउन गेला. तु थोडाफार त्याचासारखाच मला भासतोस. अस बोलुन त्यांनी आम्हाला बसण्यास सांगीतले. व ते त्या मुलाविषयी आम्हाला सांगु लागले. त्यांनी सांगीतल त्या मुलाचे वडील जादूगार होते. त्याच नाव अजय होत. व तो पण ८वी त असताना असाच या मुलासारखा माझ्या समोर होता. व तो जेवणाच्या सुट्टीत वर्गातील इतर मुलांना त्याच्या वडिलांकडून शिकलेल्या छोट्यामोठ्या जादु तो करुन दाखवायचा. यामुळे शाळेत त्याच नाव खुप होउ लागलं होत. पुर्ण शाळेत तो फेमस झालेला. अगदी मुख्याध्यापक देखील त्याला ओळखू लागलेले. त्याला मी त्यावेळी ncc जॉइन करण्यास सांगितले होते. परंतु त्याला त्यात रस नसल्याचे सांगुन त्याने टाळलेल. तेव्हा पासुन मला तो आवडत न्हवता माझ्या शिस्तप्रीय व कडक स्वभावामुळे NCC ला यायला कोण तयार न्हवते जेमथेम १० -१२ विद्यार्थ्यांना घेउन मी तो क्लास चालवायचो. मी अजय ला या कारणासाठी ncc join कर अस आॅफर केलत जेणे करुण त्याच्यामुळे इतर मुले आकर्षित होतील व ncc ग्रुप मोठ्या प्रमाणात तयार होईल.व त्या वर्षी १५ आॅगस्ट ला चांगल्या प्रकारे कवायत दाखवुन देता येईल. त्याने नकार देऊन मला नाराज केलेल.
पुढे दोन वर्ष लोटून गेली व अजय १० वी अ च्या वर्गात आला व त्या वर्षी मी त्या वर्गाचा वर्गशिक्षक होतो. त्या वर्गाची संपुर्ण जबाबदारी माझ्यावर होती. अजय हा त्या वर्षी जरा जास्तच आगावू होत चालला होता. रोज मला त्या-त्या तासाला ज्या त्या शिक्षकांच्या अजय विरुद्ध च्या तक्रारी माझ्यापर्यंत येउ लागल्या होत्या अजय तासाला जादु करुन शिक्षकांच्या हाताती खडु गायब करणे..शिक्षक फळ्यावर लिहित असताना लिहिलेल्या वाक्याच हास्यमय वाक्यात रुपांतर करने असले चित्रविचित्र प्रकार तो करु लागला होता. वर्गाचा वर्गशिक्षक या नात्याने मी अजय ला याबाबतीत बोलायच ठरवल व त्याला दुसर्या दिवशी मी एका विद्यार्थाकडे निरोप देऊन त्या अजय ला बोलावून आण अस सांगितल पण तो त्या दिवशी आला नाही अस समजलं.. असे दोन चार दिवस लोटून गेले तो शाळेत येईना झाला तेव्हा मी त्याच्या घराजवळ राहणार्या एका विद्यार्थ्याला विचारपूस केली असता मला समजल त्याचे वडिल गेले. त्यामुळे तो शाळेत येत नसल्याचे समजले. त्याच १० वीच वर्ष होत या काळजीन मी त्याला घरी जाउन भेटण्याच ठरवल व त्याच्या घरी गेलो तेव्हा त्याच्या आईने घराचे दार उघडले व त्यांनी घरात बोलावले व त्यांनी अजय वरच्या खोलीत आहे सांगुन त्याला हाक मारली अजय तुला भेटायला तुझे सर आलेत सांगुन त्यांनी अजयला बोलावून घेतले. अजय कडे मी पाहिले तेव्हा त्याचे डोळे रडुन रडुन सुजलेले दिसले व तो खुप बारिक पण झालेला. तेव्हा त्याच्या वडिलांबद्दल मी अजय च्या आईला विचारलं तर अजय पळत आपल्या वरच्या खोलीत गेला त्याची आई स्मित हास्य देत बोलली अजय आणि त्याचे वडिल यांचे नाते खुप घट्ट माझ्यापेक्षा अजय त्याच्या वडिलांचा खुप जवळचा होता. व त्यांचही खुप प्रेम होत त्यावर ते त्याला जादूगार घराण्यातील असल्या कारणाने त्याला जादूची कला पण शिकवत होते व अजय खुप चांगल्या प्रकारे ती कला अवगत करत होता व शिकत देखील होता त्यामुळे त्याचे वडील त्यावर खुप खुश होते. पण काळाच्या घालाने आज त्याचे वडील या दुनियेत नाहीत. त्यांना हार्ट अटॅक आल्याने आज ते आपल्यात नाहीत. त्यांच्या जाण्याने आम्ही खुप दुःखी झालेलो यातुन सावरण खुप अवघड होत अजय ला मीच थोडेदिवस शाळेत जाउ नकोस अस सांगितले तुझ मन लागणार नाही. त्यामुळे तो शाळेत येत न्हवता तुम्ही त्याचे त्याचे गुरु आज त्याला पहायला आला खुप छान वाटले तुम्ही त्याच्याशी वर जाउन बोला तोवर मी तुमच्यासाठी चहा टाकते असे सांगीतले. मी अजय च्या खोलीत गेलो तेव्हा अजय बेड वर डोक टेकवून आडोशाला झोपला होता. त्याच्या डोक्यावर हात ठेवत मी त्याला बाळ अजय अस हाक मारत त्याला उठवले. त्याला अस किती दिवस रडत पडत घालवणारेस तुझ १० वी च महत्वाच वर्ष आहे बाळा तुला शाळेत याव लागेल तुझे बाबा आज आपल्यात असते तर तु शाळेत जात नाहीस हे पाहुन त्यांना तुझ वागनं आवडलं असत का म्हणत मी त्याला समजावण्याचा प्रयत्न करत त्याला उद्या शाळेत ये अस सांगुन निघुन आलो.
दुसर्या दिवशी अजय माझ्यासमोर होता. पण त्याच्या चेहऱ्यावर कोणतेच हावभाव न्हवते तो शांतपणे आपल्या बाकावर बसला होता. तेवढ्यात जेवायची सुट्टी झाली सलग सरांनी दोन तास घेऊनही अस दोन तास झाले अस वाटलं नाही.. सर बोलले बाकीच लेक्चर उद्या बोलत..सर वर्गा बाहेर पडले.
ईतर मुल जेवायच्या सुट्टीत सरांच्या लेक्चर बाबत बोलत होती. अमोग मात्र अजय ला घेउन खुपच उत्सुक झालेला त्याला अजय ला बद्दल सगळ जाणायच होत तो कुठे रहायचा कसा दिसायचा कोणत्या वर्गात होता तो वर्ग कुठे त्याची तुलना सरांनी थेट त्याच्याशी केलती हे ऐकुन तो खुप आश्चर्य चकित झालेला...त्याने शाळेत असलेले सर्वात जुने शिपाई काका ज्यांच्याशी अमोग ने मैत्री केलेली त्यांना तो पळत जाऊन शाळेच्या गेटजवळ भेटला व धापा टाकत तो अजय बद्दल विचारु लागला... रानडे काका तुम्हाला अजय माहित आहे का ओ जो एक जादूगार मुलगा होता माझ्यासारखा माझ्याच वयाचा..
हो..पण तुला कोणी सांगितल त्याबद्दल हि ६-५ वर्षा पूर्वीची गोष्ट तुला कोणी सांगितली
मला आज पाटिल सरांनी लेक्चर ला... पण मध्येच आता जेवायची सुट्टी झाली त्यामुळे पुढे काय झाल ते ते सांगु शकले नाहीत.
अमोग: नाही
रानडे काका : १० वी अ च्या वर्गात तो मुलगा अजय शिकत होता. खुप हुशार त्याच वर्षी त्याचे बाबा गेलते एक दिवस खुप मोठा भुकंपाच्या हादर्याने शाळेच्या सर्वात वरच्या मजल्यावर गोल घुमटात अजय चा वर्ग होता तिथे सगळ्यात जास्त नुकसान झाले त्या वर्गात दगड कोसळत होती तेव्हा अजय ने शरतीने सर्व विद्यार्थ्यांना बाहेर काढले पण स्वतःहाला त्यातून वाचवू शकला नाही तो बिचारा शाळे सारख्या वास्तुत अशी घटना घडण खुप वाईट पण आजही त्याची आत्मा त्या वर्गात असल्याच भासते शिक्षक व शाळेच्या फाउंडर्सनी मिटींग घेउन त्यावेळी तो वर्ग कायमस्वरुपी बंद केला त्या वर्गाला पुर्ण पणे बंद केलय व तीकडे जाण्यास विद्यार्थ्यांना सक्तीची मनाई आहे. पुढे चालून खुप राजकारण झालं पालक शिक्षकांमध्ये त्या वर्गाला घेउन पण त्या अजय ची आत्मा विद्यार्थ्यांना इजा पोहचवत नाही त्यामुळे शाळेला टाळ लागण्याऐवजी आज देखील शाळा चांगल्याप्रकारे चालु आहे..पण पण ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी शाळा बंद ठेवली जाते..तुला एक सांगु अजुन चार दिवसांनी तो दिवस आहे तुम्हाला त्या दिवशीसुटटटी असेल... शाळेचा चोर दरवाजा हा १० वी अ च्या वर्गाला जाऊन मिळतो. तो चोर दरवाजा फक्त मला मुख्याध्यापक व पाटिल सर आम्हा तिघांनाच माहित..तो मी तुला सांगु शकत नाही कारण विद्यार्थ्यांच्या हितासाठी मी तुला सांगु शकत नाही..
पुढे अमोग ला हा चोर दरवाजा शोधायचा असतो त्यानुसार तो त्याचे प्रयत्न चालु ठेवतो...
संबंधीत भाग... पुढिल भाग २ मध्ये