सायको सिझन ऐक भाग ५
मंदार.साखरकर
आता,
दुसऱ्या दिवशी सकाळी ११.०० वाजता Adv. कांचन पोलिस चौकीत येऊन बोलतात, मला प्राजक्ताला भेटायचे आहे मी तिचा वकिल आहे.
हवालदार कांबळी Adv. कांचनला बोलतात बसा. बोलून तो ई. रवीच्या कँबिनमध्ये येऊन बोलतो Adv. कांचन आले आहेत प्राजक्ताचा भेटायला.
ई.रवी बोलतात द्या भेटायला १० मिनिटे आणि बोलतात काँ. स्वाती आली की पाठवा आत.
ह.कांबळी प्राजक्ताच्या लाँकर रूममध्ये जातो आणि बोलतो तुला भेटायला Adv. कांचन आले चल ऊठ.
प्राजक्ता, ह.कांबळीला बोलते जा त्याला बोल मला जेव्हा वाटेल भेटायचे तेव्हा बोलवते, जा सांग जायला त्याला.
ह.कांबळी येऊन Adv. कांचनला बोलनार.
तेवढ्यात कांचन बोलतो ऐकले मी, ती जेव्हां सांगेल तेंव्हा फोन करा मला.
ई.रवी बाहेर येत, ह.कांबळीला बोलतात. घेऊन या तिला चौकशी रूममध्ये.
प्राजक्ता बोलते हात लावायचा नाही. तुझ्या साहेबाना माहिती नाही का. तेवढ्यात काँ. स्वाती येऊन तिला खेचत चौकशीत रूम मध्ये आणुन बोलते बस चल.
ई.रवी, कांबळीला बोलतात जारे सत्यमेव जयतेचा पटा आण तो आणि येताना चहा पण आण आरोपीला.
चल पुढे बोल का मारले सगळ्याना.
प्राजक्ता बोलते मी काही केले नाही आहे. तुमच्याकडे काय सबूत आहे की मारले सगळ्यांना.
बाँडी भेटल्या बाकिच्या बाँडी कुठे आहे.
अजिंक्य आणि साक्षीला मारलस की जिवंत आहे.
प्राजक्ता परत बोलते मी काही केले नाही आहे.
राहिला प्रश्न अंजिक्य आणि साक्षीचा मला काय माहिती कुठे आहे.
कांबळी प्राजक्ताला चहा देत, ई.रवीला पटा देतात. प्राजक्ताला बोलतो कबुल कर सगळे, नाही तर आम्हाला आमच्या पद्धतीने कबुल करू.
प्राजक्ता चहा पित बोलते, चला ट्राय करा रवीकडे बघत बोलते.
ई.रवी प्राजक्ताला बोलतो आता पर्यंत प्रेमाने विचारले. आता शक्तीचा प्रयोग करावा लागेल.
प्राजक्ता बोलते करा तुम्ही शक्तीचा ऊपयोग करा मला पण तेच पाहिजे आहे.
काँ.स्वाती परत तिला दोन थोबाडीत मारत बोलते गपचूप बोल कशाला बाबाना त्रास देतेय.
प्राजक्ता बोलते कोण, मी आता ई.रवीच्यां समोर अपराधी म्हणून बसली आहे, नाही त्यांची मूलगी बरोबर ना. बोलून बोलते मला माझ्या वकीलाशी बोलायचे आहे.
परत स्वाती मारायला जाते. ई.रवी बोलतात बोलवा तिच्या वकीलास.
.......
जरा वेळाने Adv. कांचन येतात. चौकशी रूममध्ये प्राजक्ता आणि कांचन बोलत बसले होते.
कांचन तिला बोलतात. गालावर मारण्याचे निशाण कुठले.
प्राजक्ता बोलते काही नाही असेच.
ठीक मी बोलतो नंतर ई.रवी बरोबर कांचन बोलतात.
चल सुरवात करूया मला सगळे खर सांग. काही लपवू नकोस.
कांचन बोलतो तु हे का केले सगळे.
मी काही केले नाही आहे. जे केले आहेत ते सगळे अजिंक्य आणि साक्षीने मिळून केले आहे.
कांचन बोलतात ठीक आहे. तू बोलतेस हे सगळे त्यानी केले आहे. तर मग दोघे आहेत कुठे ते का करतील दोघे.
प्राजक्ता बोलते मला नाही माहिती. नशीब मला नाही मारले. मला पूर्णपणे ह्या केस मध्ये गुण्तवले आहे. राहिला प्रश्न दोघेकुठे आहेत तर ते पोलिसांचे काम.
प्राजक्ता बोलते दातचा किरकिर आवाज करत बोलते, तूला जर तूझी मुलगी जिवंत पाहिजे असेल तर मला बाहेर काढ. सात दिवसा नंतर, हेच बोलायला तुला बोलवले. चल निघ ईथून. जर नाही सोडवलेस तर ती स्वतः हाच स्वतःला मारेल किंवा ती अजिंक्याला तरी मारेल बघ विचार करून.
कांचन बोलतो ठीक आहे. मी प्रयत्न करतो. पण मला माझी मूलगी सुखरूप पाहिजे.
प्राजक्ता हसत बोलते ठीक आहे.
कांचन बाहेर येत, ई.रवीला सांगतात मला हीची फाईल द्या. आजून ऐक माझ्या क्लाईटची मानसिकता तुम्हाला माहिती आहे ना. मग तिला मारले का. तिने स्वतः ला काय केले तर त्याची जिमेदार कोण.
क्रमश