झब्बू निरोप घेऊन आला.पण धगधगणाऱ्या जाळास कुणी हलवताच जाळ ढणढणत जास्त वाढतो म्हणून कल्याणला माडीवर जाण्याची भिती वाटू लागली. पण नसानसात भिनलेल्या मृद् गंधास टाळत किती ही दूर पळण्याचा प्रयत्न केला तरी धुंद सुवासाच्या ओढीनं पावलं आपोआप रानाकडं वळतातच . उद्या कल्याणी सातारला परतणार याची जाणीव होताच तो उठला.
कल्याण नऊ वाजता माडीवर पोहोचला. माडीच्या मागच्या टप्प्यात घराच्या सागवानी चौकोनी खांबास कुंबीला पाठ टेकून कल्याणी आईच्या आठवणीत उदास बसली होती.समोरच्या खांबास टेकत अप्पाही खालीच बसले होते. कल्याण येताच रमेशनं पुढच्या टप्प्यातून खुर्ची आणली व तो निघून गेला.
खुर्ची बाजूला सरकवत कल्याण व झब्बूनं खांबास रेलत चौकोन पूर्ण केला. कल्याणची उपस्थिती जाणवताच मागच्या दारातून अनेर काठावरून येणारा वारा कल्याणीस सुखद वाटू लागला.
तीन चार मिनीटं स्मशान शांतता. कोंडी फुटेना. प्रत्येकाला ही जीवघेणी कोंडी फुटावी असं वाटत होतं पण कोणीच बोलेना.
" अप्पा , सुरेंद्रराव दोन तीन दिवसाचे निघालेत मग अजून नाही आले?" झब्बूला जीवघेणी शांतता बैचेन करू लागली म्हणून त्यानं विचारलं.
" निघाले पण पुन्हा काही तरी अडथळा आल्यानं येणं रद्द झालं" अप्पा उत्तरले.
.
.
" द्वारका इकडे ये जरा काही बोलायचंय!" म्हणत अप्पा उठू लागले. तोच कल्याणीनं जवळून जाणाऱ्या अप्पास वर मान करत हात धरत बसवलं.
" अरे मग काही तरी बोला! नुसते आतल्या आत रडत कुठपर्यंत बसणार!"
अप्पा कळवळून बोलत खाली बसले.

" कल्याण......! कसा आहेस? माई?"
बऱ्याच दिवसांनी कल्याणीचे शांत बोल कानावर पडताच कल्याणच्या ह्रदयात धडधड ऐवजी घरघरच वाढली.
" बराच......! नाही म्हणायला हा झब्बू छळतो तेवढाच त्रास!शांत बसू देत नाही!" कल्याण झब्बूकडं पाहत म्हणाला.
कल्याणीच्या डोळ्यातून ओघळ लागत गालावरून झरू लागले.
" उद्या सातारला निघतेय! भेटावसं वाटलं! म्हणून झब्बूला बोलले"
" निघताय ! ते ही खरंच ! जावं तर लाग़णारच मॅडम!"
' मॅडम' शब्द ऐकला नी कल्याणी अप्पास बिलगत हंबरडा फोडू लागली.
" अप्पा ,सांगा तुमच्या या कल्याण बाबास! नाती इतक्या लवकर तुटत नसतात! बघा हो! 'मॅडम' म्हणून हा कसं परकं करतोय" अप्पांना तिथं थांबणं असह्य झालं व ते डोळे पुसत बाहेर पडले.
" मॅडम! मला ही आता या गावातून निघावं असंच वाटतं! पण चंद्रभागेच्या थडीनं लहानपणीच पोरकं केलं.माईच्या रूपात पांझराथडीनं अंगाखांद्यावर खेळवत वाढवलं नी पोटापाण्यासाठी अनेर थडी जवळ केली. पावली अनेर थडी! एका वर्षात भरभरून दान दिलं. पण माझ्या फाटक्या झोळीत नाही सामावलं गेलं ते! म्हणून आता नाही थांबावं वाटत! या मातीतल्या माणसात काय एवढी माया आहे कुणास ठाऊक! तीच माया माझा जीव घेऊ पाहतेय मात्र!"
कल्याणी रडतच त्याच्या डोळ्यात पाहू लागली. कल्याणचं बोलणं तिच्या ह्रदयास रक्तबंबाळ करत होते!
" आमचं सोडा मॅडम, तुम्ही कशा आहात?" कल्याण आल्यापासून पहिल्यांदाच वर मान करत विचारता झाला.
" कल्याण राघूस वाटावं मैना उडून गेली .पण उडणारी मैना सोनेरी पिंजऱ्यात कैद व्हावी तिच गत आमची! जाऊ दे. एक ऐकशील माझं?" कल्याणी आशेनं त्याच्याकडं पाहू लागली.
" बोला!"
" पण त्या आधी मला वचन दे नकार देणार नाहीस!"
" आग लावा त्या वचनांना! हल्ली वचन, वचन देणारे, घेणारे यांची इतकी घृणा निर्माण झाली की वचन घेणाऱ्यांची गचांडी धरून.......!" कानाच्या पाळ्या लाल होत श्वास अंगारागत फुलला तो थरथरत उठू लागला.
तोच कल्याणीनं उठत त्याला बसवत रडतच
" नाही मागत काही पण जाऊ तरी नको!" म्हणत बसवलं.
" मॅडम, कधीकाळी कुणी केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून स्वत: हून काही देणं घेणं इतपत ठिक. पण त्याचा जेव्हा इतर फायदा घेत एखाद्याला आयुष्यातून उठवतात ना तेव्हा अशांना हतनूरच्या धरणात बुडवावं ...." पुढचं कल्याणकडून बोललंच गेलं नाही.
झब्बू पायात डोकं खूपसून खूपसुन ढोरागत हंबरू लागला नी कल्याण भानावर आला
" हे बाबा, तु का रडतोय! मी तुझ्या ताईला नाही बोलत रे! पण मी स्वत: त्या वचनाच्या भूलथापांना बळी पडत सारे संदर्भ बदलावयास लावले ना! त्याचीच आग होतेय रे! गोदाकाठी मोठा कर्णाचा अवतार होत मी...... जाऊ दे! पण मला जर या न सोसणाऱ्या जाळाची कल्पना असती ना; तर कल्याणी खरं सांगतो त्याच वेळी साथीनं गोदाकाठीच सामावलो असतो"
'कल्याणी ' शब्द ऐकला नी तिला दुरावा असह्य होत ती त्याला बिलगण्यासाठी उठली पण तो पावेतो कल्याण झपकन बाहेर पडला.
रात्री उशिरापर्यत झब्बू त्याच्या ताईला त्याच्या बाबाचं विरहात जळणं बया करत राहिला.
पहाटेच कल्याणी सातारला निघाली.
त्यानंतर आठ दिवसांनी सुरेंद्रराव सिमेवरून येत जळगावमार्गे आले. पण त्यांनी कल्याणीला मी बोरवणला जातोय हे कळवलंच नाही. मामीच्या दु:खात त्यानं अश्रू की नकाश्रू गाळले. एक दिवस प्रवासाचा थकवा काढला. अप्पांनी कल्याणीला सातारहून बोलवण्याचं विचारलं. पण त्यानं नकार देत मी लगेच सातारला परतणार सांगत नाकारलं. त्यानं दुसऱ्या दिवशी सकाळीच कल्याण डाॅक्टराची भेट घेतली.सुरेंद्ररावास पाहताच कल्याणला आश्चर्य वाटलं

" डाॅक्टर साहेब ,छातीत कळ येतेय हो!पहा जरा."
" झोपा!" कल्याण स्टेथॅस्कोप लावत तपासू लागला.बी पी. मोजला.
" काही विशेष काळजी करण्या सारखं नाही. प्रवासानं पित्त वाढलंय! जागरण ही झालं असावं!"
" डाॅक्टर साहेब जागरण म्हणाल तर झोप लागतच नाही!"
" का? झोप न लागायला काय झालं!" कल्याणनं औषधी लिहीत वर मान करत विचारलं.
" ज्याच्या छातीत कळ उठतेय म्हटल्यावर झोप कशी लागेल त्याला? नी दुसरं कारण हे!" सुरेद्ररावानं उठत खिशातनं चिठ्ठी काढत कल्याणकडं दिली.कल्याणनं चिठ्ठी पाहिली. फोन नंबरची काॅल हिस्ट्री होती. तो वर खाली पाहू लागला. त्यानं नंबर पाहिला कल्याणीचा नंबर त्यानं पाहिला नी त्याची थरथर वाढली.
" काय हे? नी का दाखवत आहात हे?"
" डाॅक्टर साहेब आता बघा तुमचं ही पित्त खवळलं ना?"
" सुरेंद्र राव काय म्हणायचंय आपणास नेमकं?"
" कल्याण सदा गायकवाड उर्फ केजी. मु. पो पंढरी, जि. सोलापूर.व्हाया नारायणगाव ,चिखली मार्गे बोरवण.बारीच्या सुंदराबाई सांप्रत फणसे- उत्तम नर्तिका आणि हाडाचा सोंगाड्या व काळजाचा ठाव घेणारा ढोलकीसम्राट सदा गायकवाड यांचाच तमाशा ना आपण. मग मला काय म्हणायचं हे कसं कळत नाही आपणास?" सुरेंद्र राव आता कल्याणच्याच खुर्चीवर बसत टेबलावर पायाची अढी घालत पेपरवेट फिरवत बोलू लागला.
" जे सांगायचं ते सरळ सांगा त्यासाठी वैयक्तिक जिवनात डोकावत खोलात जाण्याची गरज नाही!"
"केजी! कसं असतं, लहानपणी आमच्या सातारकडे खेड्यात बारी आली की चावडीवर पडायची. मित्रांसोबत जायचो मी पण. लोकांना जाम आकर्षण बारीचं. चावडीत ते काय करतात, कसे बसतात, कसे झोपतात, त्याची अंडी पिल्ली चघळत बसायची जाम हौस, रात्री ही त्यांची कनात तंबू फाडून फाडून डोकावण्याची ती सवय पडलीय आम्हास ती नाही जाणार. पण तुम्ही का उगाच या फंदात पडले!”
" काय केलंय आम्ही!"
" एव्हाना काॅल हिस्ट्री पाहिल्यावर लक्षात आलंच असेल तुमच्या!प्रेम! आमच्या बापू मामाच्या मुलीवर ! तरी आम्ही डोकावलो नसतो.पण दुर्दैवानं त्याच आता आमच्या सौभाग्यवती आहेत ! रात्री बारा बारा पर्यंत काॅल? व्वा डाॅक्टर साहेब मानावं लागेल! ते ही सतत ! दोन दोन तास! मला सर्व सांगा काय काय? नी कसं कसं!"
कल्याणची तळपायाची आग मस्तकात गेली.
" सुरेद्रराव! व्वा मानलं तुम्हास! काॅल हिस्ट्री काढली तर थोडी तसदी घेऊन काय बोललो ती हिस्ट्रीही काढली असती! निदान काय बोलणं झालं ते तरी कळालं असतं!"
" ते शहानपण शिकवायची गरज नाही .ते ही काढलंय!"
" मग तर आपण एवढं खोलात शिरलेच नसते. होतं आमचं प्रेम! आम्ही कधीच नाकारणार नाही. पण ते साऱ्या वडिलधाऱ्यांच्या संमतीनं व साक्षीनं शाश्वत होतं. त्यात लबाडी, धूळफेक, पाप याचा लवलेश ही नव्हता. "
" रात्री बारा बारा पर्यंत बोलणं हे काय होतं मग?"
" काॅल हिस्ट्री पहा. कधी माझा काॅल दिसतोय का? सारे काॅल कुणाचे आहेत ते पहा. आम्ही जे काही केलं ते बापू अप्पाच्या मर्जीनं व मर्यांदाचं पालन करून शाश्वत.आमच्या प्रेमात बोरवणातील कच्या बोरात असणारा आंबटपणा असेल पण त्यानं यथावकाश पिकून गोडवा द्यावा तो गोडवाच दिलाय!त्यात किड नव्हती. आपण आलात त्याच क्षणी आम्ही सर्वस्व दान देत मुक्त झालो. तुमच्या लग्नानंतर एक तरी काॅल दिसतोय तुम्हास? हे नितळ दानाचं प्रेम. या देहास विरहात जाळून खाक करू पण किड लागू देणार नाहीत आम्ही."
" मला प्रवचन नकोय. या गावातून सटकायचं एवढंच म्हणायचंय मला!"
" याला धमकी समजू की विनंती?"
"शाश्वत प्रेम केलंय ना मग हवं ते समजा!"
" नाही तरी इथं राहणं आम्हालाच असह्य झालंय. पण धमकी असेल तर या यातना भोगत ही आम्ही पाप केलं नाही या साठी इथल्या मातीतच मरू!पण एक विनंती करतो.कल्याणी निष्पाप आहे. वयानुरूप कच्या बोरीचा अवखळ पणा होता ,असेलही, पण त्यात कुठलीच किड नाही.पाया पडतो.गैरसमज काढा. स्वत: हून तिच्या जिवनात आलात तर सुखानं रहा!"
सुरेंद्र खाली नजरेनं संतापात परतला.
आपण शूट करायला जावं तर समोरच्यानच आपली गन हिसकवत आपल्याच कपाळावर निशाना साधावा हीच गत त्याची झाली.
नंतर कल्याणलाच बोरवनात असह्य झालं .बदलणारे संदर्भ त्याला पुरतं वेडे करत होते. त्यात आपण जर इथं राहिलो तर नाहक कल्याणीस झळ नको म्हणून त्यानं माईस चिखलीस परततोय म्हणून कळवलं.
परिस्थिती माणसास कधी कंगाल करते तर कधी कधी नेमक्या त्याच वेळी काही तरे फासे टाकत दान ही देते. दुपारीच दिनाचा काॅल आला.
" कल्याण लेका एक दिड वर्षांपासून कुठं गायब झालास? शहा सरांचा काॅल होता. तुला अर्जंट काॅन्टॅक्ट करायला सांगितलंय! " सांगत बऱ्याच वेळ गप्पा मारल्या. कल्याणला शहा सरांशी ही बोलावं वाटेना. त्यानं टाळलंच. पण दुसऱ्या दिवशी दिनाकडून नंबर घेत शहा सरांनीच काॅल केला.
" कल्याण तू पक्का मूर्ख दिसतोस!अरे मास्टर डिग्री साठी मुलं लाखो घेऊन टाचा घासतात नी तू?" त्यांनी बरंच झापत त्यास आठ दिवसात मुंबई ला बोलावलं. मागं शहा सरांनीच त्याला बोलवत अप्लाय करायला लावलं होतं पण बोरवण मध्ये बसलेला जम व कल्याणी यामुळं तो तिकडं दुर्लक्षच करत होता. दोन अडिच वर्षे घालत मास्टर डिग्री घ्यायची नी मग पुन्हा शहरात लाखो गुंतवत इन्फ्रास्ट्रक्चर उभारायचं. त्यात दवाखाना चालेल याची शाश्वती नाही. त्या पेक्षा हातचं कशाला सोडा,हा सोईस्कर विचार करत नावाला शहा सर सांगताय म्हणून त्यानं अॅप्लीकेशन देऊन आला होता. पण डाॅ. शहा सरांची नामांकित लोकात गणना होती व त्यांच्या शब्दास मान होता. त्यामुळेच त्याचं काम होणार होतं. पण तरी त्यानं तो विचार बाजूला ठेवत सामान चिखलीस हलवायचं ठरवलं. झब्बूस हे कळालं नी पहिला झटका त्यालाच बसला. आता पुन्हा आपण निराधार होणार व शेणामातीतच सडणार हे त्यानं ओळखलं. त्या ही पेक्षा आपला माणूस कल्याण बाबा दुरावणार ही जाणीव त्याला दिमख लागल्यागत पोखरू लागली.
अप्पास समजताच अप्पा 'माई क्लिनीक'वर धावतच आले. सोबत इतर पाच सहा लोक ही आले. त्यांच्या दृष्टीनं कल्याणचं गाव सोडून जाणं म्हणजे गावाचे पुन्हा हाल. कारण आठ दहा किमीवरील कंजारला पाणी पावसात जाणं खूप जिकीरीचं होतं. त्यात कल्याण पैशाबाबत कधीच कुणाला अडवत नसे. उलट गरिबांना स्वत: औषधं देई. त्यात मायेचं व आधाराचं बोलणं यानं ही बोरवणातला माणूस नी माणूस त्याच्याशी जोडला गेला होता. दौलतराव अर्जुन गोकुळ देखील त्याच्याशी आता प्रेमानं वागायला लागले होते.
साऱ्यांनी विणवलं पण व्यर्थ.
सारे उठले. अप्पा सुन्न होत बसून राहिले.
" बाबा! तुझ्यावर अन्याय केला म्हणून आम्हास सोडून चालला का!" अप्पानं काळजास हात घातला
नी कल्याण ढासळला.
" अप्पा एका एका वखर जमीनीसाठी भावाचा मुडदा पाडणारे लोक मी पाहिलेत! नी तुम्ही या तमासगिराच्या मुलासाठी आपलं आख्खं वतन दयायला निघाले होते. मग तुम्ही अन्याय केला हे मी कसं म्हणेन.अहो, उमेशला ढोल सोडायला लावत माझ्या कमरेला ढोल बांधत ' कल्याण बाबा' म्हटलं नी तिथंच आपल्यातला बाप माणूस मला कळला. नी तुम्ही माझ्यावर अन्याय करणार का!"
" मग मला सोडून का जातोय रे? माझा बापू गेला, माझी कल्याणी दूर नी आता तू ही...!"
" अप्पा मला पुढील शिक्षणासाठी मुंबईला जायचंय. बघा शिक्षण झालं की पुन्हा इथंच मोठा दवाखाना टाकतो की नाही! किती दिवस तुमच्या भाड्याच्या घरात राहायचं!"
" कल्याण बाबा तू गेला की नाही येणार पुन्हा! तू तू माझ्या कल्याणीवर रागावलास ना म्हणून जातोय!"
जुने संदर्भ निघू लागताच कल्याणच्या डोळ्याला धारा लागल्या.त्यानं अप्पाचे हात हातात घेतले
" अप्पा, मला कुणावरचं रागवायचा हक्क नाही. बापूंच्या वचनाच्या मोहास बळी पडलो नी माझ्या कल्याणीस मीच हरवून बसलो! त्याची शिक्षा नियती मला भोगायला लावेलच.फक्त एक विनंती करतो.मी गेल्यावर माझ्या झब्बूस मळ्यात ठेवा! माडीच्या आसऱ्यात तो सुखानं राहिलं!"
कल्याण थांबणार नाही हे अप्पानं ओळखलं.
कल्याणनं सामानासाठी टेम्पो ठरवत त्याला दिवस सांगितला. त्या आधीच त्यानं एक दिवस आधी बाईकनं निघायचं ठरवलं. कारण टेम्पो सोबत आपण असलो की गाववाले उगाच मोहात टाकतील. त्या आधीची रात्र त्यानं शेवटचं एकदा बोरवणला नजरेत भरवून घ्यायचं ठरवलं. रात्री जेवण करून त्यानं झब्बूला सोबत घेतलं. फाल्गुन लागल्यानं थंडी आपला पसारा आवरत निघाली होती. दशमीचा घडीचा चंद्र नभात झळकत होता. कल्याण अप्पाच्या मळ्याच्या रस्त्यानं निघाला. पण अचानक विचार बदलत तो माघारला. त्याला अनेर पात्रातच फिरावं वाटू लागलं. गावात येताच अप्पाची माडी समोर दिसली. रमेश उमेश केळीस पाणी भरण्यासाठी गेले असावेत. शेतकरी केळीस सहसा रात्रीच पाणी देतात हे त्याला माहिती होतं. अप्पा व द्वारकामाईच असल्यानं तेही झोपले असावेत म्हणून माडी उदास रडवेली भासत होती. माडीच्या अंगणात तो घुटमळला. पण दहा अकराचा सुमार अजुन काही जागेच होते. झब्बूनं त्याला धरत पुढे नेलं. नदीत ते माडीजवळच्याच रस्त्यानं उतरू लागले
कल्याणला माडीच्या अंगणात घुटमळतांना जे दिसलं ते तो चितारू लागला. तो पावेतो तो चालता चालता पात्रात आला. पात्रातल्या रेतीत तो बसत आडवा झाला...व विचार गर्तेत बुडाला.
गणपतीची मिरवणूक माडीच्या अंगणात. दौलतरावास कळू न देता आपल्या ढोलाच्या नादावर नाचावयास लावलं. त्यानं चवताळून गोक्यानं खूण करत आपल्या घरातून पाणी ओतायला लावलं. पण आपण कोरडे.माडीच्या अंगणात येताच कल्याणीस बापूनं पाणी आणावयास लावलं नी कल्याणीनं भर गर्दीत येत पाणी ओतलं. आपल्या ओल्या अवतारात ढोल बडवणाऱ्या देहाकडं पाहत गर्दीत गोक्याला हूल देण्यासाठी आपल्यावर डोळ्याचं पात खट्याळपणे झपकवलं.
गोक्या तिथंच हारला
त्याच्या अंगावर शहारे आले.
" काय झालं कल्याणबाबा!" अचानक त्याला रेतीतून उठलेलं पाहताच झब्बू विचारू लागला.
" झब्बू मी उद्या सकाळीच बाईकनं निघतो परवा तू टेम्पोत सामान भरून ये!"कल्याणनं विषय पालटवला.
" बाबा टेम्पोत मी सामान भरून देईन. पण टेम्पोसोबत माझं काय काम!" झब्बू आतला हुंदका दाबत म्हणाला.
" झब्बू ऐक ! सामानासोबत ये चिखलीत दोन दिवस रहा नी मग बसवून देईन तुला बसवर! मी अप्पांना सांगितलंय.ते तुला मळ्यात ठेवतील. हे बघ पुन्हा चुकून ही शेण आवरणं, झाडलोट करणं असली काम करत लोकापुढे लाचार होऊ नको. माडीच्या आसऱ्यात रहा!"
झब्बू पायात डोक खुपसत रडू लागला.
" बाबा ....!"
" रडू नको! या गावातली तुम्ही सारी रडता नी मग मला ही..."
कल्याण उठला परतण्याची इच्छा असुनही त्याची पावलं सिताराम भरवाडच्या वाड्याकडं वळलीच. तो पात्रातून चालू लागला. त्याला कल्याणी शाळेत जाण्याचा रस्ता मागं पडू लागला तशा वेदना होऊ लागल्या. पावसा खेरीज आठ महिने कल्याणी याच रस्त्यानं पायी शाळेत जाई. म्हणून तो त्या रेतीत झोपला होता.
" झब्बू या पात्रात लोक किती आठवणी सोडून जातात रे! पाणी येतं रेतीस वाहून नेतं नवीन रेती वाहून आणतं तरी त्या लोकांचे स्पर्श ,मल्हार मेघी सूर,तसेच थांबलेत कुणाची तरी वाट पाहत असच जाणवतं. तो माघारी फिरला. दरवर्षी बैलगाडी, ट्रॅक्टर व माणसं चालून चालून वाट पडायची. त्या वाटेवरची रेती उचलत त्यानं खिशात भरली व पुढे निघाला. तर मागून झब्बूनं त्याच्या पायाची रेती उचलत आपल्या खिशात भरली. ते चालत चालत पुनवेला कल्याणी व तो थोडावेळ बसले होते त्या जागेवर आले. चपखल ती जागा सापडणं मुश्कील पण त्यानं काठावरच्या कवठ व बेलाच्या झाडाकडं पाहिलं व खुण पटली. त्या जागेवर बसत तो धुंद होत थडीवरून वाहणारा वारा पिऊ लागला. तोच त्याला वाहणाऱ्या वाऱ्यात कल्याणीचे बोल उमटत असल्याचं जाणवलं.वरती नभात घडीची फुगीर चंद्रकोर मेघाआड लपत आकृती तयार होत असल्याचं जाणवलं
" कल्याण संदर्भ बदलले तरी त्यांना विसरत जुने पूर्वीचे भावशून्य संदर्भ आठवत नाही का जगता येणार? बदलल्या संदर्भाचा जाळ सोसण्यापेक्षा भावशून्य संदर्भ निदान दाह न करता शांतीनं जगू तरी देतील!" राधाताईच्या वेळी आलेली कल्याणी सातारला परततांना तेच सांगू पाहत होती पण तो पावेतो आपण बाहेर पडलो हे त्याला स्मरलं. तो उठला त्या जागेवरची रेती पुन्हा त्यानं खिशात भरली. व माघारी फिरला. त्यानं मनातल्या मनात काही तरी ठरवलं.
सदा बाबा पत्नी पळून गेली तरी दारूच्या थेंबास शिवला नाही तर त्यांनी आपली कला वाढवत टक्कर दिली. यमुनाबाई बिनीकर यांनी लग्नास गळ घातली पण पहिल्या अनुभवानं तोंड पोळल्यानं त्या नात्यावरचा त्यांचा विश्वासच उठला. त्यांनी यमुनाबाईस बहिण मानत बारीवर वागवलं.
माई! माई तर त्याग मुर्ती! चारीत्र्याची खाण. लग्नाची बायको असून फसवत माईशी लग्न करणाऱ्या आमदार पुत्र सर्जेराव याला अद्दल घडवत पहिल्या बाईनं पदर पसरताच माईनं पाण्यागत अलग होत सर्जेरावास त्यागलं. आमदारांनी माईचा त्याग व सच्छील वागणं पाहून आपल्याच संस्थेत विनवत नोकरी दिली. नोकरी करतांना ही सर्जेरावास त्यांनी कधीच फडकू दिलं नाही. या माणसांनी कुठे ही वाहत न जाता आपला देह जाळून त्यागाचं उदाहरण ठेवलं. मग आपण ...? चला प्रयत्न करुया सावरण्याचा. जुन्या भावशून्य संदर्भां सोबत.
दुसऱ्या दिवशी पहाटेच टेबलावरची कल्याणीनं दिलेली चांदीची मूर्ती त्यानं उचलली. पण पुन्हा नविन संदर्भ जाळ देतील याची जाणीव झाली.तरी ती मूर्ती टाकण्याचा मोह झालाच नाही. त्यानं द्वारकाताई व अप्पाचा पाया पडत निघण्याची घाई केली. पण तरी वयानुसार सुधरत नसतांनाही ताईनं चहासाठी थांबवलं. त्यानंही माडीवर आता येणे नाही म्हणून चहा घेतला.
" कल्याण बाबा नियतीनं माडीचा जावई नाही होऊ दिलं तरी मुलगा म्हणून तरी आठवण ठेव नी येत रहा!"
" द्वारके, बाबा आता येणे नाही! आपल्या मौतीवर ही येतो की..." तोच कल्याणनं अप्पाच्या तोंडावर हात ठेवत " अप्पा रामप्रहर आहे निदान..."
अप्पांना हुंदका आला. कल्याणने इथं थांबलो तर निघताच येणार नाही म्हणून घाईत उठला व अंगणात येत बाईकला किक मारली. बाईक स्टार्ट होताच त्यानं माग वळत पाहिलं. अप्पा कमानीस धरत डोळे पुसत होते. कल्याणच्या डबडबत्या नेत्रात कल्याणी उभी राहत हात हलवतेय असाच भास झाला. तो निघाला व अप्पांनी द्वारकाकडं पाहत " गेला माझा कल्याण बाबा!" म्हणत देवळीतच बसत टाहो फोडला.
झब्बूनं दुपार पर्यंत सारं सामान पॅक केलं. दुपारी त्यानं स्वयंपाक केलाच नाही. तसाच ओसरीवर खाट टाकत धाब्याकडं पाहत आसवं गाळत राहिला. एक दिड वर्षात त्याला त्याच्या कल्याण बाबानं कशाचीच उणीव भासू दिली नाही.त्याला माणसात आणत गावात मानाचं स्थान मिळवून दिलं. ज्या माडीत जन्मापासून देवळी चढायची हिम्मत नव्हती त्या माडीत प्रवेश करवून नाती निर्माण करून दिली. तो रात्री ही पाणी पिऊनच झोपला. एका मुलाला बोलवत त्यानं पत्त्याची चिठ्ठी लिहून घेतली.
सकाळी टेम्पो भरून तो चिखलीस निघाला. निघतांनाच त्यानं गाव पंढरीची माती कपाळाला लावत आता बोरवणात परतणे नाहीच हा निश्चय पक्का केला.
चिखलीत दोन दिवस राहत माईच्या हातचं मायेचं जेवण करत तो राहिला. पण परतायची वेळ आली तसा तो बैचेन होऊ लागला. त्याला वाटे बाबा एक शब्द जरी बोलला तरी येथून हलायचं नाही. अन्यथा परतीच्या वाटेवरच.....
तर कल्याणला वाटे की झब्बू गाव सोडून इथं राहणार नाही.
सकाळी झब्बू परतू लागला तसं माईनं जेवण करून दुपारी जायला सांगितलं. झब्बू टवटवीत झाला.
कल्याणनं त्याच्या हातात पासबुक देत बॅगेत ठेवायला लावलं.
झब्बूनं ते हातात घेत " बाबा कुणास देऊ हे नी मी आता कसं देणार..?" तोच त्यानं जीभ चावली.पण कल्याणच्या लक्षात आलं नाही.
" झब्बू कुणालाच नाही द्यायचं ते! ते तुझं कंजार शाखेचं पासबुक आहे. मागे तुझ्या नावाचं अकाऊंट काढलं होतं त्याचं!"
झब्बुला बाबा बाईकवर बसवून कंजारला फोटो काढत बॅंकेत घेऊन गेल्याचं आठवलं.
" याचं काय मग?"
" बघ तुझा दर महिन्याचा पगार मी खात्यावर जमा करत होतो. तू कंपाऊंडर होतास ना माझा! पंचवीस हजाराच्या आसपास रक्कम आहे. ती तशीच बॅंकेत पडू दे. गरज असेल तर नी तेवढेच काढत जा!"
झब्बूला बाबा आपणास दोन वेळचं जेवण देतो यातच खूश होता. त्याला पगाराची आशाच काय पण स्वप्नातही नव्हतं. पंचवीस हजार ऐकताच तो गहिवरला!
" बाबा याचं काय काम मला! मी फकीर माणूस!"
" अरे तुझ्या कामाचे आहेत ते!"
" तरी नको मला! त्यापेक्षा....." पण तो अडखडला.
कल्याणनं जबरीनं त्याच्या बॅगेत पास बुक ठेवलं. बॅग तर झब्बूकडं कधीच पाहिली नव्हती. त्यानं बॅग उघडत आत काय ते उत्सुकतेनं पाहिलं
" बाबा बॅगेत काही नाही म्हणून तो ती बॅग परत घेऊ लागला.
कल्याणला शंका आली.
त्यानं हातात घेत पाहिलं. आत एकाच कागदावर बोरवणचा व चिखलीचा पत्ता लिहीलेला होता व त्यालाच झब्बूचा पासपोर्ट फोटो डकवलेला. कल्याण थरथरला. त्यानं झब्बूला खाडकन कानाखाली वाजवत
" झिपऱ्या लेकाचा! नाही बोरवणला परतायचं होतं तर तुझ्या बाबास एका शब्दानं ही सांगता आलं नाही. एवढा टोकाचा निर्णय?" कल्याण त्याचं छाताड धरत विचारू लागला.
झब्बू रडतच " बाबा ज्या गावात माझा बाबा नाही , ताई नाही त्या गावात परतून मी काय करू? त्यापेक्षा.........."
" अरे पण जिवाची काशी करण्याचा विचार आणतांना माझा विचार आला नाही का तुला? झब्ब्या तू आता कुठंच जाणार नाही!" कल्याण त्याला उठवत जवळ घेत म्हणाला. नी झब्बू चिखलीतच थांबला
कल्याणनं झब्बूस माईजवळ ठेवलं व तो मुंबई ला मास्टर डिग्री साठी रवाना झाला.
कल्याणनं बोरवण सोडलं नी त्यानंतर पाच सहा महिन्यांनीच....लग्नाला एक वर्ष होत नाही तोच सुरेंद्रराव सिमेवर शहीद झाले नी कल्याणी सुन्या कपाळानं बोरवणला परतली. या वर्षभरात कल्याणीनं काय सोसलं व बोरवणला आल्यावर भविष्यात काय वाढून ठेवलंय याची कुणाला खबर होती.
.
.मागील एका वर्षातील तिनं सोसलेला दाह, जाळ......!
नको अलक्षा!
कुणाच्याही प्रारब्धात सटवाईनं असला टाक लिहीणं!
.
. क्रमशः

✒वा......पा.....
नंदुरबार.
8275314774.
नंदुरबार.
8275314774.