माझा भाऊ आला नसता तर....
लेखक:- अंकुश सू. नवघरे. (पालघर)
(ज्योतिष विशारद)
पुनः प्रकाशन:- दि. ११.०३.२०१९
©Ankush S. Navghare ®२०१९
(ह्या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत)

नमस्कार मित्रांनो....
साधारणतः २० वर्षांपूर्वी हा मला आलेला एक अनुभव आहे. माझे गाव समुद्र किनारी असल्याने सुट्टीत आजोळी गेल्यावर संध्याकाळी समुद्रावर फिरणे, मातीचे किल्ले बनविणे, शंख शिंपले शोधणे हे माझे ठरलेले उद्योग असायचे. आमच्या गावात समुद्र असल्याने आणि गाव खूप मोठे नसल्याने वेगळी स्मशानभूमी नसून समुद्रावरच जरा वस्तीपासून लांब प्रेते जाळली जातात. समुद्र किनाऱ्यावर त्या बाजूला सहसा कोणीच जात नाही. आमच्या गावाच्या समुद्रकिनाऱ्या ला लागून असलेली सर्व म्हणजे साधारणतः १०० एकर जमीन ही एक प्रसिद्ध अभिनेत्री ह्यांनी घेऊन त्यावर फार्महौस बांधले आहे. त्याच प्रमाणे पूर्ण जमिनीच्या कंपाउंड ला सुरुची झाडे लावल्याने गाव आणि समुद्र किनारा ह्यात एक प्रकारचे पार्टिशन तयार झाले आहे. इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे काहीच दिसत नसल्याने तो भाग अजूनच निर्जन झाला होता.
असेच एके दिवशी मी आणि माझा मोठा आतेभाऊ आम्ही दोघे समुद्रकिनारी फिरायला गेलो होतो. फिरत फिरत गोष्टी करत करत आम्ही कधी त्या बाजूला दूरवर निघून आलो ते आम्हाला कळलेच नाही. माझा भाऊ मला म्हणाला अरे चल लवकर आपल्याला परत निघायला हवय आपण खूप दूरवर निघून आलोय, इकडे जास्त कोणी येत नाही आणि आता अंधार पण पडायला सुरुवात झालीय. त्यावेळी मला त्या जागेबद्दल जास्त काहीच माहित नसल्याने मी विचारले कारे काय झालं ? थांबुया अजून थोडा वेळ काय होतंय. त्यावर तो म्हणाला काही नाही रे पण जायला पाहिजे आता.
आम्ही निघालोच होतो इतक्यात माझ्या भावाच्या पोटात दुखायला लागलं. म्हणून तो म्हणाला की अरे माझ्या पोटात खूप दुखायला लागलाय मी जरा २ ला जाऊन येतो. तू इकडेच थांब कुठे जाऊ नकोस मी लगेच येतो. असे म्हणून तो पाण्याच्या दिशेने जाऊ लागला तेवढ्यात त्या काय आठवलं कोण जाणे तो परत आला आणि म्हणाला की मी जरी लवकर नाही आलो तरी घाबरू नकोस आणि मला नावाने हाक मारू नकोस आणि मी पण तुला नावाने हाक मारणार नाही. असे म्हणून तो निघून गेला आणि जाऊन बसला. लांब वर त्याची आकृती दिसत होती पण जसजसा सूर्य मवाळू लागला तशी आकृती अंधुक होऊ लागली. काहीवेळाने एकदम अंधारल्यासारखे झाले पण तसे दिसत होते. सूर्य क्षितिजाला लागल्यावर कधी अंधार पडतो काही कळत नाही.
१५ मिनिटे झाली असतील तेवढ्यात मला चाहूल लागली की माझ्या दिशेने कोणीतरी येत आहे. म्हणून मी वळून पाहिले तर मला दिसले की कोणीतरी माझ्याच दिशेने येत होते आणि त्याची उंची साधारणतः माझ्या भावाइतकीच होती. तेवढ्यात तो चालता चालता माझ्यापासून जरा लांब येऊन थांबला. अंधुक प्रकाश असल्याने मला त्याचा चेहरा नीट दिसत नव्हता. म्हणून मी त्याच्याकडे जायचं ठरवलं तेवढ्यात मला माझ्या भावाचे शब्द आठवले की इथेच थांब मी येतो म्हणून मी थांबलो. तो पण तिकडेच थांबला होता आणि जसकाही माझ्याच येण्याची वाट पहात होता. मी येत नाही हे बघून तो मला हाक मारत म्हणाला की अरे अंकुश चल काय करतोयस, कोणाची वाट पाहातोयस. तो आवाज माझ्या भावाचाच होता. मला खूप बर वाटलं कारण अंधार पडला होता, मी एकटाच होतो आणि जरा घाबरलो पण होतो. तो परत म्हणाला अरे चल की उशीर होतोय! ते ऐकून मी त्याच्या दिशेने झपाझप चालू लागलो आणि ६ पावलं पुढे गेलो असेल नसेल तेवढ्यात माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला आणि मला मागे खेचलं. त्या अनपेक्षित स्पर्शाने माझ्या सर्वांगातून एक थंड शीरशीरी सारखी गेली. मी थांबलो आणि मागे वळून पाहिले तर माझा भाऊ माझ्या मागे उभा होता आणि म्हणाला काय ये कुठे निघालास इतक्या घाईने? सांगितलेलं ना तुला कि माझी वाट बघ अस! मी त्याला पाहून थंबकलोच आणि प्रश्नार्थक नजरेने त्याला पाहू लागलो. तो मला बोलला की अस काय पाहातोयस माझ्याकडे. तेव्हा मी त्याला म्हटलं की अरे तू तर तिकडे समोर होतास ना? आणि मला हाक पण मारलीस म्हणून मी निघालेलो तुझ्याच कडे यायला असे म्हणून मी वळून त्या दिशेकडे बोट दाखवू लागलो तितक्यात तिकडून विचत्र हसण्याचा आवाज आला आणि मित्रांनो तुम्ही विश्वास नाही करणार पण ती व्यक्ती कि जो कोण होता तो जोरात धावत सुटला आणि अंधारात दिसेनासा झाला. तो इतका जोरात धावला असेल की कोणी सामान्य माणूस इतक्या झटकन धाउच शकणार नाही.
ते दृश्य मी आणि माझा भाऊ टक लावून पहात होते. आमच्या डोळ्यांची पापणी लवते ना लवते इतक्या कमी वेळात तो नाहीसा झाला होता. ते सर्व पाहून मी अजूनच घाबरलो होतो. मी माझ्या भावाला काही विचारणार इतक्यात तो म्हणाला जय श्री राम आणि तू पण आता हेच बोल. घरी पोहोचल्यावर काय विचारायचे असेल ते विचार आपल्याला लवकरात लवकर निघायला हवं. असे म्हणू आम्ही राम राम करत कसेबसे वस्तीकडे आलो तेव्हा कुठे माझ्या भावाच्या जीवात जीव आला. तो काहीच बोलला नाही आणि मी पण काहीच बोललो नाही. आमच्या दोघांच्याही डोळ्यातली भीतीच सर्वकाही सांगून जात होती. घरी पोहोचल्यावर त्याने आजीला माझी दृष्ट काढायला सांगितली त्यानंतर माझी भीती जराशी कमी झाली तसे तो म्हणाला की नशीब मी वेळेवर आलो नाहीतर काय झाले असते काय माहित.
तो प्रकार काय होता ते मला नंतर कळले पण आत्ता त्याचे नाव मी इथे लिहीत नाहीय पण खरं सांगू का, कि आज इतक्या वर्षांनंतर पण मला ही स्टोरी लिहिताना राहून राहून मनात एकच विचार येत होता की जर त्यावेळी माझा भाऊ आला नसता तर....
धन्यवाद...
अंकुश सू. नवघरे.