पायवाट भाग: पहिला
अज्ञात पायवाट ही अद्भुत असते. ती तुम्हाला तुमच्या गंतव्याकडे घेऊन जाते किंवा काही अनाकलनीय दाखवू शकते. पण हीच पायवाट तुम्ही चाललेली शेवटची वाट ही असू शकते.
साल: 1851
स्थळ: सह्याद्रीच्या खोर्यातल एक छोटस गाव

उकाड्याचे दिवस होते. संभाजीराव घोरपडे आणि त्यांचे पुत्र, धनाजी घोरपडे, आपल्या कन्येला सासुरवाडीला सोडून परत आपल्या गावी चालले होते. तस निघायला जरा उशीरच झाला होता म्हणा. व्याहीनीं नको म्हंटल तरी ही 'वाईच जेऊन चला' म्हणुन आग्रह धरला होता, तो संभाजीरावांना मोडता नाही आला. "तात्या, त्ये पाव्हन लईच आग्रीव केल्यात नव्ह? उगाच सांच्या वक्ताला भाईर पडाय नग व्हत." धनाजीनी बैलांना नाजुक फटका मारत आपली काळजी बोलून दाखवली. "आर, पण पोरीच मन मोडविना मला. उगा आपुन बापाला अन् भावाला दुपारच्या वक्ताला उपाशी पोटी पाटिवनार म्हण रडाल्ती पोर माजी." संभाजीराव आपल्या राखाड्या पण वजनदार आवाजात नकळत जमेल तेवढा प्रेमभाव आणून बोलले. ऊन आता उतरत आल होत पण उन्हाची रखरख काही कमी होत नव्हती. त्यांच गाव अजून अर्धा दिवस लांब होत. अचानक कुठूनतरी काळे ढग जमा होऊन सोसाट्याचा वारा सुटला. काही वेळानी पावसाचे टपोरे थेंब त्यांच्या अंगावर काट्या सारखे टोचू लागले.
"आता ह्यो वस्साड मेला पौस कुठन आला?" धनाजी आपल्या तोंडावर हाताची छत्री करत म्हणाला.
"आर, वळवाचा पौस हाय त्यो. थांबल लगीच."
"तात्या, कुठ झाडाखाली थांबायचं का?"
"आर धन्या, थांबतोस कुठ? चल बीगी बीगी. थांबल त्यो लगीच." तात्या म्हणाले.
पण पाऊस थांबायची काही लक्षण दिसत नव्हती. ते बघून नाईलाजाने तात्यांनी गाडी एका खोपिकडे घ्यायला सांगितली. बर्याच वेळानी पाऊस थांबला. ढग सरल्यावर त्यांचा लक्षात आल की आता सूर्य पण उतरणीला आला होता. आता बाकीचा प्रवास रात्रीच्या अंधारात करावा लागणार होता. त्यांनी रात्र व्हायच्या आत परत येऊ, ह्या निर्धाराने घर सोडल होत, म्हणुन त्यांनी कंदीलही घेतला नव्हता. नियतीचा खेळ काही वेगळाच होता.

नुकताच काळोख व्हायला सुरुवात झाली होती. दोनही बाजूंना घनदाट जंगल. धनाजी सावकाश गाडी हाकत होता. हा रस्ता जरी ओळखीचा असला तरीही रात्रीच्या वेळी सावधगिरी बाळगलेली बरी ह्या विचाराने तो चालला होता. तात्यांन बरोबर गप्पा मारता मारता त्याला दूर कोणी तरी कंदील हलवत त्यांना आपली जाणीव करून देत होता.
"तात्या, समोर कोंतरी दिवटी घेऊन उबा हाय. आमास्नी बोलीवतोय वाटत."
"साम्बाळुन र धन्या!" तात्यांनी त्याला सावध केल. धनाजीने लांबूनच डोळे बारीक करून करून त्याच्याकडे बघीतले. अंधारात एवढ्या लांबून काय धड दिसेना. तरी ही काही काळ-बोर नसल्याची मनाला खात्री करून देऊन गाडी त्याच्या जवळ उभी केली. अंगांनी किडकिडीत, फाटकी बंडी, गुडघ्यापर्यंतच मळकट धोतर आणि डोक्याला फाटक लुगड बांधलेला तो इसम होता.
"पावन कंच्या गावच म्हनायच?" धनाजीनी चौकशीच्या स्वरात विचारल.
"हिगडच पल्याडल्या गावात जायाच हुत मालक. लई मेहरबानी व्हईल तिथपतुर सोडलासा तर." त्याने वाकून हात जोडून विनवणी केली.
तात्या म्हणाले, "नाव काय तुझ?"
"मला हनम्या म्हणत्यात मालक." तो एकदम दारुण आवाजत बोलला.
"मगासच्या पौसात भिजला कसा नाईस?" तात्यांनी आपले डोळे बारीक करत त्याला न्याहाळला.
"इकडल्या रानात खोप हाय माजी. तीगडच हूतो. म्हनतान कोरडा हाय मालक."
"मग रातच्याला र्हायच नाय काय खोपीत?"
"घरात बायको पोटुशी हाय मालक. रातच्याला गरज पडली तर गडी माणूस पायजे की घरात."
"बर. बैस गाडीत. कुठ हाय तुझा गाव?"
"हेऽऽ हीतच. पल्याडल्या अंगाला." हनम्याने हातवारे करून आपल्या गावची दिशा दाखवली. काही वेळा पूर्वी पावसाने भरून आलेल आभाळ आता मोकळ झाल होत. पौर्णिमेचा चंद्र आपली भूमिका नीट पार पाडत होता. जंगल चांदण्यात न्हाऊन गेल होत. हनम्याकडच्या कंदिल रस्त्यावर बर्यापैकी उजेड पाडत होता. पण, घनदाट जंगल असून सुद्धा एकही पाखराचा किंवा जनावराचा आवाज नव्हता हे तात्यांचा मनात खटकत होत. पण तस काही वावग जाणवत नव्हत म्हणुन ते गप्प होते.

"हे इथून पुढ डाव्या आंगाला पायवाट आत गेल्या बघा. तिथून आत घ्या मालक." हनम्याने विनंती केली.
"तुला सोडतो हीथ. चालत जा की मर्दा!" तात्यांना उगाच जोखिम घ्यायची सवय न्हवती.
"मालक, वाईच सोडा की आतपतुर मालक. वाटत काय सावज आंगाव आल म्हंजी? जीव कुणाला नको झालाय का मालक?" हनम्या परत हात जोडून विनवण्या करू लागला. तात्यांना आत जायच म्हणजे धोक्याचे ठरू शकेल ह्याची कुणकुण होती, पण त्या गरीब माणसाला रस्त्यात टाकून जाण त्यांना चुकीच वाटत होत. त्यांनी धनाजीला गाडी आत घ्यायला लावली. गाडी वळवताच दोन्ही जनावर गाडीला गचके देऊ लागली. ती त्या दिशेला काही केल्या जायला बघत नव्हती. मानेला गचके देत आपल्या शिंगांनी दाव तोडायचा प्रयत्न करत होती. धनाजीने दाबून त्यांना डाव्या दिशेला वळवल. पायवाट जरा अरुंदच होती. पावसामुळे थोडा चिखल साचलेला. दुतर्फी दाट झाडी रस्त्यावर छप्परा सारखी उतरली होती. त्यामुळे चंद्राचा उजेड रस्ता दाखवत नव्हता. फक्त कंदिलाच्या उजेडात धनाजी बैल हाकत होता.
"तात्या, ही पायवाट कधी बघितल्यागत वाटत नाय व. तुम्हास्नी याद हाय काय ही वाट?" धनाजीने शंका वर्तविली.
"न्हाय रे धन्या, मला बी काय आठवना झालय. ह्याला सोडून लगेच परतीची वाट धरूया." तात्या हळूच धनाजी जवळ जाऊन त्याला सांगितल. आता फक्त बैलगाडीचा आवाज येत होता. बाकी सगळी स्मशान शांतता.
काहीवेळ पुढे गेल्यानंतर कोणीतरी ढोल बडवत असल्याचा त्यांना आवाज आला. बाप लेक दोघांचे कान टवकारले. त्या ढोलच्या आवाजात संमोहित करणारी जादू होती. त्या दोघांना कशाची तरी अनामिक भीती वाटत होती. "ह्यो कसला आवाज र हनम्या?" तात्यांनी विचारल. हनम्या म्हणाला," आमच्या गावात्न येतुया आवाज. गावच्या देवळात धनगराची प्वारं ढोल बडवीत बसत्याता. त्येच असतील." तरीही तात्यांच्या मनातली भीती काही केल्या जात नव्हती. आता गाव दिसत होत. गाव कसला, नुसतीच 10-15 घर होती. पण ते देऊळ दिसत नव्हत. पुढे जाऊन हनम्याने गाडी थांबवायला सांगितली. "घर आल माझ. घरला या की मालक. रातच्याला राहून सकाळी जावा म्हनसा." त्याने विचारले.
"नग, सकाळी काम हाईती. जातो आमी." अस म्हणत धनाजी ने गाडी वळवणार तेवढ्यात हनम्या म्हणाला, "हे असच पुढ घ्या गाडी. लवकर जाशीला तुमच्या गावाला." अस म्हणत हनम्या आपल्या घराकडे निघाला. ना नमस्कार ना राम राम. तसाच गेला. मागे वळूनही पाहिल नाही. का कुणास ठाऊक. धनाजीने हनम्याची आज्ञा मानत गाडी तशीच पुढे नेली. तात्या ही काही बोलू शकले नाही. त्यांचे चेहरे अचानक स्तब्ध झाले होते. अचानक दोघेही कसल्यातरी मोहिनीत जखडकले गेले होते. धनाजी तसाच बैलं हाकत पुढे जात होता. त्यांना ऐकू येत होता तो फक्त ढोल. एक नाही, तर अगणित ढोल. पुढच्या वाटेवर रस्त्याच्या दुतर्फा गावातील पुरुष हातात मशाली घेऊन उभे होते. सगळ्यांच्या डोळ्यांवर झापड बांधलेली होती त्यात हनम्या ही होता. त्या मशालीची आग लाल पिवळी नव्हती, काळी निळी होती. मशालीच्या उजेडात ही कोणाचीच सावली दिसत नव्हती. संभाजीराव आणि धनाजी ह्यांना हे सगळ काहीच दिसत नव्हत. फक्त ते ढोल आणि त्यांचा आवाज, एवढच त्यांना कळत होत. ढोलचे पडघम त्यांना काही तरी सांगत होते. त्या दोघांना 'ते तिघ' बोलवत होते. ढोल बडवत होते. बाप लेक देवळाकडे येऊन पोहोचले. 'ते तिघे' बाहेर उभे होते. त्या दोघांना बघून 'त्या तिघानी' ढोल बडवन बंद केल. सगळीकडे भयाण शांतता झाली. ढोल खाली ठेवला. उलटे हाथ जोडून तिथेच त्रिकोणाच्या आकारातल्या एका आकृतीत बसले. ढोलचा आवाज बंद होताच बाप लेकाची तंद्री मोडली. त्यांना कळेना आपण कुठे आलो आहोत. सगळी कडे मिट्ट काळोख. शुद्ध आली तेव्हा लोकांच्या मशाली दिसल्या. त्यांनी 'त्या तिघांकडे' बघितल. पाठमोरे करून बसलेली ती माणस कोण होती हे बघताच त्यांना प्रचंड धक्का बसला. संभाजी तर छाती धरून थरथरायला लागले.

क्रमशः
लेखक: © विनय चव्हाण