सहाव्या भागाची लिंक 👇👇
सोनगावचा_मास्तर - भाग सात (अंतिम)
दूसर्या दिवशी सकाळी श्रीधरची शाळेत निघण्याची तयारी पुर्ण झाली होती होती, त्याने भिंतीवरच्या चौकोनी आरशामध्ये पाहुन कपाळावर अष्ठगंधाचा ठिपका लावला, तेवढ्यात दररोजच्या प्रमाणे 'शेवंता' गरम जेवणाचा डबा घेऊन श्रीधरच्या घरात हजर झाली.💁
"मगं मास्तर, कसं काय वाटलं तुम्हाला माझं कालच नाटक.. मस्त जमलं का नाही" डबा देत तिने श्रीधरला विचारले.
"मगं मास्तर, कसं काय वाटलं तुम्हाला माझं कालच नाटक.. मस्त जमलं का नाही" डबा देत तिने श्रीधरला विचारले.
"छानच होत की..पण नक्की नाटकच करत होतीस ना तु? कारण तुझ्याकडे पाहून तसं वाटलं नाही मला" श्रीधर थोडासा नाराजीनेच बोलला.
"आता बयां..तुम्ही जसं सांगितलं तसच समदं केलं की मी,
तशीपण मी कुठं तयार होते असलं भलतं सोंग करायला.. पण तुम्ही म्हणाले ह्या नाटकाचे पंधरा रूपये देतो, म्हणून मी तयार झाले..
पण तुम्हाला एक सांगू का? तुम्ही सांगितलं तरी मला हे खरं वाटतच नव्हतं की, रघुला देसाई गुरुजीची भुतबाधा झाली असलं म्हणून.. पण काल समदं पाहिलं आणी मगंच माझा विश्र्वास बसला..मग कधी देताय माझे पंधरा रूपये??"

"हंम्म..अगं देईल की नंतर, पगार तर होऊ दे आधी"
"बरं ते जाऊ द्या.. पण काल मला रघुसोबत तसल्या अवस्थेमंदी पाहुन तुम्हाला एवढा राग कसा आला हो? नाही म्हणजे ते पण तुमचं नाटकच होतं का दुसरचं काही..कारण तुमच्या डोळ्यात मला वेगळंच काहीतरी दिसत होतं"
शेवंताने श्रीधरच्या डोळ्यात रोखून पाहत विचारले..
शेवंताने श्रीधरच्या डोळ्यात रोखून पाहत विचारले..
"दुसरच काही म्हणजे? काय दिसत होतं तुला?"
"माझ्यावरलं तुमचं प्रेम."
"प्रेम? छे..प्रेम बिम फक्त कथा कहाण्यांमध्ये असते"
श्रीधरने नजर चोरत उत्तर दिले.
"माझ्यावरलं तुमचं प्रेम."
"प्रेम? छे..प्रेम बिम फक्त कथा कहाण्यांमध्ये असते"
श्रीधरने नजर चोरत उत्तर दिले.
"बरं, लई दिवस झाले पण तुम्हांला एक इचारायच होत, आज इचारु का मास्तर? तुम्ही आजवर लग्न का नाही केलं हो?"
शेवंताचा प्रश्र्न ऐकून श्रीधर काहीवेळ शांतच बसला, त्याचे मन त्याच्या भुतकाळात फिरत होते..
शेवंताचा प्रश्र्न ऐकून श्रीधर काहीवेळ शांतच बसला, त्याचे मन त्याच्या भुतकाळात फिरत होते..
"खरं सांगू? आजवर माझी लग्नाची इच्छाच झाली नाही शेवंता..माझे आई आणी बाबा दोघेही मी लहान असतानाच देवाघरी गेले होते..माझे बालपण माझ्या काकांच्या घरी गेले..शेतीमधील कामे करता करता शाळा शिकलो.. शिकण्याची आवड होती पण पैशामुळे काका मॅट्रिकच्या पुढे शिकवायला तयार नव्हते.. म्हणून मग गावच्या आठवडी बाजारात भाजी-फळे विकून त्या पैशातून पुढचे शिक्षण पुर्ण केले..आमच्याच गावातल्या शाळेत काही वर्षे मास्तरची नोकरी पण केली..लग्नाचे वय झाले होते पण माझ्या काकांनीही कधी माझ्या लग्नाचे मनावर घेतले नाही, आणी मला स्वतालाही कोणी तसे आवडले नाही म्हणून मी पण प्रयत्न केला नाही..असेच राहता राहता शेवटी राहुनच गेलं बघ" श्रीधरने थोडक्यात त्याचा जीवनपट मांडला होता..
"कशी बायको पायजेल तुम्हाला? तुमच्यासारखीच शिकलेली, सवरलेली पायजे? का माझ्यासारखी अडाणी पण चाललं"
शेवंताने मुद्द्याला हात घातला.
शेवंताने मुद्द्याला हात घातला.
"तु? तु.. तशी दिसायला चांगलीच आहेस की..तुझ्या हातचे जेवण पण उत्तमच...पण..पण तुझे चारित्र्य? मी शाळेचा मास्तर आहे शेवंता, लोकं काय म्हणतील मला?"
"लोकं तुम्हाला दोन वेळेला खायला देणार आहेत का?"
"ते सर्व ठिक आहे पण..पैशासाठी तु देसाई गुरुजी सोबत संबंध.." श्रीधर अडखळत म्हणाला,
" हो.. पैशासाठी मी देसाई सोबत प्रेमाचे नाटक केले हे खरं आहे.. माझ्या व्यसनी नवर्याच्या जाचाला कंटाळून मी लग्नानंतर च्या सहा महिन्यांतच परत माहेरी आले, हे सुद्धा खरं आहे..माझ्या घरी दिवसभर गावात उनाडक्या करत फिरणारा एक लहान भाऊ आणी कायमचं आजारी असणारे आमचे म्हातारे आबा हे दोघंच असतात..माझं घर चालवण्यासाठी आणी आबाच्या औषधांच्या खर्च्यासाठी मी सरपंचाच्या वाड्यावर घरकाम करते, पण मिळणार्या कमी पैशात माझं घर चालत नव्हते म्हणून मी नाईलाजाने पैशांसाठी देसाई सोबत संबंध ठेवले..
तुम्ही इथं नवीन राहायला आले होते, तेव्हा मी तुमच्या सोबत पण तेच करणार होते जे देसाई सोबत केलं..पण तुमचा स्वभाव वेगळा होता, मी अनेकदा प्रयत्न केले पण, तुम्ही मला कधी तसल्या नजरेने पाहिलंच नाही, हळूहळू मी तुमच्या स्वभावाच्या प्रेमात पडत गेले..सकाळ असो कि रात्र कधीच तुमचा जेवणाचा डबा चुकवला नाही, ज्यादिवशी तुमचा उपवास असेल त्यादिवशी मी पण उपवास धरू लागले, कारण तुम्ही उपाशीपोटी असताना मला कधी जेवणाचा घासच गेला नाही..मी तुमच्या सारखी शिकलेली नाही मास्तर, मी तुमच्यासाठी योग्य आहे का नाही, ते मला माहित नाही, पण गेल्या अनेक दिवसांपासून मी तुम्हालाच पतीच्या रुपात पाहायला लागले आहे"

न थांबता शेवंता भरभर बोलत असली तरी तिचे एक एक वाक्य हे मनापासून होते हे श्रीधरला समजले, आणी आता तिला नकार देण्यासाठी किमान त्याच्याकडे तरी काही कारणही उरले नव्हते..
"ठिक आहे शेवंता, पण माझीपण एक अट आहे..आपला संसार तु काटकसरीने करणार असशील आणी माझ्याकडे सारखे सारखे पैसे मागणार नसशील तरच माझी तयारी आहे..,आणी हां..आणखी एक म्हणजे, तुला दररोज तुझ्या केसांमध्ये सुगंधी फुलांचा गजरा घालावा लागेल"
हसत हसत श्रीधर म्हणाला.👩❤️👨
हसत हसत श्रीधर म्हणाला.👩❤️👨
त्याचा होकार ऐकून शेवंता आनंदाने त्याला बिलगली, श्रीधरनेही तिच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला नाही, उलट आपोआपच त्याचा उजवा हात अलगदपणे तिच्या पाठीवर येवून स्थिरावला.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
त्यादिवशी श्रीधरच्या घरामध्ये घडलेल्या भीषण प्रसंगापासून दोन दिवस रघू अंथरूणावर खिळलेला होता, नंतरच्या आठवडाभरात तो हळूहळू बरा झाला..पण जेव्हा त्याच्या आईने त्याला शाळेत जायला सांगितले तेव्हा त्याने स्पष्टपणे नकार दिला, उलट "मी आता कधीच शाळेत जाणार नाही" असे निक्षुन सांगितले.
आईला त्याचे भुतबाधेच प्रकरण समजले असल्याने तिने त्याला शाळेसाठी जबरदस्ती केली नाही..आणी तिला जे काही समजले होते, ते पण त्याला जाणवू दिले नाही..
ती दिवसा शेतात कामाला जायची पण रघू दिवसभर घरीच राहायचा, शेजारी पाजार्यांच्या घरी जायचा..त्याच्या शारीरिक अपंगत्वामुळे त्याला मित्रांसोबत खेळता येत नसले तरी कसाबसा खेळण्याचा प्रयत्न करायचा.. पण शाळेमध्ये जाण्याचे नाव काही केल्या काढत नव्हता..

दरम्यान काही दिवस गेले आणी रघुची शारीरिक व्याधी जास्तच बळावली असल्याचे त्याच्या आईच्या ध्यानात आले.. त्याचा चेहरा आता दिवसेंदिवस जास्तच विद्रुप बनत चालला होता, तसेच तो आधीपेक्षा खूप चिडखोर आणी हेकेखोर बनत चालला होता, तो आता रात्र रात्र भर न झोपता डोळे वासून अंथरूणावर बसुन राहायचा..एके दिवशी तर खेळणार्या मुलांनी त्याला चिडवल्याने त्याने गावातील पाच मुलांना मारुन मारुन पार रक्तबंबाळ जखमी केले होते..
गावामध्ये त्यांच्याविषयी वेगवेगळ्या चर्चाही चालू झालेल्या होत्या..त्याची ही अवस्था पाहून रघुच्या आईला अन्नपाणी गोड लागत नव्हती..
गावामध्ये त्यांच्याविषयी वेगवेगळ्या चर्चाही चालू झालेल्या होत्या..त्याची ही अवस्था पाहून रघुच्या आईला अन्नपाणी गोड लागत नव्हती..
एकेदिवशी रघुविषयी ही सर्व माहिती रघुच्या आईने शेतात जाताजाता शाळेत जावून श्रीधरची भेट घेवून त्याला सांगितली..रघुच्या आईची चिंता वाढत चालली होती आणी ती एक शेवटचा आशेचा किरण म्हणून श्रीधर आणी शंभुकडे पाहत होती.
संध्याकाळी श्रीधरने मारुती मंदीरामध्ये जावून शंभुची भेट घेतली आणी रघुबाबतचा सर्व वृत्तांत त्यांना सांगितला, तसेच आपल्याला लवकरात लवकर यावर उपाययोजना केली पाहिजे असेही सांगितले, शंभूने काहीवेळ गंभीरपणे विचार केला..
"म्हणजे आता रघुला वाचवण्यासाठी आपला शेवटचा उपाय करून पाहण्याची वेळ आलेली आहे तर..सध्या ग्रहमानही त्यासाठी अनूकूल आहे, पण त्यासाठी आपल्याला ज्या स्मशानामध्ये देसाईचा अंत्यसंस्कार झालेला होता त्या स्मशानातली दोन मुठभरून चिता भस्म (राख) लागेल..त्या भस्मामध्ये देसाईंच्या शरीराचा किंचीत तरी अंश राहिला असेलच, त्याकडे तो नक्कीच आकर्षित होईल",☠️

"ते काम मी करतो महाराज, मला माहित आहे ते ठिकाण" श्रीधरने ते काम अंगावर घेतले..त्यानंतर शंभू आणी श्रीधर दोघांनी मिळून बारकाईने पुढील योजने संदर्भात चर्चा केली..
दूसर्या दिवशी रघुची आई श्रीधरला शाळेत भेटण्यासाठी आल्यानंतर श्रीधरने तिलाही आवश्यक त्या सर्व सुचना दिल्या..
शंभूने श्रीधरला जे काम सांगितले होते ते पुर्ण करण्यासाठी त्याला पुन्हा एकदा सारंगपुरला जायला लागणार होते, कारण देसाईंच्या पार्थिवाचा अंत्यसंस्कार तेथेच झाला होता..
शंभूने श्रीधरला जे काम सांगितले होते ते पुर्ण करण्यासाठी त्याला पुन्हा एकदा सारंगपुरला जायला लागणार होते, कारण देसाईंच्या पार्थिवाचा अंत्यसंस्कार तेथेच झाला होता..
श्रीधरने सरपंचांची भेट घेतली आणी ह्यावेळी खरे कारण सांगुन त्यांची नवीन सायकल ताब्यात घेतली.. दूसर्या दिवशी शाळेला रजा टाकून पहाटेच तो सारंगपुरच्या दिशेने निघाला, ह्यावेळी त्याला पुर्ण रस्ता माहित असल्याने कुठेही विनाकारण थांबण्याची गरज पडली नाही..मजल दर मजल करत तो सांरगपुरला पोहोचला आणी तेथील गावाबाहेरच्या स्मशानातून चिता पेटवण्याची जागा पाहून त्यातून दोन मुठी राख खरवडून काढत पिशवीत भरून पुन्हा लगेचच सायकलवर टांग टाकून त्या रात्री सोनगावला परत माघारी आला.🚴
स्मशानातील राखेसारखी अपवित्र वस्तु मंदीरात नको म्हणून दूसर्या दिवशी श्रीधर ती राख घेवून शंभूला भेटण्यासाठी त्याच्याच सुचनेनुसार ओढ्याच्या काठी गेला.. तेथे शंभुने एक वितभर उंचीची जाडसर काळया कपड्याची मानवाकृती बाहुली शिवलेली होती,आतमध्ये सर्व कापुस भरलेला होता.. त्याने त्या बाहुलीचे मुंडके बाजूला सारून आतला थोडा कापुस बाहेर काढून श्रीधरने आणलेली राख त्या बाहुलीमध्ये ओतली आणी पुन्हा तिचे मुंडके शिवून टाकले..
इकडे रघुची आई दररोज येणार्या शेजार्या पाजार्यांच्या तक्रारी आणी टोमण्यांमुळे हैराण झालेली होती, ती त्या दिवशी डोळ्यात पाणी आणून रघुला म्हणाली,
"मी तर हात टेकले बाबा तुझ्यापुढं, शाळांत जात नाहीस, चार चार दिस अंघोळ करत नाहीस, रात्री तर तुला झोप लागतच नाही कधी.. खेळायला गेला तर पोरांनाच रक्त निघेपर्यंत हाणून आलास..एक काम कर तु, माझ्याबरोबर शेतातच चल, काही काम करू नगस, फक्त बरोबर चल माझ्या"

आपल्यामुळे आईला रडताना पाहून रघुला थोडे वाईटच वाटले आणी तो त्याच्या आईसोबत शेतामध्ये जायला तयार झाला..रघुची वडिलोपार्जित शेती ही सरपंचाच्या जमीनी लगतच होती आणी त्यांच्या शेतीला पाणीही सरपंचाच्या त्या मोठ्या विहीरीमधूनच होते..जमीनीत खोलपर्यंत दगडी बांधकाम असलेली आणी बारमाही खोलवर पाणी असलेली ती एक भव्य गोलाकार विहीर होती..
रघु आईसोबत शेतामध्ये तर आला होता पण तिथे त्याचे मन रमत नव्हते, तो आपला झाडांचे उंबर,चिंचा,बोरे पाडून खात खात वेळ घालवत होता.. 🌿आईने दूपारपर्य़त शेतात भरपुर काम केले, आता कडक उन्ह पडले होते..तिने चिंचेच्या झाडाखाली बसलेल्या रघुला आवाज देत बोलावून घेतले..
"चल बाबा रघु, उन्ह वाढलंय..विहीरीवर जावून हात पाय धुवून, जेवण करून घेवू..अजून बरंच रान खुरपायचय मला" असे बोलून ती रघुला घेवून सरपंचाच्या विहीरीकडे गेली..
रहाटाच्या दोरीला बांधलेला हंडा विहीरीतील पाण्याने पुर्ण भरून जड झाला होता..तो वर घ्यायला आईला थोडा त्रासच होत होता,
"रघु जरा हात लाव रे..ह्या कामामुळ अन् उन्हामुळ अवसानच राहिल नाही बघं मला" तिने बाजूला उभे असणार्या रघुला विनंती केली..
"रघु जरा हात लाव रे..ह्या कामामुळ अन् उन्हामुळ अवसानच राहिल नाही बघं मला" तिने बाजूला उभे असणार्या रघुला विनंती केली..
रघू तिला मदत करण्यासाठी विहीरीच्या काठाजवळ आला आणी त्याने आईसोबत रहाटाची दोरी वर वर खेचण्यास सुरुवात केली..आईवर विश्र्वास ठेवून तो पुर्णपणे गाफील होता, त्याचे लक्ष त्या विहीरीतून बाहेर येत असणार्या भरलेल्या बादलीकडेच होते.. पण त्याच्या आईची भिरभिरती नजर आजूबाजूला फिरत होती.. कुठूनतरी तिला इशारा मिळाला आणी तिने तिचे मन घट्ट केले..पुढच्या क्षणी एका झटक्यात तिने रहाटाची दोरी सोडून देवून रघुला काहीही समजण्याच्या आत एक जोराचा धक्का देवून त्या मोठ्या विहीरीच्या खोल पाण्यामध्ये ढकलून दिले..
धप्पकन रघुचा पाण्यामध्ये पडलेला आवाज ऐकताच बाजुच्या झुडपामध्ये लपून असणारे शंभू आणी श्रीधर पळतच विहीरीजवळ आले..
"ताई, तुम्ही लवकर ह्या विहीरीपासुन शक्य तितक्या दुर जा, श्रीधर तु काठावरच माझ्या इशार्याच्या तयारीत राहा"
शंभूने घाईघाईने सुचना दिल्या...रघुची आई पदर तोंडाला लावून हुंदके देत तेथून बाजूला गेली..
"ताई, तुम्ही लवकर ह्या विहीरीपासुन शक्य तितक्या दुर जा, श्रीधर तु काठावरच माझ्या इशार्याच्या तयारीत राहा"
शंभूने घाईघाईने सुचना दिल्या...रघुची आई पदर तोंडाला लावून हुंदके देत तेथून बाजूला गेली..
शंभूने 'ती काळी बाहुली' पिशवीतून बाहेर काढून विहीरीच्या काठाजवळ ठेवली, तिच्याशेजारी मंत्रित केलेले काही तळलेले तेलकट छोटे गोळेही ठेवले,आणी तो खाली पाण्यातील गंटागळ्या खात असणार्या रघुकडे बारकाईने पाहु लागला..🥺
हात पाय हलवत पाण्यावर तरंगण्याचा व्यर्थ प्रयत्न करणार्या रघुला त्याचे अपंग आणी अशक्त शरीर साथ देत नव्हते..
नाकातोंडात पाणी शिरलेला रघु गटांगळ्या खात होता, हात वर उचलून मदतीसाठी ह्या दोघांकडे याचना करत होता...पण ते दोघेही त्यांच्या जागेवर स्थिर उभे होते..

काही क्षणातच रघु पुर्णपणे पाण्यामध्ये बुडाला, आणी त्याचक्षणी एक गडद काळी सावली त्याच्या शरीरातून बाहेर पडुन वर काठावर ठेवलेल्या काळ्या बाहुली मध्ये सामावली गेली..
"जय पवनपुत्र महाबली" मंत्रोच्चार करत शंभूने रुईचे पाने तोडून बनवलेला छोटासा हिरवा हार त्या बाहुलीच्या गळ्यात घातला आणी श्रीधरला खुणेनेच इशारा केला..
"जय पवनपुत्र महाबली" मंत्रोच्चार करत शंभूने रुईचे पाने तोडून बनवलेला छोटासा हिरवा हार त्या बाहुलीच्या गळ्यात घातला आणी श्रीधरला खुणेनेच इशारा केला..
श्रीधरने एक दीर्घ श्वास घेवून विहीरीमध्ये जेथे रघु बुडाला होता त्याचठिकाणी पाण्यात एक खोलवर सुर मारला, विहीरीच्या पाण्यामध्ये जावून त्याने डोळे उघडले, विहीरीतील स्वच्छ पाण्यामुळे आणी दूपारच्या उन्हामुळे त्याला पाण्याखालीही थोडेसे अंधूक अंधूक दिसत होते..पण तो पाण्यात बराच खाली आला तरी त्याला रघु कोठेच दिसत नव्हता...तो आणखी खाली खाली जात पाण्यात खोलवर गेला, अगदी विहीरीच्या तळाचा खडकही त्याच्या हाताला लागला, पण रघु गवसला नाही..आता मात्र पट्टीचा पोहणारा श्रीधर हताश झाला होता, त्याच्या फुफ्फुसातील श्वासही जवळपास संपत आला होता, त्याला आता लवकरात लवकर पाण्याच्या वर जावे लागणार होते पण तरीही तो आजूबाजूला रघुला शोधत होता..जणू वर जायचे तर रघुला घेवूनच असा त्याने निश्चय केला होता..अचानक त्याला एका बाजूला काही अंतरावर काहीतरी चमकताना दिसले त्याने तिकडे जावून पाहिले.. तो रघुच्या अंगावरचा पांढरा सदरा होता, ताबडतोब त्याने रघुच्या खांद्याला पकडले आणी त्याला खेचत वर वर जावू लागला.. प्रमाणापेक्षा जास्तवेळ श्र्वास रोखून रोखल्याने त्याची चांगलीच दमछाक झाली होती, तरीपण कसाबसा तो पाण्याच्या बाहेर येण्यात यशस्वी झाला, नंतर शंभू आणी रघुच्या आईने दोराच्या साहाय्याने दमलेल्या श्रीधर आणी बेशुद्ध पडलेल्या रघुला बाहेर खेचून काढले..
रघुच्या पोटामध्ये पाणी गेलेले असले तरी त्याचा श्र्वास चालू असल्याचे पाहून सर्वांना आनंद झाला, रघुच्या पोटातील पाणी बाहेर काढून श्रीधरने त्याला उचलून खांद्यावर घेतले आणी ते सगळेजण रघुच्या घरी आले..🏠
"ताई, काळजी करण्याचे काहीही कारण नाही आता, लवकरच शुद्धीवर येईल रघु..त्याचबरोबर त्याच्यासाठी काही चांगल्या औषधी आणी अंगाला दररोज लावण्यासाठी एक लेप पण देतो उद्या श्रीधरसोबत पाठवून"
शंभुने रघुच्या आईला आश्वस्त केले..आणी हातामध्ये आणलेली ती काळी बाहुली श्रीधरकडे दिली..
शंभुने रघुच्या आईला आश्वस्त केले..आणी हातामध्ये आणलेली ती काळी बाहुली श्रीधरकडे दिली..
"पण देसाई गुरूजीचा आत्मा रघुचे शरीर सोडून ह्या बाहुलीमध्ये कसा आला महाराज?" रघुच्या आईने विचारले.
"देसाईचा मृत्यू खोल पाण्यामध्ये बुडून झालेला होता, त्यामुळे साहजिकच मृत्यूसमयी त्याच्या मनात खोल पाण्याबद्दल तीव्र भिती निर्माण झाली होती, तीच भिती त्याच्या आत्म्याच्या अंशामध्येही उतरली होती, त्याच मुळे जेव्हा रघु पाण्यावर तरंगत होता त्यावेळीच त्याच्या आतला देसाई पण भयभीत झालेला होता आणी जेव्हा तो पुर्णपणे पाण्यामध्ये बुडाला तेव्हा घाबरून देसाईने त्याच्या शरीराचा त्याग केला.. आणी त्याचा अंश काठावर ठेवलेल्या चिताभस्माच्या बाहुलीकडे आकर्षित होवून त्यामध्ये सामावला गेला..हा अभिमंत्रित केलेला सिद्ध हार महाबलीच्या गळ्यातील रुईच्या पानांपासून तयार केलेला आहे, जो आता त्याला ह्या बाहुलीमधून बाहेर येवू देणार नाही"
शंभूने आईला समजावून सांगितले..तसेच श्रीधरलाही एक विनंती केली,
शंभूने आईला समजावून सांगितले..तसेच श्रीधरलाही एक विनंती केली,
"श्रीधर.. तु ही बाहुली नेवून ओढ्यामध्ये सोडून दे..जेव्हा या बाहुली मधील राख पुर्णपणे पाण्यामध्ये विरघळून जाईल तेव्हा मोहबंधनामध्ये गुरफटलेल्या देसाईच्या आत्म्याला मुक्ती मिळून जाईल" 🌪️
एवढे बोलून शंभू तेथून निघून गेला..
एवढे बोलून शंभू तेथून निघून गेला..
आता दूपार टळून संध्याकाळ होण्याच्या मार्गावर होती, ओढ्याचे पाणी मोठा खळखळाट करत वाहत होते, श्रीधरने एकदा त्याच्या हातातील रुईचा हार घातलेल्या काळ्या बाहुल्यावर नजर टाकली..
" शिक्षकांचे काम मुलांना घडवण्याचे असते..पण तु चूकलास देसाई मास्तर" असे पुटपुटत त्याने तो बाहुला ओढ्यामध्ये दूरवर भिरकावून दिला..वेगाने वाहणाऱ्या ओढ्याच्या प्रवाहात तो बाहुला काही क्षणातच नजरेआड झाला..🌊
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
ह्या सगळ्या प्रसंगाला आज चार महिने उलटून गेले होते..
सहावीच्या वर्गाचा वार्षिक परीक्षेचा निकाल लागुन ती मुले आता इयत्ता सातवीच्या वर्गात येवून एक महिनाही पुर्ण झाला होता..रघु हा आजारी असल्यामुळे परीक्षेला बसु शकला नव्हता तरी पण श्रीधरने त्याला सर्व विषयांमध्ये पास करून त्याचे नाव सातवीच्या वर्गात घेतले होते..पण अजून पर्यंत एकही दिवस तो शाळेत आला नव्हता.. शिकवताना श्रीधरची नजर वारंवार त्याच्या रिकाम्या बेंचवर जायची..

आजपण श्रीधर दररोजच्या प्रमाणे वर्गात आला होता..
"तर मुलांनो मागच्या वर्षीप्रमाणे ह्या वर्षीपण आपण तुमच्यातल्या एकाची वर्गमॉनिटर म्हणून निवड करणार आहोत..तर तुमच्यापैकी जे कोणी इच्छुक असतील त्यांनी उभे राहुन नाव सांगा"
"तर मुलांनो मागच्या वर्षीप्रमाणे ह्या वर्षीपण आपण तुमच्यातल्या एकाची वर्गमॉनिटर म्हणून निवड करणार आहोत..तर तुमच्यापैकी जे कोणी इच्छुक असतील त्यांनी उभे राहुन नाव सांगा"
मागच्या वर्षीची मॉनिटर असणारी 'मंजिरी' परत एकदा बोट वर करत उभे राहण्यासाठी सज्ज झाली होती पण तेवढ्यात,
"रघुनाथ वाघमारे" 🧒
दरवाजातून आलेल्या ह्या खणखणीत आवाजाने सर्व वर्गाची नजर तिकडे वळाली..आणी मंजिरीनेही तिचे बोट खाली घेतले..
"रघुनाथ वाघमारे" 🧒
दरवाजातून आलेल्या ह्या खणखणीत आवाजाने सर्व वर्गाची नजर तिकडे वळाली..आणी मंजिरीनेही तिचे बोट खाली घेतले..
दरवाजात रघु उभा होता, अंगावर स्वच्छ गणवेश घालून.. विशेष म्हणजे त्याचे तोंड, हात सरळ झालेले होते आणी चेहर्यावर स्मितहास्य दिसत होते..न अडखळता सरळ चालत त्याने वर्गामध्ये प्रवेश केला..सर्व मुले त्याच्याकडे आश्र्चर्यचकित नजरेने पाहत होती..
"असे बघताय काय तुम्ही मित्रांनो? मी तुमचा रघु..परत तुमच्यामध्ये आलोय..हां पण गेल्या वर्षीपेक्षा माझ्यामध्ये हा जो बदल तुम्हाला दिसतोय ना, त्याचे श्रेय आपल्या श्रीधर मास्तरांना जाते बर का..कारण त्यांनी आणी त्यांच्या गुरूंनी मला मृत्युच्या दाढेतून बाहेर काढले आणी त्यामुळेच मी आज तुम्हांला समोर दिसतोय..आपल्या जीवनामध्ये शिक्षक तर अनेक येतात.. पण गुरू फक्त एकदाच येतो आणी मी श्रीधर मास्तरांना फक्त शिक्षक नाही तर गुरू मानतो"
रघुने खाली वाकून श्रीधरच्या पायाला हात लावला आणी तो त्याच्या जागेकडे निघाला,.वर्गातील सर्व मुला मुलींनी टाळ्यांचा कडकडाट करत त्याचे जंगी स्वागत केले.👏
रघुने खाली वाकून श्रीधरच्या पायाला हात लावला आणी तो त्याच्या जागेकडे निघाला,.वर्गातील सर्व मुला मुलींनी टाळ्यांचा कडकडाट करत त्याचे जंगी स्वागत केले.👏
रघुला पुर्णपणे बरा झालेला पाहून श्रीधरच्या चेहर्यावर समाधान झळकले होते, पण त्याने आपल्याबाबतित दाखवलेली विनयशीलता आणी वर्गातील मुलांचा मिळालेला प्रतिसाद पाहून त्याच्या डोळ्यात पाणी तरळले.😢
आणी आपला हा भावनावेश वर्गातील मुलांच्या नजरेस पडु नये म्हणून तो झटकन वर्गाच्या बाहेर निघून गेला..
आणी आपला हा भावनावेश वर्गातील मुलांच्या नजरेस पडु नये म्हणून तो झटकन वर्गाच्या बाहेर निघून गेला..
शंभू गुरव' हा जगापासून अलिप्त असणारा एक ब्रम्हचारी साधक होता, जगाच्या मानसन्मानाची त्याला कधी गरजही नव्हती आणी अपेक्षाही..रघुची बाधा उतरवून झाल्यानंतर तो लगेचच सोनगाव सोडून दूसरीकडे गेला.. कधी त्याला यावेसे वाटलेच तर पुन्हा परतही येईल..
शंभूप्रमाणेच श्रीधरनेही त्याचा कारनामा स्वताहून कोणालाही सांगितला नाही, कारण त्याने जे काही केले होते ते फक्त त्याचे कर्तव्य म्हणून, प्रसिद्धीसाठी नाही..पण त्या सर्व घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असणार्यांनी केव्हाच त्याचा कारनामा इतरांना सांगायला सुरुवात केली होती.. सोनगावात तर घराघरात श्रीधरची चर्चा रंगु लागलीच होती..पण लवकरच ह्या "सोनगावच्या मास्तर"ची कीर्ती आजुबाजूंच्या गावांमध्येही पसरणार होती..