ती रात्र.......
भाग १
भाग १
बाहेरून आवाज तर येत होता पण कळत नव्हतं नक्की कशाचा येतोय. सगळ्यांना दरदरून घाम फुटला होता. काहीच कळत नव्हतं.ते पाचही जन मलाच दोष देत होते. आणि अचानक बाहेरून दरवाज्यावर कोणीतरी लाथ मारली............
आम्ही 6 जण मित्र एकाच कॉलेज मध्ये एकाच वर्गात सगळीकडे एकत्र आता काय कॉलेज life होतं सगळं कसं छान चालल होतं.
आमच्या गॅंग मध्ये मी,वृषभ,विनय,आदित्य,सचिन,विशाल एवढे लोक होतो. सगळे वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या भागातून इथे आलेले होते.
विद्यापीठाच्या परीक्षा झाल्या होत्या,निकाल पण छान लागला होता.
आता कॉलेज म्हटलं की खूप गोष्टी आल्या त्यातलीच एक गोष्ट म्हणजे व्यसन. आमच्यात कोणाला कसलच व्यसन नव्हतं. सगळे निर्व्यसनी होते. कॉलेज च्या मागच्या बाजूला बरीच दुकाने,पानटपऱ्या होत्या.
तिथे मुलं व्यसन करायला जायचे.
पुण्यात सगळे शिकायला आम्ही आणि मी पुण्यातलाच. माझं गाव पण पुण्याजवळच होतं. गावाला भलीमोठी शेती,शेतामध्ये घर होत.
आणि शेताला लागून दुसऱ्या बाजूला एक पाझर तलाव होता. आम्ही मित्रांनी मिळून प्लॅन केला होता. माझ्या गावच्या रानातल्या घरात जाऊन मटण पार्टी करायची. मी म्हणालो ठीक आहे जाऊया आपण पण पावसाळयात जाऊ. पण २०१९ चा पाऊस वाट लावून गेला कुठेच जाता आलं नाही. पण त्या नंतर त्यांनी तगादा लावला माझ्या मागे की कधी जाऊया,कधी जाऊया कधी करायची पार्टी म्हणून. शेवटी मी म्हणालो निकाल लागला की जाऊया.
आणि तो दिवस आला निकाल लागला आम्ही सगळे सहाजण पास झालो. आणि कोणतातरी सण होता तेव्हा लागोपाठ तीन सुट्ट्या आल्या होत्या. सचिन म्हणाला,आता तीन दिवस याच्या गावाला जाऊया आणि मस्त enjoy करून येऊया. मी पण ठीक आहे बोललो. बाकी सगळे रूम घेऊन राहत होते मी एकटाच घरी राहत होतो. कळत नव्हतं घरी काय सांगावं. घरी सांगितलं की प्रोजेक्ट work आहे मित्रांच्या रूम ला जावा लागेल राहायला. पप्पा माझे मला कुठे जाऊन देत मित्राकडे राहायला. पण खूप विनंत्या नंतर सोडलं. आमचा प्लॅन झाला होता. माझ्याकडे bike होती. वृषभ ने औरंगाबाद वरून त्याची activa कशी पुण्यात आणली ते एक रहस्य च आहे. आणि विनय च्या मित्राची गाडी मिळाली.
आम्ही आधी पुरंदर किल्ला करणार होतो आणि मग गाव गाठणार होतो.

तो दिवस उजाडला. शनिवार होता तो आवरलं आम्ही सगळ्यांनी आणि निघालो पुरंदर च्या दिशेने मध्ये वाटेत नाष्टा केला.
किल्यावर पोहोचलो किल्ला पाहिला मग photoshoot केलं जरा.
गड उतार होऊन दुपारी जेवायला गारवा हॉटेल ला गेलो.
मग जरा सासवड फिरलो. ६ वाजले मटण घेतलं. कांदा,लसूण,मिरच्या,मसाले सगळं काही घेतलं.रानातल्या घरात काय चूल भांडी सगळं होतंच. भाकरीची ऑर्डर दिलती. 25 भाकऱ्या घेतल्या बांधून आणि निघालो गावाला. अर्ध्यातासात पोचलो पण आम्ही. गाड्या पार्क केल्या आणि निघालो घराकड चालत. दूरपर्यंत काही दिसत नव्हतं. भयाण अंधार,रातकिड्यांची किरकिर चालू होती. दूरवर एक वीटभट्टीवर एक दिवा दिसत होता फक्त.
घराच्या दरवाज्याजवळ पोहचलो आणि पाहतो तर काय कुलूप आणि चावीच काय आता माझ्या तर लक्षात पण नाही आले. गावात गेलो तर घरी कळेल आता काय करावं काही सुचत नव्हतं. तेव्हड्यात माझ्या लक्षात आलं की आजोबा चावी घराच्या बाहेरच्या देवळीत लपवून ठेवत होते. मी दोन्ही देवळ्या तपासल्या आणि नशीब आमचं थोर चावी सापडली. कुलूप उघडलं आत गेलो.जरा बसलो घरात जाऊन रानात सीताफळ लावली होती त्याला पाणी देण्यासाठी बोर घेतली होती. त्यामुळे पाणीप्रश्न मिटला होता. आम्ही सगळे फ्रेश झालो. चूल होती भांडी होती सरपण तर होतंच. घरात थोडस रॉकेल सापडलं मग चूल पेटवली. भरभर कांदा टोमॅटो कापून घेतले. विशाल ला येत होती भाजी बनवता म्हणून तो बोलला मी बनवतो. सांगलीचा तो तिकडे त्याच्या वडिलांचे तीन हॉटेल्स होते. रात्र वाढत गेली मटणाचा खमंग वास सुटला होता. सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं होत. आदित्य पाणी आणायला जातो सांगून गेलता खरा बराच उशीर झाला आला नव्हता. काही वेळात तो ही आला. घामाने भिजलेला होता. विचारलं त्याला कुठे होतास,तर तो बोलला वरच्या वावरात कोणाचा तरी फिरण्याचा आवाज आला. खूपवेळ आवाज येत होता म्हणून घाबरून लपून बसलो होतो. माझी थोडी तंतरली मला वाटलं कोणीतरी आलंय. म्हणून मी डोकावून खिडकीतून बाहेर बघितलं पण कोणीही दिसतं नव्हतं. जनावर असेल म्हणून सोडून दिलं मी. जेवण झाले आणि भांडी धुवून जागच्या जागी ठेवले. विन्या म्हणला चल शेतातून फेरफटका मारून येऊ. आलो आम्ही शेतात, शेतात कडुलिंबाची झाड आणि त्यांचा आकार भीतीदायक वाटत होता. सचिन ला लघुशंका आल्याने तो गेला एक झुडपात. आम्ही गप्पा मारत मारत घराकडं आलो पण सचिन वापस आला नव्हता. आम्ही म्हणालो येईल तो पण दरवाजा लावून घेतला आणि आत बसलो.
दोन मिनिटे नसतील झाली आणि जोरात दरवाजा कोणीतरी बाहेरून ठोकत होतं. आम्ही घाबरलो कोण असेल. नंतर लक्षात आलं सचीन असेल. दरवाजा उघडला पण बाहेर कोणीच नाही. आदया म्हणला हे सच्या अजून कसा आला नाही. चला त्याला शोधायला जाऊयात. म्हणून आम्ही सगळेजण शोधायला गेलो,आणि सापडला तर मोबाईल टॉर्च ने इशारा करा असे सांगितले. कोणाचा काही reply आला नाही. शेवटी मी घरात आलो तर काय पाहतो समोर सचिन निपचित पडला होता. आजूबाजूला कोणीही नव्हता. मी ओरडून ओरडून बोलावलं सगळ्यांना सगळे आले. सचिन उठ उठ सचिन उठला नाही. मी बोललो दरवाजा लावून घे. कदाचित तो आलाय. सचीन ला खुप मार बसला होता. तो उठत नव्हता. शरीरथंड पडलं होतं त्याच आणि आम्ही समजून गेलो काय ते. आम्हाला आता सुधारत नव्हतं काय करावं ते. आणि बाहेर पुन्हा आम्हाला चालण्याचा आवाज आला कोणाच्यातरी. आम्ही जाम घाबरलो होतो कळत नव्हतं काय करावं ते. सगळे मित्र मलाच दोष देऊ लागले. तुझ्यामुळे आम्ही इथे अडकलो. एकतर माझा भुतावर विश्वास नव्हता कारण जी गोष्ट पाहिली नाही त्यावर कसा विश्वास ठेवायचा ना?