ठाव- A Thriller marathi story by Marathi Horror story blog - Part 3
मशीनघराचं कुलूप पाऊसपाण्यानं पूर्ण गंजलं होतं.राॅकेल सोडून ही किल्ली वाकडी तिककडी झाली पण कुलूप उघडलं नाही.सरतेशेवटी आबानं दगड घेत दोनचार दणक्यांनी कुलुप तोडलं.ते पाहून आपल्याला ही आपल्यांनीच वार करत तोडलं याची आबास मनात सल उमटली.कडकन कडी पडत आबांनी दार लोटताच मांजरीचं जोडपं भुसकन बाहेर पडलं.मशीन घरात पसाराच पसारा व धुळीचं साम्राज्य पसरलेलं.याला साफ कसं नी किती करावं हा पेच आबापुढं उभा राहिला.माणूस किती प्रौढी मिरवतो पण काळ त्याची जिरवतोच .आबांना हे घर घेतल्याच्या वेळचा किस्सा आठवला.
गंगू बामणास मुलबाळ नव्हतं. तो थकला त्यावेळेस दुरच्या नातेवाईकानं त्यास मुंबईस वृद्धाश्रमात ठेवण्याचं ठरवलं. गंगू गाव सोडतांना डोळ्यात आसवं आणत म्हणाला .
"आबा माझी राहती कुडी जे द्याल ते पण तुम्हीच घ्या!दुसरा कुणी घेऊन त्यात मांसाहार करेल हे नकोय मला!"
आबांची हवेली त्या वेळेच नुकतीच नवी बांधून झाली होती व आबांना घराची गरजही नव्हती.शिवाय गंगू सारख्या निरवशाचं घर नकोच म्हणून आबास ते घर फुकटही नको होतं म्हणून त्यांनी नकार दिला.पण काशीबाईनं "गंगूची इच्छा आहे तर घेऊ या ना.नी दुसरा कसा येईल हवेलीसमोर त्यापेक्षा एवढा मोठा कुणबावा आहे कशाला तरी उपयोगी पडेलच .घर आहे ते शेवटी".
आबांनी मोबदला देत इच्छा नसतांनाही घेतलं.व त्यावेळेसच विहीरीवर विजेच्या मोटारी बसल्या व डिझेलची किर्लोस्कर मशीन जे पावसात पडुन होते ते सारे या घरात ठेवले.काळानुसार इतर भंगार,अडगळची भर पडत ते फुल होत गेलं.या प्रसंगाची आठवण होत शेवटी घरानं, काळानं आपला बदला घेतलाच आज आबांचीच अडगळ होत घर त्यांना सामावून घेत होत.
पुढचे दोन दिवस आबांनी सारी भंगार काढत असलम भंगारवाल्यास विकलं.जुनी मशीन्सची बक्कड रकम मिळताच काशीबाईंनी त्या घराची डागडुजी करून तळ घेतलं.घराचं रूप राहण्यायोग्य झालं.गयभू आबानं मनोमन स्वर्गात जाऊन बसलेल्या गंगू बामणाचे आभार मानले.
सहादूनं हवेली विकलीच नाही तर हवेलीतून आपणास काढण्यासाठी चाल होती हे कळताच गयभू आबास ढवंढाय दाटला.माहेरात व सासरी वैभव भोगणाऱ्या आपल्या काशीस हे दिवस यावेत यानं त्यांच्या भावनेचा चिराच ढासळला.
आबा व काशीबाई दिवस ढकलत असतांनाच मोहन बाबू व सगुणा आले.त्यांच्या रूपानं यांना पोटची लेकरंच मिळाली.सगुणाला माहेर दूर झाल्यानं काशीबाईतच आई दिसू लागली. रात्र रात्रभर काशीबाई त्यांचं गतवैभव दोघांना सांगे.तर सगुणा माहेर कसं दुरावलं ते.
काशीबाईस हातास काहीतरी किडूकमिडूक चावण्याचं कारण झालं व हात सुजला,जखम वाढली.आयुष्यात मधुमेहाची तपासणी केली नाही व त्यानं जखम चिखळतच गेली.जिथं खाण्याचे फाके होते ते जेमतेम सगुणा मोहनबाबूमुळं कमी झाले होते तर इलाज कुठून करणार.हाताच्या जखमेचं निमीत्त करून काशीबाईनं आबास भाकरी बडवायचं शिकवलं.तब्येत ढासळतच गेली.काशीबाईंनी खाटलं धरलं.मोहनबाबूनं आपल्या घरमालकास म्हणजे सहादूस आईच्या तब्येतीबाबत कळवलं.पण सहादूचा काहीच प्रतिसाद नाही.काशीबाईचं अन्न सुटलं.आबा मशीन घरात काशीबाईच्या उशाला बसत हातपंख्यानं वारा ढाळत आसवं गाळत रात्रभर बसू लागले.श्रीमंत बापाची लाडाची लेक व आपलंही गत वैभव नी आज गंगू बामणाच्या पडक्या घरात शेववटच्या घटका मोजतेय!आबांचा ऊर फाटू लागला.त्यांना कुठं तरी धुगधुगी होती की सहादू व महादू नं यावं व शेवटी तरी हवेलीत न्यावं.पण पोरं दिवस मागून दिवस जाऊनही येत नाही पाहून त्यांचा ही धीर खचू लागला.
"मोहन बाब आणखी एकदा सांगा हो सहादू महादूस! आईचं खरं नाही म्हणावं .लवकर या!"
मोहन बाबूनं आबाचं काळजाला घर करणारं विनवणीचं बोल ऐकून रात्रीच्या अकरालाच फोन केला.
"सहादू दादासाहेब ! काकी शेवटच्या घटका मोजता आहेत हो!निदान अंतिम समयी तरी यावं!"
"मोहनराव क्लर्क आहात म्हणजे निदान चार बुकं तरी नक्कीच शिकले असणार तुम्ही.तुम्हाला हे ही कळत नाही का? कुणाला केव्हाही डिस्टर्ब कसं करावं?"
"दादासाहेब आई आहे आपली!वेळच अशी आलीय !अशावेळी काय शिष्टाचार पाळावेत!"
"ठेवा फोन आता!पाहीन सकाळी!"
म्हणत सहादूनं संतापात फोन ठेवला.
मोहनबाबूस आबांना काय सांगावं प्रश्न पडला.त्यांनी निघालेत एवढंच सांगत विषय बंद केला.
काशीबाईला रात्री दोनच्या सुमारास यम लागले .
"काहो ! आले बघा आपले सहाद्या, महाद्या!"
आबा आवंढा गिळत आवेग दाबत ,"हो गं काशी केलाय मोहन बाबून फोन!निघालेत ते!"
"बरं माझं एक ऐकाल का ! मी गेल्यावर तुम्हाला ते नेतीलच सोबत.तर जास्त ताणू नका हो.खुशाल पोरांसोबत जा! उगाच हट्टाला पेटून एकटं नका राहू.निदान तुमचा तरी अखेर हवेलीत होवो! द्या बरं मला वचन"
आबा हवेलीचं नाव निघताच आपला चेहरा लपवत रडू लागले.काशी कसं सांगू तुला...!
"अहो हे बघा मला सहादू बोलवतोय हो!" काशीबाई भ्रमात बरडू लागल्या.व नंतर त्यांच्या घशात खरखर वाढली.दिवसभराच्या ड्युटीनं थकलेले मोहन बाबू नुकतेच झोपायला निघून गेलेले.सगुणा तान्ह्या बाळास कवेत घेत जवळच पेंगुळलेली.गावातलं कुत्रंही जवळ नव्हतं.एक काळ असा होता की रात्रीच्या एक वाजेपर्यंत कायम हवेलीच्या ओसरीत दहा पंधरा लोकं सुने बसत विड्या फुकत! नी आज काळ उलटला म्हणून कुणीच नाही.
आबानं सगुणास हाळी भरली.सगुणा उठली.लगोलग जाऊन नवऱ्यास बोलवून आणलं.मोहन बाबूनं घशाची घरघर ऐकताच ओळखलं की काकी आता काही क्षणाची सोबतीण आहे.त्यांनी लगोलग निर्णय घेत सगुणाच्या मदतीनं काकीस उचलत हवेलीत आणलं.आबा नुसत्या भकास डोळ्यांनी टकाटका पाहू लागले.
मोहन बाबूनं आबास मांडी द्यायला लावत तोंडात पाणी द्यायला लावलं.आबा थरथरत "काशी नाही जाणार बाबू मला सोडून!का उगाच तुम्ही घाई करताहेत? निदान तिच्या पोरांना तरी मांडी द्यायला येऊ द्याना!" रडतच म्हणू लागले. मोहन बाबूनही काशीबाईस मांडीवर घेत पाणी दिलं व सगुणास ही द्यायला लावलं.
"आबा मी व सगुणा काकी व तुमची पोरंच ना मग का रडता?"
सगुणानं शीप दिली नी घरघर थांबत जोराचा आचका येत घशातलं पाणी आत गेलं नी मान कलली.मोहन बाबूनं काकीचे उघडे डोळे हातानं झाकले नी गदागदा हालत "आबा काकी गेली आपली!"हंबरडा फोडला.मोहनचा हा हंबरडा पडत्या श्रावतझडीत कसलीही ओळख नसणाऱ्या सगुणास घोंगडीत घेत घरात आणणाऱ्या माऊलीच्या उपकाराच्या उतराईचा होता.सगुणा आबास बिलगली.
कोंबडं आरवलं नी हवेलीतला गलका लोक हळूहळू गोळा होऊ लागले.दोघांना फोन गेले.सहादू आधी निघाला असता तर येणं शक्य होतं.पण आता चेन्नई हून शक्यच नव्हतं व त्यालाही तशी मुळीच घाई नव्हती.महादू जेमतेम आला.त्यानंच भडाग्नी दिला.
नंतर सहादू यथावकाश आला. व येताच त्याला व सुनीला काशीबाईस हवेलीत मोहनने आणलं होतं हे कळताच ते मोहनवर संतापले.त्याला कोपऱ्यात घेत "मि.मोहन तुम्हीच ना?रात्री फोन करणारे?नी तुम्हाला घर भाड्यानं दिलं म्हणजे काय विकत दिलं असं नाही.तुम्ही कोणाला विचारून हा तमाशा माझ्या हवेलीत आणला?थांबा जरा हा कार्यक्रम आटोपू द्या मग पाहतोच तुम्हास?" सहादूनं सरळ सरळ धमकावलंच.
मोहन बाबुंना तर आपल्या आईबाबत हा इतका क्षुद्र वागूच कसा शकतो!या विचारानं धक्काच बसला.सहादू महादूनं कसंबसं करून उत्तरकार्य आटोपलं.नेमकं त्याच दिवशी सगुणाच्या लग्नापासुन मुलीचं व मोहनचं तोंड न पाहणारे सर्जेराव दाभाडे पत्नीसहीत सारी मळमाटी विसरत मुलीच्या प्रेमापोटी पत्ता हुडकून काढत मुलीसाठी आले.आई-वडिलांना पाहताच सगुणाला रडावं की हसावं तेच समजेना.बापानं भरल्या दिलानं माफ करत पोरीस उराशी कवटाळलं.आईच्या तर धाराच बंद होत नव्हत्या.
सहादूनं निघण्याच्या वेळेस मोहन बाबूस त्यांच्या सासऱ्यासमोर -सर्जेरावासमोर हवेली एका महिन्यात खाली करण्यास सांगत "त्याचं काय आहे मोहनराव तुम्हास हवेली भाड्यानं दिली तर तुम्ही स्वत:ची समजत परस्पर निर्णय घ्यायला लागलेत.मला ते नकोय.मुकाट्यानं एका महिन्यात खाली करा हवेली.मला हवेली विकायचीय"
मोहनबाबूस सासऱ्यासमोर उगाच तमाशा होऊन पाण उतारा नको होता.म्हणून त्यांनी होकार भरला.
पण नाशिकमध्ये द्राक्ष उत्पादक असलेले सर्जेराव!लेकीच्या घरी पहिल्यांदाच येत होते.व त्यांना आपण पाय ठेवावा व मुलीच्या डोक्यावरचं छत निघण्याच्या गोष्टी हे सहन झालं नाही.त्यांनी मौन पाळलं व नंतर सहादूस कोपऱ्यात घेत"सहादू शेठ हवेली कोपऱ्यात विकू नका.फायदा करायचा असेल तर लिलाव ठेवा व मला एका शब्दानं कळवा!" सांगितलं.
आबास मोहनबाबूस काशी व आपल्यामुळं हवेली सोडावी लागणार याचं दुःख वाटलं.काशी गेली पण आता निदान पोरं सोबत नेतील अशी मनात त्यांना आशा होती.कारण या तेरा दिवसात बसणारे उठणारे सहादू महादूस आबाची आबाळ होऊ नका देऊ आता.सोबत न्या म्हणून समजावतच होते.
सहादू जायला निघाला.आबाला वाटलं आता हा बोलावेलच पण कशाचं काय.त्यानं सुनीला व पोरांना बसवत गाडी काढू लागला.आबाला काशीबाईचं बोलणं आठवलं.ते हट्ट सोडत सहादुच्या गाडीजवळ गेले.
"सहादू मी काय करू पोरा आता!"आशाळभूत नजरेनं केविलवाणेपणानं विचारू लागले.
"तुमचं तुम्ही बघा.मी काय सांगणार.महाद्या घेऊन जात असेल तर माझी आडकाठी नाही.अन्यथा खळवाडीचं शेत आहेच त्यावर खुशाल गुजराण करत रहा." म्हणत तो गाडी स्टार्ट करत निघून गेला.
आबाला तर आताच मरण आलं तरी चालेल असंच झालं.का आपण उगाच याची अपेक्षा केली.
महादूची प्रतिक्रीया ही तशीच कोरडी होती.तरीपण त्यानं दर महिन्याला पैशे पाठवत जाईन इथंच रहा .निदान इतकं तरी बोलला.
आबाला आता काशीबाईची तिव्रतेने आठवण येऊ लागली.आपल्याला काशी वावधनात एकटं सोडून गेली याची त्यांना जाणीव झाली.
.
.
पहाट झाली पण पाऊस सुरूच आठवणीचे चटके असह्य झाल्यानं आबांनी कूस बदलत उठून बसले.
दुपारपर्यंत मोहनबाबू व सगुणा माहेराहून परतले.
सहादू सांगून गेल्याप्रमाणं हवेलीसाठी गिऱ्हाईक येऊन पाहून जाऊ लागले.महादुनंही मग आपलाही हिस्सा विक्रीला काढला. मध्यंतरीच महादू मशीन घर माझंच असून तेही विकायचंय असली भाषा करू लागला. मोहन बाबू दुसरी खोली पाहतच होते.गिऱ्हाईक आलं की आबाच्या दिलात गिड्डाच पडे.हवेली जर विकली गेली व मशीनघरही विकलं तर आपण कुठं जायचं?त्यात मोहनबाबू जर दुसरीकडं चालले गेले तर?
आबाला भविष्याची चिंता व अंतिम ठावाची चिंता खाऊ लागली.
रात्री मोहन बाबू जेवणाचं ताट घेऊन आले.आबांना खाण्याची वासनाच नव्हती.मोहनबाबूनं सगुणेस बोलवलं.सगुणेनं मशीन घरात येत आबांना जबरीनं बसवलं.
"बाबू, सगुणा पोरी या म्हाताऱ्यावर एक उपकार कराल?" आबा जेवता जेवता हात जोडत विचारू लागले.
"आबा असं काय विचारता.जे असेल ते मोकळं सांगा.आमच्यावर भरवसा नाही का? का परकं समजता आम्हास!" सगुणा पोटतिडकीनं म्हणाली.
"बाबू !काही ही करा नी हवेली तुम्हीच विकत घ्या ना!"
सगुणा व मोहनबाबुचे डोळे एकदम चमकले.आबा मनातलं बोलले होते पण.....
"आबा हवेली विकत घेण्याची आमचीपण इच्छा आहे.कारण ज्या माऊलीनं या गावात आम्हास ठाव दिला,तिचा ठाव उजाडला तर आम्हासही दु:खंच होईल.पण आबा माझं गावचं घर विकून, जमापुंजी टाकून व बॅंकेचं कर्ज काढूनही बजेट व किंमत यात जमीन अस्मानाचं अंतर आहे काय करावं कळतच नाही आबा!"
मोहनबाबूनं गणित मांडलं.
"बाबू खळवाडी काशीच्या नावावर आहे.हवं तर मी तिला विकतो.ती खळवाडी असली तरी किंमत देईलच"
"नको आबा.तुमची मुलं तुम्हास नाहक त्रास देतील".
"आबा ते हवेली घेवोत अथवा न घेवोत पण एक नक्की आम्ही जरी हवेली सोडली तरी तुम्ही काळजी करू नका!तुम्हास अंतर देणार नाहीत." सगुणानं आबास धीर दिला.
आबाच्या घशात तरी घास अडकलाच.
सहादू व महादुचं जमत नव्हतं तरी सहादूनं एकत्रच हवेलीचा लिलाव ठेवण्याचा निर्णय घेतला.कारण अलग अलग दोघांना किंमत आली नसती.त्या बदल्यात महादूस सहादूनं मशिन घर देत तेही विक्रीस काढलं.लिलावाची तारीख ठरली.नाशिकचे सर्जेराव दाभाडे लक्ष ठेवूनच होते.
लिलावाचा दिवस जवळ आला.मोहनकडंनं बॅकेत कर्जप्रकरण टाकूनही तजवीज झालीच नाही मग त्यानं कर्ज घेणं रद्द करत निदान मशीन घर तरी घेऊच ही तयारी केली.
आबा सकाळीच नदीवर फिरायला निघून गेले.हवेलीचा लिलाव म्हणजे आपलाच सौदा आपल्या डोळ्यांनी पाहणं त्यांना जमणारच नव्हतं.
पंधरा लाखापासुन बोली सुरू झाली.दुपारनंतर चार वाजेपर्यंत पंचेचाळीस लाखात हवेली कोणीतरी नाशिकच्या माणसानं घेतली.सहादू महादूनं आबास नदीवरून आणत साऱ्या कागदावर सह्या घेत त्या माणसाकडं कागदं सुपुर्द केली.दुसऱ्या दिवशी उरलेली प्रक्रीया होणार होती.मशीन घर मात्र मोहनबाबूनच घेतलं.हवेली गेल्यानं आबाची मान वर येईचना.संध्याकाळी कुठं जावं हा प्रश्न त्यांच्या समोर होता पण मशीन घर बाबूनं घेतल्याचं कळताच त्यांना हायसं वाटलं.
दुसऱ्या दिवशी सर्जेरावांनी येत गाडीत सगुणाला बसवत शहरात जाऊन हवेली सगुणाच्या नावावर केली.
"बेटा रूसलेल्या बापाची ही विवाहभेट स्विकार कर.कुणी माझ्या लेकीस बेघर करत होता.या बापास कसं सहन होईल.शिवाय ज्या माऊलीनं संकटकाळात माझ्या लेकीस छत दिलं होतं त्या माऊलीचा ठाव मी दुसऱ्याकडं कसा जाऊ देईन!"सर्जेरावांनी रडणाऱ्या सगुणास मिठी मारली.
सगुणा मोहनबाबू सर्जेरावासहीत गावात परतले.
सगुनानं हवेलीच्या ओसरीवर नवी आरामखुर्ची टाकत मशीन घरातून आबास हात धरुन आणलं व आराम खुर्चीवर बसवत रडतच म्हणाली. "आबा तुमच्या या सगुणाच्या बापानं तुमचा ठाव वाचवला हो!"
आबास सारं कळताच त्यांनी थरथरत्या देहानं , भरल्या काळजानं , सर्जेरावाकडं नाही पण सगुना कडं पाहीलं."सगुणे, माझ्या काशीला माणसाची पारख होती गं!उगाच तिनं तुला ठाव दिला नव्हता! काशी आता मी माझ्या सगुणेच्या ठावात सुखानं अखेरचा श्वास घेत तुला भेटायला येईन बघ"
.
.
नी..
.
.
नी.
.
.आबांनी आराम खुर्चीत रेलत आपलं गतवैभव आठवतं श्वास रोखला.
सगुणा ,मोहनला आनंदाच्या अतिरेकात समजलंच नाही.नी जेव्हा लक्षात आलं तोपावेतो आबांनी माघार घेतलीच नाही.कसलाच त्रागा नाही की लाथा झटकणं नाही.पक्का मनोनिग्रह आपल्या काशीला आपल्या ठावातून अखेरचा श्वास घेत भेटण्याचा.
......
...
..
आsssssबाsssss

सगुणानं टाहो फोडला.
✒ वासुदेव पाटील.