अनिकेत घरात बसुन सतत काय करावे हा विचार करत होता.त्याला असे विचारमग्न पाहून त्याच्या वडिलांनी शामराव यांनी हटकले सुद्धा पण अनिकेत ने त्यांना तब्येत बरी नसल्याचे कारण सांगितले. अनिकेत ला मार्ग सापडत नव्हता.असाच विचार करत असतांना त्याला त्याचा जीवलग मित्र आकाश ची आठवण झाली.त्याने आकाशला फोन करून त्यांच्या नेहमीच्या चहा व सिगरेट प्यायच्या ठिकाणी बोलावुन घेतले.अनिकेत तिथ लवकर पोहचला. थोड्या वेळाने आकाश आला व आल्याबरोबर अनिकेत ला म्हणाला "काय लव बर्ड खूप दिवसांनी आठवण आली मित्राची",पण अनिकेत चा उदास चेहरा पाहून त्याला काहीतरी घडल्याची जाणीव झाली.तो अनिकेतला घेऊन चहाच्या टपरीवर गेला.चहाची ऑर्डर देऊन त्याने अनिकेतला काय झाले ते विचारले. अनिकेत ने रडत रडत त्याला सर्व सांगितले.आकाश ने अनिकेत ला धीर देत सांगितले एक व्यक्ती आहे जी मदत करू शकते.त्या व्यक्तीचे भेटकार्ड आकाश ने अनिकेतला देऊन भेट घेण्याबाबत सांगितले. अनिकेत ला पुन्हा धीर देऊन आकाश निघून गेला.अनिकेत आकाश ने दिलेल्या भेटकार्ड वर नजर टाकतो त्यावर लिहिलेल्या व्यक्तीला भेटायला जातो.
आकाशने दिलेल्या भेटकार्ड वरील पत्त्याप्रमाणे अनिकेत एखादया राजवाड्याप्रमाणे दिसणाऱ्या वीरभद्र पॅलेस च्या बाहेर उभा होता.कुणाला न कळविता जाणे योग्य होणार नाही म्हणून अनिकेतने कार्डवरील नंबर वर फोन केला.काही रिंग गेल्यावर पलीकडून भारदस्त आवाज ऐकू आला वीरभद्र बोलतो,काय मदत करू आपली.स्वतःला वीरभद्र म्हणविणाऱ्या समोरील व्यक्तीचा फक्त आवाज एकूणच अनिकेतला स्वतःच्या अंगात उत्साह संचारल्याची जाणीव झाली.अनिकेत ने त्यांना भेट मागितली जी त्यांनी तात्काळ मान्य केली.अनिकेत वीरभद्र पॅलेस च्या आत शिरला. आत गेल्याबरोबर बंगल्याच्या समोरच्या आवारात भगवान शंकराचे मंदिर त्याला दिसले.एक नोकर त्यांना एका खोलीत घेऊन गेला.खोलीत वेगवेगळ्या प्रकारच्या उदबत्त्याचा सुवास दरवळत होता,पौराणिक ग्रंथाचे श्लोक कानावर येत होते.राळ व कापूर यांचा सुगंध येत होता.खूप महिन्यांनी अनिकेत असले प्रसन्न वातावरण अनुभवत होता.तेवढ्यात त्याला समोरून 6 फूट उंच,बळकट स्नायू,व्यायामाने कसलेले शरीर,गौरवर्णीय चेहरा,गळ्यात रुद्राक्षांची माळ असा सुंदर तरुण येतांना दिसला.तो तरुण अनिकेत जवळ आला.त्याला नमस्कार करत म्हणाला "मी वीरभद्र,वीरभद्र पाटील".बोला काय काम होते.अनिकेत त्या तरुणाकडे पाहतच राहिला.त्याने नावावरून थोराड,वयस्कर,भगवे कपडे परिधान केलेला अश्या व्यक्तीची कल्पना केली होती.त्याला असे पहात असलेले पाहून वीरभद्र म्हणाला प्रत्येक वेळी मन जे चिंतिते तसे नसते . त्याच्या बोलण्यावर अनिकेत ओशाळला. त्याने वीरभद्र ला नमस्कार करून आपली समस्या सांगितली.अनिकेतच बोलण ऐकून वीरभद्रच्या चेहऱ्यावरील भाव झरझर बदलत होते.त्याच्या चेहऱ्यावर चिंतेची छटा उमटली.
वीरभद्रच्या चेहऱ्यावरील चिंता पाहून अनिकेत काळजीत पडला.त्याने वीरभद्रला कारण पण विचारले,त्याच्या प्रश्नाचे उत्तर न देता वीरभद्रने अनिकेतला आज रात्री त्याचा बंगल्यावर मुक्कामी थांबण्याची सूचना दिली.अनिकेत ने ऑफिस ला एका महिन्यांची सुटी टाकल्यामुळे काही अडचण नव्हती.वडिलांनी काळजी करू नये म्हणून त्याने वडिलांना फोन करून कंपनीच्या कामासाठी बाहेरगावी असल्यामुळे घरी पाच ते सहा दिवस येणार नसल्याचे सांगितले.वीरभद्र अनिकेत ला घेऊन त्याच्या खास खोलीत आला.ही त्याची खास खोली अतीसंरक्षीत होती. एखादया बँक ची तिजोरी च्या प्रकारे वेगवेगळ्या सुरक्षेच्या पातळ्या वापरून सुरक्षित केल्या जाते तशीच ही खोली त्या खोली वर चढण्यासाठी केलेल्या पहिल्या पायरीपासून संरक्षीत केली होती.त्या खोलीत जाण्यासाठी पाच पायऱ्या होत्या ज्या पंचमहाभूतांचे प्रतिनिधित्व करत होत्या.अग्नी,जल,वायू,आकाश,पृथ्वी.कुठलीही अमानवी शक्ती पावित्र्याचे द्योतक असलेल्या या पंचमहाभूतांच्या संरक्षीत कवचातुन आत येऊच शकत नव्हती आणि आलीच तर पुढे त्या शक्तीला आव्हान होते खोलीच्या दरवाजाचे.त्या खोलीच्या दरवाजावर महाकाल,भुतांचा नाथ,त्रैलोक्याचे स्वामी देवाधिदेव महादेव यांचे संहारक शस्त्र त्रिशूल लावलेले होते.शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगाच्या मंदिरातील पाण्यावर खास प्रक्रिया करून ते अभिमंत्रित केलेले होते.तो दरवाजा पार करणे निदान अजूनतरी कुठल्याही अमानवी शक्तीला शक्य झाले नव्हते.अश्या त्या खोलीत वीरभद्र अनिकेत ला घेऊन आला होता.रात्र व्हायला थोडा वेळ होता.वीरभद्र ने अनिकेतला बसायला सांगितले. वीरभद्रने अनिकेत ला विचारले तुझा भुत,आत्मा,अमानवीय शक्ती वा गूढ शक्ती यांवर कितपत विश्वास आहे.अनिकेत म्हणाला की चंद्र,मंगळावर स्वारी करणाऱ्या, अण्वस्त्र, संगणकीय क्रांतीच्या विज्ञात युगात ह्या गोष्टीवर विश्वास ठेवणे मुश्किल आहे.वीरभद्र म्हणाला का मुश्किल आहे?बर्म्युडा ट्रँगल चे रहस्य अजूनही विज्ञानाच्या कक्षेबाहेर आहे.एव्हरेस्ट कित्येक वेळा सर केल्या गेला पण त्यापेक्षा कमी उंचीचा कैलास पर्वत अजूनही गिर्यारोहकांच्या कक्षेबाहेर आहे.पृथ्वी च्या उदरात,आकाशाच्या पोटात अश्या कित्येक गोष्टी आहेत ज्या अज्ञात आहे.भावनाला वाचविण्याची तुझी किती मानसिक व शारीरिक तयारी आहे?अनिकेत म्हणाला भावनावर मी स्वतःपेक्षा खूप प्रेम केले आहे आणि तीला वाचविण्यासाठी माझी जीव द्यायची व जीव घ्यायची पण तयारी आहे.वीरभद्र म्हणाला ठीक आहे,आता मला काही प्रयोग करायचे आहेत.सर्वप्रथ मी तुला संमोहित करून माहिती घेणार आहे आणि गरज पडलीच तर पुढचा प्रयोग करेल.वीरभद्र ने अनिकेत ला त्याने खास बनवून घेतलेल्या खुर्चीवर बसविले.टेपरेकॉर्डरवर विशिष्ट संगीत सुरू करून अनिकेत ला संमोहनवस्थेत नेले.त्याला वेगवेगळे प्रश्न विचारले पण त्यामुळे वीरभद्रचे समाधान झाले नाही.त्याने अनिकेतला संमोहन अवस्थेतून बाहेर आणले व पुढील प्रयोगाच्या तयारीला लागला. त्याच्या खोलीत वेगवेगळ्या द्रावनांच्या बॉटल होत्या त्यातील एका बॉटल मधील द्रावण त्याने पात्रात घेतले.ते पात्र व एक इंजेक्शन घेऊन अनिकेत जवळ येत त्याला म्हणाला की मला तुझ थोड रक्त काढायचे आहे.अनिकेत ने प्रश्नार्थक नजरेने वीरभद्र कडे पाहिल्यावर वीरभद्र हसून म्हणाला विश्वास ठेव तुझ्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे द्यायला मी बांधील आहे.युद्ध लढण्यासाठी रणांगणावर उतरण्याअगोदर आपल्या शत्रूचा,त्याच्या कमकुवत तसेच बलस्थानांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.इथं शत्रू कोण हे अज्ञात आहे.त्याचा शोध घेतल्यावर मग पुढची रणनीती आखणे सोपे जाईल.अनिकेतने सहमती दर्शविल्यावर वीरभद्रने त्याचे रक्त काढून त्या पात्रातील द्रावणात मिसळले.नंतर ते द्रावण घेऊन तो आपल्या खास बनविलेल्या चौरंग सदृश्य आसनावर बसला.अनिकेत त्याच्या प्रत्येक कृतीकडे टक लावून पाहत होता.वीरभद्र ने अनिकेत चे रक्त मिसळलेले पात्र तोंडाला लावून गटागटा पिले व ध्यानस्थ बसला
ते पाहून अनिकेत ला शिसारी आली पण भावनावरील निरातीशय प्रेम त्याला गप्प बसण्यास बाध्य करत होते.अर्धा तास ध्यानमग्न राहिल्यावर वीरभद्रने डोळे उघडले.त्याचा चेहरा चितामग्न दिसत होता.आसनावर उठून अनिकेत जवळ येत तो म्हणाला की तू जेव्हा भावनाला भेटायला तिच्या घरी गेला होतास ते दृश्य मी बघितले आणि तिच्या चेहऱ्यावरील हिंस्र भाव पाहून ती कुठल्यातरी अमानवी शक्तीच्या छायेखाली असून तिच्या जीवाला धोका आहे.विशेष म्हणजे ती शक्ती स्वतःहून आली नाही वा भावना पण स्वतःहून त्या शक्तीच्या कचाट्यात सापडली नसून तिला बोलाविण्यात आलेले आहे.तिला कुणी व कशासाठी बोलाविले याचा लवकरात लवकर शोध घेतला नाही तर भावनाचा मृत्य अटळ आहे.वीरभद्रचे बोलणे ऐकून अनिकेत सुन्न झाला.काही हालचाल न करता फक्त शुन्यात नजर लावून बसला.वीरभद्रने दिलेल्या हाकाही त्यांच्यापर्यंत पोहचल्या नाहीत.शेवटी वीरभद्र ने त्याच्या खांद्याला जोराने हलविले तेव्हा तो भानावर आला.त्याने रडत रडत वीरभद्रच्या पायावर लोटांगण घेत भावनाला वाचविण्याची विनंती केली.वीरभद्र ने त्याला उठविले व म्हणाला मी माझ्यापरीने सर्वतोपरी प्रयत्न करेल.तीन दिवसांनी अमावस्या आहे.तोपर्यंत तरी ती शक्ती भावनाला काहीच करणार नाही.अमावशेच्या रात्री आपण भावनाच्या घरी जाऊन या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावू. भावनाचे घर हे या युद्धाचे रणांगण आहे.वीरभद्र खोलीतील एक कपाट उघडून त्यातून रुद्राक्ष असलेले लॉकेट काढले.ते लॉकेट अनिकेत च्या गळ्यात टाकून म्हणाला आज रात्री तु झोपेत परत भावनाला भेटायला जाशील तेव्हा माझा देह इथंच असेल पण मनाने मी तुझ्यासोबत येईल.फक्त पुर्वी भावनाला भेटायच्या आवेशात तु त्या जागेचे,भोवतालच्या परिसराचे निरीक्षण केले नाहीत,यावेळेस सूक्ष्म निरीक्षण कर.जर माझा तर्क बरोबर असला तर भावना तिथे नसणार.अनिकेतने मान डोलावली व म्हणाला की हे लॉकेट कशासाठी व हे माझ्या गळ्यात त्या ठिकाणी येईल का? वीरभद्र म्हणाला हे लॉकेट वेळ आलीच तर तुझ्या रक्षणासाठी. मी मनाने तुझ्या सोबत असेल पण माझ्या शक्तीवर मर्यादा राहतील व राहला विषय तुझ्यासोबत लॉकेट तिथं येण्याचा तर माझा साधा तर्क आहे की जर भावनाच्या कानातील डुल स्वप्नांच्या दुनियेतून प्रत्यक्ष जगात येऊ शकते तर लॉकेट पण तिथं जाऊ शकते ना.
रात्री अनिकेत झोपी गेला तसा वीरभद्र आपल्या खास आसनावर जाऊन ध्यानस्थ बसला.थोडया वेळाने अनिकेत गाढ झोपेत जाऊन त्याचा प्रवास भावना भेटते त्या ठिकाणी सुरू झाला.तेच जंगल,तीच झाडे पण यावेळेस वीरभद्रच्या सुचनेमुळे अनिकेत त्यांचं बारकाईने निरीक्षण करत होता.झोपडीजवळ पोहचल्यावर झोपडी समोरील दगड रिकामा होता.त्या परिसराचे निरीक्षण केल्यावर आपण ही जागा पूर्वी पाहिलेली आहे असं अनिकेतला वाटू लागले.त्याने भावनाला आवाज दिला पण प्रतिसाद मिळाला नाही.अचानक वातावरणात घुबडांचे घुत्कार ऐकू येऊ लागले, कुत्रे हेल काढून जोरजोराने रडू लागले.रातकिड्यांची किरकिर वाढली.थोडया वेळा पूर्वी प्रसन्न वाटणाऱ्या रात्रीचे रूपांतर भयाण अन भकास रात्रीत झाले.अनिकेतला अचानक गळा घोटल्यासारखे वाटू लागले.त्याक्षणी त्याच्या कानांवर वीरभद्र चा आवाज आला,निघ लवकर इथून. पण अनिकेत चे पाय जाग्यावरून हलत नव्हते.जायबंदी झाल्यासारखा तो एकाच जागी उभा होता.मन वीरभद्राची तेथून निघायची सूचना मानायला तयार होते पण शरीर साथ देत नव्हते.अनिकेतला दुरून कुणीतरी बीभत्स आवाज काढत त्वेषाने धावून येत असल्याचा भास झाला आणि त्याचवेळी अनिकेतच्या गळ्यातील रुद्राक्ष जोराने गोल गोल फिरायला लागला.रुद्राक्षाच्या फिरण्याबरोबर अनिकेत चे पायांनी पण माघारी धावायला सुरुवात केली.परत येता येता अनिकेतला एक व्यक्ती पण पळताना दिसली. त्याला पाहून अनिकेत आश्चर्यचकित झाला.तो व्यक्ती इथं कसा आला व काय करतो हा खूप मोठा प्रश्न अनिकेत ला पडला.रोहन होता तो...
दुसऱ्या दिवशी सकाळी अनिकेतला जाग आली ती शिवस्तोत्राने.वीरभद्र म्हणत होता ते.अनिकेतला जागी झालेले पाहून वीरभद्र त्याच्याजवळ आला.त्याच्या चेहऱ्यावरून त्याला खूप काही सांगायचे असल्याचे त्याच्या लक्षात आले.वीरभद्र म्हणाला की काही सांगायची गरज नाही.मी मनाने तुझ्या सोबत होतो.तु जे पाहिले ते सर्व मी पण पाहिले.तु प्रथम सकाळची कार्ये उरकून घे.तुझ्यामनावर खूप ताण आलेला आहे.मस्त कॉफी पीत चर्चा करू.एका तासाने अनिकेत तयार होऊन आला.वीरभद्र त्याच्या हातात कॉफीचा कप देत म्हणाला आता सांग ती जागा तीच आहे न एकदा पावसाळ्यात तु अन भावना तिथं सहलीला गेले होते,दोघेपण मनसोक्त पावसात भिजले होते? आणि परत येतांना तुला दिसलेला मुलगा रोहनच होता न?अनिकेत होकारार्थी मान हलवत म्हणाला ती जागा भावना च्या खूप आवडती जागा असून महाबळेश्वरच्या जंगलात आहे.रोहनच्या गावजवळच ती जागा असून भावना सुटीत रोहनच्या गावाला गेली की तिथे नेहमी जात असायची.पण तुम्ही कसे ओळखले?रोहन तुमच्या परिचयाचा कसा?वीरभद्र स्मितहास्य करत म्हणाला मित्रा मी तुझ्या रक्ताचे प्राशन त्या द्रावणात टाकून उगाच पीलो नाही.ते पील्यामुळे तुझ्या जन्मापासून तु केलेली प्रत्येक गोष्टींचा,तुझ्या सानिध्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा,सोप्या शब्दात तुझ्या आतापर्यंतच्या आयुष्यापटलाचा अभ्यास केला.अरे ते नाही का रे तुम्ही ब्लेड या हॉलीवूड चित्रपटात बघता तसंच. फक्त चित्रपटात ड्रॅकुला स्वतःचे दात खुपसून रक्त पितो व त्या व्यक्तीच्या पूर्वायुष्यात डोकावतो एवढाच काय तो फरक.वीरभद्र चे बोलणे ऐकून अनिकेतच्या मनात त्याच्याप्रती आदर निर्माण झाला.रोहन तिथे काय करत होता व तो तिथे कसा आला हे अनाकलनीय होत. तो तिथे आला होता याचा अर्थ सर्व प्रकारामागे त्याचाच हात असावा अशी शंका अनिकेतला येत होती.त्याला रोहनचे भावना ला भेटू न देणे,त्याला धमक्या देणे या गोष्टींचा विचार करून शंका अजुनच बळकट होत होती.तितक्यात वीरभद्र ने त्याला अजून एक धक्का दिला.वीरभद्र त्याला म्हणाला की आता अमावस्येच्या दिवशी भावनाच्या घरी जाण्याअगोदर तिच्या आईवडिलांना पूर्वकल्पना देणे गरजेचे असून तु उठण्याअगोदरच मी त्यांना फोन करून इकडे बोलाविले आहे.आता फक्त वेड्यासारखा माझ्याकडे त्यांचा नंबर कसा आला ते विचारू नकोस.तुझ रक्त पिल्यापासून तुझी प्रत्येक गोष्ट मला माहित आहे अगदी तुझा अन भावनाचा प्रणयसुद्धा. अनिकेतचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.दुपारी भावनाचे आईवडील आल्यावर वीरभद्र ने त्यांना सर्व गोष्टींची कल्पना दिली.जर अमावस्येच्या रात्री भावनाला त्या अमानवी शक्तीच्या अंमलाखालुन बाहेर काढले नाही तर ती दुसऱ्या दिवशी सकाळी या जगात राहणार नसल्याचे सांगितले. हे ऐकून भावनाची आई रडायला लागली.त्या दोघांनी भावनावर खूप उपाय केले,औषध उपचार केलेत पण फरक पडला नव्हता.शेवटी हा उपाय पण करून पाहू म्हणून ते तयार झाले. अमावस्येच्या पहिल्या रात्री वीरभद्रअनिकेत ला न सांगता कुठेतरी बाहेर गेला तो दुसऱ्या दिवशी सकाळीच आला.अमावस्येच्या दिवशी वीरभद्र ने वेगवेगळ्या रंगाचे द्रावण,रुद्राक्षांच्या माळा, विचित्र दिसणाऱ्या अगरबत्ती,खास बनविलेल्या मेणबत्या आणि काही हाडं, त्रिशूळ आणि इतर सामान एका बॅगेत भरले व आपल्या खास आसनावर ध्यानस्थ बसला.ध्यान..ताण व तणावापासून मुक्त करून देणारी,तुमच्यातील नकारात्मक विचार ऊर्जा काढून सकारात्मक ऊर्जा भरणारी साधना.तेच कदाचित वीरभद्र च्या शक्तीचे स्रोत असेल.अनिकेत ने पण वडिलांना फोन करून इतर काहीही न सांगता भावनाच्या घरी जात असल्याचे कळविले.अनिकेत ज्या परिस्थितीमधून जात होता ते त्याच्या वडिलांनी पाहिले होते.त्यांनी पण अनिकेतच्या सोबत भावनाच्या घरी येण्याचा हट्ट धरला.त्यांना बाकी काहीच विषय माहीत नव्हता पण अनिकेत तिथे गेल्यावर भांडण व्हायला नकोत म्हणून ते येत असतील असा विचार करून अनिकेतने तिथे यायला परवानगी दिली.
अमावस्येच्या भयाण दिवसाची ती संध्याकाळ.रात्री काय होईल या हुरहुरीने व विचाराने अनिकेतला कापरे सुटत होते.पण वीरभद्र मात्र कुठली तरी पांढरी भुकटी अंगाला लावत असल्याचे त्याला दिसले.भुकटी लावणे झाल्यावर वीरभद्र अनिकेत जवळ आला.त्याच्या हातावर एक भगवा धागा बांधुन म्हणाला की काहीही झाले तरी,कितीही भ्रम झाले तरी माझ्याकडे बघायचे. गळ्यातील लॉकेट व हातातील धागा काढायचा नाही.वीरभद्र ने पूर्ण काळे कपडे घातले होते.काळे कपडे,गळ्यातील रुद्राक्षांच्या माळा, डोक्यावर भले मोठे शिवगंध रेखाटलेले असे त्याचे रूप पाहिल्यावर अनिकेत च्या मनात विचार आला की रात्री जे दिसेल ते दिसेल पण याच्याकडे आताच पाहिल्यावर भीती वाटते.ते निघाले.रात्री दहा वाजता ते भावनाच्या घरी पोहचले.अनिकेत चे वडील अगोदरच तिथे आलेले होते.भावनाच्या घरी पोहचल्यावर रोहन अनिकेत कडे पाहून गूढ हसला.वीरभद्र ने भावनाच्या रूम मध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली तसेच रूम मध्ये भावना, तो,अनिकेत इतकेच लोक राहतील व बाकीच्यांना बाहेर थांबण्यास सांगितले पण रोहन,भावनाच्या वडिलांनी भावनाच्या रूम मध्ये येण्याविषयी हट्ट धरला.अनिकेतच्या वडिलांना एकटे न ठेवता त्यांना पण सोबत घेण्यात आले.नाईलाजाने वीरभद्र त्या सर्वांना रूम मध्ये न्यायला राजी झाला.भावनाच्या रूम मध्ये तेही रात्री प्रवेश करतांना मागील प्रसंग आठवून अनिकेत ची छाती धडधड करत होती.त्याच्या हृदयाचे ठोके त्यालाच ऐकू येत होते.भावनाच्या रूम मध्ये प्रवेश केला तेव्हा भावना रुममध्ये कुठंच नव्हती.खळकन लाईट फुटल्याचा आवाज होऊन खोलीत अंधार पसरला.दरवाजा आपोआप बंद होऊन अनिकेत,रोहन,भावनाचे व अनिकेतचे वडील आणि वीरभद्र यांच्या परतीचे दरवाजे बंद झाले आणि अचानक छतावरून भावनाचे वेडसर माणसासारखे हसणे ऐकू आले.ते हसणे ऐकून सर्वांच्या अंगावर सरसरून काटे उभे राहिले,फक्त दोन व्यक्ती याला अपवाद होते.एक स्वतः भावना तर दुसरा वीरभद्र.भावनाच्या वडिलांनी चाचपडत माचीस शोधून काडी उगविली पण छतावरून फुंकर मारून भावनाने ती विझविली. असा प्रकार आठ ते दहा वेळा झाला.अंधाराला सरसावलेल्या वीरभद्रच्या सराईत नजरेने बॅगमधून त्याच्या खास मेणबत्या काढून रूम मध्ये लावायला सुरुवात केली.भावनाने त्या विझविण्याचा खूप प्रयत्न केला पण त्या वीरभद्र ने बनविलेल्या मेणबत्या होत्या आणि म्हणूनच खास होत्या.कुठलीही अमानवी शक्ती त्या विझवू शकत नव्हती.रूम मध्ये मेणबत्याच्या प्रकाशात सर्वांनी वर पाहले अन वीरभद्र वगळता सर्वांची बोबडी वळाली. भावना अक्षरशः रस्यावरून चालत जाण्यासारखी छताला चिपकुन दात विचकत चालत होती.तोंडातून लाळ गळत होती.तिच्या दातांवर दात घसण्याचा आवाज मनात धडकी भरवीत होता.छतावरून उडी मारून ती सरळ अनिकेतच्या समोर आली व घशातून घरघर करत पुरुषी आवाजात म्हणाली आलास तु,मागील प्रसंगातून काहीच शिकला नाहीस.ठीक आहे आलाच तर परत कसा जातो तेच पाहते असे म्हणत तीने अनिकेत ला हात लावायचा प्रयत्न केला पण ती दूर फेकल्या गेली.दूर फेकल्यावर ती पुन्हा चवताळून अनिकेतच्या अंगावर जात होती व परत फेकल्या जात होती. अनिकेतच्या गळ्यातील रुद्राक्षाचे लॉकेट व हातातील धागा आपले काम चोख बजावीत होते.या मध्येच वीरभद्र ने बॅगेतून अगरबत्ती काढून खोलीत लावल्या तसेच त्रिशूल काढून खोलीतल्या कोण्याही कोपऱ्यातून सहज नजरेत येईल अशा जागी ठेवला.बॅगेतून एक बॉटल काढून त्यातील द्रावण मंत्र म्हणत भावनाच्या अंगावर टाकले तशी ती जोरात किंचाळली आणि पहिल्यांदा तिच्यातील अमानवी शक्तीला वीरभद्रची जाणीव झाली.अनिकेत व इतर सर्वांचे रक्षण करण्याची क्षमता व कवच फक्त वीरभद्र असल्याचे त्या शक्तीला जाणवले.भावनाचे केस पुन्हा उभे राहिले.वेडी वाकडी मान हलवीत,चार पायांवर धावत येत तिने जबडा वासून वीरभद्र वर झेप घेतली पण,पण वीरभद्र च्या जवळ पोहण्या अगोदरच ती दुप्पट वेगाने दूर फेकल्या गेली. वीरभद्रचे तिच्या अंगावर पाणी टाकणे सुरूच होते.अचानक भावना शांत होऊन रडायला लागली.दिनवाना चेहरा करून अनिकेतला म्हणाली बघ अनिकेत माझे काय हाल होत आहेत,माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे रे.अश्याने मी मरून जाईल ना.अरे तुझ्यादेखत हा काळा कपडे घातलेला माणूस मला त्रास देत आहे.अनिकेत काही क्षण भान विसरून पुढे जायला निघाला तेव्हा त्याला वीरभद्र चे शब्द आठवले.त्याने वीरभद्रकडे पाहिले.वीरभद्र ने त्याला मानेने नकार दिल्यावर तो जाग्यावर थांबला.वीरभद्रच्या मंत्रोपचार व द्रावणाने भावना शांत झाली.वीरभद्र तीला म्हणाला सांग आता तू कोण आहेस,भावनाला का त्रास देत आहेस.भावना पुरुषी आवाजात म्हणाली मी तर माझ्या अंधाराच्या स्वामींचा साधा हस्तक आहे.मला हरविले म्हणून स्वतःला महान समजू नकोस,बाराच्या ठोक्याला माझे स्वामी खुद्द येतील तेव्हा तु त्यांच्यासमोर किती टिकतोस ते पाहू आणि राहला भावनाला त्रास द्यायचा विषय तर तिच्या नाशासाठी तुमच्यातीलच एकाने आम्हाला आमंत्रित केले आहे.तीने तसे म्हटल्याबरोबरच वीरभद्र व अनिकेतच्या नजरा रोहन कडे वळल्या.रोहनची नजर अजुनही गूढ गूढ होत होती...