The Newspaperलेखक : ज्योती कुंभार
भाग १
संध्याकाळचे 6 वाजलेले. नागपुरच्या रस्त्यांवरची वर्दळ वाढली होती. आपापल्या कामावरुन परतणारी माणसे घाईतच आपापल्या घरांच्या दिशेने निघाली होती. ट्रॅफिकमध्ये अचानक वाजलेल्या गाड्यांच्या हॉर्नमुळे, बसच्या खिडकीत डोके ठेऊन झोपलेल्या तुषारची झोप मोडली. नाईलाजाने भुवया उंचावत त्याने कसेबसे डोळे उघडले व खिडकीतुन डोकावले. बाहेर एका बाईकवर एक कॉलेज कपल चिपकुन बसलेलं होतं. बाईक थोडीशी पुढे गेली आणि तुषारची नजर मागे बसलेल्या त्या मुलीच्या कामुक बांध्याकडे गेली. क्षणभर डोळे न लवता पाहत त्याने झोपेत नकळत आपल्या ओठांवर आलेली लाळ हाताने पुसली. पुसता पुसता त्याने लक्ष आपल्या शेजारी गेले, शेजारचा एक वयस्क माणुस त्याला सारखा घुरत होता. तुषारने त्याच्याकडे पाहुन थोडावेळ बाहेर पाहीले, तो माणुस अजुनही तुषारला तसाच घुरतच होता. शांत स्वभाव असलेल्या तुषारने त्याकडे दुर्लक्ष करता बाहेरचे दृश्य पाहणे पसंत केले.
तुषारचा स्टॉप जवळ येत होता म्हणुन आपली ऑफिसची बॅग खांद्यावर घेऊन बसच्या दाराशी जाऊन उभा राहीला. काही सेकंदात त्याचा स्टॉप आला. बसमधुन उतरताच आपल्या खांद्यावरची बॅग नीट सावरण्याचा प्रयत्नात रस्त्यावर चालणार्या एका माणसाला त्याचा धक्का लागला.
"काय रे, आंधळ्या दिसत नाही काय?" त्या माणसाने रागेत विचारले.
"सॉरी! सॉरी!" म्हणत तुषारने विनम्रतेने माफी मागितली. तसा तो माणुस डोळे दाखवुन तोंडातल्या तोंडात पुटपुटत पुढे चालायला लागला. तुषारही आपल्या मार्गी लागला.
तुषार साठे, 26 वर्षांचा तरुण, दिसायला देखणा, अतिशय शांत स्वभाव, जास्त कोणांत न मिसळणारा, एकलकोंडेपणा आवडणारा आणि अतिशय भित्रेपणाची वृत्ती असणारा. तोच स्वत:चा मित्र होता आणि तोच स्वत:चा आई-वडील होता. होय, दोन वर्षांपुर्वीच त्याच्या आई-वडीलांचा मुंबईतील राहत्याघरी खुन झाला होता. तेव्हापासुन खचलेल्या तुषारने कशीबशी आपली इंजिनिअरींगची डिग्री पुर्ण केली व सरळ नागपुरला निघुन आला होता. येथे त्याने एका नामांकीत कंपनीत जॉब मिळविला होता. कंपनीतही त्याचे खास असे कोणी मित्र नव्हते, त्याला ठाऊक होते की कुणाशी जास्त संवाद नसल्यामुळे अनेकदा त्याची तक्रार वरपर्यंत जाते पण त्याचा आपल्या कामाशी असलेल्या प्रामाणिकपणा पाहुन सिनिअर लोकंही त्याला काही बोलत नाहीत.
सकाळी तयारी करुन आपल्या कामावर जाणे व कामावरुन परतणे, दररोजचा हाच त्याचा दिनक्रम असायचा. ह्या दोन वर्षांत त्याने कधीही एकदा बाहेर जाऊन एखादा सिनेमा, नाटक वा फिरण्याचा कार्यक्रम केला नव्हता. अगदी सुट्टीच्या दिवशीही तो त्याचा भाड्याचा घरातच पडुन राहत असे, त्याचा घरातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे टीव्ही, फक्त तोच त्याचा एकांतपणाचा साथीदार होता. कोणाशी फोन वा शेजार्यांशी बोलणे सहसा घडत नसायचे. त्याला जिवनात कसलेही टेंशन नको होते कारण त्याचा अंगात थोडेही टेंशन सहन करण्याची ताकद नव्हती. त्याला त्याचे आयुष्य एकांतातच आणि सुरळीत जगायचे होते म्हणुनच त्याने आजपर्यंत कधीच कसलाही लोभ केला नव्हता. मग ते पैसा असो वा सेक्स. सेक्सलाईफ तर जणु त्याचासाठी एक गुढ होते, या जिवनात तरी उपभोगता येईल की नाही याची काही खात्री नव्हती. म्हणुनच आयुष्यात आतापर्यंत एकही गर्लफ्रेंड झाली नव्हती; अर्थात त्याला मुलींबद्द्ल तसले आकर्षण तर होतेच पण कधी डेरींग झाली नव्हती आणि असेही त्याचा ऑफिसमधल्या सर्व मुली त्याला 'अजीब' मानायच्या. आपल्या भित्रेपणामुळे नेहमी कंपनीच्या वार्षिक कार्यक्रमाचा वेळी त्याचा आजारीपणाचा अर्ज ठरलेला असे, कारण त्या सर्व गोष्टी (गेम्स, फनी चॅलेंजेस, ट्रीप, सर्वांसमोर स्टेजवर बोलणे) ह्या त्याचा बिरादरीतल्या नव्हत्या. अश्या एकांतपणाच्या व एकाप्रकारे दयनीय अश्या अवस्थेत तुषारची जिंदगी चालत होती. नो फॅमिली..., नो फ्रेंड्स..., नो गर्लफ्रेंड..., नो इंजोयमेंट..., नो फन....एंड नो थ्रील...!
तुषार बसमधुन उतरुन आपल्या घराकडे निघालाच होता. लवकर जाऊन त्याला त्याचे आवडते जिरा राईस व दाल तडका बनवायचे होते. त्याच विचारात असताना रस्त्यावर एक मोठ्ठा आवाज झाला,
धड्डाम्म्म...बुम्म्म्म....!!!
त्याचा डोळयांसमोरच कार आणि बाईकचा भीषण अपघात घडला होता. कारने दिलेल्या जोरदार धडकेमुळे बाईकस्वार जणु एखाद्या पुतळ्याप्रमाणे रस्त्याचा कडेला फेकला गेला, त्याचा बाईकचा तर अक्षरश: चेंदामेंदा झाला होता. तोच मागुन येणार्या एका ट्रकने त्या कारला मागुन ठोकले व कार एखाद्या खेळण्यासारखी हवेत घिरक्या घेत उडाली. कारमधील माणसांचे शरीरांचे तुकडे हवेत इतरत्र उडत होते. तुषार जागीच थांबुन ते दृश्य पाहात होता त्याचे पाय तर केव्हाच थरथरायला लागले होते. तो पुर्णपणे गार पडला होता. क्षणांत सर्वत्र शांतता पसरली, आजुबाजुचे सर्व लोकं त्या ठिकाणी मदतीसाठी धावले. तुषारने आपल्या हातांचे थरथरणे थांबविण्यासाठी आपल्या ऑफिसच्या बॅगची पट्टी घट्ट धरुन घेतली. सावकाश पावलं टाकीत तोही त्या अपघाताच्या ठिकाणी जाऊ लागला. लोकांच्या गर्दीतुन मार्ग काढीत त्याने ते ठिकाण गाठले.
सर्व लोकं आरडाओरड करीत होते. एकप्रकारे कल्लोळ माजला होता तेथे, कोणी पोलिसांना फोन लावीत होते तर कोणी एंबुलंसला. लोकांच्या त्या गर्दीत मुश्किलीने मोजकेच जण पुढाकार घेऊन जखमींना व मृतांना बाहेर काढीत होते. बाकी मात्र बघ्याची भुमिका घेऊन सर्व नजारा पाहत उभे होते, तुषार हाही त्यातलाच एक होता! ते जीव हेलावणारे दृश्य पाहुन तो जास्त वेळ तेथे थांबु शकत नव्हता. त्याने पॅंटच्या खिशातील हातरुमाल काढुन कपाळावरील घाम पुसला. तेथुन निघायच्या विचाराने तो तेथुन पलटणार तोच त्याचे लक्ष समोर उभ्या असलेल्या एका विचित्र इसमाकडे गेले जो त्याचाकडे सारखा पाहत होता. तुषारपासुन तो इसम जवळजवळ 20 पावलांवर उभा होता. रंगाने सावळा व साधारणत: पस्तिशीतल्या त्या इसमाने एक अतिशय मळलेले पांढर्या रंगाचे शर्ट घातले होते (जे आता राखाडी रंगाचे दिसत होते), पॅंटच्या नावावर एक पायजमा घातला होता ज्याला त्याने एका काळ्या दोर्याने कमरेभोवती बांधुन कसेबसे अडकवले होते, त्याचे केसं काळेपांढरट आणि अगदी विस्कटलेले होते, तुषारला पाहता पाहता त्याने दात विचकुन हसण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याचे ते किडलेले काळसर दात नजरेस पडले. अतिशय कट्टर भिकार्यासारखा अवतार होता त्या इसमाचा. त्याचा हातात एका वर्तमानपत्राचा रोल होता. तो इसम तुषारला हळुच इशारा करुन बोलावु लागला. तुषारला तो कोणी वेडाबिडा असल्याचा भास झाला. आज अश्या विचित्र लोकांशी का सामना होतोय माझा? तो बसमधला घुरणारा व्यक्ती आणि आता हा? असा विचार करीत तुषार त्या इसमाकडे दुर्लक्ष करुन तेथुन निघण्यासाठी पलटला. तोच समोर तो इसम चक्क त्याचासमोर उभा होता आणि यावेळेस त्या दोघांतले अंतर फक्त काही सेंटीमीटर्सचे होते. तुषार हृद्य अगदी गळ्यापर्यंत गेल्यागत दचकला. तो इसम एवढ्या लवकर तिकडच्या इकडे कसा आला असावा याचे त्याला अहम आश्चर्य वाटले होते आणि थोडीशी भितीही वाटली होती.
तो इसम तुषारकडे पाहत पुन्हा दात विचकुन हसु लागला. यावेळेस त्याच्या सुकलेल्या ओठांपलीकडील त्याचे किडलेले काळसर-तपकिरी दात स्पष्ट दिसत होते. तुषार त्याला आश्चर्यात पाहतच त्याच्या बाजुने जाण्याचा प्रयत्न करु लागला पण त्याने आपला हात आडवा करुन तुषारच्या मार्ग अडविला व आपल्याकडील न्युजपेपर त्याचासमोर धरला.
"सर! एक म्मिनिट.. ह्या एक नवा न्युजपेपर आहे, घ्या ना?" तो विनवणी करीत म्हणाला.
"मम....मला नाही घ्यायचा!" तुषारने त्याचा न्युजपेपरवाल्या हाताला झिडकारले व पुढे चालु लागला.
"स्स्सर...सर....सरर..,, प्लीज, अतिशय उत्तम न्युजपेपर आहे. सकाळ, लोकमत, पुढारी किंवा महाराष्ट्र टाईम्सला काय करता असा न्युजपेपर कधी तुम्ही वाचला नसेल," तो पुन्हा मार्ग अडवुन विनवणी करु लागला. तुषारने त्याचाकडे दुर्लक्ष केले व पुढे चालु लागला. तो तोंडातल्या तोंडात पुटपुटत होता. तो इसम तसाच उभा राहुन तुषारच्या पाठमोरी आकृतीकडे पाहु लागला, त्याच्या चेहर्यावर आता रागीट हावभाव पसरलेले होते.
"सर...चांगला न्युजपेपर ए हो, कालचीच काय आजची सुद्धा बातमी आहे ह्या न्युजपेपरमध्ये," तो इसम ओरडला.
हे ऐकुन तुषार जागीच थबकला. तेव्हा तो इसम त्या न्युजपेपरमधील एक पान उघडुन त्याला दाखवीत होता. तुषार जागीच उभा होता आणि तो इसम जवळ आला.
"हे पाहा सर, आताचा अपघाताची न्युज! किती जागरुक ए पाहा हा न्युजपेपर," म्हणत त्याने ती न्युज तुषारला दाखविली.
ते पाहुन तुषार चाटच पडला, त्याचे डोळे आश्चर्याचा भरात विस्फारले आणि अंगावर शहारे आले. अगदी काही मिनिटांपुर्वी घडलेल्या त्या अपघाताची त्यात फोटोसहीत माहीती होती, 'कालीदास मार्गावर भीषण अपघात, 1 दुचाकीस्वार गंभीर जखमी तर कारमधील तिघांचा मृत्यु, ट्रकचालक फरार' ते पाहुन तुषारचा जीव भितीने आणि धक्क्याने जोरजोरात धडधडायला लागला, क्षणाचाही विलंब न करता तो आपल्या घराकडे पळत सुटला.
"अहो सर...सर..!!!" तो रहस्यमय इसम मागुन ओरडत राहीला.
तेवढ्यात एका व्यक्तीने त्या इसमाला धक्का मारुन हाकलुन लावले.
"ए चल्ले, चल. निघ इथुन! साले! कुठून कुठून येऊन जातात."
नाही...नाही... हे कसं काय असु शकते. अशीच जुनी बातमी असेल ती, पण...पण मी तारीख तर पाहीली, आजचीच तारीख होती त्यावर आणि शिवाय तो फोटोही तर सेम त्या अपघाताच्या सीनचाच वाटत होता. कदाचित... मलाच भ्रम झाला असावा पण तो माणुस किती विचित्र होता, असे विचार करीत तुषार त्याचा घराकडे पोहोचला.
घाईतच त्याने कुलूप उघडले व लागलीच स्वत:ला आत कोंडुन आतुन कडी लाऊन घेतली. तुषार तसाच दाराला टेकुन दम घेऊ लागला. आपला टाय त्याने थोडा लुस केला व टायने चेहर्यावरील घाम पुसला. थोडे मन शांत झाल्यावर त्याने आत जाऊन फ्रिजमधुन थंड पाण्याची बॉटल काढली व सोफ्यावर बसुन गटागटा गळ्यात ओतुन घेतली. थोडे पाणी चेहर्यावरही ओतुन घेतले. आता त्याला थोडे बरे वाटत होते. पंख्याचा हवेत त्याला चेहर्यावर गार असा सुखदायक ओलावा जाणवत होता म्हणुन तो तसाच सोफ्याला टेकुन वर मान करुन बसुन होता. गरागर फिरणार्या पंख्याचा पात्यांना पाहण्याचा प्रयत्न करताना त्याचा डोक्यात तेच विचार चालु होते. इतक्यात दाराची बेल वाजली व तुषार चमकलाच. त्याने आपल्या मनगटातील घड्याळ पाहीली, सात वाजायला आले होते. सहसा त्याच्या दाराची बेल दुधवाल्याशिवाय कोणीही वाजवित नव्हते, पण तीही फक्त सकाळी वाजते. यावेळेस कधी नव्हे ते कोण आले असावे याचे त्याला विलक्षण नवल वाटत होते. तो उठुन दारापाशी गेला व त्याने हळुच दाराची कडी उघडली.
"हॅलो सर!" तो विचित्र इसम भावहीन चेहर्याने म्हणाला.
"तु?" म्हणत तुषारने दार लावायचा प्रयत्न केला तोच त्या इसमाने त्यास थांबविले.
**क्रमशः**
भाग २
"नाही सर, प्लीज! ऐकुन तर घ्या!"
"पण तु इथपर्यंत पोहोचलाच कसा?? माझा पाठलाग करीत होतास का?" म्हणताना तुषारने बाहेरच्या आवारात बारीक नजर फिरवली. त्याला शंका होती की, ह्या व्यक्तीचे आणखी कोणी साथीदार तर नाहीत... पण तो व्यक्ती एकटाच होता.
"सर, फक्त एक महिन्यासाठी आमचा न्युजपेपर लाऊन घ्या. नंतर नाही आवडला तर लागल्यास बंद करुन टाका," तो पुन्हा विनवणी करीत म्हणाला.
"अरे, मला नाही लावायचा तुझा तो न्युजपेपर! असंही मला टाईम नसतो, सकाळी मी लवकर जातो," तुषार चिडत म्हणाला.
"काही प्रोब्लेम नाही सर, न्युजपेपर संध्याकाळचा आहे, प्लीज सर! माझ्या पोटापाण्याची व्यवस्था होऊन जाईल सर... प्लीज!" तो अक्षरश: गयावया करु लागला, हात जोडुन गिडगिडु लागला. तुषारला त्याचा अवताराकडे पाहुन त्याची दया आली. तुषार काही वेळ विचार करु लागला.
"ठीक आहे! पण फक्त एक महीना. त्यानंतर मला वाटले तर मी बंद करुन टाकेल, पण त्यानंतर असे येऊन मला त्रास द्यायचा नाही," तुषारने अट घातली.
"ठीक ए सर! ठीक ए!" आनंदात म्हणुन तो इसम तेथुन निघाला. जाताना त्याचा चेहर्यावर अजब क्रुर हास्य होते.
"ए एक मिनिट! तसे नाव काय आहे तुझ्या न्युजपेपरचे?" तो इसम मागे फिरला
"सत्य," जड शब्दांत म्हणत तो तेथुन निघाला. तुषारला त्याचे वाग़णे जरा विचित्रच वाटत होते. अतिशय किचकट असा समजण्यापलिकडचा होता तो इसम.
खाऊन-पिऊन झाल्यावर तुषारने टीव्ही चालु केला, पण त्याचा डोक्यात अजुनही त्या इसमाबद्द्ल विचारचक्र फिरत होते. टीव्हीवरील कार्यक्रमावर त्याचे लक्षच नव्हते, शेवटी कंटाळुन त्याने टीव्ही बंद केला. विचार विचार करता त्याला केला केव्हा गाढ झोप लागली तेच कळाले नाही.
रात्रीचे 2.30 वाजले होते, तुषार सोफ्यावरच आडवा होऊन गाढ झोपेत होता. बाहेर रस्त्यांवर शांत असलेल्या कुत्र्यांचे अचानक भुंकणे सुरु झाले. एकामागे एक कुत्रे जोरजोरात आहोटी घेऊ लागले होते. त्यांची ती आहोटी ऐकुन न घाबरणार्या व्यक्तीचीही अनेकदा घाबरगुंडी उडावी. त्या आहोंटीच्या खेळातच अचानक तुषारच्या घराच्या दरवाजा आपोआप उघडला गेला आणि त्यासोबतच आत शिरलेला एक थंड हवेचा झोत तुषारला आणखी गाढ झोपेत घेऊन गेला. झोपलेल्या तुषारचा जराशीही चाहुल लागली नव्हते की, तो रहस्यमय इसम त्याचा सोफ्यामागेच रक्ताने माखलेली कुर्हाड घेऊन उभा होता. त्याचा कपड्यांवरही रक्ताचे ओले डाग होते. तो एकसारखा तुषारच्या निद्रानीस्त चेहर्याकडे भावहीन अविर्भावाने पाहत होता. सावकाश त्याने आपल्या हातातील रक्तरंजित कुर्हाडीकडे पाहिले व पुढच्याच क्षणी तिला दोन्ही हातांनी हवेत उगारले. क्षणाचाही विलंब न करता त्याने आक्रोश करीत ती कुर्हाड तुषारवर चालवली.....
तुषारने घाबरुनच आपले डोळे उघडले व सोफ्यावर उठुन बसला. त्याने सोफ्याचा मागे व आपल्या अवतीभवती नीट पाहीले पण तेथे काहीही नव्हते. मधुर सकाळ झाली होती, बाहेर दुधवाला बेल वाजवित होता. आपले दोन्ही हात चेहर्यावर ठेऊन त्याने ते फक्त एक स्वप्न होते असे मनातल्या मनात म्हणुन सुटकेचा नि:श्वास टाकला.
"हुश्श्श...!"
दुध घेला जाताना त्याचा लक्षात आले की, दार उघडेच होते. कदाचित आपण दार लावायला विसरलो असणार असे समजुन त्याने दुध घेऊन दार लावले ऑफिसची तयारी करु लागला. सर्व आटोपल्यावर, कडक इस्रीचे फॉर्मल कपडे घालुन तो सोफ्यावर बसला व आपले फॉर्मल शुज घालु लागला. ते घालत असतानाच त्याला शुजच्या तळाला काही काळपट चिकट द्रव्य लागले असल्याचे जाणवले. त्याने बोटाने थोडे पुसुन पाहीले, तो द्रव्य घट्ट होता. त्याने वाकुन खाली पाहीले असता त्याला लाकडासारखी काही वस्तु दिसली. ती अनोळखी वस्तु पाहुन त्याचा भुवया नकळत जवळ आल्या. त्याने तो लाकुड पकडुन बाहेर खेचुन काढला, तो पुर्ण काढायचा आधीच ती वस्तु काय होती हे त्याचा लक्षात आले आणि त्याने ती वस्तु हातातुन फेकली व घाबरत उठुन दुर कोपर्यात जाऊन उभा राहीला.
तुषार अक्षरश: तळपायांपासुन ते डोक्याचा केसांपर्यंत थरथरत होता. आताच अंघोळ करुन फ्रेश झालेला त्याचा चेहरा घामाने डबडबला होता. ओंठ कापत होते, तोंडातुन शब्द फुटत नव्हते. ती वस्तु दुसरे तिसरे काही नसुन त्याचा स्वप्नातली ती रक्ताने माखलेली कुर्हाड होती! तुषारला स्वत:चा डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. हा फक्त त्याचा डोळ्यांचा भ्रम होता की सत्य यातच त्याची गोची होत होती. आपल्याला वेडबिड लागले की काय असे त्याला वाटुन आले, पण स्वत:ला सावरत त्याने ती जवळ जाऊन ती कुर्हाड उचलली. हे तर सत्य आहे, ही कुर्हाड तर खरी आहे, हा माझा भास नाही असे तुषारला वाटत असतानाच त्यावरील रक्त पाहुन त्याने ती कुर्हाड आत्ताचा आत्ता बाहेर फेकण्याचा विचार केला पण तेव्हाच त्याचा लक्षात आले की, जर कोणी आपल्याला अशी रक्तरंजित कुर्हाड फेकताना पाहीली तर बिनकामाचा पोलिसांचा ससेमिरा मागे लागेल. स्वत:चा भल्याचा विचार करुन त्याने ती कुर्हाड एका कापडात गुंडाळुन जवळच असलेल्या निर्मनुष्य भागातील नाल्यात फेकुन द्यायचे ठरविले. त्याने तसे केलेही....
आज ऑफिसच्या वेळेत एकदाही त्याचा मनात त्या इसमाबद्द्ल विचार आला नाही. तो त्या कुर्हाडीबद्द्लच विचार करीत होता. कोणी जर आपल्याला ती कुर्हाड फेकताना पाहिले असेल तर, कोणाचे रक्त होते त्यावर, जर त्या कुर्हाडीने कोणाचा खुन झाला असेल तर आणि आपल्यावर त्याचा आळ आला तर या विचारांनीच त्याचा आजचा दिवस खाऊन टाकला होता. ऑफिस सुटल्यावर तुषारला घराकडे जायची ओढ लागलेली होती. कधी एकदाचा घरी पोहोचु असे त्याला झाले होते कारण एक घरच असे ठिकाण होते जेथे त्याला नेहमी सुरक्षित वाटत असे. शिवाय दिवसभर आसपासच्या लोकांच्या घुरणार्या नजरांपासुनही काही वेळ त्याची सुटका होत असे. तो घराजवळ आला व त्याचे घाईतच चालणारे पाय घर आल्याचे समजताच आपोआप सावकाश झाले. तुषारने आपल्या खिशातील घराची चावी काढण्यासाठी खिशात हात टाकला आणि....
**क्रमशः**
भाग ३
त्याचे लक्ष घराच्या आवारात पडलेल्या न्युजपेपरच्या रोलकडे गेले. तेव्हा त्याचा लक्षात आले की, हा इसम नक्कीच न्युजपेपरच्या नावाखाली आपल्याला अडकविण्याचा प्रयत्नात आहे. पण तुषार आता त्याचाबद्द्ल कळवायला पोलिसांकडे जाऊही शकत नव्हता कारण ती रक्ताळलेली कुर्हाड त्याचाच घरात मिळाली होती. त्याला खुप पछतावा होत होता की, त्याने आवेशात येऊन ती कुर्हाड नाल्यात फेकावयास नको होती. जर खरंच खुन झाला असेल तर कदाचित पोलिसांनी त्याचा निर्दोषपणावर विश्वास केलाही असता. खुन त्या इसमानेच केला असणार याची तुषारला खात्री होती.
तो न्युजपेपर उचलुन घरात शिरला व नेहमीप्रमाणे फ्रिजमधील बॉटल काढुन थंड पाणी गटागटा गळ्यात ओतले. तो न्युजपेपर अजुनही त्याचा हातातच होता. सोफ्यावर विसावुन त्याने तो न्युजपेपर उघडला व त्यातुन एक कागदाचा तुकडा खाली पडला. तुषारने तो कागद उचलला असता त्यावर त्या इसमाने काहीतरी लिहीले असल्याचे त्यास समजले.
'पान नंबर 7 वाचण्यास विसरु नका!'
तुषारला हे अतिशय विचित्र वाटले, असे कोणी कोणाला मेसेज टाकत का की, हे पान वाचा ते पान वाचा म्हणुन. शेवटी त्याने उत्सुकतेपोटी न्युजपेपरचे पान नं. 7 उघडले. ते पान बाकीच्या पानांपेक्षा अतिशय वेगळे होते. अगदी जुनाट अश्या कागदावर छापलेले होते. त्या पानाच्या मध्यभागी लक्ष वेधुन घेणारी डार्क बॉर्डर असलेली एक चौकट होती जिच्यात एक बातमी छापलेली होती.
तुषारची ही बातमी वाचुन झाली न झाली तोच दाराची बेल वाजली.
ट्रिंग!... ट्रिंग्ग्ग!........
तुषार पुन्हा सावध झाला, तो न्युजपेपरवालाच असणार असे त्याला भासले. तुषारला आता त्या इसमाची लक्षणं काही योग्य वाटत नव्हती. आपल्याकडे त्याचे न्युजपेपर लावण्यासाठी आग्रह धरणे, आपला पाठलाग करुन घरापर्यंत पोहोचणे, मग ती रक्ताळलेली कुर्हाड? ह्या विचारात असतानाच बेल पुन्हा वाजली.
ट्रिंग! ट्रिंग! ट्रिंग्ग्ग!....
तुषार उठुन उभा राहीला व किचनमधुन चाकु घेऊन आला. स्वंरक्षणासाठी चाकु हातात घेऊन त्याने हळुच दार उघडले व त्या किंचित फटीतुन बाहेर डोकावुन पाहिले. बाहेर कुणीच दिसले नाही. सावकाश तुषारने दार संपुर्ण उघडले पण समोर कुणीच दिसत नव्हते. त्याने आजुबाजुस संपुर्ण परिसरावर लेजरप्रमाणे नजर फिरवली पण कोणीही आढळले नाही. गोंधळुन तो पुन्हा दार लावणार तोच तुषारला दाराचा उंबर्याशी एक खाकी पाकीट पडलेले दिसले. ते संदिग्ध पाकीट पाहुन त्याने पुन्हा चौकस नजर फिरवली.
“कोणी आहे का?...” त्याने हाक मारली (अर्थात ती हाक नसुन भितीयुक्त असा कापरा आवाज होता जो कदाचित शेजारच्या व्यक्तीलाही ऐकु गेला नसावा).
काहीही प्रतिसाद येत नाही हे पाहुन आणि मन नको म्हणत असतानाही त्याने ते पाकीट उचलले व घरात शिरुन दार लावुन घेतले. ते खाकी पाकीट बर्यापैकी वजनदार लागत होते. तुषारने दाराशी टेकुनच ते पाकीट उघडले व त्यात हात टाकुन आतील काहीतरी वस्तु वर ओढुन काढली. त्या वस्तुसकट हात बाहेर येताच त्याचा चेहर्याचा रंगच उडाला, त्याचा हातात एक चकाकती सोन्याची पोत होती. तिला पाहताच तुषारची प्रश्नार्थक नजर त्या न्युजपेपरवर गेली व त्याने लागलीच ते पाकीट सोफ्यावर उपडे गेले तर नोटांची एक गड्डी बाहेर पडली. त्याने वेळ न दडवता ते पैसे मोजुन काढले, ते बरोबर 25 हजार भरत होते. त्याचे डोळे आश्चर्याने विस्फारले गेले.
हे कसं शक्य आहे??? त्याचा मनात लगेच विचार आला की, कदाचित त्या इसमानेच तर हा पराक्रम करुन त्या चोरीची लुट माझ्या पत्थी तर आणुन ठेवली नसेल ना? पण तो असे का करीत आहे? काय बिघडवलयं मी त्याचे? तो व्यक्ती आणि हा न्युजपेपर काही काळा जादुचा प्रकार वगैरे तर नाही ना? असे अनेक प्रश्न तुषारला छळु लागले.
हे सगळेच त्याला विलक्षण रहस्यमय वाटु लागले होते....
समोर टिपॉयवर ती सोन्याची पोत व 25 हजारांची चोरीची कॅश ठेवलेली होती. तुषार सोफ्यावर बसुन बैचेनीत आपला डावा पाय हलवत त्यांकडे पाहत होता. मानसिक तणावात त्याचे हाताचे नखे चावणे चालु होते. त्याला असे वाटत होते की, तो आता ह्या चक्रातुन कधीही बाहेर पडु शकणार नाही. कुर्हाडवरील ते रक्त आठवताच त्याचे मन विचलित होत असे. आजची रात्र त्याला भुकतहानही लागली नव्हती. कसेही करुन त्याला त्या इसमापासुन सुटकारा मिळवायचा होता पण त्याचा मेंदुने जणु काम करणेच बंद करुन दिले होते.
हे सगळं आता आपल्या डोक्यावर येणार आणि कोणीही माझा विश्वास करणार नाही. सगळ्यांना असेच वाटेल की, त्या कुर्हाडीने केलेला खुन व या वस्तुंचा लुटीमागे माझाच हात आहे. न जाणे त्याने किती गुन्हे केले असणार त्याचा सर्व गुन्ह्यांचा जबाबदार आता कदाचित मलाच ठरविले जाणार. आपल्या सर्व गुन्हांची हंडी माझ्या डोक्यावर फोडुन तो स्वत: मात्र मोकळा फिरणार आणि मी जेलमध्ये बसुन जन्मठेपेची शिक्षा भोगणार...किंवा मृत्युदंडाचा फास्यात अडकणार...??
तुषार त्या रात्री भुकेपोटी झोपी गेला. झोप कसली, रात्रभर केलेल्या विचारांनी त्याचा मेंदुवर विलक्षण ताण पडला होता. अतिशय भित्रट अश्या त्याचा स्वभावामुळे त्याचा मेंदु जास्त तणाव सहन करु शकला नाही व तो काही वेळ डॉर्मंट कंडीशनमध्ये गेला होता. सकाळी लवकरच तो आपोआप शुद्धीवर आला. उठुन-उठुन सर्वात आधी घराचा दाराकडे पाहिले जे आज बंद होते मग त्याने सोफ्याखाली पाहीले जेथे आज काहीही नव्हते. त्याचा मनात आले की, आपण जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर हे घर सोडयला हवे. दुसरीकडे गेल्यावर निदान त्या इसमापासुन आणि या सर्व जाचापासुन आपली सुटका तर होईल. तुषारने एक घर खुप दिवसांपासुन पाहुन ठेवले होते. त्यामुळे ऐन वेळेवर घर शोधण्याची त्याला जास्त चिंताही वाटत नव्हती.
आज ऑफिसचा टाईम त्याने मोठ्या मुश्किलीने घालवला. त्याने पक्के ठरविले होते की, ह्या दोन दिवसांत कसेही करुन आपण घर बदलायचे. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर तो घाईने आपल्या घराकडे निघाला. मनाने अशांत तुषार चालता चालता अचानक मागे वळुन पाही. त्याला नेहमी असे वाटत होते की, तो इसम कुठूनतरी नेहमी त्याचावर नजर ठेऊन होता. जणु त्या इसमाची 'पुढची चाल' ठरलेली होती, आणि तो त्याला आणखी गंभीर गुन्ह्यांत अडकावयाचा प्रयत्न करणार होता. तुषार झपाझप चालत त्याचा घरापर्यंत पोहोचला, तशी त्याची चाल पुन्हा हळु व सावध झाली. त्याचे सर्वत्र नजर फिरवुन चोरुन पाहणे चालुच होते. घराचा आवारात त्याला आजच्या त्या रहस्यमय न्युजपेपरची आजची प्रत पडलेली दिसली. आज न्युजपेपर न वाचायचा विचार त्याचा मनात आला पण त्याचा अंगात आता अनपेक्षित धक्के पचवायची ताकद उरली नव्हती. त्याला मनात कुठेतरी असे वाटले की, ह्या न्युजपेपरमुळे आपण धक्क्यांना पचविण्यासाठी मानसिकरीत्या आधीच तयार होऊन जाऊ म्हणुन त्याने तो न्युजपेपर उचलला व घरात शिरला.
तुषारने हात थरथरतच तो न्युजपेपर टिपॉयवरुन उचलला ज्याचा बाजुला एक चाकु त्याने आधीच आणुन ठेवलेला होता. तुषारने अतिशय विषण्ण मन:स्थितीने त्या रहस्यमय न्युजपेपरचे पान नं. 7 उघडले....आणि वाचु लागला.
**क्रमशः**
भाग ४
तुषारचे संपुर्ण वाचुन होते न होते तोच अपेक्षेप्रमाणे दाराची बेल वाजली.
ट्रिंग!..ट्रिंग!...ट्रिंग्ग्ग!....
वेळ न घालवता तुषारने लगेच टिपॉयवरील चाकु उचलुन दाराकडे धाव घेतली. दार उघडुन त्याने पाहीले असता एक मोठी काळी रंगाची लेदरची बॅग दारापाशी पडलेली होती. तुषारने बाहेर निघुन पुर्ण परिसर नजरेने पिंजुन काढला. खुप वेळ तो तसाच बाहेर उभा होता. नाईलाजाने त्याने ती जड बॅग घरात ओढली व दार लाऊन घेतले. बॅगेची चेन उघडताच तुषार डोळे न लवता आत पाहात राहीला. आत हजार, पाचशे व शंभरच्या नोटांचा गड्ड्यांनी ती बॅग खाचोखाच भरलेली होती. तुषारने लागलीच तिची चेन पुन्हा लावली व तशीच पडु दिली. तो आता कपाळाला हात लाऊन खालीच बसुन होता. त्याला कल्पना आलीच होती की, ही कॅश त्या बॅंकेचीच आहे!
पण कोणी का स्वत:चा जीव धोक्यात घालुन बॅंक लुटेल आणि मग ती सगळी कॅश माझ्यादारी आणुन ठेवेल. काय मिळतयं त्यांना हे सर्व करुन? आणि माझ्याच मागे लागलेय हे लोकं? मी काय बिघडवलेय कोणाचे? कोणी का ह्या सर्व गुन्ह्यांचे खापर माझ्यावर फ़ोडु इच्छित आहे? मी तर आयुष्यात कधी कुणाला साधा उलटुनसुद्धा बोललेलो नाहीये, त्यामुळे कोणासोबत दुश्मनीचा तर प्रश्नच येत नाही. या दरम्यान तुषारचे पहिले मन अनेकदा त्याला पोलिसांकडे जाऊन सर्व कहाणी सांगावयास प्रवृत्त करीत होते पण दुसरे मन मात्र क्षणांत पहिल्या मनावर कुरघोडी करीत असे. आपण जर पोलिसांकडे गेलो तर ते काही एक विचार न करता आपल्याला सरळ आत टाकतील. त्यांना काय फक्त केस सोल्व करण्याशी मतलब... कदाचित 'त्या' लोकांची अशीच इच्छा असणार की, मी पोलिसांकडे जावे व फसुन जावे, पण मी... मी नाही जाणार.... नाही जाणार मी पोलिसांकडे...!!!
तुषार त्वरीत आपले जीवनापयोगी महत्त्वाचे सामान एका बॅगेत भरु लागला. त्याने आत्ताचा आता हे घर सोडुन जाण्याचा निर्णय घेतला होता. अंधार पडण्यास सुरुवात झाली होती. जर मी आत्ताचा आत्ता इथुन निघुन गेलो तर त्यांना कळणारही नाही मी कुठे गेलो ते, म्हणुन नंतर त्या विचित्र इसमाचेही टेंशन नाही आणि त्याचा त्या विचित्र न्युजपेपरचेही टेंशन नाही असा विचार करीत तुषारने गुपचुप त्या अंधारात आपली बॅग, ती पैशांची बॅग व त्या खाकी पाकीटासहीत ते घर सोडले व नव्या घरी पोहोचला जे त्याने खुप दिवसांपासुन पाहुन ठेवले होते. घरमालकासोबत त्याची चांगली ओळख होती, ते गृहस्थ वयाने जरा वयस्क होते व घरी एकटेच राहत असत. त्यांचे त्या एरीयात अनेक मालकीची घरे होती जी ते भाड्याने देत असत. पुढच्या काही मिनिटांनंतर तुषार त्याचा नव्या घरात होता. एका मोठ्या अडचणीतुन सुटल्याची भावना नकळतपणे त्याचा मनात संचारली होती. हे पाकीट आणि ही बॅग आपण कोठेतरी फेकुन देऊ किंवा नष्ट करुन टाकु असे ठरवुन त्याने निश्चिंत होऊन ती रात्र चांगल्या झोपेत काढली.
पुढच्या दिवशी तुषारने ऑफिसला सुट्टी टाकली. त्याला बाजारात जाऊन काही महत्त्वाचे सामान आणावयाचे होते. आपल्या जुन्या घराकडे जाऊन राहीलेले सामान आणायची त्याची अजिबात इच्छा नव्हती कारण त्याला भिती वाटत होती की, कदाचित तेथे 'ती' लोकं नजर ठेऊन असावीत. पुन्हा आपला पाठलाग करीत ते आपल्या नव्या ठिकाणाचाही पत्ता लावु शकतात याची त्याला पुर्णपणे कल्पना होती. त्याने आज रात्रीच्या अंधारात त्या पाकिटाची व पैशांच्या बॅगेची विल्हेवाट लावायचे ठरविले होते. ते काम एकदा फत्ते झाल्यावर त्याचा डोक्यावरील त्या गुन्ह्यांचा टांगत्या तलवारीपासुन त्याची कायमची सुटका होणार होती.
घाबरट तुषारचा अंगात आज नवीनच आनंदी असा तुषार जन्माला आला होता. आधी 'ब्लॅक एण्ड व्हाईट' वाटणारे हे जग त्याला रंगीत आणि सुंदर जाणवत होते. जणु जगण्याची नवी उमीद त्याला मिळाली होती. मागच्या काही दिवसांत त्याने खुप काही मानसिक त्रास सोसला होता, पण तो आता स्वत:ला जास्त खंबीर व योग्य वेळी योग्य निर्णय घेणारा परिपक्व माणुस समजु लागला होता. यामुळे त्याचा आत्मविश्वास कित्येक पटींनी वाढला होता. तरीही आपल्याला खुपच सावध राहावे लागणार याची त्याला संपुर्ण कल्पना होती. तो मुद्दामुनच संध्याकाळ होण्याची वाट पाहत होता. संध्याकाळ उलटली, पण त्याचा घराचा उघड्या दारासमोरुन कुणीही संशयित व्यक्ती फिरकला नव्हता शिवाय त्या विचित्र न्युजपेपरची वेळ तर केव्हाच निघुन गेली होती म्हणुन तो आपल्या नव्या घरात स्वत:ला अतिशय सुरक्षित असल्याचा अनुभव करु लागला होता.
अंधार पडायला सुरुवात झाल्यावर तुषार शांतपणे घराबाहेर पडला. जे जे काही महत्त्वाचे सामान त्याला घ्यायचे होते ते त्याने बराच वेळ घालवुन विकत घेतले. रिक्षाने परतताना तो सीटला अगदी खेटुन बसला होता जेणेकरुन रस्त्यावरील कोणीही व्यक्ती त्याला पाहु शकणार नाही. रिक्षाचे पैसे देऊन तो घराजवळ उतरला व घाईतच दाराशी आला. त्याने घराचा आवारात पुन्हा एकदा तीक्ष्ण नजर फिरवली. तेथे कोणताही न्युजपेपर पडलेला नव्हता हे पाहुन त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याचा चेहर्यावर समाधानाचे हास्य उमटले होते. त्याने आरामात घराचे दार उघडले. आज आपण अगदी रिलॅक्स लाईफचा आनंद घेऊ असे मनातल्या मनात म्हणत तो आत शिरला. तुषारने आज बाहेरुनच जेवायचे पार्सल आणले होते. चिकन आणि मच्छीचा स्वाद घेत त्याने डकार येईपर्यंत ताव मारला. आज खुप दिवसांनी त्याने खर्या जिवनाचा आनंद लुटल्यासारखे जगले होते. आज कसलेही टेंशन न घेता तो झोपी गेला. ही त्याचा जिवनातील आजपर्यंतची सर्वात सुंदर झोप होती....
पुढच्या दिवशी सकाळी तुषारला लवकरच जाग आली. त्याने अंघोळ केली, चहा प्यायची इच्छा झाली होती पण दुध नसल्याने त्याने किचनमधे न जाता बाहेरच चहा घेऊ असे ठरवले. आज पुर्ण जोशात त्याने नवा फॉर्मल शर्ट-पॅंट, नवे शुज, नवी घड्याळ घातली व तो ऑफिसला निघाला. रस्त्यावर जाता जाता त्�