( मी सायली कुलकर्णी . पहिल्यांदाच कथा लिहण्याचा प्रयत्न करत आहे . काही चुकले असेल तर मोठ्या मनाने माफ करा .काही सुधारणा असतील तर अवश्य सुचवा . ह्या कथेतील सर्व पात्रे , घटना व स्थळे काल्पनिक आहेत . ह्या गोष्टीतून कोणतीही अंधश्रद्धा पसरवायचा हेतू नाही . कथचे 3 पार्ट आहेत )
कथेचे नाव - नैवेद्य (पार्ट 1)
धानदेवी चे देऊळ गावा पासून खूप लांब . गावाची वेस ओलांडली की मुख्य रस्ता वरून डाव्या बाजूला एक तिरकी पायावाट लागायची , त्या पायवाटे वरून धानदेवी च्या देवळात जायला 2-3 तास लागायचे . धानगाव तस लहान गाव , कमी लोकसंख्या असलेलं . शहरा पासून खूप दूर त्या मूळे आधुनिक सोई सुविधा नसलेल . गावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती . गावात ग्रामदेवता होती . धानदेवी चे देऊळ धानगाव च्या वेशी बाहेर . ते देऊळ कुणी बांधले , कधी बांधले कुणालाच माहित न्हवते . देऊळ म्हणजे चार भिंती आणि आत एक दगडी निस्तेज मूर्ती . मूर्तीच्या साधारण दिसण्या वरून ती देवींची मूर्ती आहे हे समजत होते . बाकी त्या देवळात काहीच न्हवते . इतर देवळात जसे चैतन्य असते किंवा एक देवत्वाचा अनुभव येतो तसा तिथे अजिबात जाणवत नसे . धानगाव जवळ असल्याने त्या देवळाला लोक धानदेवी चे देऊळ असं बोलत . ना देवीची पूजाअर्चा रोज होत असे ना देवीला रोज नैवेद्य दाखवला जाई . ती देवी पण बिचारी एकटीच त्या डोंगरावर वाळीत टाकल्या सारखी राहत होती . कधी कोणी तरी एखादा माणूस देवीच्या दर्शनाला वाकडी वाट करून जाई . देवीच्या दर्शनाला त्या पायवाटेवरून सरळ जाताना एक तासाच्या अंतरावर आणखी एक छोटा फाटा लागत त्या फाट्यावरून लक्ष वेधून घ्यायचे ते मोठे झाड आणि रक्ता सारखी लालभडक त्याची मोठी फुले. ना कुणाला त्या झाडाचे नाव माहित होते ना त्या फुलांचे नाव . फक्त धानदेवीच्या देवळात जाताना त्या छोट्या फाट्या वरून जरा आत गेले की दिसायचे ते रक्ता सारख्या लालभडक फुलांचा पडलेला सडा आणि त्या झाडाचा मोठा बुंधा . ते झाड तेथे कोणी लावले हे कुणालाच माहित न्हवते . तसले झाड पूर्ण पंचक्रोशीत कुठेच न्हवते . पण त्या झाडाची आणि लाल फुलांची काही तरी खासियत होती , जी लोक धानदेवीच्या दर्शनाला जायची ती लोक भानामती झाल्या सारखी तिकडे आपोआप खेचली जायची , आणि अचानक गायब होत , कशी आणि कुठे हे कुणालाच समजत नसे . आणि तसेही धानगाव ची माणसे ही त्या देवळात जास्त जात नसत . मुख्य रस्त्यावर देवीच्या देवळा कडे जाण्याच्या मार्ग दर्शवणारा पांढरा दगड होता , पण तो सहजा सहजी लक्षात येत नसे .
भीमा आणि रामा दोघे पण नांदगावाचे. दोघे पण जिवलग मित्र .दोघांच्या आवडी - निवडी पण सारख्या . दिवसभर उनाड फिरणे , किरकोळ चोरी-मारी करणे , गरीब लोकांना फसवणे , भोंदूगिरी करणे हेच त्यांचे उद्योग . त्यांच्या घरचे पण त्यांच्या वागण्याला कंटाळलेले . दोघे सकाळ सकाळ घरातून पोटभर जेवण करून बाहेर पडले की रात्रीच्या जेवणा वेळी हजर . मग दुपार भर फालतू गोष्टी करायला दोघे मोकळे . हल्ली दोघांना पण पैश्याची खूप चणचण भासत होती . भीमा रामाला म्हणाला "राम्या हल्ली पैश्याची जाम तंगी हाय र आणि आपल्या गावात भी काय राम रायला नाही . कुठं तर दुसऱ्या गावी जाऊन आपला बिझनेस करू . " रामा बोलला " व्हय र पैश्याची जाम तंगी चालू हाय आणि घरचे भी जाम डोकं खात्यात रे , वैताग आलाय बघ . पण बिझनेस करायला आपल्या कड पैका कुठाय ?" भीमा बोलला "अरे लोकांना गंडवाया पैका कशाला लागतोय , एक काम करू आपण हे गाव सोडू नवीन गावात जाऊ आणि आपला बिझनेस चालू करू " रामा बोलला "व्हय र , त्याच त्याच लोकांना टोप्या घालून जाम वैताग आलाय आणि आपल्या गावातील लोक भी हल्ली जाम शानी झाल्यात , आपल्याला बघून रस्ता बदलत्यात" हे गाव सोडून आपलें नशीब दुसऱ्या गावात आजमावयाचे ह्या वर दोघांचे एकमत झाले . दोघांनी स्वतःच्या घरी त्यांचे निर्णय सांगितले . दोघांच्या घरचे लगेच ह्या गोष्टी साठी राजी झाले , नाही तरी दोघांच्या घरचे त्यांना व त्यांच्या स्वभावाला वैतागले होते . घरची व गावाची साडेसाती टाळली म्हणून सर्व खुप खुश होते . दुसऱ्या गावी निघण्याचा दिवस ठरला . घरच्यांनी दोघांन साठी जेवण बांधून दिले . घरच्यांचा आणि गावाचा निरोप घेऊन ही जोड गोळी सकाळी स्वतःचे नशीब आजमावण्यासाठी निघाली . ऊन वाढत होते तसे ही दोघे धानगाव च्या रस्त्याला आली . भीमा रामाला बोलला "गड्या ते बघ पुढे एक गाव हाय . थोडे दिवस ह्या गावात बिझनेस करू मग नवीन गाव हुडकु , आपल्याला गावंचि कमी नाय " रामा बोलला "चाललंय की , पण भीम्या लई भूक लागलीय बघ , आधी कुठं तर बसून गिळून घेऊ , पोटात आग पडली हाय बघ " तेव्हा त्यांना धानदेवी च्या देवळा कडे मार्ग दाखवणारा रस्त्यावरचा तो दगड दिसला .
क्रमश .....