गिर्हा- Sweet children horror story
कथेचे नाव:-गिर्हा
लेखिका:- ज्योती पवार (परी)
माझ्या आयुष्यात घडलेली कथा आहे.
तेव्हा मी 4th ला होते.
मार्च महिन्यातील घटना,
परीक्षा जवळ आली असल्याने, शाळेत सगळे शिक्षक आमच्या कडून अभ्यासाची तयारी करून घेत होते..

लहानपणापासून च हुशार असलेली मी शाळेत ही अभ्यासात हुशार होते.
नेहमी पहिल्या तीन नंबर मध्ये असायची.आणि हुशार असल्याने आणि मनमिळाऊ स्वभाव असल्याने शाळेतील विध्यार्थ्यांन मधेच नाही तर
सर्व शिक्षकांनमध्ये पण लाडकी होते.
आणि याच कारणाने
शाळेत व शाळेच्या परिसरातील गावात मी एक हुशार मुलगी म्हणून ओळखली जात होते.

त्यामुळे शाळेची वर्ग मॉनिटर मीच असायचे,
गणित विषय माझा आवडता विषय असल्यानें आणि गणित माझ परफेक्ट असल्याने मोकळ्या वेळेत मी शाळेतील काही मुलांना ज्यांच गणित कच्च होत. अशा मुलांना मी गणित विषय शिकवायचे.

असच एकदा
दुपारची वेळ होती, आणि मी गणित शिकवायला घेतलं सगळ्यांना गणित च उदाहरण देऊन ते सोडवायला सांगितलं काहींना ते जमलं पण एका मैत्रिणीला गणित जमत च नव्हतं.अगदी दहा वेळा गणित ची पद्धत समजावून
सांगितली तरी
सुद्धा,तिला ते जमत नव्हतं मग,
काय झालं मलाच समजलं नाही मला आला राग मी दिली एक कानाखाली😜

तशी ती लागली रडायला, तिच्या आवाजाने सर आले आमचे आणि विचारलं काय झालं ग??
तिने सांगितलं हिने मारलं मला,
सरानी मला विचारलं का मारलस तिला,
मग मी सांगितलं की गुरुजी हिला दहा वेळा गणित समजावून सांगून पण येत नाही तिला म्हणून मारलं,
गुरुजींना माझाच राग आला,आणि त्यानी माझ्या पाठीत एक धापाटा मारला.
आणि बाहेर उभं राहण्याची शिक्षा केली.

आतापर्यत कधी मी गुरुजींनि मला मारलं नाही ,कधी तशी वेळ च आली नाही ,पण
आता गुरुजींनी मला पाठीत मारलं म्हणून जास्त च राग आला.

मग काय शिक्षा गेली खड्डयात घेतलं दप्तर आणि निघाले घरी.😂😂
शाळेतून बाहेर आले आणि ओरडून च बोलले गुरुजी मला मारलंत ना आज माझी काही चूक नसताना मी आता घरी जाऊन तुमचं नाव च सांगते माझ्या आजी ला ,

ज्या शाळेत मी शिकत होते ती मराठी शाळा माझ्या सख्ख्या आजोबांनी बांधलेली आहे.
माझे सख्खे आजोबा त्याच शाळेत शिक्षक होते, पण माझ्या जन्मआधीच ते देवाघरी गेले.😔त्यामुळे मी त्यांना पाहू शकले नाही,
आणि माझी आजी शिक्षकाची बायको असल्याने आमच्या मराठी शाळेत तिचा जास्तच दबदबा होता.
मला कोणी काय केलं तर मी डायरेक्ट आजीला च शाळेत घेऊन यायची,
आताही तसच झालं,
माझे मी निघाले घरी,
मी बोलले शब्द गुरुजींच्या कानावर पडेपर्यत मी सगळेच्या बाहेर येऊन धावत सुटले.

भर दुपारची वेळ त्यात बरोबर 12 वाजलेले,सगळा रस्ता सामसूम ,
रस्त्यावर कोणीही चिटपाखरू ही नाही,अशातच मी धावत घराकडे रडत रडत पळत होते.

आमच्या घराकडे जाताना रस्त्यामध्ये एक मोठं चिंचेचं झाड लागत .
तिथेच एक फरशीचा ओढा आहे,
वेळेचे भान नसल्याने मी धावत रडत जात होते .
मनात राग धुमसत होता.
मनात राग धुमसत होता.
धावत धावत मी फरशी जवळ आली,
आणि बघते तर काय रस्त्यावर मधोमध गिर्हा काळे कपडे घालून हात पाय पसरून
झोपलेला,
झोपलेला,
मला काय माहीत हा गिर्हा आहे तो,कारण आजीने आधी खूप वेळ सांगितलं होतं चिंचेच्या झाडावर गुऱ्हा भूत असत,
पण पाहिलं नव्हतं मी त्यामुळे मी तीच काय ऐकून घेत नव्हते.

आणि आता हा समोर गिर्हा आहे हे मला कळायला तेवढी अक्कल कुठे होती,मी रागात च होती मला वाटलं असेल कोणी गावातला म्हातारा ,
आधीच गुरुजींचा राग मनात त्यात हा गिर्हा वाट अडवून बसलेला,मग काय जास्त च राग आला ,
गुरुजींन वरचा सगळा राग काढला यांच्यावरच

शिव्या देतच बोलली,
ये म्हाताऱ्या उठ वाटेतून की मारू दगड ,
तीन वेळा बोलली पण हा काही जागचा हलायच नाव घेईन ,
उचलली दगड आणि भिरकावली त्याच्या कडे,
त्याच वेळी वरून गावातील लोक येत होती,
त्याच्या आवाजाने हा पळाला वर अगदी झाडाच्या टोकावर जाऊन बसला,

आणि ओरडला पोरी आज वाचलीस परत नाही ,वाचणार,
पण माझ्या मनात राग अजून होता, मी केलं प्रत्युत्तर त्याला,
जा रे म्हाताऱ्या तुला कोण घाबरतय,
आला मला मारायला, तूच मरशील लवकर म्हातारा झालास ना मग लवकर मर आधीच गुरुजीने मला मारलं त्याला मी सोडणार नाय ,आता तू नको डोकं खाऊ🤣🤣

अस बोलून निघाले पुढे ,आणि गावतले लोक भेटले मला न एकटीला बघून बुचकळ्यात पडले कधी एकटी न येणारी पोरगी आज एकटी कशी,
मग मला विचारलं काय झालं ग रडतेस का,आणि एकटीच कुठं निघालीस सोबत कोणाला तरी आणायचं ना,

मग बोलली काय विचारायचं आहे ते त्या गुरुजी ला जाऊन विचारा मला नका विचारू,
तशीच धावत घरी आले तो तापाने फणफनत च,
आल्या आल्या आजीने उचलुन घेतलं बघते तर काय माझं अंग तापाने भाजत होत.

आजीने माझ्या आई ला आवाज दिला,
सगळे धावत आले आणि विचारू लागले काय झालं? एकटी च का आलीस मग
आजी ला स
शाळे पासून ते फरशी पर्यत ची सगळी हकीकत सांगितली,
सगळे बसले
गुरूजी ला शिव्या देत डोक धरून.

मी मात्र तापाने भाजत होते.
मग आजीने अंगारा आणला आणि लावला,
रात्री उतारा उतरवून नेऊन चिंचेच्या झाडाखाली ठेवला.

दुसऱ्या दिवशी आजी शाळेत जाऊन गुरुजींचा मस्त च समाचार घेतला,
त्यांतर सलग 4 दिवस मी तापाने आजारी होते.
नंतर माझा ताप उतरला,
तेव्हापासून मी दुपारचं एकटी येणं सोडून दिलं.
दुपारचं च काय तर कधीच त्या रस्त्याने एकटी गेले नाही.नंतर ते झाड तोडून टाकण्यात आले,
त्यानंतर मग मी केव्हाही एकटी यायची तेव्हा कधीच कोणी दिसलं नाही.

समाप्त....🙏