घराचं बांधकाम पूर्ण होताच चिंधू अण्णा खळ्याजवळच नव्या घरात रहायला आले. बांधकामाच्या वेळेस आपण केलेल्या कामामुळे व आपलं वागणं यामुळे चिंधू अण्णा तर आधीच माया करत होते पण आठ दिवसातच सारजा आक्काही सावित्रीमाय व गोदामाय सारखीच माया लावू लागली. क्विझ काॅम्पीटिशनच्या प्रसंगापासून आपल्याला कळून चुकलं की विधीचा आपल्या विषयीचा राग निवळला आहे. आता ती ही मनमोकळं बोलू लागली. साऱ्या कुटुंबात उठबस सुरु झाली. सारजा माय काहीही बनवलं की तोंडातला घास आम्हा भावंडासाठी ठेवूच लागली. त्यामुळे सावित्री माय "सारजे! माझ्या लेकरांना हल्ली माझ्या पासून हिरावत आहे बरं तू!" अशी प्रेमळ तक्रार करू लागली. सारजा माय पण हसून "दोन्ही पोरं खूप कष्ट करत्यात हो माय, म्हणुन त्यांना टाकून काही खावावसंच वाटत नाही" असं उत्तर देत.
आपलं राबणं, काॅलेज, क्लास, व आखाडा हे सारं काळ सरकत होता तसं सुरुच होतं. विधीशी मैत्री वाढतच होती पण निकोप सालस निर्व्याज. मात्र विधीच्या मनात वेगळंच चालू होतं. तीचं मन जरी लपवत होतं पण तिचे डोळे मात्र आसपास कुणी नसलं की फितुरी करत तिच्याशी. आपण मात्र त्या वेळेस तिथनं काढता पाय घेत असू. मात्र मैत्रीच्या नात्यात कुठच तोशीस लागू देत नसू.
ग्रॅज्युएशन झालं.बी. एड. ला अॅडमिशन घेतलं.

गावात मात्र बिंद्रन च्या वेगळ्याच हालचाली सुरू होत्या. बिंद्रन ला बिनविरोध ग्रामपंचायत निवड नको होती. त्याला गावात निवडणूक होऊनच पॅनेल बसावं, असं वाटे. जेणेकरून आपल्या सारखे नव्या दमाचे लोकं निवडून येतील. व नंतर मग कुस्तीच्या जोरावर आपण सरपंच पद मिळवू मग काय कुरणच कुरण....
पण याला अडसर सदा अण्णांचा तर होताच. त्यात आपल्याच पट्टीचा नविनच आलेला चिंधू अण्णा ही ठरू पाहत होता. म्हणून तो आखाड्यात घाम गाळत पहेलवान बनवत होता, स्वतःही बनत होता पण त्याचबरोबर गावातल्या आखाड्यातही राजकीय धूळ उडवत होता. आधीचं सारं राजकारण सदा अण्णा भोवती केंद्रीभूत होतं. दुसरी पट्टीचं नेत्वृत्व बदलून जरी चिंधू अण्णा कडं आलं तरी त्यांनीही एका वर्षातच अण्णाची निती ओळखली. अण्णा निकोप राजकारण करतात. गावच्या भल्याचा आधी विचार करतात. काडीचा स्वार्थ करत नाही. विकास हेच ब्रीद. म्हणुन चिंधू अण्णा
जरी विरोधी पार्टीतले होते तरी त्यांनी अण्णाचाच पायंडा चालू ठेवला व त्याच्याच सल्ल्याने सामोपचाराने ते सत्ता चालवत. हेच बिंद्रनला खटके. हे असचं चालू राहीलं तर आपण आखाड्यातच खपून जाऊ. सत्ता मिळणारच नाही. मग त्यानं काही लोकांना फितवत आपल्याकडं वळवलं.
दोन्ही पट्टीचे आठ आठ सदस्य होते. पण निवड लागली तेव्हा कुस्ती जिंकली ती चिंधू अण्णाच्या पट्टीच्या पहेलवानानं मग नववा सदस्य त्याच पट्टीचा झाला. वर्षानंतर सदा अण्णाच्या पट्टीनं कुस्ती जिंकली. त्यावेळेस सदस्य तेच पण सरपंच पद अण्णाकडच्या पट्टीला जाणार होतं इथंच बिंद्रननं खोडा घातला. आपल्या पट्टीचे नऊ सदस्य असल्यानं बहुमत आपलंच आहे म्हणून कुस्ती जरी त्यांनी जिंकली तरी पुढची उरलेली चारही वर्ष कायदेशीर दृष्टीने आपलाच सदस्य राहील असं पटवत आपल्या पट्टीतल्या लोकांना एनकेन प्रकारे फितवलं व अविश्वास आणला. सरसोलीच्या ग्रामपंचायतीच्या इतिहासात हे प्रथमच घडत होतं. चालल्या प्रकारानं सदा अण्णा प्रमाणेच चिंधू अण्णा ही चक्रावले. ते सर्व लोकांना जमवून गावात राजकारणाचं गरळ ओकणाऱ्यांना थारा देऊ नका म्हणून पटवू लागले. पण सदस्यच बिंद्रननं गायब गेल्यानं साऱ्यांचा नाईलाज झाला. तरी गावच्या भल्यासाठी सदा अण्णांनी माघार घेत बाबा उरलेली चार वर्ष ही तुमच्याच पट्टीचा सरपंच करू लागल्यास.चालत आलेली रीत बदलू हवं तर. लोकशाहीचा आदरच करू. पण गावदेवीच्या यात्रेतल्या कुस्तीला अवकळा येत गावात बलोपासनाच होणार नाही. असं न करता साऱ्यांनी मधला मार्ग काढण्याचं ठरवलं. बिंद्रनला बोलावण्यात आलं. पण तो अस्मानातच उडत होता. त्यानं पुढ निवड ही बिनविरोध होणारच नाही असं सांगताच लोक ही बिथरू लागले. "आरं बिंद्रन पहेलवान्या उगच बांदरावानी काय वागतोस? शहाणी सवरती माणसं मागार घेत आहेत गावच्या भल्यासाठी, मग तु पण काहीतरी सबुरीनं घे की गडा!" म्हणत समजावुन लागली. मग पुन्हा दोन्ही पट्टीतल्या लोकांनी मिळून पुढचा तिढा सोडायचं ठरवलं.
नंतर सदा अण्णा व चिंधु अण्णांनी आगामी राजकारण बिंद्रन सारख्या स्वार्थी वृत्तीच्या लोकांकडे जाणार नाही यासाठी रात्रभर खल करत काही ठरवलं. साऱ्यांना मान्य होईल व बिंद्रनकडं सत्ताही जाणार नाही असा सर्वमान्य मार्ग काढला.
तूर्तास चार वर्ष चिंधु अण्णाच्या पट्टीचं बहुमत असल्यानं त्यांचाच सरपंच राहील पण जे सदस्य निवडले आहेत त्यातुन. शिवाय दरवर्षी गावकुसातली कुस्तीही होईलच. मागची कुस्तीची गणना करत अजुन चार कुस्त्या होतील. व पाच कुस्त्यामधुन जी पट्टी जास्त कुस्ती जिंकेल त्याच पट्टीचा आगामी निवडणुकीनंतर सलग पाच वर्ष सरपंच राहील. सदस्य निवड मात्र बिनविरोधच होईल. गावात निवडणूक लावून जातपात, धर्म यावर लढाया लावायच्या नाहीत पैशाचा चुराडा करायचा नाही. तसेच यापुढं बाहेरचा पहेलवान न आणता गावातीलच प्रमुख पहेलवानाची कुस्ती लावून ज्या पट्टीचा पहेलवान पाच पैकी जास्त कुस्ती जिंकेल त्याच पट्टीचा कमीत कमी बारावी पर्यंत शिक्षण झालेला एक उमेदवार निवडावा असं ठरवलं. ते बिंद्रननं हसतच मान्य केलं. कारण त्याला आपणच पहेलवान म्हटल्यावर व एक कुस्ती तर मारलीच आहे आणखी दोन जरी मारल्या तरी पुढची पंचवार्षिक ही आपलीच असं मनोमन विचार करत त्यानं करारास संमती दिली.
अण्णांनी हीआपला खळ्यातला आखाडा व आपली व आश्लोक ची कुस्ती पाहुनच गावातल्या पहेलवानाचा निर्णय घेतला होता. त्या वेळेपासून गावातले कुस्तीचे आखाडे घाम गाळु लागले. चालू वर्षाची दुसरी कुस्ती आश्लोक बिंद्रनच्या पहेलवानासोबत हारला. कारण आमचा खळ्यातला आखाडा आताच कुठं बाळसं धरत होता.बिंद्रनच्या पट्टीच्या नावावर दोन कुस्त्या झाल्या. आता त्यांना तीन पैकी एकच जिंकणं आवश्यक होतं. आता मात्र मी आश्लोक ची जिवापाड तयारी करून घेऊ लागलो. व त्याला पर्याय म्हणून गावातल्या इतर मुलांना ही तयार करू लागलो.
तिसऱ्या वर्षाची कुस्ती आश्लोक नं चुटकी सरशी जिंकत सदा अण्णाच्या आशा पल्लवीत केल्या. अभ्यास क्लास राबता सांभाळणं चालूच होतं. पण या साऱ्यांना दुय्यमं स्थान देत कुस्तीलाच महत्त्व देण्याबाबत अण्णा सुचवत.
"आलोक मला आश्लोक वर भरवसा आहेच पण येणाऱ्या कठिण काळासाठी तू तयार रहा. कारण पुढची वाट खडतर असून बिंद्रन शी संघर्ष असल्यानं आश्लोक सोबत तू ही तयार रहा. तूच माझा हुकमाचा एक्का आहे.
चिंधू अण्णा कडं आमचं जाणं येणं विधीशी बोलणं वा चिंधू अण्णानं ही आमच्यावर जीव ओवाळणं बिंद्रनला खटकू लागलं त्यानं एक दिवस चिंधू अण्णालाच याचा जाब विचारत "काका ज्यानं आपल्या पट्टीच्या पहेलवानाला हरवलं व पुढेही त्याच्यापासून धोका आहे हे समजूनही तुम्ही त्यांना आश्रय देता हे बरं नाही. याचा अर्थ आम्ही काय काढावा? आमचं नेत्वृत्व फितू..." सांगू लागताच त्यावर चालत जात
"बिंद्रन लेका शब्दांना लगाम दे. राजकारण राजकारणाच्या जागी व संबंध हे संबंध असतात. त्यात राजकारण आणायचं नसतं. त्यांच्यात दम असेल तो ते लावतील. तुझ्यात दम असेल तो तू लाव. पण त्याकरता संबंध का तोडायचे? "सांगत त्याला उडवलं. मग बिंद्रन चिंधू अण्णालाच कल्टी करण्याचा प्रयत्न करू लागला.
चौथ्या वर्षीची कुस्ती आश्लोकनं मारताच बिंद्रन जख्मी वाघासारखा चवताळला.
आता दोन दोन बरोबरी झाली व पुढच्या वर्षीची फायनल कुस्ती व निवडणूक ही.
बी. एड.च्या परीक्षा तालुक्याला होत्या. चिंधु अण्णानं विधीला सोबतच मोटर सायकलवर नेण्याचं सुचवलं. हे ऐकताच घरातून विधीच्या डोळ्यात काळजात उचंबळणाऱ्या सागराचा गाज उमटू लागला. हल्ली तिच्या काळजानंही डोळ्याच्या फितुरीला मूळ संमतीच देऊन टाकली असावी. चार चौघात माझ्या जवळ न बोलणारी विधी एकांत मिळाला की तिची नेत्र पल्लवी बोलू लागे. त्यावेळेस आपण खाली मुंडी करत पाताळात परिस्थिती धुंडाळायचं काम करत टाळत असू. पण आज अण्णांनी सांगितल्यावर माझा नाईलाज झाला. तालुक्याला सोबत मोटर सायकलवर जातांना नेमकं बिंद्रन आडवा गेला. त्यान आमच्या कडं पाहत जवळच्या मित्राला,
"काय रं दिना हल्ली कुणाच्या आखाड्यात कुणी बी कुस्ती खेळायला लागलं गड्या", म्हणाला. आपण दुर्लक्ष करत गाडी दामटली.
पुढं काही अंतर गेल्यावर ब्रेक मारला की आपणं पुढं पुढं सरकत गाडीच्या पेट्रोल टॅंकवर पार सरकलो.
मागून तोच स्पर्श. अंगातून वीज निघाली.
"आलोक!"
हा शब्द ऐकताच आता मोठा भूकंप होणार हे ताडून गाडीच्या धडधडपेक्षाही ह्रदयातील धडधड अधिक जाणवू लागली.
"आलोक मला काही सांगायचंय तुला"
"काय?"
"तुला नाही कळत का?"
".........."
"असा शांत का? बोल ना".
"विधी काय समस्या आहे का आजच्या पेपरची? अभ्यास नाही झाला" मी मुद्दाम ना जाणत्याच सोंग घेतलं.
"पुढे बघ. नाहीतर तू इथंच शिकवायला लागशील. काही नाही जाऊ दे" विधी संतापानं लाल होत कडाडली.
" मी साईड ग्लासनं ओझरती नजर चेहऱ्यावर टाकताच गाल टमाटर झालेले दिसले.भूकंप व्हायचा थांबल्याचं हायसं वाटून
मी मुकाट्यानं गाडी दामटू लागलो.
तोच विधीनं पुन्हा
" आलोक वेड्याचं सोंग घेऊ नकोस मला काय सांगायचं ते कळतंय तुला पण तू मुद्दाम सोंग पांघरतोस".
म्हणजे अंतर्गत हालचाल तीव्र होत पुन्हा जोराचा भूकंप होईलच हे ताडून मी पण पुढे जागा नसतांनाही सरकू लागलो.
"कसलं सोंग? "मी बाळबोधपणा विचारलं. विधी आता संतापाच्या ऐवजी रडेल की काय असंच वाटू लागलं.
तोच शहर आलं व विधीनं विषय थांबवला.
गाडी थांबवताच मी नळाजवळ जात घटाघटा पाणी प्यालो. तरतरी आल्यावर आगामी काळात येणाऱ्या धोक्याची जाणीव झाली.
दुसऱ्या दिवसापासून मी क्लासचं एक पोरगं गाडीवर मध्ये बसवुन विधीला मागे बसवत नेऊ लागलो. उरलेले पेपर उरकले. तरी विधी "हे शिंगरू उगाच हेलपाट्यानं मारतोय आलोक तू!" असं मार्मीक बोलताच ते कार्टं "आलोक दादा विधी दिदी शिंगरू का म्हणतेय मला?" असं विचारतं झालं.
विधीला जे सांगायचं होतं ते तसंच बाकी ठेवत मी तद्नंतर कोणत्याही परिस्थितीत विधीशी एकांतात भेटणं टाळायचं हा पण केला.
मी एम. एडला प्रवेश घेतला. सहा महिन्यावर कुस्ती आली.
शासनानं सरसोली गावास पर्यटन स्थळाचा दर्जा देत त्याच्या विकासास करोडो रूपयांचा निधी मंजूर केला. आधीच यात्रेचं भरमसाठ उत्पन्न, शेतीचं उत्पन त्यात हा निधी तर करोडोनं येणार. बिंद्रन या बातमीनं तर गदरलाच. त्यानं आश्लोकला हरवण्यासाठी स्वतः मैदानात उतरण्याचं जाहीरच करून टाकलं.
सदा अण्णाला प्रश्न पडला. आश्लोक पेक्षा बिंद्रन सहा वर्षांनी मोठा. शिवाय ताकदीचा गडी. खात्या पित्या घरचा तरणाबांड गबरू गडी. तयारीचा पट्टीचा पहेलवान. आपल्या आश्लोकचा तग लागणंच शक्य नाही. आणि याच कुस्ती वर आपलं सारं राजकारण पणाला लागलंय. आता आपण आपला हुकमी एक्का बाहेर काढायचा.
अण्णांना आखाड्यात आलोकच्या कुस्तीत एक सूडाची आग दिसायची.ताकद तर उभ्या मदमस्त खोंडाला शिंगं धरुन पाठ लावून उलटा करण्याची.
कुस्तीत तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात. डावपेच, अंगात रेड्याची ताकद व यांच्या जोडीला तुमच्याकडं जिंदगीवरच सूड घेण्याची आग दिलात हवी. या सर्व बाबी आलोककडं होत्या.
अण्णानंही आलोकचं नाव जाहीर करत बिगुल फुंकला.
निवड काही महिन्यावर येऊन ठेपली. अण्णाच्या मनात आश्लोकनं कुस्ती जिंकली की चिंधू अण्णा शी बोलणी उरकूनच टाकू. पण कुस्ती जिंकल्यावर. तो पर्यंत नाही.
इकडे चिंधू अण्णा व सारजा माय रात्रीच्या अंधारात विधीच्या लग्नाबाबत बोलू लागले. विधीनं हे ऐकलं व तिनं आता काहीही करून आलोकला भेटून आपलं मन उघडं करायचंच ठरवलं. ती लवकरात लवकर संधीची वाट पाहू लागली. कारण खळ्यात क्लास, आखाडा याची कायम गर्दी असायची. निवडणूक कार्यक्रम लागला. सरसोलीत ग्रामपंचायत स्री राखीव पदाची सोडत निघाली. बिंद्रन तर थंडगार पडला. कारण त्याच्या घरातली एकही स्त्री बारावी पास नाही. म्हणजे करारानुसार आपण कुस्ती जिंकली तरी आपण वा आपल्या घरच्या स्त्रीया सरपंच होऊ शकत नाही. तरीपण काही ही होवो आधी कुस्ती तर जिंकू. मग सरपंच पदाचं पाहू असा विचार तो करू लागला. कारण कुस्ती जिंकणं ही आता सोप्प राहिलं नव्हतं. आश्लोकला तर आपण यू चटणी केलं असतं पण...
पण....
आलोक?
याची ताकद तो ऐकून होता व आखाड्यात ही पाहिली होती. म्हणुन तो आता सरळ कुस्ती ऐवजी नवे डावपेच आखू लागला. त्याचाच एक भाग म्हणून सरपंच पदासाठी त्यानं चिंधू अण्णाला विधीचं नाव सुचवलं. चिंधू अण्णा नी सदा अण्णाला गाठत बिद्रनची चाल काय असू शकते व पुढे काय करायचं तुमच्या पट्टीचं कोणतं नाव जाहीर करायचं याची विचारणा करू लागला. सदा अण्णा पेक्षा त्यांच्या पट्टीनंच सावित्रीमायचंच नाव पुढे केलं. बिंद्रन ला हेच माहीत होतं. त्याला आलोकची गोची करायची होती व मानसिक खच्चीकरण करायचं होतं. जिंकून सावित्रीमायचे उपकार फेडायचे की हारुन दिलात पाझरणारी ओल जिवंत ठेवायची?
निवडणुक आधीच काही दिवस यात्रा येणार होती व कुस्ती लागणार होती.सारजा माय व
चिंधू अण्णा विधीकरीता स्थळ पाहण्यासाठी जिल्ह्याला मुक्कामाला जावं लागलं. ह्या संधीचं सोनं करायचं विधीनं ठरवलं. कारण नंतर संधी मिळाली नाही तर घरचे आपले लग्न ही उरकतील. अंधार पडला ती बाहेर पडली बाहेर आलोक खळ्याच्या बाहेरच उभा होता. आसपास कुणीच नव्हतं. संधी साधत विधीनं त्याला गाठलं.
"आलोक रात्री बारानंतर घरी ये मला महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी".
"काय बोलायचंय बोल आताच".
"नाही महत्वाचा विषय आहे. रस्त्यात बोलणं बरोबर नाही. रात्री घरी ये"
आपल्याला वाटलं विधीचं महत्वाचं काय असणार? तेच म्हणुन तिला उडवत आपण "जे सांगायचं ते उद्या सकाळी अण्णा आल्यावर सांग. रात्री मी येणं बरोबर नाही अण्णा नसतांना"सांगितलं.
"मला माहीतीय तू येणार नाही. पण विषय गंभीर आहे. कुस्ती बाबत आहे व आजच सांगणं गरजेचं आहे. मी वाट पाहते. आणि हो एकटा ये. "
नेमका त्याच वेळी बिंद्रन आलोकला भेटण्यासाठी खळ्यात येत होता. त्याचं कारण वेगळं होतं. पण विधीला बोलतांना पाहून त्यानं आडोशाला उभं राहत यांच्या गप्पा ऐकल्या. 'रात्री, महत्वाचं काम' हे ऐकताच त्यांच्या संशयाला बळकटी मिळाली. त्यानं तेथूनच परत फिरत चक्रे बदलली.
कारण असाही बिंद्रन विवंचनेत होता की आलोक विधी ऐवजी सावित्रीमायच्या दुधालाच जागला तर आलोकशी कुस्तीत आपण जिंकणं शक्यच नाही. शिवाय भविष्यात ही हा आपल्या ला नडेलच. ही संधी आलीय. आलोकचा काटा काढण्याची...
विधीच्या इज्जतीचा फालुदा करण्याची.....
व राजकीय पटलावरून सदा चिंधूरूपी घोडी कायमचीच बाद करण्याची........

क्रमशः.......
(रात्रीचा अंधारही जिथे थरारला...
अग्नीकुंडात रक्ताच्या समिधा पडतांना......)

पाहूयात पुढच्या भागात...
✒वासुदेव पाटील.
8⃣भाग::-आठवा8⃣
सरसोलीत जेष्ठाची अमावस्या यायला घाबरु लागली. रात्री नऊ वाजताच आश्लोकनं जीप जळगाव रस्त्याला लावली. आज रात्रीच्या रेल्वेने सदा अण्णा येणार होते. त्यांना घ्यायलाच तो निघाला. मी सावित्रीमायजवळ जेवायला बसलो. जेवताना सावित्रीमाय मला लाडात म्हणाली,
"यापुढं मी तुम्हाला जेवण देणारच नाही तुमचं तुम्हीच पहा. मी थकलेय आता".
"माय तुझ्या हातचं जेवण नाही तर जीणं ही नाही मग" मी असं म्हणताच मायनं माझ्या तोंडावर हात ठेवत,
"पोरा तसं नाही रे, सून आण आता असं म्हणायचं होतं मला" म्हणाली.
मला सून शब्द ऐकल्याबरोबर विधी आठवली. आज रात्री ती काय महत्वाचं सांगणार? जायचं का तिला भेटायला घरी? तेही रात्री? शोभतं का आपल्याला असं रात्री चिंधू अण्णा घरी नसतांना? मुळीच नाही. जे असेल ते उद्याच पाहू.पण रात्री तिच्याकडं जायचं नाही.
मला विचारात गढलेला पाहताच" हे बाबा हवं तर नको करू लग्न पण पोटभर जेवण तरी कर", सावित्रीमाय हसतच म्हणाली. मी जेवण करून खळ्यात परतलो. रात्रीचे बारा वाजले.आपण विधीकडं जाणार तर नव्हतोच पण तरी मला झोप येईच ना. सरसोलीत अमावस्या घाबरत घुबरतच आली होती. व अंधाराचं साम्राज्य पसरवलं होतं. बिंद्रन तर दहा बारा ठोल्यांसहीत लाठ्या काठ्या कुऱ्हाड घेऊन चिंधू अण्णाच्या घराभोवती पसरलेल्या अंधारात डूख धरून बसला होता.
मासे पकडणाऱ्यानं गळाला चारा अडकवून चारा खायला येणाऱ्या माशाची वाट पहावी तसच बिंद्रन आपली वाट पहात होता.
विधीचा तर आज डोळा लागण्याचा प्रश्नच नव्हता. तिला माहीत होतं आपण येणार नाही पण तरी कुठं तरी धुगधुगीही वाटत होती की येईलच. बारा वाजले तिचं ह्रदय धडधड करू लागलं. ती सारखी खळ्याकडं पाहू लागली. पण अंधारात माझी येण्याची चाहूल लागेच ना. अंधारात मात्र किती तरी डोळे श्वास रोखून विधीच्या व माझ्या वाटेवरच्या हालचाली न्याहाळत होत्या. ज्याची विधीला वा मला त्यावेळी सुतराम कल्पना नव्हती.
साडेबारा वाजले नी विधीचा संयम सुटला. आज नाही तर कधीच नाही. आज निकाल लावायचाच. किती जाळायचा हा देह? शिवाय ज्याच्या आगीत हा देह जळतोय त्याच्या दिलातही हीच आग आहे का? पडताळायचच आज. ती अलगदपणे खळ्याकडं सरकू लागली.बिंद्रन बावचळला. चारा खाण्यासाठी मासा येण्याची आपण वाट पाहतोय पण मासा तर येतच नाही तर उलट चाराच माशाकडं चाललाय? माणसंही खुळबुळ करू लागली. त्यानं त्यांना तिथंच थांबवत तो खळ्याकडं लपकला.
आश्लोकची जीप सदा अण्णाला घेऊन पहाटे परतेल म्हणून खळ्याचं झाप उघडच ठेवलं होतं. विधीचं काम सोपं झालं. ती आत येताच धडधडत घाबरलोच.विधी असलं आक्रीत करेलच हे आपल्याला माहीत होतं.
"विधी परत जा तू घरी. इतक्या रात्री असं भेटणं बरं नाही कुणी पाहीलं तर!"
"आलोक! तुला काहीच वाटत नाही. ही रम्य रात हा त्याहून रम्य एकांत.ही नितांत सुंदर मी....तुझी वाट पाहून पाहून जीव धोक्यात घालून आले रे".
"विधी पुरे ही काव्यात्मकता! नी बऱ्या बोलानं मुकाट्याने माघारी फिर. "आपण संतापलोच
" आलोक तुला काव्यात्मकता वाटते?मला वाटलं तुला गांभिर्य भाव समजत नसावेत म्हणून मग या भाषेत सांगावं."
" विधी ते मला काही माहीत नाही. तू निघ इथनं कुठलीच घरंदाज मुलगी एवढ्या रात्री असं... "
" अरे आलोक एवढ्या वर्षात इज्जत होती म्हणून तर जवळ सागर असूनही संयम बाळगला. गेली पाच वर्षे मी होरपळतेय रे. पण आता....मलाच शंका यायला लागली. अण्णा व आक्का नी मुलगा शोधायला सुरुवात केलीय. मला फक्त मला जे वाटतं ते तुला ही वाटतं का? याचं उत्तर हवंय. जर तुझा होकार असेल तर मी अण्णांना स्पष्ट तसं सांगेन"
" विधी तोंडाला लगाम दे. तुझ्या मनात काय चाललंय मला माहीत नाही पण असला मी सात जन्मातही विचार करणार नाही "
" आलोक! सात जन्म कुणी पाहिलेत! सात जन्म नकोय मला. या जन्माचं काय तेवढं बोल"
" विधी! अगं दुसऱ्याच्या फेकलेल्या तुकड्यावर जगत आलोय आम्ही. आम्हाला असली थेरं करण्याचा अधिकारच नाही.राहिला असता तरी माझे संस्कार मला... "
" आलोक मला तुझं लेक्चर नको. तु मला स्विकारणार की नाही तेवढं सांग फक्त".
"मुळीच नाही. तू सरळ चालती हो इथून"
" आलोक तू नाही म्हणशील हे मला माहित आहे. कारण उपकाराचं ओझं तु पक्कं मनात डोक्यावर घेऊन बसलाय.फक्त तुझ्या मनात माझी ओल नाही हे माझ्या डोक्यावर हात ठेवून सांगुन दाखव".
" विधी ओलच काय पण तसला विचारही स्पर्श करु शकत नाही माझ्या मनाला. "
विधीनं आलोकचा हात पकडत डोक्यावर ठेवत
" बोल आता तु खरच माझ्या वर प्रेम करत नाही? "
आपण हात झटकन माग घेऊन मागं सरकत
" विधी वेडेपणा करू नको, निघ येथनं. नियतीनं काही प्रारब्ध कोरीच ठेवलेली असतात जिवनभर जळण्यासाठी. तसंच माझही."
"ठिक आहे मी जाते व अण्णा सांगतील तिथं लग्न ही करते.पण एकदाच मनातलं खरं सांग तरी निदान"
"मला काहीच सांगायचं नाही. तू निघ इथनं अन्यथा मी आताच..."
"आलोक तू नको रे मीच मरते. नाही तरी तुझ्याशिवाय मला ही कुठं स्वारस्य राहिलंय आता"
" तो तुझा प्रश्न आहे", आपण विधीनं निघावं म्हणून कोरडेपणानं म्हणालो.
विधी रडतच पळत घराकडं पळाली. बिंद्रन ला समजेना हल्ला करायच्या आतच विधी परत गेली.
आपण विचार केला की विधी संतापात गेलीय व अण्णाही घरी नाही. न जाणो काही बरं वाईट विचार केला तर?
बाहेरुन तरी कानोसा घ्यावा म्हणून तडक निघालो. मला घराकडं जातांना पाहताच बिंद्रन च्या डोळ्यात पुन्हा आशा तरळू लागली असावी. विधी मागोमाग पोहोचला तोच मला पेट्रोलचा वास आला. सारा प्रकार क्षणात लक्षात आला नी एकदम उडालोच.विधीनं पेट्रोलचा ड्रमच अंगावर ओतला होता. ती पेट्रोलनं निथळत होती. मागच्या खोलीतला छोटा लाईट आधीच सुरु होता व बाकी सारे लाईट बंद. साऱ्या घरात धावतच घरात प्रवेश केला. विधीला एक जोरानं कानफटीत वाजवत आगपेटी हिसकावून घेऊ लागलो तोच झटापटीत आगपेटी अंधारात खाली पडली. ती शोधण्यासाठी दोघांची पुन्हा झटापट सुरु झाली.
"सोड एरवी पाच वरषापासुनही जळतेच आहे तुझ्या नादात! आज अखेरची झेप घ्यायची" तितक्यात भिजलेली साडी धरत ओढली व दूर भिरकावली. बिंद्रननं ती उचलली व माणसांना इशारत केली. मासा गळाला लागला व चारा ही शाबूत आहे. हल्ला....
बिंद्रननं विधीला बाजुला ओढलं. त्याला पाहताच प्रश्न पडला हा इथं कसा? पण तितक्यात लाठ्या काठ्या फरचे बरसू लागले. विधीला बाजुला ओढत तिच्या तोंडावर हात ठेवत बिद्रननं तिच्या कानात "उद्या सिधे सिधे जवाब द्यायचे अन्यथा आज सोडू याला पण भविष्यात...." असं सांगत बोंब ठोकत झोपलेल्या सरसोलीला जागं करत गोळा केलं. इकडं एकाच्या हातानं काठी हिसकावत तीन माणसांना लोळवलं पण सततच्या वर्षावाने मारुतीगत रक्ताच्या थारोळ्यात भिजलो. विधीला मागून येणाऱ्या पुसटशा उजेडात आपण दिसताच तिची दातखीळ बसली. तोच आलेल्या लोकांना "बघता काय ठेचा या डुकराच्या अवलादीला. यानं सदा अण्णा घरी नाही पाहुन विधी माईच्या इज्जतीवर घाला घातला व विधी माईनं आरोळ्या ठोकताच पेट्रोल टाकून जाळणार होता हा. मारा याला द्या दणका" म्हणाला.बिंद्रनची माणसं आपल्याला अंधारात बदडत होती तर छोट्या लाईटकडं दातखीळ बसलेली अर्धवट कपड्यातली विधी दिसताच
अंधारात रक्ताच्या थोरोळ्यात माखलेला आपण कोण ओळखू गेलोच नाही. सरपंच पदाची दावेदार विधीला बदनाम करण्याची ही विरोधी पट्टीची चाल असावी असं समजत चालून येत बदडायला सुरवात केली. अंधारात किती तरी वेळ लोकं बिंद्रन ची माणसं तुडवतच राहिली. रक्तामांसाचा चिखल, पोटातल्या आतड्यांचा चिखुल चिवडा, शुद्ध गेली. दोन अडिच वाजता आश्लोक सदा अण्णाला घेऊन परतताच हल्लेकरी पांगले. आपल्याला त्याच जीपनं दवाखान्यात नेण्यात आलं... हे चौथ्या दिवशी मुंबई ला दवाखान्यात शुद्धीवर आल्यावर समजलं.
...........
........
.....
आलोकला सारं सारं आठवलं.
कात्रजला रहायला आलो पण जुन्या आठवणीच्या घाटातच अडकून पडलोय जणू.विचारचक्रात गुरफटलो असतांनाच दारावर मि. माने थापा मारत होते ते लक्षातच आलं नाही. लक्षात येताच दरवाजा उघडला. मि. मानेसोबत आश्लोक ही माघावून हातात बाॅक्स धरत आला. आल्या आल्याच मानेनी गच्च मिठी मारत "आलोक तुझा संघर्ष संपला रे. या तुझ्या लहानग्या पठ्ठ्यानं स्पर्धा परीक्षेचा आखाडा जिंकला रे! .... डि. एस. पी होणार तो!" म्हणाले.
मी तसाच गच्च डोळे मिटत निसटत निसटत भिंतीला रेलत खाली बसलो नी ह्रदय हर्षोल्हासानं, दुःखानं भडभडून आलं.
"आपल्या ला काय होतय तेच समजेना.
दुःख!
आनंद!
"आया!
बाबा!
मामा!
अण्णा!
सावित्रीमाय!
गोदामाय!
सारे आठवू लागलो."
तसाच पळत गल्लीत आलो.
एस टी. डी. बुथवर.
नाणं टाकत नंबर घुमवला.
" अण्णा!
.......
....."
" पोरा कुठं गायब झाला होतास रं या बुढ्ढ्यांना सोडून.. "
" अण्णा आपला आश्ल्या, तुमचा आश्ल्या साहेब झालाय"
पलिकडंनं आरोळ्याचा आवाज
" सावित्री ये सावित्री पळ आलोक बोलतोय गं!, अगं आपलं लहानं आश्ल्या साहेब झाला! पळ पळ. "
सावित्री माय काही बोलत नसतांनाही सारं सारं कळत होतं दोन्ही कडं महापूर आला होता.
" पोरा... "अण्णानं फोन हिसकावत" आलोक पोरा आताच निघा. सरसोलीत अशी जंगी मिरवणूक काढतो बघ उघड्या जीपवरनं! जळगावचा रसूलचा बॅंड आणतो बघ्. ठेव फोन. निघा. त्या काळतोंड्या बिंद्र्याला, साऱ्या सरसोलीला दाखवतो. या सदा अण्णांच्या पहेलवानचा पराक्रम".
सरसोलीत दोघा भावांची राजेशाही मिरवणूक निघाली. उघड्या जीपवर मी, सोबत अण्णा, सावित्रीमाय, गोदामायला बसवलं. अख्ख्या सरसोलीला तालुक्याला जिल्ह्याला आनंद झाला. आज गावकुसातल्या मातीचा आम्ही पांग फेडला.
आश्लोक दिल्लीला प्रशिक्षणाला गेला. त्याच्या सोबत बॅचमेट म्हणून पुण्याची वर्षा इंगळे होती. दोघांनी पोष्टींगच्या आधीच लग्नाचा निर्णय घेतला. आपली इच्छा अण्णाच्या आशिर्वादानं सरसोलीत बार उडवू अशी होती. आश्लोकला भरपूर समजावलं. पण हाय प्रोफाईल सोसायटी. त्यांना ही ग्रामीण ओल काय कळणार. माझा संघर्ष तर....... मुळीच नाही. पण आश्लोक? त्याला तर कळायला हव होतं. आपल्याला बोलवलं पण आपलं तर आभाळच पोखरलं गेलं.
विधी पुण्याला. आश्लोकनं तर साफ....निराशाच केली.
सरळ पुणं सोडावं आणि निघून जावं दिगंतरी.....
पण अण्णा व सावित्रीमायचं काय?ती दोघं थकली होती.इकडं आश्लोकनं जसं मला पोखरलं तसंच जावयानं सारा राबता हळूहळू विकत अण्णांना पोखरलं होतं.
हे विभुता! का निर्माण करतो तू अशी माणसं! एकीकडं अनाथ पोरांना माया लावणारी अण्णा, माय, गोदामाय सारखी माणसं बनवतो तर दुसरीकडे मामी, बिंद्रन,जावई, आश्लोक अशी माणसंही तूच निर्माण करतोस.
कसलं विचित्र कोडं हे. त्यांना या उतारवयात आधार देणं गरजेचं आहे. जगलंच पाहिजे आपण.
ज्या संस्थेत प्राध्यापक होतो त्या संस्थेनं सातपुड्याच्या आदीवासी मुलांच्या उच्च शिक्षणासाठी जळगावात नवीन महाविद्यालय ओपन केलं. मी लगेच बदली करून जळगावला आलो. अण्णा व सावित्री मायला ते नाही म्हणत असतांनाही काहीएक न ऐकता जळगावला आणलं.
"पोरा तु सारी हयात लोकांचं करण्यातच घालशील का? स्वतःचं काय?" अण्णानं विचारलं.
"अण्णा! तो विलक्षा माझ्या प्राक्तनात लग्नाचं पान लिहीण्याचं विसरला. मग मी तरी का लिहावं ते नको असलेलं पान? "
अण्णा व सावित्रीमाय च्या डोळ्यात महापूर दाटला. पण आपल्या आटल्या ह्रदयानं आपल्या नयनांना ते सुखही देणं हल्ली बंद केलं होतं.
सातपुड्याच्या गोरगरीब मुलांना वा इतर कुठेही अनाथ मुलं दिसली की त्यांना आधार देत संस्थेत दाखल करू लागलो.
एक वर्ष यातच स्वतःला गुंतवलं. पण पहेलवानकीनं व कष्टानं कमावलेलं शरीर आता उतरू लागलं.
आश्लोक ची पोष्टींग नगरला झाली. तो मध्यंतरी कामानिमित जळगावला आला व अचानक अण्णाला दिसला. अण्णानं त्याला फैलावर घेत घरी आणलं. . त्यालाही वाटलं आपण रागावू. संताप करू. किंवा आसवं गाळू. पण यातलं काहीच घडलं नाही. तो परत गेला. यानं मात्र मायचं काळीज फाटलं.
"पोरा निदान नाही राग पण रड तरी. तू रडणं तुझा दुःखाचा डोंगर बाहेर पडण्यासाठी गरजेच आहे रे लेकरा!तु असंच वागला तर आम्ही इथं राहणारच नाही ".
"मायेच्या या शब्दानं दोन आसवं ही आपल्या डोळ्यात तरळली नाहीत.
" माय माणूस रडतो आपल्या माणसासाठी! पण आपली माणसंच आपली राहीली नसली मग?"
दुसऱ्या दिवशी अण्णा दोन दिवसासाठी सरसोलीला जातो म्हणून गेले व परत आले तेच चिंधू अण्णाला घेऊन.
चिंधू अण्णा मिठी मारत बिलगला.
"पोरा तू देवमाणुस. तुझ्या बाबत मनात मी शंका घेतली मी महापाप केलं चुकला हा तुझा अण्णा. माफ कर मला. "
अण्णा माझ्या मनात कुणाविषयी काहीच किल्मीष नाही. निसंकोच रहा. आपल्या सारख्या थोरामोठ्यांची आशिर्वाद होते म्हणून तर आज मी तुमच्या समोर उभा आहे.
"आमची सारजा आक्का काय म्हणते? "
" पोरा मजेत आहे. बघ तुला भेटायला कुणाला आणलंय मी", चिंधू अण्णा म्हणाले. तोच घरातून विधी बाहेर आली.
"अण्णा, विधीला का आणलंत आपण?, उगाच पुन्हा गावात राळ उठायची व तिचा सुखाचा संसार........."
"पोरा सुखाचा संसार!" अण्णा मध्येच माझं बोलणं काटत व उसासा टाकत म्हणाले.चिंधू
अण्णा व सदा अण्णा घरात उठू लागले तोच त्यांना थांबवत अण्णा बसा इथंच.पण ते थांबले नाहीत.
विधीनं वर पाहताच माझी मान खाली झुकली.
चल थोडं बाहेर मोकळं बोलू ना थोडं.
मी यंत्रवत उठलो व माझं मलाच आश्चर्य ही वाटलं. गल्लीतनं चालत जवळच बागेत आलो.
"आलोक आपण दोघं तळकलेल्या काचा आहोत. कितीही डकवल्या तरी चित्र विद्रुपच दिसेल. हे आता मी ही स्विकारलंय. तुझा तर प्रश्नच नाही. काल सदा अण्णा अण्णांना घेऊन पुण्याला आले. सारं सांगितलं. तरी मी येतच नव्हते. पण सासुबाईंनीच आग्रहानं पाठवलं."
".........",
आपलं काही नं बोलता खाली गवताच्या काडीनं लाॅनमधली न दिसणारी माती कोरणं सुरुच.
" आलोक तुला वाटतं मी संसारात सुखी आहे मग का विष कालवायचं. म्हणुन तु सारखा दूर पळतोय. मी तुझ्याशी अनेक वेळा बोलण्याचा प्रयत्न केला. तुला वाटत होतं ही पुन्हा तेच सांगेल. पण नाही रे.बरं माझं सोड. पण तु हल्ली असा विरक्त सारखा का वागतोस? आश्लोक वागला असेल वाईट पण
त्याच्या जागेवर तो योग्यच. हे वयच असं असतं. सारेच तुझ्या सारखे नसतात. पण एक लक्षात ठेव सारं सोड व पूर्वीसारखाच आलोक हो.
अरे माझ्या कडं बघ लग्नापासून साधा स्पर्श देखील केला नाही अथर्वने तरी देखील मी जगतेच आहे ना. "
आता मात्र माझं माती कोरणं थांबलं व तिच्या डोळ्यात नजर भिडली. तोच आकाशात मेघांची दाटी वाढली. आकाशातून टपोरे थेंब टपकू लागले. मला साऱ्या हयातीत आज प्रथमच विधी असहाय वाटली. आकाशातून जलधारा बरसू लागल्या तसं विधी व मी ठराविक अंतर राखत रडतच भिजू लागलो.
माझं किती महिन्यापासून थांबलेलं रडू आज जलधारा पेक्षाही वेगानं सुरू होतं.
जिवनात काही बरं वाईट करतांना आपल्या साठी कुणी तरी सर्वस्वाचं बलिदान करून जगतच आहे, आपली वाट पाहत कृतार्थास थांबवत कुणीतरी थांबलंय याची जाणीव ठेव व लवकर लग्न कर असं सांगत विधी परत गेली पण भिज ओल सोडूनच.
विधी परत जायला महिना उलटत नाही तोच अथर्व अपघातात गेल्याची बातमी धडकली. मी लेक्चर तसच सोडलं व अण्णा _मायला घेत पुणं गाठलं.

क्रमशः...........
✒वासुदेव पाटील.
__________________________________________________________________________________
9⃣भाग ::--नववा9⃣
सदा अण्णांनी आश्लोकला फोन करून पुण्याला बोलवलं. त्याची नुकतीच नगरहुन कोल्हापूरला बदली झाल्यानं तो त्याच धावपळीत होता. पण आलोक दादानं बोलणंच बंद केल्यानं त्याला आपली चूक लक्षात आली होती. पण दादाच्या मनातून ती सल जातच नाही. म्हणून दादा नंतर आपलं असं दुसरं माणूस अण्णा व सावित्रीमाय शिवाय या बेगडी दुनियेत कोणीच नाही हे त्याच्याही लक्षात यायला लागलं होतं. म्हणुन विधीच्या नवऱ्याचं कळताच तो ही कोल्हापूरहुन धावतपळत आला. अंजना मॅडमचा एकुलता एक आधार व विधीचं तर सर्वस्वच गेलं. विधी मरणासन्न बेशुद्ध दवाखान्यात अॅडमिट होती. आलोक दादा आपल्याला टाळतोय हे आश्लोकच्या लक्षात आलं.
सदा अण्णा व रडत रडत चिंधू अण्णांनी" हा सारा मामला घातपाताचा आहे आश्लोक. याचा तपास तू लक्ष घातलं तर लगेच लागेल. बघ तुझ्या वळखीनं"अशी विनवणी केली.
"अण्णा नुकतीच माझी बदली झालीय तिथं. पाहतो मी. आपण निश्चिंत रहा.दोषींना शोधतोच. मी तशा कमांड देतो".
सारे जण परतले. विधी तर बेशुद्धच होती. चिंधू अण्णा थांबले.
आश्लोकनं कोल्हापूरला परतताच अथर्व अपघात फाईल्स चे डिटेल्स घेत संबंधीतास सखोल लक्ष घालून त्वरीत अॅक्शन घेण्याबाबत कमांड दिली.
तपासाची चक्रे वेगानं फिरू लागले. तपासयंत्रणा फोंडा घाट कोल्हापूर पुणे अंजना मॅम विधी अशा परिघात तपास करू लागली. विधीकडून काही माहिती मिळण्याची शक्यताच नव्हती. कारण ती बेशुद्ध च होती. मग अंजना मॅडम कडुनच माहीती घेण्यात येऊ लागली. मोबाईल नंबर हिस्ट्री वरून कोल्हापूर कनेक्शन मिळू लागलं शिवाय सरसोली ही. प्रारंभिक चौकशी करण्यासाठी राही रजत व बिंद्रन ला उठवण्यात आलं.
अंजना मॅडम व त्यांच्याकडून साराच पट उघड झाला.
अथर्व व विधीच्या लग्नाआधीच अथर्व सांगलीला बी. टेक. करतांना त्याचं राही नावाच्या माॅडेल मुलीशी सूत जुळलं. हे कळल्याबरोबर दिवाकर रावते व अंजना मॅडमनं विधीशी लग्न करण्याचा निर्णय घेत लग्न लावलं ही. पण त्या आधीच राही व अथर्व यांनी कोल्हापूरात एका मंदीरात वैदिक पद्धतीने लग्न उरकलेलं होतं. अथर्व पुरता राही व ड्रग्जच्या आहारी गेलेला होता. ही लग्नाची गोष्ट दिवाकर वा अंजना मॅडम यांना माहीतच नव्हती. ती अंजना मॅमला नंतर कळली. राही व रजत कडं लग्नाचे रीतसर पुरावे होते. पण अथर्वने नशेच्या आहारी गेल्यानं या बाबी सिरीयस घेतल्याच नाही. शिवाय आपले वडील डि. एस. पी. व गडगंज पैसा या गुर्मीत त्यानं दुसरं लग्न आई वडीलांच्या समाधानासाठी केलं व आधीच्या लग्नाची ही कल्पना दिली नाही. त्यालाच आधीच्या लग्नाची कुठं शुद्ध होती.
हनीमुनला महाबळेश्वरला हाॅटेल मध्येच राहीनं त्याला गाठत आपल्या कडील सारे पुरावे दाखवत तू मला फसवलं. माझ्याशी लग्न झालेलं असतांना तू दुसरं लग्न केलंच कसं म्हणून हूज्जत घालू लागली. त्यावेळेस राहीच्या प्रेमात वेडा झालेल्या अथर्वने तिला समजावत "हे लग्न म्हणजे आई वडीलांच्या समाधानासाठी एक फार्स आहे. तुच माझी पसंद आहे घाबरू नकोस" समजावत सारी रात्र घालवली. इकडे विधी आलोकच्या भिज ओलीत तर अथर्व राहीकडं पण तरी विधीनं तिला पाहिलंच...
विधीनं हा सारा प्रकार अंजना बाईस कथन केला. पण इज्जतीचं खोबरं नको म्हणून अजंना बाईनं विधीला समजवत शांत बसवलं. विधीनं ही चालूच आलोक प्रकरण गरम असतांनाच बभाटा नको म्हणून मौन पाळलं.
नंतर राही व रजतनं दोन्ही मिळून अथर्वला लुटणं सुरु केलं.कधी प्रेझेंट म्हणून दागिने घे, कधी रोकड तर कधी गाडी वा जागा घे. अथर्व कोल्हापूर जाई तर कधी रजतच सनावदला येई. अथर्वला लक्षात यायला लागलं की राहीचं आपल्या वर खरं प्रेम नाहीच फक्त आपली संपत्ती हेच राहीचं खरं प्रेम. पण नेमकं तेव्हाच बिंद्रननं आलोक व आश्लोक येऊन सरसोलीत पुन्हा घडी बसवू पाहत आहेत व ते आपल्या पुढील राजकारणासाठी धोक्याचं आहे हे ओळखून अथर्वशी रजतशी घसपट वाढवत विधी व आलोकचा सारा मामला तेल मीठ लावत सांगू लागला. मग अथर्वला आपणच चुकलोय तर विधीला बोलून काय उपयोग. मग त्यानं विधीला आपलं सारं राही प्रकरण माहीत असुनही ती सांभाळते तर मग आपण ही तसाच समजोता चालू द्यायचा असा विचार करत त्यानं बिंद्रन ला उडवून लावलं. पण विधी त्याच्या मनात उतरेना तर राही निघेना. मग आर्थिक लूट सहन करत तो राहीकडे जातच राहिला.
आता राही व रजतच्या अपेक्षा वाढू लागल्या. पण त्यांना भिती होती ती त्याचे वडिल डि. एस. पी दिवाकर रावतेची. जो पर्यंत रावते आहेत तो पर्यंत आपल्याला याच्या स्थावर मालमत्तेला हातच लावता येणार नाही. शिवाय आपलं हे प्रकरण त्यांनी मनावर घेतलं तर.....?
मग काय ठरलं हाच काटा काढू आधी मग अथर्व.
दिवाकर रावते कायम बाहेर रहायचे. मॅडम पुण्याला. त्यात मुलगा असा. त्यामुळे ते ही कायम गोवा उटी कोडाईकॅनल अशा ठिकाणी पंधरा दिवसातून गुप्तपणे जात. रजतनं ही माहिती अचूक मिळवली. ठरलं.....
दिवाकर रावते बोटीनं रात्री गोव्याच्या समुद्र किनारी फिरत होते. उंची मदिरा साथीला नंतर साथ द्यायला.... बोटचालकचे हात ओले होताच रजतनं राहीला बोटीत चढवलं. रात्र रंगत गेली. झिंग चढत गेली. मदिरा असर दाखवू लागली. गोव्याच्या समुद्रात दिवाकरराव व बोटचालकांना समाधी मिळाली. दुसऱ्या दिवशी समुद्रात बोट उलटल्याची बातमी. सारं चिडीचुप.
काळ जाऊ लागला तसं राही व रजत अथर्वला वडिलांच्या इस्टेटीचा वारस लावण्या साठी तगादा लावू लागले. बरीच संपत्ती तर दिवाकर रावतेंनी आधीच अंजना मॅडम व अथर्वच्या नावावर केलीच होती. कारण कधी काळी आपल्याच नावावर इतकी संपत्ती कशी ही चौकशी झाली तर मग?
दिवाकर रावतेच्या मृत्यू नंतर त्यांच्या नावावर असलेली संपत्ती अंजना मॅडम व अथर्वच्या नावावर झाली. मग ते अथर्वलाही धमकावून लागले. पण तो त्यांना आता सपशेल धुडकावून लागला. अथर्वनंतर लग्नाची पत्नी म्हणून राहीचा हक्क होणारच होता. पण यानं व अंजना मॅडमनं जर आधीच विधीच्या नावे केलं तर?
शिवाय आपल्याला अजुन वारसपण नाही. व तोच वारस जर विधीला झाला तर? म्हणुन नावावर करणे वा करत नसेल तर यालाही दिवाकर रावते करू. नंतर आधी आपणाशीच लग्न हे सिद्ध करता येईल आपोआप आपण वारस लागू.
मग त्याच हालचाली सुरु झाल्या. अथर्वला वडील होते तोपर्यंत भितीच वाटत नव्हती. पण आता नशेनं शरीर पोखरलं गेलंय व वडिलांचा आधार ही नाही. तो आता चिंतेत राहू लागला.
रजत अथर्वला भेटायला येई तेव्हा बिंद्रनची त्याच्याशी ओळख झाली होती व नंतर घट्ट मैत्री ही झाली होती. त्याला हे सारं प्रकरण माहीतच होतं. त्यालाही चिंधू अण्णाची संपत्ती खुणावत होती. विधीनं तर चिंधू अण्णाला रक्ताचं जवळचं आपणच. पण विधी वारस मग हे सारं अथर्वलाच मिळणार. म्हणून रजत व त्यानं योजना आखली.
विधी आलोकला भेटून परतली. नंतर अथर्व तिच्याशी सारं बोलू लागला. विधी ते अंजना मॅडमला सांगत असे. कारण तिची ओढ अथर्वकडे नव्हतीच. अथर्वने आपल्याला समजून घेतलंच नाही मग का म्हणून आपण ही. पण तरी सासु व रीत रीवाज म्हणून विधीनं एक समजोता करून घेतला होता. म्हणून अथर्व आता मोडून पडलाय व नाही शारीरिक पण मानसिक आधार त्याला द्यायला हरकत नाही. म्हणून ती ही नाही तरी त्याला आधार देई. राही व रजतचा तगादा चालूच होता. पण यानं त्यांना मी असे पर्यंत काहीच मिळणार नाही म्हणून ठणकावून सांगितले.
गोव्याहून एक निनावी फोन आला. "आपणास आपल्या वडिलांबाबत महत्वाची माहिती पुरवायची आहे. व पुरावे पण. आपण लवकरात लवकर गोव्याला या".
"कोण बोलतंय?"
"ते महत्वाचे नाही. भेटीत ते कळेलच" इतकं बोलून फोन कट केला.
आईला सांगताच आईनं एकटा जाऊ नकोस विधीला सोबत ने म्हणून सुचवलं. विधी व अथर्व निघाले. पुण्याहून कोल्हापूर करत फोंडा घाटातून गाडी जाऊ लागली.रात्री अकराचा सुमार. तोच समोरुन ट्रक... धडखड⚡धडखड⚡धडाडधूम⚡⚡⚡⚡
अथर्व जागेवरच कलिंगडाचा चोथा व्हावा तीच गत. तर विधी रक्ताच्या थारोळ्यात लथपथ तोच एका गाडीतून तीन जण उतरले. विधीला ग्लानी येत होती. कानावर अस्पष्ट शब्द....
"ते गेलं पण तिला अजून धुगधुगी आहे. वाहनं वापरत आहेत मदत मिळून वाचली तर नाहक वांदे."
तोच एकानं राॅडनं जोरात डोक्यात वार......
तपासात सारी माहिती मिळताच पुन्हा बिंद्रन राही व रजतच्या मुसक्या आवळताच तिघांनी गुन्हे कबुल केले.
विधी दोन तीन महिने दवाखान्यातच राहिली. नंतर अंजना मॅडमनं निवृत्तीनंतर तिला घेत सनावदलाच राहणं पसंद केलं. विधी जरी बरी झाली होती पण ती एकदम विमनस्क अवस्थेतच वावरत होती. बोलणं तर बंदच. फक्त शून्यात पाहणं. कुणी आलं तरी काहीच न बोलता एकटक पाहणं व मध्येच उठत चालायला लागणं. अंजना मॅडम चिंधू अण्णा व सारजा आक्का या प्रकारानं भांबावली. व त्यांनी पुणं सोडत सनावदला मुक्काम हलवला.सनावदला ही तीन महिने झालीत पण फरक पडेचना. मध्यंतरी चिंधूअण्णा विधीला सरसोलीला घेऊन आले. पण परिणाम शुन्य. सरसोलीला सारजा आक्कानं आंघोळ घालून सकाळी तिला बाहेर बसवलं व आक्का घरात काम करू लागली. तोच विधी उठली व चालत सदा अण्णाच्या खळ्याकडं चालू लागली. खळ्याचं मालक आता बदलले होते. विधी खळ्याकडं भकास नजरेनं पाहत होती. तिच्या दग्धभू मनात पाच सहा महिन्यात प्रथमच कालवाकालव दाटून आली. तिच्या गालावरून आसवं ओघळली. तोच सारजा आक्का बाहेर येताच तिचं लक्ष खळ्याकडं उभ्या विधीकडं गेलं. आक्का धावत गेली. विधीचे अश्रू पाहताच आक्काच्या मनात आशा पालवली. तिला आज विधीला रडतांना पाहुन आनंद झाला.
आक्कानं रात्री चिंधू अण्णाला कानात काही सांगितलं. चिंधू अण्णा सकाळीच जळगावला सदा अण्णाला भेटले. मनातली सल भडभडून मोकळी करत,
"अण्णा तो अलक्षा जोड्या बरोबर बनवतो पण कधीकधी मानव त्यात हस्तक्षेप करतो. पण त्यानं जिवनात विद्रुपताच येते".
सदा अण्णा आता थकले होते व त्यांनी आलोक च्या लग्नाची आशाच सोडली होती. कारण आलोकनं त्यांना स्पष्ट सांगितलं होतं"अण्णा मी जगतोय केवळ तुमच्या व सावित्रीमाय साठी. अन्यथा या जगाचा मी केव्हाच निरोप घेतला असता. या जगात माझ्या साठी काहीच शिल्लक नाही. विधात्याने माझ्या साठी खूप मोठं दान दिलं होतं पण मला ते घेता आलं नाही. त्याचाच शाप मला नडला व त्या रात्री मला शिक्षा मिळाली. ती तिचीच हाय होती. म्हणुन मी आता लग्न करणारच नाही. "
पण सदा अण्णाला आता पुन्हा धुगधुगी जाणवू लागली. दोन्ही अण्णा सनावदला गेले. अंजना मॅडमची भेट घेतली.
सुरवात कशी करावी समजेना. सदा अण्णांनीच कोंडी फोडत सुरवात केली.
" माई झालं ते वाईटच. आपल्या वर काय बाका प्रसंग गुदरला, त्याचं दुःख काय हे आपणच जाणता. आम्हाला ते कळणारही नाही. पण झालं ते मागं टाकत पुढं काय हे पाहायचं असतं जुन्या जाणत्यांनी".
"अण्णा सांगायचं काय मोकळं बोला" अजंना मॅडम बोलल्या.
"माई अथर्वरावांचं वाईटच झालं पण आता विधीबाबत आपण काय ठरवलं? ".
" अण्णा पोरीची काळजी खूप हो. तेच सुचत नाही. शिवाय तीचं विमनस्क होणं.. "
" माई आम्ही पण तेच म्हणतोय की... "
" अण्णा स्पष्ट सांगा हो"
" माई विधीचं दुसरं लग्न... "
" अण्णा आपण थोर बंधुच. आपण जे ठरवाल ते समजून उमजून. कारण मुलबाळ नसतांना नादान पोरीनं पुरी हयात कुणाच्या हिमतीवर काढायची"
" माई म्हणुणच आपली परवानगी घेण्यासाठी आलोय आम्ही. कारण दुःखं तर मोठचं त्यात नाजुक विषय कसा काढायचा आम्ही. कारण विधी आता तुमची मुलगी"
"अण्णा विधीनं काय सोसलंय मला माहीत आहे. या रावतेंनी तिचं शोषणच केलंय. कारण माझा मुलगा असला तरी... "अंजना मॅडम रडायला लागल्या.
अण्णांनी आवेग कमी झाल्यावर मग अंजना मॅडमला आलोक बाबत सांगताच अंजना मॅडमनं संमती दर्शविली.
आलोकनं विधीला दवाखान्यात बेशुद्ध अवस्थेत पाहिलं तेव्हा त्याच्या काळजात चर्र झालं होतं. पण सारा प्रपात काळजात दाबत त्यानं निरोप घेतला होता. परत येताच संस्थेनं त्याला अचानक दिल्लीला पाठवलं होतं. दिल्लीला एका प्रोजेक्टसाठी सहा महिन्यासाठी त्याला जावं लागलं. एरवी अण्णा व माय साठी त्यानं नकारच दिला असता पण विधीची अवस्था पाहून त्याला आता कशातच चित्त लागेना म्हणून तो सरळ दिल्लीला निघून गेला होता. अंजना मॅडमचा होकार मिळताच चिंधू अण्णा व सदा अण्णा परत फिरले.चिंधू अण्णा सरसोलीला परतले व आलोक दिल्लीहून परत आला.
सदा अण्णा कडं त्यानं विधीची चौकशी केली. अण्णांनी विधी प्रकरणात आश्लोकनं कशी मदत केली ते सारं सांगितलं. पण आश्लोकचं नाव ऐकताच त्याला कडवट चवीची अनुभूती जाणवायला लागली.
"पोरा विधीची अवस्था वाईट आहे. ती कुणालाच ओळखत नाही. नुसतं चालणं फिरणं इतकंच".
"कुठं आहे ती सद्या?" आलोकनं विचारताच अण्णाला हुरुप आला.
"चालायचं का उद्या तिला पहायला, सरसोलीला?आलोक तु लग्न कर असं मी मुळीच सांगणार नाही पण आता तुला खरी विधीची गरज आहे.विधीला नाही. विधीनं तुझी आशा सोडलीय. पोरा अंजना मॅडम चिंधु अण्णा यांनाच काय पण आता त्या विधात्याला देखील वाटतंय की तू विधीला स्विकारावं. पण प्रश्न फक्त इतकाच आहे की विधी स्विकारेल का तुला?" आलोक आता उन्मळून पडला.ढसाढसा रडतच तो आक्रंदला
" अण्णा तिला स्विकारावंच लागेल या ह्रदयात तिनं भिज ओल सोडलीय तर पेरा ही तिलाच करावा लागेल. "
दुसऱ्या दिवशी सदा अण्णा सावित्रीमाय व आलोक सरसोलीला निघाले. चिंधू अण्णाला इतक्या लवकर आलोक येईल हे अपेक्षित नव्हतं. त्यांनी हसतच साऱ्यांना बसवलं. विधी वरच्या मजल्यावर होती. सारे जण वरती जाताच. विधीनं एकटक साऱ्यांना न्याहाळले. व ती परत शुन्यात परतू लागली. तोच मागे कोण उभं.? तिची शुन्यातील नजर वेधक भेदक झाली. व लगेच क्षणात तोंड फिरवत तीच्या गालावर आसवं चमकू लागली.
आलोक पुढे सरसावला तशी ती उठली व खिडकीकडे जाऊन बाहेर पाहू लागली. आलोक जवळ जात
"विधी!"
".........."
"तुझ्या मिठीत विसाव्यासाठी हा आलोक दुसऱ्या जन्मापर्यंत थांबणार होता. पण नियतीला दया आली बघ, आता मात्र तू कठोर बनू नकोस"
तोच ह्रदयात कोंदून ठेवलेला उमाळा फुटला.
आणि...
आणि....
गिरणा मायेच्या पात्राला पहिल्याच वळवाच्या महापुराच्या पाण्यानं सैरावैरा धावत गिळावं,
क्षितीजाच्या सांदित दिसणाऱ्या छोट्याश्या कृष्णमेघानं क्षणात मेघडंबरी व्यापत घनघोर वर्षावं
तसच रडत रडत ती पळतच त्याला गच्च आवळत, बिलगत"आलोक!," आलोक!, आलोक मी सोडलेली भिज ओल प्रितीची ऋजूवात न करताच अशी फुका जाणारच नाही या आशेवर तर मी मरत मरत जगत आलेय रे".मुका संवाद रडत रडतच सुरु झाला.